Aug 16, 2020
नारीवादी

तूच माझी सावीत्री.....२

Read Later
तूच माझी सावीत्री.....२

मागच्या भागात आपण पाहिले आरती चा वाढदिवस असतो...आणि आनंद तिला सरप्राईज द्यायला येतो तर खूप गोंधळ...

आनंद चा चेहरा उतरतो, सर्व बघून पण तो शांत राहतो..सगळे गेल्यावर आरती ला खुप बोलतो..
तूला सोसायटी, आणि बाहेरची माणसे जास्त प्रिय,माझ्यासाठी वेळ नाही...उगाच सगळी कडे पुढाकार काय गरज आहे तूला?? तू नसलीस तर काय कार्यक्रम होणाऱ नाही का?? तूला व्यसन लागलंय कौतुक करून घ्यायचे?? घरात बघत जा...मी सांगितलं की तूला वेळ नसतो, आणि बाकी सगळ्यांना द्यायला वेळच वेळ आहे...

आनंद माझे प्लीज ऐकून घ्या...आरती म्हणाली...तुम्ही कामांत बिज़ी, तुम्हाला वेळ नव्हता मला खूप कंटाळा यायचा हो, मुलांचे, घरातले, सर्व करून मी दमून जायचे...पण तुम्हाला वर्क लोड होता, रोज रोज तेच करून कंटाळा यायचा हो मला पण...म्हणून मी स्वतःला गुंतवून घ्यायला सुरुवात केली..

आता तुम्हाला वेळ मिळतो आहे, आणि मी बिज़ी म्हणून तुम्ही चिडता, रागवता मग् विचार करा माझी तेव्हा काय अवस्था असेल??

पण आनंद काही ऐकायच्या मनस्थिती मध्ये नसतो, तो परत ओरडताे, ए गप्प बस ह,मला नाही लेक्चर द्यायच, ते जे काही तत्वज्ञान सांगायचे ना तें बाहेर, मला अक्कल शिकवू नको...

हे सगळं ऐकताना आरती बघत बसली,विचारात हरवली हा नक्की माझाच आनंद आहे ना??

आणि तेवढ्यात जोरात आवाज होतो..ती दचकून बघते तर काय आनंद ने जेवणाचे ताट उडवले...

ती रडायला लागली, एवढा राग तीने पहिल्यान्दा बघितला..

आणि तिथुन पुढे रोज भांडण करू लागला आनंद, कधी जेवणावरून, कधी घरात पसारा म्हणून, तर कधी तिने जवळ यायला नकार दिला म्हणून..प्रत्येक गोष्टीत तिचा, तीच्या कामाचा, तिच्या छंदाचा उद्धार करू लागला...

आरती आतल्याआत कुढत चालली होती....कोणाशीच मन मोकळेपणाने बोलू शकतं नव्हती...

कधी कधी तिला वाटे, तोडून टाकावं हे नाते, ज्या नात्यात सुसंवाद नाही त्या नात्याचा काय उपयोग??

मोठ्या मोठ्या आवाजात ओरडत बोलणे, वस्तू फेकून देणे, सतत बाहेर पार्टी ला जाणे, कोणाचेही न ऐकणं, आनंद चे वागणे हाताबाहेर चालले होते...

मुलांकडे बघून ती जगत होती...सतत दडपणाखाली असायची...हळू हळू सोसायटी मध्ये सुद्धा सगळ्यांना आरती मधला फरक जाणवू लागला..पण ती स्वतःहून कधीच कोणाला सांगत नव्हती...

आणि आनंदला सुद्धा काहीच बोलत नव्हती..तिने आहे ती परिस्थिती मान्य केली..बोलुन काहीच उपयोग नाही हे तिला समजले होते.मुलांसाठी ती सारं काही अड्जस्ट करत होती..
आनंद आता तिला सारखं बोले, तू माझ्या सोबत मनाविरूद्ध राहतेस, तूला मी नकोय तूला फक्त मोठेपणा हवायं आणि मी कसा चुकीचा आहे असे दाखवून द्यायला हवे...साधेपणाचा आव आणून सावीत्री असल्याचा खोटा आव आणतेस तू...

पण तिच्यावर आता कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता...

आनंद तमाशा करायची एक संधी सोडत नव्हता...असे असताना तिच्या भावाचे लग्न जमले...लगेचचा मुहूर्त काढला, अगदी 2 महिन्यात सर्व तयारी केली....

बघूया पुढच्या भागात काय होते??
तिला लग्नाला जायला मिळेल का??
आनंद काय करेल???


पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका...
लाइक आणि कंमेंट करत रहा...
साहीत्य चोरी हा गुन्हा आहे.लेख शेअर करायचा असेल तर नावासहीत करण्यास माझी हरकत नाही...

© अनुजा धारिया शेठ

९ जुन २०२०