अनिका 15

relation between kedar and Anikaa is not just employee and boss its beyond that ...

"काय बाई पाऊस पडतोय ..  मोहन मृणाल कसे असतील कोण जाणे ?'-आई 

"अहो ,त्यांची काय काळजी करायची ? ते सांभाळतील एक मेकांना ...."-आबा 

"हो न ..नाही म्हणजे थोडक्यात पण छान झालं सगळं ...चला एका कर्तव्य पार पडलं .."-आई  

"आई ,मस्त पैकी चहा हवाय ग?"-अनु -दारातूनच आवाज देत 

"या ,या ...आधी आत  तर या ,मग बनवते .... आता या जबाबदारीकडे लक्ष द्यावं लागेल ..."-आई हसत आबांना म्हणत होती 

"कसली जबाबदारी ...?'-साहिल टेबल वर बसत बोलला..एव्हाना अनु सुद्धा येऊन  पाणी पीत बसली होती ..

"काय मग आज पण उशीर ..एवढं काम बर नव्हे ..."-आबा .

"हो न एक बातमी कव्हर करायच्या नादात ऑफिस मधलं काम तसच राहील मग म्हंटल ते पूर्ण करून च निघू .."-अनु 

"हं हम्म.ती आग लागली तीच न ..बघितली आम्ही  तुमची बातमी ...काही कळलं का ? कश्याने लागली ते ?"-आबा 

"नाही न अजून तरी नाही ..तिथे बोलायला गेले तर एकच गोंधळ माजला होता ..धक्काबुक्की काय आणि दगडफेक काय ?सुरु होत  बरंच काही .."-अनु ..

"अग बाई ,तुला लागलं नाही न कुठे ?काळजी घेत जा हो .. सोबत असते ना कोणीतरी ?"-आई 

"हो आई ,म्हणजे आज नव्हते सोबत कोणी ..पण ऐरवी असतात ....आज मी एक फोन आला आणि तडक निघाले होते न .."-अनु 

"काही नाही हा सगळं पोलिटिकल मॅटर आहे .."-साहिल 

"असू शकतो पण अजून तरी काही खात्रीलायक कळलं नाही .."-अनु

"आणि कळणार हि नाही ....असे मॅटर बाहेर पडत नाही ....गॅस चा स्फोट झाला किंवा शॉर्ट सर्किट मुळे आग ह्यापलीकडे जास्त काहीच येणार नाही बातम्यांमध्ये ......"-साहिल

"असं काही नाही ..जे आम्हला माहिती मिळते तीच तर आम्ही जनतेपर्यंत पोहचवतो न ..आणि तू म्हणतोस तस काही पुरावे तर हवे न ..त्याशिवाय कशी बातमी देणार आम्ही .."-अनु

"हे बघ अनु ,सगळेच तुझ्यासारखे प्रामाणिक नसतात ..आणि आजकाल तर हे चालतच ना ..करावं लागत ...शेवटी बातम्या ,न्यूज चॅनेल हा सुद्धा एक व्यवसाय आहे .. त्यात काही गैर नाही .."-साहिल  

"म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का कि सगळेच पैसे घेऊन बातम्या बदलतात म्हणून .."-अनु चहा घेत बोलत होती 

"हो हे फॅक्ट आहे आणि सगळेच नसले तरीही ९० टक्के तरी असच आहे ."-साहिल 

"एक मिनिट सगळेच असे नसतात साहिल ...आमच्यकडे आम्ही जी न्यूज घेऊन येतो तशीच ती देण्यात येते .."-अनु 

"हे बघ बऱ्याच गोष्टी ह्या पडद्यामागे घडत असतात ..त्या जश्या दिसतात तश्या असतातच असे नाही ..आता तू विषय काढलाच आहे म्हणून सांगतो ...तुझा तो बॉस केदार तो पण काही एवढा धुतल्या तांदळासारखा नाहीये ,ओके ...तुमच्या चॅनेल मध्येही अश्या बऱ्याच गोष्टी घडतात आणि बातम्या सुध्या फिरवल्या जातात .."-साहिल 

"तू आता काहीही बोलायला लागला आहेस साहिल ..असं काही नाही ये  ...केदार च म्हणशील तर तो तसा नाहीये .."-अनु अचानक थोडसा चिडली होती ..वातावरण गरम झालं होत ..

"अरे ,अरे भांडता काय असे ?आता तर चांगले बोलत होतात ..मधूनच काय होत रे तुम्हाला आणि बस करा तो विषय आता ..."-आई 

"आई मी भांडत नाहीये ..तिने विषय काढला म्हणू तिला फक्त सांगतोय आता हे तिला माहित नाही तर ह्याला आपण काय करणार ..आणि हे काही गैर आहे अश्यातला पण भाग नाही ..ती उगीचच चिडते आहे "-साहिल 

"उगीचच म्हणजे ,तू चुकीचं बोलू शकतो तर मी त्यावर रिऍक्ट पण नाही व्हायचं .."-अनु परत सुरु झाली ...

"अरे थांबा ..काय हे अनु शांत हो बर .."-आई 

"मी का शांत होऊ ..त्याला सांग काहीही खोटं बोलतंय तो ..ह्याच्या म्हणण्यानुसार मी सुद्धा खोट्या बातम्या देते .."-अनु 

"मी असं म्हनलेलो नाहीये अनिका ...मी फक्त हे सांगत होतो कि कधी कधी व्यवसाय चालवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात ...आणि मी केदार च्या बाबतीत बोलत होतो .."-साहिल 

"तेच तर ,तू किती ओळखतॊस त्याला ,असं उगीचच कोणाबद्दल काही बोलू नये हे म्हणतेय मी .."-अनु चांगलीच पेटली होती आबा हे सगळं बघत होते 

"अच्छा म्हणजे मी केदारच नाव घेतला म्हणून तू चिडलीस तर ..काय ग आणि तू मला विचारतेस पण तू तरी केवढं ओळखते त्याला ....तू काही महिन्यापासून ओळखते त्याला पण त्याबाबतीत बऱ्याच उलटसूट गोष्टी येत होत्या आधीपण ....त्यात एवढा चिडण्यासारखा काय आहे ? कोणी लागतो का तो आपला ..?"-आत साहिलही भुवई उंचावून बोलत होता ...

"तुझ्याशी ना वाद घालण्यात काहीच अर्थ नाही ...शि.."-अनु चिडतच तिथून हात पाय आपटत रूम मध्ये निघून गेली ...

"अनु  ये अनु ..आग ऐक तरी ."-आबा तिला थाम्बवण्याचा प्रयत्न करत होते पण तिने ते ऐकलेच नाही ..ती तडक निघून गेली 

"काय हे ,इतके पुढे पर्यंत वाद घालण्याची गरज काय होती ?"-आबा 

"अहो आबा ,मी काहीच चुकीचं बोललो नाही ...आणि राहिला वादाचा प्रश्न तर तिनेच सुरवात केली ...मी तर फक्त वस्तुस्थिती सांगत होतो ...त्या केदार वरून मॅडम ला इतक चिडण्यासारखं काय झालं  कोण जाणे ?"-साहिल 

"हो पण ती आताच आली होती ...जरा दमाने घ्यायला हवं होत ."-आई 

"आई ,तू नेहमी तिचीच बाजू घेतेस ..आम्ही सुद्धा काम करून दमूनच घरी आलो न ...जाऊ दे ..मीच जातो इथून .."-म्हणत साहिल हि वैतागून तिथून बाहेर गेला ..

"अरे ,आता तू पण ..ऐक ना .."-आई त्याला थांबवत होती पण तो निघून गेलं 

"सविता ,जाऊ द्या त्याला पण .."-आबा 

कठीण आहे बाबा आजकाल च्या मुलांचं .."-आई मोठा श्वास घेत म्हणाली ....

दोघेही तसे नेहमीच वाद घालत असत ..पण आज अनु जरा जास्त चिडली . रूम मध्य जाऊन अनु स्वतःशीच बडबड करत होती 

"समजतो काय स्वतःला ,उचलायची जीभ आणि  लावायची टाळ्याला ..काही म्हणतो ..म्हणे केदार हि तसाच आहे ,त्याला काय माहित केदार कसा आहे ते ? "-आणि अचानक अनु थांबली ,बेड वर बसत विचार करू लागली ...."पण खरंच केदार कसा आहे हे नीट आपल्यला तरी काय माहित आहे ?काही महिन्याची ओळख ,सोबत काम करतो ,बोलतो पण personally तो कसा आहे हे अजून नीटस कधी कळलंच नाही ...मध्येच विचित्र वागतो ...त्या दिवशी reception ला आला तर किती छान बोलत होता अगदी जुन्या मित्रासारखा पण मग अचानकच नसांगता निघून गेला ...दुसऱ्या दिवशी सकाळी किती चिडचिड कि बस ...कधी हि चिडतो,रागावतो  पण त्याचे डोळे ..त्याचे डोळे खूप काहीतरी सांगतात ..त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी दिसते ....की इतकी काळजी करत असेल तो ? एक लेडी एम्प्लॉयी आहे म्हणून पण मग रेवा ,सोफी अश्या इतर मुलींच्या बाबतीत इतका काळजी करतं नाही दिसलं कधी ...का हा फक्त माझा दृष्टीकोन आहे ..मीच असा विचार करतीये ....काय असेल त्याच्या मनात ..तास किती हि rude वागला तरी कुठेतरी एक स्वच्छ मन आहे त्याच्या कडे पण त्याच्या डोळ्यात बरच काही लपलाय ...सतत काम ,कश्यापासून पळतोय तो ? माझ्यासाठी इतकी काळजी का ? .शी ...किती प्रश्न पण उत्तर एकही नाही ...का करतेय मी केदारच्या एवढा विचार ? की म्हणून साहिल न केदारच नाव घेतल्यावर आपल्याला राग आला ....?का?"-अनु स्वतःशीच विचार करत बेड वर पालथी पडून राहिली ....

क्रमश:

©अनुराधा पुष्कर.. 

🎭 Series Post

View all