Aug 13, 2020
प्रेम

साथ भाग -5

Read Later
साथ भाग -5

"साथ"
भाग 5

  सकाळी राधा आणि पिहू निघाल्या...रोहन सोडत होता घरी. मोठी आई ,काकू ,काका सगळेच राधा ला परत ये म्हणून बजावत होते. श्रेया शिव पण पिहू ला परत भेटू म्हणून प्रॉमिस करत होते.

   रुटीन चालू झाला सगळ्यांच, राधाच्या रुटीन मध्ये एक फरक झाला  तो म्हणजे स्वातीचा रोजचा फोन.

   पिहू तर आजी आजोबांना श्रेया शिव आणि नेहा मावशीच्या गोष्टी सांगून दमत नव्हती. आणि ते ही ऐकण्यात गुंगून गेले.

   "काय हा मुलगा , किती पसारा खोलीत, कॉफी पिऊन कप पण असाच टेबले वर" मोठी आई एक एक वस्तू रोहनच्या खोलीत आवरत होत्या. पुस्तक उचलताना त्यातून एक फोटो खाली पडला. रोहन च्या पुस्तकात मुलीचा फोटो. तरीच हा लग्नाला नाही म्हणतोय, फोटो न बघताच त्यांनी पदराआड लपवला आणि पटकन आपल्या खोलीत गेल्या. फोटो बघताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप  बदलले, फोटो उशीखाली ठेवला आणि त्या स्वैपाकघरात गेल्या.सगळं आवरलं आणि दुपारी बेडवर पडल्यावर त्या फक्त फोटो चा विचार करत होत्या, मनातल्या मनात विचार केला आणि त्यांनी ठरवलं आजच रोहन शी बोलायचं.


     "रोहन ही घे कॉफी, आणि मी आज तुझं काहीएक ऐकणार नाहीये. हे मुलींचे फोटो आहेत. आणी एक मूलगी निवड . तुझ लवकरात लवकर लग्न ठरवणार आहे मी. मला बाकी काही ऐकायचं नाहीये".

    "अगं आई ऐक तरी, मला तुला काहीतरी सांगायचंय, पण कक सांगू कळत नाहीये."रोहन

   "रोहन , मला काहीच ऐकायचं नाहीये, जे मी संगतीये ते आता फायनल आहे, आणि तू ऐकणार आहेस माझं. खूप सूट दिली तुला, हवं तस वागू दिल पण आता नाही. फोटो बघ , आणि तुला बघायचे नसतील तर मी ठरवून टाकेन आणि तुला ते ऐकावच लागेल. "एवढं बोलून मोठी आई निघून गेली.

   कधीच अस न बोलणाऱ्या आपल्या आईकडे बघत रोहन निशब्ध झाला. 
   

 

क्रमशः

-©️®️सौ गौरी विवेक जोशी

   


   

Circle Image

Mrs Gauri Joshi

Homemaker

I am homemaker, mother, and pharmacist by education but not working now a days. Reading is my passion.