Aug 16, 2020
नारीवादी

तूच माझी सावीत्री.....३

Read Later
तूच माझी सावीत्री.....३

 

तिला लग्नाला जायला मिळेल का??
आनंद काय करेल???
या प्रश्नांवर  येऊन आपण थांबलो होतो...तर आता बघूया पुढे...

लग्न ठरले आणि लॉकडाउन झाले, पण मुलगी एकच तालुक्यातील असल्यामुळे मोजके लोक घेऊन लग्न लावायचं ठरले...दोन भावांची एकच बहीण...त्यात तिच्या लग्नानंतर हे पहिल लग्न...खूप तयारी केली तिने...मुलांसाठी सुद्धा हौस म्हणून खूप तयारी केली आणि त्याचसोबत त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून कोरोना बाबतीत पण सर्व सामान घेतले...माहेर तसे एकाच जिल्हयात होते तरी पण लहान मुलांना घेऊन अगोदर येणार नाही असे तिने आई बाबांना सांगितलं...त्यांनी सुद्धा जास्त आग्रह केला नाही..कोरोना असल्यामुळे..

सकाळी लवकरच निघते,काही हवंय का?? असे बोलून तीने आईचा फोन ठेवला आणि परत राहिलेली तयारी
करण्यासाठी ती गेली...

आनंद चे वर्क फ्रॉम होम सुरू होतेच...आणि सतत सोबत असल्यामुळे तो आरतीला सतत प्रत्येक गोष्टीत टोकत होता...पण माहेरी लग्न आहे उगाच काही वाद नको म्हणून ती सर्व सहन करत होती काहीच न बोलता...

अचानक आनंदला ताप आला...डोक दुखायला लागले...तिने शांतपणे त्याला खिचडी दिली आणि गोळी  दिली...त्यांना वाटले नॉर्मल असेल...पण ताप रात्रभर उतरला नाही...सकाळी कसलाही विचार न करता तिने माहेरी सांगितले,ह्यांना ताप आहे..आम्ही लग्नाच्या दिवशी येऊ,आता जमत नाही...लग्नाला ४ दिवस होते...

डॉक्टर बोलले आपण टेस्ट करायला हवे...मला वेगळीच शंका येते...लगेच टेस्ट झाल्या...रिपोर्ट यायला वेळ होता...परवा रिपोर्ट कळेल..असे डॉक्टर म्हणाले, आरती मनात म्हणाली परवा तर लग्न आहे, मी कसे जाणार ह्याचे रिपोर्ट आल्याशिवाय...

उदास झाली,पण तीने लगेच स्वतःला सावरले,आनंद खूप घाबरून गेला होता....तो विचार करत होता...आपण कोणाला भेटलो??आणि तेवढ्यात फोन आला, त्याचा मित्र बोलत होता...अरे आनंद एक गोंधळ झाला यार...आपण सुशीलला भेटायला गेलो...पण त्याचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आलाय....

हे ऐकूनच आनंदच्या हातून फोन पडला...तो घाबरून गेला...टेन्शन आले त्याला...आरती आली तिथे...त्याला असे बघून ती त्याच्या जवळ गेली... तो लांब झाला...तिला काही कळंत नव्हते...तिने विचारले काय झाले??

आनंद ने सर्व सांगितलं....तिला पण धक्का बसला..पण तसे न दाखवता ती म्हणाली,तुम्ही घाबरू नका, सर्व व्यवस्थित होईल.आणि तिथून बाहेर आली...

बाहेर येऊन तिने सगळ्यांना आवाज दिला...आणि शांतपणे सगळ्या गोष्टीची कल्पना दिली...

सासूबाई एकदम रडवल्या झाल्या...पण ती ठाम होती निदान तसे दाखवत तरी होती...

तिने सगळ्यांना काय करायचे,कसे वागायचे याची पूर्ण कल्पना दिली...आनंद ला मानसिक आधार हवाय त्यामुळे आपण खंबीर राहायला हवे...

आणि अजून आनंदचे रिपोर्ट यायचे आहेत...आपण जे काही करतोय तें फ़क्त preacautions म्हणुन....प्लीज़ सगळ्यांनी थिंक पॉसिटीव्ह...सगळं व्यवस्थित होईल...

काय येतील आनंद चे रिपोर्ट???...
भावाच्या लग्नाला जायला मिळेल का तिला??
तिने सांगितलं सर्वाना काय करायला हवे तें??
आणि सर्वानी तिला मदत केली...

बघूया पुढच्या भागात...

पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका...
लाइक आणि कंमेंट करत रहा...
साहीत्य चोरी हा गुन्हा आहे.लेख शेअर करायचा असेल तर नावासहीत करण्यास माझी हरकत नाही...

© अनुजा धारिया शेठ

९ जुन २०२०