अनिका 16

story and achievement of girl

https://www.irablogging.com/blog/anika15_5899

पार्ट १४ स vवारकलिक kकी करा 

नाश्त्याच्या टेबल वर आबा ,श्रेया साहिल ,अनु सगळेच होते. वातावरण शांत होते ..अजूनही साहिल आणि अनु बोलत नव्हते ,शश्रेया दोघांकडे बघत होती ..आबा पेपर वाचत होते .

"काही झालाय का?'-श्रेया 

दोघे हि फक्त श्रेया कडे बघून  परत चुपचाप नाश्ता करू लागले ..

"आबा ,आज एक मीटिंग आहे ..आपल्याकडे काही जाहिरातदार येणार आहे  ..त्यांच्या सोबत ..त्यांच्यासोबत बोलून नव्या किमती च बजेट ठरवायचं आहे ."-साहिल. 

"ठीक आहे ,तू ते बघून घे ...मला दुपारी दुसरं काम आहे त्यामुळे मी नसेन कदाचित तिथे .."-आबा 

अनु अजूनही विचारातच शांतपणे नाश्ता करत होती ....साहिल पण खाता खाता तिच्याकडे बघत होता ...श्रेया फक्त त्यांचच निरीक्षण करत होती ....तेवढ्यात समीर हि तिथे येतो ...

"ये हाय ,समीर  कसा आहेस ?"-श्रेया ..तस सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं 

"अरे समीर ये ये ..बैस .."-आबा बोलले तास तो हि नाश्त्याच्या टेबल वर बसला ...

"काय मग काय चाललंय ?  नवीन काम सुरु झालं कि नाही ...."-  आई 

"नाही .म्हणजे हो ...म्हणजे "-समीर 

"अरे काय हे ..हो नाही ..काय चाललंय ?  काही अडचण आह का ?"-आबा 

"नाही म्हणजे काय आहे न ऑफिस साठी एक जागा फायनल केली आहे ....पण पुढचं अजून काहीच ठरलं नाही .. दोन तीन दिवसात होऊन जाईल पूर्ण .."-समीर 

"छान , मस्तच ..यशस्वी हो .."-आई 

"काय मग अनु आज ऑफिस ला जायचं नाही का ?"-समीर वातावरणाचा अंदाज घेत ...

"हं ,जायचंय ना ...निघणारच आहे आता  .."-अनु .साहिल अजून हि तिच्याकडे फक्त बघत होता ....दोघांमधून कोणीही पहिले बोलायला तयार होत नव्हते ..

"excuse  मी ...सॅम तू बैस, मला निघायला हवं "-साहिल वर रूम मधे निघून गेला त्याला हि ऑफिस साठी निघायच होत ....

"काही झालंय का ?"-समीर 

"कुछ तो है ? पत्ता हि नाही चल रहा यार "-श्रेया 

"ये  गप ना .."-अनु 

आबा आणि आई सगळं बघत होते ...आई kitchen मध्ये गेली ...समीर साठी चहा आणायला .आबा हि बाहेर गार्डन मध्ये गेले ..श्रेया आणि समीर फोन मध्ये काहीतरी बघत बोलत होते ..अनिका मात्र विचारात दिसत होती ...साहिल तयार होऊन निघाला होता .

"आई येतो ग .."-साहिल अनु कडे तिरक्या डोळ्याने बघत आई ला सांगत होता ..आणि तसाच बाहेर जाण्यासाठी दरवाजाजवळ गेला ..त्याला हि वाटत होते कि आता बोलावे पण तेवढ्यात अनु ने च आवज दिला ,

"साहिल .."-अनु 

साहिल दोन मिन थांबला ...आणि मग मागे वळून  भुवया उंचावून पाहू लागला ..त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या ..

"निघालास का ?"-अनु 

"हो ,म्हणजे दरवाजा पर्यंत आलोय म्हणजे निघतच आहे न ,इथे झोपणार तर नक्कीच नाही .."-साहिल उगीचच तिला चिडवण्याच्या मूड मध्ये होता ..खरतर असं उत्तर ऐकून अनु ची पुन्हा सटकली पण तिने दाखवलं नाही ..

"अच्छा, मला वाटलं कि तुला काही बोलायचं म्हणून थांबलास"-अनु पण आता खेचण्याचा मूड मध्ये होती 

"कोणाशी ? ये चक्रम ...तू  आवाज दिल म्हणून थांबलो ..बोल पटकन वेळ नाहीये माझ्याकडे "-साहिल खोटाच पण रागवण्याच्या सुरात म्हणत होता ....

"हो का , मी तुला संध्याकाळी पिझ्झा खायला येणार का विचारणार होते  पण ..जाऊ दे तुला तर वेळच नाही न .."-अनु 

"संध्यकाळी न ..मी करेन manage ...पण पिझ्झा अचानक का?"-साहिल काहीच न कळल्यागत विचारत होता ..

"असाच मूड झाला न म्हणून .. आणि ते काय आहे न  आजकाल लोक आमच्या गरिबांवर खूप चिडत आहे मग म्हंटल कि चला थोडा राग शांत करू .."-अनु 

"हो का ,लोकांना वेडच लागलाय न उगीचच चिडायला ..आपण तर काही करतच नाही न .."-साहिल तिरसटपणे ...

श्रेया आणि समीर दोघांकडे बघत होत ...फक्त ..

"वेडा तर तू आहेच न ..माझा भाऊ आहेस न माझ्यासारखा वेडा.....चल यार forget इट ...सॉरी कालच्यासाठी .."-अनु कान धरून... साहिल हसला आणि तिला टाळी दिली ..श्रेया आणि समीर दोघेही टेबलवरून बघत होते आत ते उठून जवळ आले ..

"क्या बात क्या बात ..मतलब सुलाह हो गयी ..श्रेया समीरच्या खांदयावर हात ठेवून dialoug मारत होती ..समीर हातची घडी घालून उभा होता ..

सगळं हसले ..

"चला म्हणजे रात्री पिझ्झा पार्टी ."-श्रेया खुश होत 

"ओह हॅल्लो ..कुठे आपण ..ते आमचं आम्ही बघून घेऊ काय ?"-साहिल अनुला डोळा मारत 

"हो ना भांडण तर आमचं होत .त्यात तुम्ही दोघे कशाला ?"-अनु ने दुजोरा दिला 

श्रेया हात पाय पटकात ,"ये काय रे ..लगेचच एकत्र होता ..दादा नाहीये न इथे माझ्या बाजूने बोलायला ....जा ..समीर छोड इनको ...  आपण जाऊ चल .."-श्रेया समीर ला 

"दोस्त दोस्त न राहा ...."-समीर पण रडक्या सुरात ....

"हो रे ,जालीम दुनिया ..आपल्याला असं चटकन बाजूला केलं नाही ..काय वाटलं असेल मला ,तुला हि .......माझ्या दिलाचे असे तुकडे तुकडे करून टाकले ह्या लोकांनी .."-श्रेया डोक्याला हात लावून..

"ये गप ग नौटंकी .."-अनु 

"तुकडे तुकडे म्हणे ...जा फेविकॉल लाव ..मजबूत जोड ...दिल टुटेगा नही .."-साहिल 

आईच लक्ष होत आतून 

"चला ,सेना परत तय्यार झाली ...."-आई हसतच आशाबाईंना सांगत होत्या 

"चला मला लेट  झालंय  खूप  .सॅम भेटते नंतर ..."-अनु 

"ये एक मिन अनु ,मी पण येतो ..मला तिकडेच काम आहे तुला हि सोडतो ..

सगळे आप आपल्या कामाला गेले..ऑफिस च्या खाली अनु आणि सॅम थोडावेळ बोलत होते आणि वरून केदार   च  फोनवर बोलता बोलता त्यांच्याकडे लक्ष गेलं ....

"हेय हाय ओमी ..आज काय प्लॅन ?"-अनु पाणी पीत बोलली तेवढयात मोनिका तिथे आली 

"मिस अनिका ..तुम्ही काम करायला इथे येत कि टाइम पास करायला ....?"-मोनिका 

अनु आश्चर्याने बघत होती ..."बघत काय बसलीस ..तुला येऊन इतके महिने झाले पण अजून ऑफिस टाइम माहित नाही ..आणि हि तुझी फाईल ह्या मध्ये जी माहिती आहे ती चुकीच आहे ..ती बरोबर कर आधी ..."-मोनिका निघून गेली 

"हि अशी काय आहे ?हिला नीट बोलता येताच नाही का ?"-अनु 

"संगत  का असर है अनु ....देखो संभाल जातो तुम भी .."-रेवा तिकडून येत ती डोळा मारत 

"काय मॅडम एकदम खुशीत ..काय मॅटर आहे बॉस "..-अनु 

"ती आज काल वेगळीच दुनियेत असते ..माहित नाही का तुला ?"-ओमी ..अनु भुवया उंचावून तिच्याकडे बघत असते ...तेवढ्यात ऋचा येऊन सांगते "सगळ्याना मीटिंग साठी बोलावलंय ....केदार  सरानी ...

"हे घ्या एकाच झालं आता दुसऱ्याची बारी ..चला ..."-अनु मागे वळते तेवढ्यात तिला केदार मागून जाताना दिसतो .

केदार तिच्याकडे दोन मिन बघतो आणि पुढे निघून जातो 

".ह्याने काही ऐकलं तर नसेल न .."-अनु स्वतःशीच "कठीण आहे र बाबा ..आज काय होणार अनु तुझं काय माहित ?"-अनु 

सगळे मीटिंग रूम मध्ये येतात ...

"सो गुड मॉर्निंग , आज चा अजेन्डा डिसकस करूया "-केदार 

"आज आपल्याला दिवसभर मंत्रालयाची आणि पेट्रोल हाईकची बातमी रन करावी लागेल .."-मोनिका लगोलग बोलली 

"सर त्या मॉडेलच्या आत्महत्याची सगळे डिटेल्स तयार आहे  ...त्याप्रमाणे आज आपण इव्हनिंग ला एक prime शो ठेवू शकतो .."-रेवा 

"हं गुड ...nice idea आणखी काही ..."-केदार .अनु ला कोणी काही विचारत नव्हते ..केदार मुद्दामहून इग्नोर करतोय असं वाट होत 

"सर ,...."-अनु ..बोलणार तेवढयात केदार परत बोलला 

"हा खर म्हणजे  अजून एक गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायची आहे ..आपले पार्टनर पंडित सर ...ते भारतात रिटर्न आले आहेत, ५ दिवसांपूर्वी  ...आणि ते आज ऑफिस ला हि येऊ शकतात ....सो बी prepared .. "- केदार 

"व्वा ..छान "-कुजबुज सुरु झाली ..."काल  एक आग लागली होती ती बातमी कोणी केली होती ?" केदार काहीतरी आठवल्यासारखं  ..अनु शॉक होती 

"मिस पाटील ती तुम्ही केली होती न .."-केदार तिच्याकडे रोखून 

"हं हा ..हो "-अनु 

"मग सांगणार कधी ..विचारल्यावर पण तुम्ही उत्तर देत नाही..इथे आहात तर इथेच राहा ....मीटिंग मध्ये फोकस करायला शिका ..."-केदार तिला थोडा खडसावत बोलत होता  ..ती फक्त त्याच्याकडे बघत होती ..तिला कळतच नव्हते काय चुकलंय ते  ..?

"anyway ..ती फाईल घेऊन केबिन मध्ये या ..बाकीच्यानाचा वेळ वाया घालवायला नको .."-केदार परत बोलला आणि निघून गेला ....बाकीचे पण निघाले मोनिका ला मनातून खूप आनंद होत होता ....अनु मात्र शॉक होती ...

🎭 Series Post

View all