अनिका 21

Anika knows the name of that person whom she was searching ...

https://www.irablogging.com/blog/anika20_6170

भाग २० साठी वर कळी करा ...

पार्ट २१ 

केदार न कार ऑफिस पार्किंग मध्ये लावली ...अनिका उतरून ऑफिस मध्य चालू लागली  .तिचा पाय दुखत होता ..

"मिस पाटील तुम्ही ठीक आहात का ?"-केदार 

"हो सर ,"-अनु 

ते दोघे हि ऑफिस मध्ये येतात ..पंडित  सर,मोनिका ,ऋचा केतन असतात .केदार डिरेक्टली पंडित सरांच्या केबिन मध्ये जातो ..अनु तिच्या डेस्क वर जाऊन बसते ..तिने मोबाइल मध्ये काढलेले फोटोज आणि व्हिडिओस ती डेस्कवर वर असलेल्या लॅपटॉप मध्ये सेव्ह करत होती ..तिला अजूनही काही फोटो आले होते ..ते पण ती बघत होती त्यात तिला केदारचा फोटो दिसला ...तो एक मुलीला वाचवत होता ....हा फोटो तिने क्लिक केलं नव्हता ....तिला तो त्याच्याचकडून आला होता ज्याने हि बातमी दिली होती ....ती सगळं डेटा त्यात सेव्ह करत होती ..

"मॅडम ,हे घ्या .."-ऑफिस मधल्या  राजू ने तिला एक पाण्याचा ग्लास आणि गोळी आणून दिली .

"हे काय  आहे?"-अनु 

"केदार सरानी तुम्हाला द्यायला सांगितले आहे .."-राजू ते देऊन निघून गेला ..तीच पाय जास्त दुखू नये म्हणून तिला एक पेन किलर दिली होती ...तिने पण ते घेतलं आणि काम करू लागली ..तिला पंडित सरानी केबिन मध्ये बोलावले 

"अनिका या या ...तुम्ही इतक्या उशिरा इथे काम करत आहात बघून छान वाटले ..बसा ...कश्या आहात ?"-पंडित सर 

"मी ठीक आहे सर .... आणि प्लिज अहो जाहो नको ...इथे असण्याचं म्हणाल तर ते माझं काम आहे ... अँड आय एम फाईन विथ इट .."-अनु  हसून बोलली ....केदार न्यूज रूम मध्ये होता ,मोनिका घरी गेली होती.

"तुम्हाला काय अनुभव आला ..काय वाटत आहे ....? काय माहिती मिळाली? "पंडित सर 

"सर मला वाटत कि हे शॉर्टसर्किट नसावं ....कारण अचानक अशी कशी आग लागू शकते ...ते हि त्याच मजल्यावर जिथं खूप साऱ्या फाईल्स आहेत ..आणि तेही त्याच रूम ला ..हा सगळं योगायोग कसा असू शकतो .....सर मी काही फोटोज काढले ते आपल्या साठी कामाचे आहे ..."-अनु 

"ओके nice ..जी शंका तुम्ही मांडली आहे त्याबाबत अजून माहिती लागेल आपल्याला. आपल्याला..पुरावे लागतील ...सध्या आपण ह्या हॉस्पिटलच्या बाबतीतील सगळी माहिती जे कि उपलब्ध आहे ती रन करतोय ....शिवाय केदार न हि दुसरं अँगल काढलाय ...आणि तुम्ही म्हणताय तस असेल तर कदाचित कुठं न कुठे केदारची आणि  तुमची शंका मिळती जुळती आहे अस वाटतंय ...तुम्ही काढलेले फोटो टीम सोबत शेअर करा .."-पंडित 

"एस सर माझं तेच काम चालू होत ..."-अनु निघू लागली 

"मिस पाटील .तुम्ही हे फोटोज केदार कडे पण देऊ शकलं असता पण तुम्ही इतक्य रात्री त्यासाठी ऑफीसा मध्ये आलात .."-पंडित सर प्रश्नार्थक नजरेने ...

"नाही सर माझं थोडं अजून काम होत जी शंका माझ्या मनात आहे त्याबद्दल मला search करायचं आहे..कारण माझ्या माहितीप्रमाणे हे जाणूनबुजून केलं गेलं आहे ....आणि अजून एक कामआहे ..हे बघा .."-तीन एक फोटो पंडित सर ना दाखवला ..त्यांचा चेहऱ्यावर हलकेच हसू आलं आणि त्यांनी अनु कड पहिले ....

इकडं केदार त्याच्या केबिन मध्ये त्या हॉस्पिटलची सगळी जुनी नवी माहिती फॉरमॅट करत होता   ......

अनु डेस्क वर येऊन बसली. सकाळचे ४ वाजले होते .. तिचे डोळे झाकले जात होते खूप थकली होती ती ....तीन डेस्क वर डोकं ठेवलं आणि तिला डुलकी लागली ..केदार सुद्धा जास्तच थकला होता ....चेअर वर हात मागे करून सगळं आळस झटकला ....अन उठून पाय मोकळे करावे म्हणून काचेजवळ उभंराहिला..त्याच्या केबिनच्या काचेमधून खाली सगळे डेस्क दिसत होते ..त्यातच एक अनिका च डेस्क होत आणि ती त्यावर डोकं ठेवून झोपली होती .जवळ जवळ ५ ते १० मिन तो तिच्याकडं बघत होता ....त्याच फोन वाजला आणि तंद्रीतून तो बाहेर आला ....इकडे अनु ला जाग आली आणि ती परत कामाला लागली  ... तिने ते फोटो न्युज रूम मध्ये बॅकस्टेज दिले म्हणजे न्युज देताना ते क्रमाने रन करता येतील ....त्यात तिने पंडित सर ना दाखवलेलाफोटो  पण होता ..  त्या फोटो साठी खास असा एक caption तिने दिल होत ....तो केदार चा फोटो होता. एका मुलीला वाचवताना ..तिने त्यासाठी पूर्ण एक न्युज तयार केली होती ..आणि ती सुद्धा केतन कडे दिली होती पंडित सरांच्या ऑर्डरप्रमाणे ....कारण सकाळची न्युज केतन देणार होता...तिने जे फोटो शेअर केले त्यात फार closely आगीचे आणि तिथे झालेल्या नुकसानीचे दृश्य होते ...

तीच सगळं काम होत आलं होत .सकाळचे ६ वाजले होते ...बातमी ७ वाजता रन होणार होती ...सगळी तयारी झाली होती ....तिने सहज म्हणून सगळं रिपोर्ट वाचला जो कि केतन न्यूज मध्ये देणार होणार होता ..वाचता वाचता तीच लक्ष त्या हॉस्पिटलच्या माहितीकडे गेलं ...."ईश्वरी" हॉस्पिटल खूप जुने जवळ जवळ ३५ ते ४० वर्ष जुने हॉस्पिटल,आधी फक्त general वॉर्ड होता पण एक छोट्या दवाखान्याच एवढं मोठ्ठ हॉस्पिटल मध्ये रूपांतर झालेलं होत ...हे हॉस्पिटल "युगराज धर्माधिकारी  "च होत ....

हे नाव वाचताच तिला काहीतरी आठवलं ,"युगराज धर्माधिकारी  .."-नाव कुठेतरी ऐकलंय ..पण कुठे ?"-अनु ..तिला लक्षात येत नव्हतं हे नाव कुठं वाचलंय ते .....ती थोडा विचार करू लागली आणि पुढे वाचू लागली ...हॉस्पिटलचं कारभार खूप छान चालला होता .. अनेक मोठे surgeon त्या हॉस्पिटल मधेय येत असत ,मोठं मोठया शत्रक्रिया हि तिथं पार पडत असत ..त्या हॉस्पिटलचे अधिकार हे "युगराज धर्माधिकारी" ह्यांच्या कडे होते ..एवढ्या मोठया हॉस्पिटलची समाज सेवा हि चालू होती ..त्यांच्याकडे महिन्यातली प्रत्येक शनिवारी अनाथ मुलांसाठी कार्यक्रम असायचे ...ते मोफत सगळंचेकअप पण करून द्यायचे आणि जर काही मोठं शत्रक्रिय असेल तर ती पण विनामूल्य व्हायची  ......एकंदरीत हे एक नावाजलेले  हॉस्पिटल होत ..अनु पुढे वाचत होती आणि वाचत वाचता त्यात तिला एक फोटो दिसला जो रन होणार होता..   ती जागीच थबकली ....कारण  हा त्याच व्यक्तीच फोटो होता ज्याने तिला वाचवलं होत ,ज्याला तिने  हॉस्पिटल मध्ये बघितलं होत ... आणि ज्या ती शोधात होती आणि खाली नाव वाचल ,

"युगराज धर्माधिकारी.."-

"मीस पाटील .."-तिच्या मागून केदार न आवाज  दिला 

तीन मग वळून बघितले ....फाईल बंद केली ."एस,सर ...."-अनु 

"कस वाटतंय आता ?"-केदार 

"मी ओके ...."-तीन हसून उत्तर दिले ..पण डोक्यात युगराज बद्दल कुतूहल होत ...तेवढ्यात केतन ने तिच्याकडू फाईल घेतली आणि न्यूज रूम मध्ये  गेला..

सगळे खाली कॉमन डेस्क जिथं असतात  तिथे म्हणजे जिथं रेवा,अनु ,ओमी बाकी सगळी स्टाफ च cubical आहेत तिथं जमले होते न्यूज बघायला ....तिथं मोठ्ठा एक टीव्ही लावलेलं होता ...जिथं daily प्रत्येक शो रन व्हायचे ....केतन प्रत्येक बातमी  छान देत होता ..आणि शेवटी त्याने अनु ने तयार केलीली बातमी वाचली आणि मागे केदारचा फोटो आला ..

केदार ला हा आश्चर्याचा धक्का होता ..

"आज पुन्हा एकदा आपल्याला माणुसकीच दर्शन ह्या फोटोतून होतंय ....आचे सिनियर न्यूज रिपोर्टर केदार ह्यांनी आज आपल जीव चा धोका पत्करून एक मुलीचा जीव वाचवाल आहे ..ज्या हॉस्पिटलला आग लागली होती तिथे हि मुलगी अडकून पडली होती आणि तिच्या आवाजाकडं आमच्या  सिनिअर रिपोर्टर च लक्ष गेलं आणि त्यानं आपल्या जीवा ची पर्वा न करता त्या मुलीला वाचवलं आणि तिच्या आईकड सोपवलं .."-केतन ..केतन बोलत होता आणि सगळ्यान तिथं टाळ्या वाजवून केदार च अ भिनंद केलं .....अनु ला हि खूप आनंद झाला होता ...ती पण हसत होती ...केदार त्याच्या केबिन मध्ये गेला ...अनु हि निघण्याच्या तयारी होती... तिला केदार ड्रॉप करणार होता ....पंडीत सर  घरी गेले  होते आणिअनुला आणि केदार लआज सुट्टी देण्यात आली होती ...

दोघेही निघाले ..अनु च्य डोक्यात युगराज बद्दल विचार चालू होते ..

"मिस पाटील काय झालं खूप शांत आहात ?कसला विचार करताय ?आजून एखादी बातमी मिळाली का?"-केदार हसून विचारात होता 

"ह ..नाही काही नाही असाच ...."-अनु ... 

"बाय the वे ..माझा फोटो तुम्ही केतन ला दिला ...कधी काढलात फोटो "-केदार 

"हो ,असाच मी जेव्ह आत आले तेव्हा ...."-अनु 

"मिस पाटील हा नक्की तुम्हीच काढलं का ? नाही म्हणजे जेव्हा मी त्या मुलीला वाचवत होतो तेव्हा तुम्ही तिथे नव्हता.... "-केदार 

 एवढ्य कामात हि त्याच लक्ष चोफेर असत हे बघू तिला कौतुक वाटलं ,थोडा विचार करून .".माझ्या एका मित्राने शेअर केला .."-अनु नजर चोरत आणि बाहेर बघत बोलली ...

 केदार हसला.तीच घर आलं होत .त्याने गाडी साईड ला घेतली ...अनु उतरणार तेवढ्यात 

"मिस पाटील थँक you ..तुम्ही ज्या पद्धती माझा फोट टाकून हि बातमी दिली त्यावरून आप उगीचच आत होतो हे कोणालाही वाटणार नाही ..छान ..आणि तुम्ही जे काम केलत ते खूप कौतुकास्पद आहे ..."-केदार 

"सर ते माझं काम होत आणि तुम्ही खरच चांगलं काम केलं ते ता जगासमोर यायला हवं ना..you deserve it ...... गुड डे ."-अनु न दार लावला आणि ती घराकडे वळली ...ती जाईपर्यंत केदार तिथं होता आणि मग तो गेला ..

साहिल नुकताच walk घेऊन आला होता ....

 "हाय ,गुड मॉर्निंग .."-साहिल 

"गुड मॉर्निंग ..ती हळू हळू चालत होती ..आतमध्ये आली तेवढयात आई पण आली ..

"काय ग ...काय काम सुरु असत ग बाई एवढं...चेहरा बघ कसा झालाय .."-आई ने सुरु केलं 

"आई थांब आग ,आल्या आल्या काय सुरु करते तिला बघ एकदा . बसू तर दे ."-साहिल 

"हं ,काय रे नाही तेव्हा भांडंत असता ,पण दुसरं कोणी काही बोललं तर खपत नाही तुम्हाला ....काय मग चहा घेणार का ?"-आई ..

"नको ग आई मी झोपते जरा "-अनु आणि ती उठायला गेली तर पाय दुखाला ,तिचा हा पायाकडे गेला .. 

"हे बाई अनु , हे काय झालाय? .तू अशी का चालते स ..?"-आई 

"अनु काय झालंय ..खूप लागलाय का कुठे ? चल डॉक्टर कडे जाऊ "-साहिल 

 "अरे थांब काही झालं नाहीये मला ..एक रॉड लागलाय फक्त म्हणून पाय दुखतोय आणि मी गोळी घेतली आहे ..तसाच काही वाटलं तर सांगते जाउ आपण डॉक्टर कडे ..."-अनु दोघांना शांत करत बोलली ....

"ठीक आहे ..जा तू फ्रेश हो मी हळदीचं दूध पाठवते आणि थोडं खाऊन मग झोप .."-आई 

अनु ने मान डोलावली आणि ती वर जाऊ लागली 

"ये अनु ,बाकी कालची बातमी छान कव्हर केली बर का तुम्ही ...हे बघ आज तुझ्या बॉस च फोटो आलाय पेपर मध्ये .."-साहिल तिला म्हणत होता ...

तिने हलकेच smile दिली आणि वर जाऊ लागली तिला काहीतरी आठवलं ..."हि बातमी श्री न आपल्याला दिली आणि हा फोटो पण ..मागे जेव्हा आपण त्या ऑफिस मधेय काम करत होतो तेव्हा श्री कडून आपण  "युगराज च नाव ऐकलं होत ..." हा बरोबर.." ती स्वतःशीच पुटपुटत होती तेवढत समोरून श्रेया आली, 

"काय बरोबर ?काय बोलतेस ? बरी आहेस न ?"-श्रेया 

आपल्या तंद्रीतून बाहेर निघत "हं थकले आहे ..पडते जरा वेळ .."-आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली ...

अनु न पटकन हात पाय धुतले कपडे बदलले ..आणि बेड वर विचार करतच तिला झोप लागली ...

🎭 Series Post

View all