( आतपर्यंत आपण पहिले कि अनु आणि केदार ऑफिस पार्टी मधून तडकाफडकी बाहेर पडतात ....एका ७ मजल्याच्या नावाजलेल्या जुन्या हॉस्पिटल आग लागली असते ...तिथे आत घुसुन हे दोघे माहिती जमा करतात ...आणि आत पुढे ..)
https://www.irablogging.com/blog/anika19_6100
भाग १९ साठी वर क्लिक करा ..
"तू ?"-केदार
"तुम्ही दोघे इथे काय करत आहात? आत कसे आलात "-इन्स्पेक्टर विजय
"हे बघ कसे आलो ते जाऊ दे पण आता बाहेर काढ .."-केदार .इन्स्पेक्टर विजय हा केदार चा मित्र होता .
"नाही ,एक म्हणजे तुम्ही यायला नाही पाहिजे होत ...तुला कळत नाही का ?आपल्या चॅनेलच टी आर पी वाढवण्यासाठी काहीही करता तुम्ही .."-विजय
"ओह एक मिनिट आम्ही खर तेच दाखवतो ..आणि तुम्ही लोक माहिती लपवता म्हणून अशी माहिती काढावी लागते "-अनिका तिरस्काराने बोलत होती
"हो का , आम्ही शोध पूर्ण झाल्यावर सांगतो तुमच्या सारखं नाही एक एक मिनिटच सगळं काही त्यामुळे किती गैरसमज होतात माहिती आहे का ? आणि अजून एक मी आता तुम्हाला अरेस्ट करू शकतो ...."-विजय
"विजय ,विजय प्लिज यार ,ठीक आहे न आता सोड न .."-केदार
"सर ,तुम्ही "-अनु काही बोलणार तेवढयात
"मिस पाटील लेट मी talk ....प्लिज "-केदार दरडावून ..मग अनु गप्प बसते पण डोळ्यात तिरस्कार असतो ..
" विजय प्लिज माझ्यामुळे तुमच्या कामात अडचण येणार नाही नक्की ..आणि मला मिळालेली माहिती मी क्रॉस चेक करेन तुझ्याशी "-केदार .
"ठीक आहे .चल ह्यावेळेस जाऊ देतो ...पण ह्या मॅडम ला समजवा कस बोलायचं ते .. पोलिसांवर बिनबुडाचे आरोप करायचे नसतात हे माहित नाही ह्यांना बहुतेक ..."-इन्स्पेक्टर विजय रागात आणि मग तो त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो ...आणी दोघे बाहेर पडतात ...
"मिस पाटील कुठे काय बोलायचं ते कळत नाही का तुम्हाला ..?'-केदार बाहेर आल्यावर ...अनुने फक्त एक कटाक्ष टाकला तिच्या डोळ्यात राग दिसत होता पण ह्याच्याशी काय वाद घालायचा म्हणून ती गप्प होती ...केदार ने कॅमेरामन आणि बाकी टीम ला सूचना दिल्या आणि ते दोघे तिथून गाडी कडे वळले ..अनिका त्याच्यामागे हळू हळू चालत होती ....केदार गाडीजवळ आला तोपर्यंत हळू हळू अनु पण आली ....ती कार मध्ये बसली तेवढ्यात केदार तिच्या साईड ला येऊन उभा राहिला तीन प्रश्नार्थक नजरेने त्याच्या कडे पहिले ..केदार डोळ्यानेच तिच्या पायाकडे इशारा केला .अनु तशीच होती दोन मिन . तिच्या पायल लागला आहे आणि तिला त्रास होत आहे हे केदारच्या लक्षात आलं होत ..
"मिस पाटील ,तुमच्या पायाला लागला आहे न ..पाय इकडे करा प्लिज "-केदार
"नाही ठीक आहे मी ..घरी जाऊन बघेन ..."-अनु
"मिस पाटील ..आपल्याला घरी जायला उशीर होणार आहे ..तोपर्यंत हे दुखणं जास्त वाढेल .....सो आय request you .."-केदार तिच्या कडे बघत बोलत होता ,त्याच्या हातात फर्स्ट aid बॉक्स होता ..अनिका ला काय करावं कळत नव्हतं,पाय तर खूप दुखत होता ,तिने तिचा पाय कार च्या बाहेर काढला..
केदार ने परत डोळ्यांनीच खुणावलं पँट्स थोड्या वर घेण्यासाठी...
अनु ने काळजीपूर्वकथोडीशी पॅन्ट वर घेतली तिच्या पाय ला चांगलच लागल होत ...केदार ने क्रीम हातात घेतला आणि पाय ला लावायला गेला पण त्याच हात तिथेच थांबला ...अनु ची नजर अजूनही खाली होती ती त्याचायकडे बघत नव्हती ...केदार ने एकदा तिच्याकडे बघितलं "रिलॅक्स मिस पाटील ..काही होणार नाही ..मी आहे न ...त्याने हातातलं क्रिम ठेवून दिला आणि तिच्या पायावर स्प्रे केला ...."-आणि बॉक्स गाडीत ठेवून ड्रायविंग सीट वर येऊन बसला ...अनु च्या पायाला हात न लावता त्याने तिच्या दुखण्यावर इलाज केला होता ..अनु हलकेच हसली आणि दार लावून घेतलं ..ते दोघेहि आता निघाले होते ..बराच वेळ ते दोघे काहीच बोलले नाही ..खूप उशीर झाला होता ..जवळपास २ वाजले होते ..
अनु चा फोन वाजला ..
"हॅलो ,कुठे आहेस ?"-साहिलचा फोन होता
"हो निघालो आहे ..थोड्यावेळात पोहचेन ...आल्यावर कॉल करते "-अनु ने फोन ठेवून दिला ..परत शांतता ...
"घरून फोन होता का ?"-केदार नेच विषय काढावा काहीतरी म्हणून विचारले ...
"हो,साहिलचा होता .."-अनु माझा भाऊ ...
"हो ..आय know ....तुम्ही ओळख करून दिली होती ....त्यादिवशी ....मिस पाटील मला एक विचारायचं आहे "-केदार
"विचारा न ...."-अनु
"तुम्ही जे बोलला कि हे काही वेगळंच असू शकत म्हणेज नेमकं काय म्हणायचं होत तुम्हाला ? "-केदार
"काय ?केव्हा ?मला कळलं नाही .."-अनु च्या काही लक्षात येत नव्हतं ..केदार ने तिच्याकडे निरखून बघितलं तिला खरंच काही कळत नाही का तीला आपल्याला काही सांगायचं नाही हे तो बघत होता ....तेवढत त्याचा फोन वाजला ,
"हॅलो ,सर ..हा ऑन the way आहे ....काही अजून माहिती आहे पण ती formulate करावी लागेल .."-केदार पंडित सर शी बोलत होता
"कोणाचा होता फोन ...? सर होते का ?'-अनु ने अडखळत विचारले
"हो ,ते आजच्या बातमी बद्दल अजून काम बाकी आहे सो ते ऑफिस मध्ये आहेत ..."-केदार
"तुम्ही परत ऑफिस मध्ये जाणार आहात का ?"-अनु ने घाबरतच विचारले ...
"हो ,हि बातमी सकाळी कश्या पद्धतीने द्यायची ते आताच बघव लागेल ..मी रात्री ऑफिस मध्येच थांबणार आहे ..."-केदार
"सर मला पण ऑफिस मध्ये च घेऊन चला ...."अनु
"नाही ..इट्स टू लेट ..मी तुम्हाला घरी सोडतो ....."-केदार बॉसिंग करत
"सर प्लिज मी कधीचा हाच विचार करत होते कि माझ्याकडचे फोटो बातमीत सकाळी कसे रन करायचे ..तर प्लिज आपण ऑफिस मध्ये जाऊ या ..मला पण थोडंसं ह्यावर वर्क करायचं आहे ... झाली तर माझी मदतच होईल ..."-अनु
केदार ने तिला समजावलं पण तिला ऐकायचं नव्हतं ...त्याने एक मिन गाडी चौकात थांबवली
"मिस पाटील एक रस्ता तुमच्या घराकडे जातो आणि एक ऑफिस कडे ..नक्की सांग काय करायचं आहे ?"-केदार
"चहा प्यायचा आहे .."-अनु अगदी निरागस पाने
"काय ? केदार गोंधळून विचारतो "मी तुम्हाला काय विचारत आहे ते कळलं नाही का ?चहा कुठून आलं मध्ये ..."-केदार
"समोरून .."-अनु समोर एक टपरी कडे बघत बोलत होती ..केदार ने पण पाहिलं आणि मग मोठा श्वास घेतला ..अनु ने मग केदार पाहिलं डोळे बारीक करून त्याला नजरेनंच प्लिज म्हणाली .ते दोघेही गाडी त्या टपरीकडे घेऊन गेले ..
"तुम्ही उतरू नका ..मी इथेच आणतो .."-केदार उतरून चहा घेण्यासाठी गेला चहा घेऊन तो गाडीत येऊन बसला ...
"चहाचा एक सिप पिताच "वाह ,मस्त .खार सांगू खूप गरज होती ह्या एक कप चहाची ...फ्रेश वाटतंय .. ह्या सोबत न भजे पण असते न तर खूप बर झालं असत ."-अनु बोलतच होती आणि केदार चहा पीत पीत तिच्याकडे बघत होता ....तो गालातच हसत होता ...दोघांनीही चहा संपवला ...
"चला निघायचं मग ...."-केदार तास तिने हसतच हो म्हणाली ,,केअर एन परत इशाऱ्याने विचारले कुठे ?
"चंद्रावर ..."- तिने भुवया उंचावून आणि खोटी बॉक्स तुपे हास्य चेहऱयावर आणून उत्तर दिले .तिने एव्हाना गार हवेसाठी खिडकी उघडली होती ....केदार ने डोक्याला हात लावला आणि गाडी ऑफिस कडे वळवली ....