Login

अनिका 19

Anika and kedar reporting a story ...

   पार्ट १८ साठी वर क्लीक करा ...

(वाचकहो ,अनिका हि एक काल्पनिक कथा आहे .त्यात येणारे प्रसंग ,नाव, गाव ,आणि घटना ह्यांचा प्रत्यक्षात काहीही संबन्ध नाही ,आणि जर तो जाणवलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा .. आता पुढे )

केदार गाडी ड्राईव्ह करत होता .अनिका काचेबाहेर बघत होती ,

"मिस पाटील ,एक विचारू ?"-केदार .अनु ने त्याच्याकडे पाहिलं

"हं .."-अनु 

"तुम्ही कॅफे बाहेर कोणाची वाट बघत होतात का ?"-केदार 

"नाही ,....का ?"-अनिका थोडसा शॉकिंग ...

"सहज विचारलं ....anyway ,तुम्हाला काय काय माहित आहे ह्या बातमीसंदर्भात ?"-केदार त्याच लक्ष अजूनही गाडी चालवण्यावर होत ..

"जास्त काही नाही,शॉर्टसर्किट आहे बहुतेक .तिथे गेल्यावरच माहिती मिळेल ...."-अनिका .केदार  ने एक नजर तिच्यावर टाकली ती कोणत्यातरी विचारात होती .....त्यानं ऑफिस मध्ये एक फोन केला ,

"हॅलो ,रॉनी, सगळं रेडी  ठेव जर वाटलं कि काही लाइव्ह फुटेज मिळतंय तर लगेच शो रन कर ..पंडित सर असतीलच तिथे ...."-केदार .त्याने लगेच दुसरा एक कॉल केला ,

"हॅलो ,सर we are reaching ...एस सर ....बी रेडी ..."-केदार ने आशुतोष सर ना फोन केला होता .....

"मी कॅमेरामन ची टीम पाठवली आहे तुमच्या पाठोपाठ तेही पोहचतीलाच .."-पंडित सर 

"मिस पाटील, दुसऱ्या चॅनेल वर बातमी आली सुद्धा .."-केदार ड्राईव्ह करत बोलत होता ...अनु ने त्याच्या कडे बघत म्हंटल ..अनु तोपर्यंत साहिल ला तीच लोकेशन पाठवत होती ...

"इट्स ओके सर ,आपण जरा डिटेल्स देऊ ,ते फक्त न्यूज देत असतील .."-अनु अगदी विश्वासाने आणि चेहऱयावर जिंकण्याचा हसू आणत बोलली ..तस केदार ने हि तिच्याकडे बघून खूप छान शी smile दिली .... त्या दोघांचं एक कॉमन होत ,काम करतानाच त्याच डिटेल वर्क .खूप गढून जाऊन परफेक्ट काम करायचे आणि खरी माहिती कोपऱयातून शोधून लोकांपर्यंत पोचवायचे ,म्हणून तर जेव्हा पण ते दोघे एखाद्या प्रोजेक्ट वर असतील तेव्हा तो प्रोजेक्ट किंवा बातमी खूप जास्त टी आर पी देऊन जात असे....

ते आता लोकेशनवर पोहचणारच होते. अनु चा फोन वाजला ,

"हॅलो ,बोल ,हा तू पोहचलास का?..ओके  ..किती जण आहेत अजून तिथे ...हो ..नाही मी on the way आहे ."-अनिका .केदार तिच्याकडे बघत होता, तिची पण नजर त्याच्यावर गेली .त्यानं भुवया उंचावूनच तिला काय चाललंय ते विचारलं ,

"काय ?"-अनु ने काही कळलंच नाही असं दाखवलं ...केदार ने मान नकारार्थी हलवली आणि सध्या काही विचारायला नको असं ठरवलं ..

"मिस पाटील ,आपण तिथे पोहचल्यावर परिस्थितीच निरीक्षण  करू आणि मग लगेचच लाइव्ह  बातमी टाकूया . गाडीत मागच्या बाजूला एक बॅग आहे त्यात छोटा माईक आहे तो पण सोबत घ्या उतरताना आणि हो  बाकीच्या चॅनेलचे रिपोर्टर असतील तिथेच ..पण आपल्याला हवाय फक्त खास बाईट .... लक्षात आहे न , गुड लक .."-केदार. केदार   ने खास ह्या शब्दावर जोर देत त्यानं अनु कड नजर रोखली आणि ऑर्डर दिल्यासारखं सांगितलं ..अनु ने दीर्घ श्वास घेतला ,आता ते   स्पॉट वर पोहचले होते ..एक मोठया  सेव्हन मंजीला हॉस्पिटलला आग लागली होती ..सगळीकडे धावपळ सुरु होती .. गोंधळ होता ,रडारड चालू होती ,पेशंट आणि नातेवाईक सगळीच गर्दी होती . अग्निशामक दल त्यांच काम चोख करत होते,  अजूनही आगीचे लोळ दिसत होते वरती ,दृश्य तस भयावह होत .....गाडी साईड ला उभी केली होती ....दोघे हि उतरले आणि परिस्थिती च निरीक्षण करू लागले. केदार आधी माहिती जमा करून मग बातमी देणार होता पण परिस्तिथी बघता त्याने लाईव्ह चा निर्णय घेतला..... त्याने काही फोटोज आणि विडिओ ऑफिस मध्ये पाठवून दिले ..

"मिस पाटील.केतन ला कॉल करा night शिफ्ट मध्ये तो असतो हा घ्या फोन माझ्या फोनवरून करा ....मी सगळं काही बोलून ठेवलं आहे  .... 

तिने जस सांगितलं तस सगळं केलं .....अनु  ने त्याच्या फोन मध्ये शूटिंग सुरु केलं ..

पण मग त्याने काय विचार केला कोण जाणे पण त्याने सांगितलं कि "मिस पाटील ,तुम्ही बोला मी शूट करतो ,"-

"ओके ,पण इथं नाही आपण त्या तेथून बोलू ,थेट आग दिसते आणि अजूनही काही तरी मिळेल नक्की ..."-अनु .केदा ने लगेचच जागा बदलली ...

तिने हातात माईक घेतला "नमस्कार मी अनिका पाटील ,आय टीव्ही. तुम्ही माझ्या मागे बघतच आहात  कि किती भयावहआणि भीषण आग लागली आहे ....कित्येक पेशंट जीवाच्या आकांतानं ओरडत आहे ....आद्यपही हि आग कशी लागली ते कळू शकले नाही ..पण प्राथमिक अंदाज बघता शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं सांगण्यात येत आहे ...हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट ने ने सगळ्या ना सुखरूप बाहेर काढतोय असं आश्वसन हि दिल आहे ..जीवित  हानी किती आहे ह्याच अजून आकडा आलेला नाही पण एकूणच दृश्य बघता बरच नुकसान झालेलं दिसून येत आहे .....आम्ही तुम्हाला काही मन हलवून टाकणारे दृश्य दाखवत आहोत ..केदार ने आपला कॅमेरा दुसरीकडे वळवला ....जिथे एक बाई आक्रोश करत होती तिचा मुलगा त्या आगीत भस्मसात झालं होता .....काही पेशंट रडत होते ....आगीचे लोळ उठत होते .अजूनही आग विझली नव्हती ......तेवढ्यात कॅमेरामन ची टीम आली होती .... ते सगळे फोटोज आणि व्हिडिओज लाइव्ह रन करत होते ..ऑफिस मध्ये मोनिका ,पंडित सर ,रॉनी ,केतन ,ऋचा असा स्टाफ होता ..अनु आणि केदार दोघे हि रिपोर्टींग करत होते ...अनु च्या घरी सुद्धा लाइव्ह बातम्या चालू होत्या सगळे हॉल मध्ये बातम्या बघत होते .

"काय हि पोरगी , स्वतःची काळजीच मुळी नाही हिला ....."-आई चा जीव घाबरा होत होता .

"अहो ,तीच कामच आहे ते आणि तिच्यासोबत तिची टीम आहे .... बाकी काही म्हणा ,पण पोरगी निडर आहे ..बापावर गेलीये एकदम ..."-आबा  टीव्ही समजावत होते .आईने एक कटाक्ष आबांकडे टाकला .

"कितिभीषण प्रकार आहे न ?...बाप रे "-साहिल 

इकडे केदार काही फुटेज काढण्यात आणि अजून काही वेगळी माहिती मिळते का ते बघण्यात गुंग होता ... अनु ने परत बोलायला सुरवात केली ,

"हे जे हॉस्पिटल आहे ते खूप जुन्या आणि मोठ्या हॉस्पिटलच्या यादी मध्ये येत ,७मजल्याच एवढं मोठं हॉस्पिटल जिथे प्रत्येक एका फ्लोअर वर special युनिट्स आहे .इथे कॅन्सर स्पेसिअल वार्ड आहे , ......इथे फक्त उपचारच नाही तर संशोधन सुरु असत ..आणि म्हणूनच शहरापासून थोडं लांब हे हॉस्पिटल आहे ....अनु बोलत होती ....आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार इथे आत्ता खूप महत्वाच्या गोष्टींवर संशोधन सुरु होत ..हि आग ज्या मजल्यावर लागली आहे त्या पाचव्या मजल्यावर बऱ्याच महत्वाच्या फाईल्स आहेत, म्हणजे होत्या आता हि आग खरंच शॉर्ट सर्किट आहे कि आणखी काहि हा प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे .जर हे  सगळं शॉर्ट सर्किट मुळे  झालं तर हॉस्पिटल ह्याची जबादारी घेणार का? हा हलगर्जीपणा किती लोकांचे प्राण घेऊन जाईल ? असे एक नाही बरेच प्रश्न उभे आहेत ...ह्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरेसाठी आणि खरी परद्या मागची खबर ऐकण्यासाठी बघत रहा आय टीव्ही ."-कॅमेरामन ओमी ,सह  केदार आणि अनिका पाटील .....

"तिच्या ह्या बातमीवर केदार ने एक कटाक्ष टाकला, 

"काही हि हि काय बोलताय तुम्ही,इतक्या लवकर हे वाक्य यायला नको होत ,काय पुरावा आहे ?"-केदार सगळ्या टीम समोर 

"मी काहीही बोलत नाहीये आणि तास हि आपल्याला खास काहीतरी द्यायचं होत न मग हेच आहे ते ,माहिती आहे मला पण पुरावा नाही थोडं थांबा सगळं कळेल ..."अनु दुसरीकडे निघून गेली ...

केदार फक्त तिच्याकडे बघत होता ......तो मागे वळून परत पाहणी करू लागला मागच्या बाजूने त्याला आत घुसण्याचा मार्ग दिसला ....आणि तो आत मध्ये गेलं ...केदार मध्ये घुसला होता ...काही फोटोज क्लिक करत होता ....  आणि वर जात होता . .त्याला एका खोलीतून रडण्याचा आवाज आला ...त्याने बघितलं तर एक छोटी मुलगी कॉट च्या मग अडकून पडली होती ...केदार ने मध्ये जाऊन कॉट सरकवली आणि तिला कडेवर उचलला इकडे तिकडं बघत तो पुढे जाऊ लागला तिथेच एक बाई अचानक येऊन त्या पोरीला बिलगली ती तिचीच मुलगी होती .तीन केदार च आभार मानलं आणि केदार ने तिला बाहेरचा रास्ता दाखवला ...तिथून तो उजवीकडे वळला तिथे जरा सामसूमी होती तो सेकशन पूर्ण रिकामा केलेला होताआणि समोरच मुर्दा घर होत इकडे तिकडे बघत तो तिकडे जाऊ लागला ..आणि मध्ये शिरला ...इकडे  अनिका सुद्धा मध्ये घुसली होती ... ती डायरेक्ट लपत छापत  चौथ्या मजल्यावर पोहचली  आणि वरच्या पाचव्या मजल्याचे काही फोटोज पायरीवरून काढू लागली ,पण तिथे पोलीस आणि अग्निशामक दलाचे लोक काम करत होते तीच काम झालं होत .ती आता दुसऱ्या मजल्यावर आली होती . ....इकडे तिकडं रडारड ...पळापळ काही लोकांना तिथेच एक दोन युनिट मध्ये शिफ्ट केलं होत ...जेणेकरून जास्त अडचण आणि गैरसोय होणार नाही ....५ व मजला जिथे आग लागली होती तिथून  आणि वरच्या   सगळ्या फ्लोअर्स वरून पेशंट न खाली आणण्याचं काम सुरु होत ...दुसऱ्या मजल्यावर अनु पाहणी करत होती ,काही लोकात मिसळून बोलणी करत होती ...ती दुसऱ्या कॉरिडॉर मध्ये जात होती ...जात जाता दोन क्षण थबकली ...मागच्या कॉरिडॉर च्या दुसऱ्या बाजूला ...बघते तर तोच ...तोच तो तरुण ज्याने तिला वाचवलं होत ...तो आज तिच्या समोर होता फक्त काही अंतरावर ,आज ती त्याचा चेहरा पूर्णपणे बघू शकत होती .....  त्याने आकाशी रंगाचा शर्ट घातला होता आणि त्यावर ब्लॅक कलर ची पॅन्ट होती ..शर्ट च्या बाह्य फोल्ड केलेल्या होत्या ,त्याने एक गरोदर बाईचं हाथ पकडला होता आणि तो तिला खाली नर्स किंवा डॉक्टर कड घेऊन जात होता ....तो तरुण त्या बाईला वाचवत होता ...इतक्यात एक नर्स आली आणि त्याने त्या गरोदर बाईचा हाथ त्या नर्स च्या हातात दिल आणि तो परत मागे धावत गेला. अनु त्याच्यामागे गेली पण तो दिसला नाही ..ती इकडे तिकडे बघत होती. 

"शीट यार ,आज हि तो गायब झाला "-अनु डोक्याला हात लावून म्हणू लागली ,तेवढ्यात तिला परत तो तरुण  समोरच्या बाजूने असलेल्या कॉरिडॉर मध्ये दिसला ,चारपाच मुलांना एका खोलीतुन बाहेर काढताना ,तिला हळू हळू ऐकायला येत होत तो त्या मुलांना धीर देत होता ,एका ५ वर्षाच्या मुलीला त्याने कडेवर उचलून घेतला होत आणि बाकीच्या मुलं साईड ला घेऊन चालत होता ..जिन्याजवळ जाताना त्याच्या हाताला जोरात एक तुटलेला रॉड लागला  तो थोडासा विव्हळ आणि परत जाऊ लागला ..

अनिका पळतच त्याच्याजवळ जात होती तेवढ्यात तिचा पाय कश्यात तरी अटकला आणि ती पडणारच होती कि तिला कोणीतरी तिच्या कमरेत हात घालून तिला पकडला.तो तरुण तिच्या समोरून निघून गेला आणि नाहीसा झाला ,आपल्याला कोणी पकडल हे बघण्यासाठी तिने मान मागे केली आणि पाहिलं तर केदार होता .....केदार न तिला नीट उभं केलं ..

"are you ok ?"-केदार 

"हम्म,  थँक्स .मी ठीक आहे ..."-अनु .केदार  ने तिचा हात पकडला आणि ते बाहेर जाण्यासाठी  रास्ता बघू लागले खर म्हणजे अनुच्या पायाला लागला होत आणि तिला चालण्यासाठी अवघड होत होत पण तीचा हात केदारच्या हातात होता आणि तो तिला घेऊन पटापट चालत होता ,अनिका  इकडे तिकडे बघत होती पण तो तरुण परत दिसला नाही ...

ह्या मजल्यावर गर्दी जास्त होती ....ते रस्ता काढत होते . आणि पहिल्या मजल्यावर आले .पोलीस आणि अग्निशामक दलाचे लोक हि होते ..त्यांनी आपला चेहरा लपवला आणि दुसरीकडे गेले ..कारण ते चोरून आत घुसले होते ......चालत चालत समोर पोलीस दिसले म्हणून तिथल्याच एका रूम मध्ये केदार घुसला आणि  दाराच्या मागच्या भिंतीला अनु ला उभा केलं .अनु भिंतीला चिकटली होती आणि केदार तिच्या कडे तोंड करून तीला चिटकून उभा होता .दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते ...अनु चे हार्ट बिट्स खूप वाढले होते,ती केदार कडे बघत होती ,केदारच हि लक्ष अनुकडे गेले तिच्या डोळ्यात तो बघू लागला ,दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते .....अगदी चिटकून उभे होते ,अनु ला फार आवक्वर्ड वाटत होत, तिने नजर हटवली .केदार ला हि तेच जाणवलं .त्या रूमच दार उघडलं,पोलिसांनी सहज बघितलं पण त्यांना कोणी दिसल नाही ...ते गेल्यावर केदार आणि अनु ने सुटकेचा निश्वास सोडला ..... दोघांनी हलकीच smile केली जणू काही झालेच नाही आणि परत बाहेर निघू लागले कस बस मागच्या बाजूला जाऊ लागले जेथून केदार आत आला होता ,

"मिस पाटील तुम्ही कुठून आत घुसला होता ?"-केदार 

"समोरून ?"-अनु 

भुवया वर करून केदार ने तिच्याकडे पाहिलं आणि नकारार्थी मन हलवत तिला घेऊन पुढे जाऊ लागला .... अजूनही त्याने तिचा हात सोडला नव्हता , तो ज्या रस्त्यानं आलं होतं तिथे आता पोलीस होते ,पाहणी करत होते ते दोघे परत भिंतीला टेकून उभे राहिले ..आणि हळूच वाकून बघू लागले पण पोलीस काही हालयच नाव घेत नव्हते ....केदार च्या फोन वर ऑफिस मधून मिस कॉल होते ....पण त्याने जर रेसिइव्ह केलं असते तर आवाज पोलिसांकडे गेला असत . त्याने फोन बंद केला ...केदार ने परत भिंतीमागून वाकून बघितले आणि परत भिंतीला चिटकून उभे राहिले ,तस दोघे हि थबकले .त्यांच्या समोर एक वर्दी वाला उभा होता ....

क्रमशः

......................................................................................................................................................................................