अनुला कधी झोप लागली कळलंच नाही ...सकाळी उठली आणि लगबगीने तयार होऊ लागली आज ऑफिस होत ..सगळे खाली नाश्त्याच्या टेबल वर होते
"गुड मॉर्निंग ...."-साहिल
"गुड मॉर्निंग ...काय रे काही खास बातमी .."-अनु
"नाही ग तेच ते ...बाकी काही नाही ...."-साहिल
"अनु पाय कसा आहे आता ..मला कला सगळं .नाही ते उद्योग करत जाऊ नकोस .."-मोहन थोडासा दरडावून .श्रेया बघत होती फक्त .
"आर दादा एवढं काही नाही झालं ....थोडासा लागलाय ....आत्ता न मला जाम भूक लागलीये ...आई ये आई उशीर होतोय ग होतो."-अनु
"ये ,मध खास काहीतरी चालू आहे ....वाहिनी हं न आत ..नाक आज दादासाठी खास बनलाय म्हणू वेळ लागतोय .."-श्रेया
"ये गप ग सार्क सारखं मा ना काय घेतेस ?"-मोहन
"अरे तुझीच बायको आहे स्वयंपाकघरात .....बोलावं न तिला बघ पटकन येईल ....का हाक मारतोस रे ..मनू हो न ..मनू "-श्रेया खूपच चिडवत होती ..साहिल आणि अनु पोट धरून हा हसत होते ..मोहन न उठून तिचा कान पकडला तेवढ्यात आई आणि मृणाल आले ...
"अहो ,काय हे ?\"-मृणाल ..
"ये काय चाललंय सकाळी सकाळी सुरु होता तुम्ही .."-आई ..
"हिला सांग जास्तच तोंड आली तिला ..काही हि बोलत असते .."-मोहन
"ये नाही या आई .काही हि काय .... मी फक्त एवढाच म्हणाले कि भूक लागली आहे तर तुझ्या मनूला बोलावं लवकर नाश्ता घेऊन ..."-श्रेया ..मोहन परत येऊन जागेवर बसतो .. श्रेया हळू हळू एक एक शब्द जोर देऊन म्हणत होती ..आबा हि आलेलं असतात ....आणि हसायला लागतात ...मृणाल तर आत पळून जाते ...
"वाव ढोकळा ..मस्त च रे ...."-श्रेया आणि अनु एकदम .....
"हे बघ हे ..खादाड खाऊ
"ये गप रे खाऊ दे ..मस्त झालंय .."-अनु ..वाहिनी छान झालंय ग "-अन अनु
सगळे खाऊन उठतात ..साहिल अनु निघता निघतात,श्रेय हि निघत असते. जात जात परत म्हणते
"वाहिनी खूप छान झालंय बार का ..आमच्या सगळ्यांकडून loving gगिफ्टदादा देईलच तुला "-आणि ती पळते मोहन तिथून पेपर फेकून मारतो तिला आणि रूम मध्य जातो. आई आन आबा हसत असतात खूप .....
अनु ऑफीसा ला येऊन पोहचते ..आज च्या बऱ्यचश्या बातम्या ची ती ऑनलाईन माहिती काढात असते
...तिला केदार चा कॉल येतो
"मे आय कम इन सर ."- अनु
"एस प्लिज ...मिस पाटील आज तुम्हाला एक प्रेस कॉन्फेरंस अटेंड करायची आहे "-केदार
"ओके sir ."-अनु ..आणि ती निघायला लागते ..
"तुम चा पाय कसा आहे ?\"-केदार
"आता बर आहे ....much better .."-अनु
"मी डिटेल्स तुम्हाला मेसेज करतो .."-केदार ...अनु निघते आणि डेस्क वर येऊन तयारी करते
"हेय अनु ,कशी आहेस ?\"-रेवा
"मी गुड ..u say ....काय नवीन .मूड ऑफ आहे का "-अनु
"नाही ग असं काही नाही ..... थोडासा काम चालू आहे "-रेवा .
अनुला जाणवत कि काहीतरी बिनसलंय ..पण ती विचारात नाही ...तिच्या फोन वर केदार चा मेसेज येतो .....प्रेस कॉन्फेरंस च ठिकाण आणि व्यक्तीच नाव वसा वाचून ती शॉक होते ..हि कॉन्फेरेंस युगराज धर्माधिकारी ची असते .....तिला मनातून खूप आनंद होतो ...ती अगदी वेळेवर पोहचते. पत्रकारांना बसण्यासाठी विषेश सोय केलीली असते ....बाकी हि पत्रकार तिथे असतात ....अनिका हि त्यांच्यात जाऊन बसते ..थोड्याच वेळात बाहेर गाड्या चा ताफा येतो ..काही बॉडी gaurds आधी येतात ...आणि मग नंतर एक उंचपुरा handsome तरुण हि येतो,युगराज धर्माधिकारी ........,काळ्या रंगाच्या सूट मध्ये तो एकदमच भारी दिसत असतो ..हातात मोठं घड्याळ ...डोळयांवर गॉगल्स ...गोरा गोरा पान ...बघताक्षणी कोणीहि प्रेमात पडेल असा..एखाद्या कथेतल्या राजकुमारासारखा ......समोर स्टेज वर त्याच्या बसण्यासाठी खास व्यवस्था होती आणि तो त्यावर येऊन बसतो ....एक जण येऊन माईक चा ताबा घेतो ....
"इथं उपस्थित सगळ्या पत्रकारांना नमस्कार ,आज तुम्ही इथं आलात त्यासाठी आभारी आहोत ....मिस्टर धर्माधिकारी तुमच्याशी आता बोलणारच आहे पण त्याआधी मला एवढाच सांगायचं आहे कि एकावेळी एक असे प्रश्न विचारा,तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील पण आधी धर्माधिकारी साहेबांचं ऐकून घ्या .."- तो व्यक्ती
युगराज धर्मधिकारी बोलायला सुरु करतआत "नमस्कार ,आज तुम्ही आलात त्यासाठी धन्यवाद .....मी आज इथे ईश्वरी हॉस्पिटल च संदर्भात बोलणार आहे . हे हॉस्पिटल माझ्या आईच स्वप्न होत ...इथे अनेक गरजूंच्या मोफत इलाज होतो ..परवा रात्री ह्या हॉस्पिटलला आग लागली आणि त्यात मालमत्तेचं बरंच नुकसान झालं . दुर्दैवाने काही लोकांनीही आपले प्राण गमवावे लागले पण त्यांच्या कुटुंबियांना आम्ही मोबदला दिल आहे... ....ह्या आगीची करणे आद्यपही समोर आलेली नाही ...."-युगराज बोलत होत.. नंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरवात केली
"हि आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असा समज पसरवण्यात येत आहे ..पण त्यामागे नक्कीच दुसरं कारण असू शकत असं तुम्हालाही वाटत का?"-एक पत्रकार
"त्याची तपासणी आजून सुरु आहे पण प्राथमिकी माहिती आणि दृश्य बघता हे शॉर्ट सर्किटच आहे ...असे निदर्शनास आलं आहे ."-युगराज ..
"त्यादिवशी तुम्हीही तिथेच होता,आग लागण्यापूर्वी होता कि नंतर आला होता आणि जर तुम्ही नंतर आला तर तुम्हाला हि माहिती कधी आणि कशी मिळाली "-दुसरा पत्रकार
"नाही मला एक निनावी फोन आला होत कि हॉस्पिटलच्या ५ मजल्यावर आग लागली आहे ..आणि मी तडक हॉस्पिटलसाठ निघालो ."-युगराज
"मिस्टर धर्माधिकारी नेमक्या त्या रूम ला आग लागली किन्वा अस म्हणू कि आग लावली गेली जिथे महत्वाच्या फाईल्स होत्या हा एखादा कट हि असू शकतो .नाही का ?"-श्रीधर ..अनिका च लक्ष त्याच्याकडं जात तिने आधी श्री ला पाहिलेलाच नसत
"काय आहे न आगीला माहित नव्हता बहुतेक कि तिथे महत्वाच्या फाईल्स आहेत (जोक करत )..तपासणी सुरु आहे लवकरच काय ते कळेल .."-युगराज थोड्या कडक स्वरात ..
"बाहेर अशी चर्चा आहे कि हि आग मुद्दाम लावली गेली तिथलं सत्य दाबण्याकरता ....ह्या हॉस्पिटल मध्ये बरेच गैरव्यवहार होतात "-अनु ,बोलत होती सगळे अवाक होऊन तिच्या बेधडक प्रश्नाकडे बघत होते ...युगराज हि एकटक तिच्याकडे रोखून बघत होता ...त्याच हि कााटवकाा
"असं काय सत्य दडलंय तिथे कि त्यासाठी लोकांच्या जीवाची सुद्धा परवा केली नाही ...आणि मोबदला देऊन काय ती मानस परत येणार आहेत का ? "-अनिका थेट सवाल करत होती तिच्या डोळ्यात करारी पणा होता ....कडक एकदम ...आज दोन विजा बहुतेक एकमेकांशी भिडणार होत्या वातावरण बदलत होत ...युगराज चेहऱयावर हलकं हसू आणत
" मोबदला देऊन माणसांचा जीव परत अनु शकत नाही हे माहित आहे मला पण आर्थिक मदत करून त्या कुटुंबाला सावरण्यासाठी थोडासा आधार निश्चित देऊ शकतो असं वाटत म्हणून जशी जमेल तशी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मी पुनः एकदा सांगतोय कि आग काही लागली किंवा लावली गेली ह्याच शोध सुरु आहे ...तिथे जे काही ते सगळ्यनासमोर आहे.काहीही लपवलेलं नाहीये...म्हणजे मला माहिती आहे तेवढं तरी निदान... माझ्या अपरोक्ष जर काही असेल तर ते मी तुम्हाला नाही संगु शकत कारण ते मलाच माहित नाही ..आणि मला वाटत कि दडलेलं रहस्य एक पत्रकार जास्त चांगल्या प्रकारे समोर आणू शकतो नाही का? ...तेव्ह तुम्हाला जर काही कळलं तर मलाही नक्की सांगा ....."-युगराज डोळयांवर परत त्याचा का गॉगल चढवतो आणि त्याच्या अंगरक्षकाला ला इशाराकरतो ,प्रेस कॉन्फेरंस संपवण्याची ....वातावरण अजून तापेल म्हणून ती प्रेस कॉन्फेरंस तिथेच संपवण्यात येते ......
"सरांना जे सांगायचं होत ते सांगितलेलं आहे ...तुम्ही इथं आलात आणि शांततेत ऐकून घेतलं त्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद ...."-ती व्यक्ती. युगराज खुर्चीतून उठतो हात जोडून नमस्कार करतो आणि तिथून बाहे पडतो ....अनु त्याच्याकडे बघत असते
तो समोरून निघून जातो ..
"अनु काय मग कशी वाटली पहिली भेट ?"-श्री हातानेच तिला चालत चालत बोलण्याचं इशारा करतो ते दोघे चालत चालत बोलत असतात आणि बाहेर गेट जवळ येतात
"खरं म्हणजे हि आमची पहिली भेट नाही.त्यानं ओळखलं नसेल कदाचित पण मी विसरले नाही ह्या आधी मी ह्याला भेटलेय पण तेव्ह माहित नव्हतं कि हा एवढा मोठं असामी आहे ...."-अनु हसतचम्हणते ..
"हो ,कुठे ?"-श्री
"आरे मागे नाही का झोपडीतआग लागली होती तेव्हा ह्यानेच मला वाचवाल होत .."- अनु
"अरे बाप रे म्हणजे तुमच्यातला हा आगीचा खेळ जुना आहे तर ....दोन्ही प्रकारात आग आहे..तुमच्यातली आग वाढू नये म्हणजे झालं "-श्री गालातच हसत बोला होता. अनु ला काही कळलं नाही ..
"म्हणजे ?"-अनु
"काही नाही बस तुला सोडतो ..सांभाळू राहा ..तू फार बेधडक प्रश विचारलेस ..वाघाच्या जबड्यात हात घालणं बार नव्हे .."-श्री काळजीने बोलतोय हा तिला समजत होत .....
ती श्री च्य बाईक वर बसते आणिमग तो तीळ ऑफिस ल सोडतो.खाली उभं राहून दोघेही गप्पा मारत असतात ...केदार ची नजर जाते त्याला दिसत अनु एका मुलाबरोबर म्हणजे श्री बरोबर बाईक वर बसून आलेली आहे अन हसत खिदळत गप्पा मारात होती ते ...