मी पराभवाकडे लक्ष देत नाही, कारण शर्यत ससा कासवाची असते..वाघाची नाही.

जगात सर्वात सुखी कोण आहे? ज्याला समाधान हेच सुख वाटलं तो सुखी आहे.

हातातला घास हिरावला जातो...पदरातल्या सुखाचा भाग ओरबडला जातो...तू एकटा नाहीस मित्रा, प्रत्येकात एक कर्ण असतो...कधी तो तुझ्यात असतो, कधी माझ्यात असतो

आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना , ईरासंगे गृहिणी बिघडल्या गृहिणी बिघडल्या लेखिकाच झाल्या आम्ही बिघडलो तुम्ही बी घडांना

*कृष्णगंध* कोणतेही संकट आल्यावर,मला माझा देव मदत करणारच.....ही "श्रद्धा" परंतू कोणतेही संकट माझ्यापर्यंत येण्याआधी, माझा देव ते निवारणारच.... ही "भक्ती" @सौ.प्राजक्ता हेदे (कृष्णवेडी)

वळणा वळणाची आहे जीवन वाट इथे कडू गोड क्षणांच्या पाऊलखुणा असते रोज अनुभवांची नवी पहाट माणुसकीने जगूया जोडून सर्व मना -------------------- सौ.वनिता शिंदे©®

दाटून येतात जेव्हा मेघ आठवांचे उरी, फुटून बांध आसवांचा बरसती अश्रुंच्या सरी ------------------ सौ.वनिता शिंदे©®

रक्ताच्या नात्याहूनही घट्ट जुळती नाती जिव्हाळ्याची, आपुलकीने घालून साद होते गुंफन मनाशी मनाची. ------------------------ सौ.वनिता शिंदे©®

नशिबाचा तो खेळताना खेळ जीवन भासे एकाकी निराधार, निरागस मनाला वाटे हवासा मन जपणारा प्रेमळ आधार. -------------------- सौ.वनिता शिंदे©®

दु:ख लपविण्यासाठी रोजच असतो हसण्याचा नवा बहाणा पण काळीज आतून पोखरलेलं वेदनांनी गुदमरतात मनी भावना ------------------ सौ.वनिता शिंदे©®

वाटत असं कधी कधी जीवन एकट अन् उदास सारं काही असतं सोबत तरी गुदमरुन जातो श्वास -------------------- सौ.वनिता शिंदे©®

दु:खाच्या गावापलीकडंच सुखाचं घर उभं असतं सहनशिलतेच्या वाटेनंच आनंदाचं स्वप्न दिसतं -------------------- सौ. वनिता शिंदे©®

नजरेची भाषा जेव्हा कळते नजरेला शब्दांचीही गरज नसते मन समजायला, मनाची ओढ जेव्हा असते मनाला नात्यांचाही अर्थ लागतो सहज उमजायला. --------------------------- सौ.वनिता शिंदे©®

' गटारात कितीही पवित्र गंगाजल टाकलं तरी गटारातलं पाणी शुद्ध होत नाही त्याप्रमाणे वाईट प्रवृत्तीला कितीही उच्च दर्जा दिला तरी ते त्यांची पातळी दाखवणारचं.' सौ. नेहा उजाळे

सहवासाने फुलत जाणारे तुमचे नाते असेच बहरत जावो, जीवनाच्या आनंदी क्षणांचे तुम्ही जोडीने साक्षीदार होवोत, पूर्ण होऊदेत तुमच्या सर्व ईच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

तुमच्या प्रेमळ जोडीने केवळ तुमचा संसारच नव्हे तर जवळच्या सर्व व्यक्तींना तुम्ही प्रेम दिलेत, आपलेसे केलेत. एखाद्या नदीने वाहत जातांना काठावर सुंदर फुलं पेरत जावी असा तुमचा संसार फुलत राहिला, अश्या या प्रेमळ जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.