Jul 29, 2021
मनोरंजन

नणंद-भावजय

Read Later
नणंद-भावजय
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

नणंद-भावजय
या विषयावर प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात.????माझा अनुभव फार गोड आहे... त्याच वरून आजची कथा सुरू करूया.????
विविका आज खूप नर्व्हस होती, कारण तिला बघायला आज पहिल्यांदा बघायला मुलाकडचे येणार होते. विवीका दिसायला सुंदर, उंचपुरी, ताठ बांधा, कोणालाही पहिल्याच भेटीत आवडेल अशी आणि ती एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. पण तिला इतक्यात लग्न करायचे नव्हते, तरी पण स्थळ चांगलं आल म्हणून घरच्यांनी समजवून तिला तय्यार केले. ती पण म्हणाली की ठीक आहे एकदा बघून घेऊया. तरी बघायला येणार म्हटल तर प्रत्येक मुलीच्या मनात घालमेल ही होतेच, तसच काहीतरी आपल्या विवीका च होत.
विवीका ने छान तय्यार झाली, फिक्या गुलाबी रंगाची साडी, त्यावर हलका मेक अप, साधी हेअरस्टाईल अगदी गोड दिसत होती. आई ने पाहिल्यावर लगेच तिची दृष्ट काढली. वेळ झाली पाहुणे येण्याची, 11 वाजता येणार होते ते. थोड्याच वेळात पाहुणे आले, मुलाचे आई बाबा आणि त्याची मोठी बहिण सोबत च मुलगा पण आला, त्याच नाव अमन, अमन सुद्धा देखणा, उंचपुरा, इंजिनिअर झालेला, एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्ट वर होता.. 
सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. विविका चहा घेऊन बाहेर आली. पाहताच क्षणी अमन विविकाच्या प्रेमात पडला. त्याची नजर तिच्या वरून हटेनाच, तितक्यात त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला चिमटा काढला आणि तो भानावर आला. अमन ची मोठी बहीण वैशाली, लग्न झालेली, स्वभावाने प्रेमळ आणि शांत., तिला ही विवीका पाहताक्षणी खूप आवडली आणि अमन तर तिच्या प्रेमातच होता त्याचा प्रश्नच नव्हता. त्याचा पण होकार होता. वीविका ला पण अमन आवडला. विशेष म्हणजे तिला तिची होणारी नणंद खूप प्रेमळ वाटली आणि समजून घेणारी वाटली. 15 दिवसाने सक्षागंध आणि 2 महिन्याने लग्न ठरलं..

लग्नाचा दिवस आला, लग्न विधीपूर्वक पार पडले. विवीका सासरी आली. तिचा अगदी राणी प्रमाणे गृहप्रवेश झाला. सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन नवरीने गोड बनवाव अशी त्यांच्याकडे पद्धत होती, सासूने सांगितलं की सगळ्यांसाठी गोडाचा शिरा कर. विविका का सगळच नवीन होत, तिला काही सुचत नव्हते, तेवढ्यात तिची नणंद म्हणजे वैशाली आली.  आणि म्हणाली चल मी तुला मदत करते.. हळूहळू वैशाली ची मदत घेऊन विवीका ने गोडाचा शिरा केला आणि सगळ्यांना दिला. सगळ्यांना खूप आवडला, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. विविका ला पण छान वाटलं. तिने वैशू ताई ला धन्यवाद म्हटल. वैशाली ने तिला समजावलं की काहीही गरज पडली तर मला सांग.. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. त्यावरून दोघांमध्ये छान मैत्रीची सुरुवात झाली. प्रत्येक अडीअडचणी ला वैशाली वीविका सोबत असायची. रोज फोन वर बोलणं सुरू होतच. अश्यातच त्यांच्या नात्याला नवीन नाव मिळालं मैत्रीचं... पाहायला गेलं तर दोघींमध्ये 12 वर्षाचा फरक होता, पण वैशाली ने कधी आपल्या मधला फरक विवीका ला जाणवू दिला नाही... तिला कोणत्याही बाबतीत ऑर्डर्स दिल्या नाही मग आणि काहीच महिन्यात दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. घरातले पण खूप आनंदी होते दोघींना अस सोबत बघून, अगदी अमन सुद्धा, कारण दोघींनी मिळून मिसळून एकमेकांना साथ दिली. एकमेकींच्या आनंदात दुःखात सहभागी झाल्या.. ☺️ आणि विशेष म्हणजे एकमेकींच्या नात्यात इगो कधी आणला नाही. अश्या प्रमाणे नणंद भावजय मैत्रिणी झाल्या...आज त्यांच्या नात्याला १० वर्षे पूर्ण झालीत, त्यांनी आधीच ठरवलेलं होत की आजचा दिवस आपला असेल, त्या प्रमाणेच त्या दोघी मस्त चित्रपट बघायला गेल्या त्यानंतर शॉपिंग ला गेल्या आणि नंतर जेवायला... दोघींनी सोबत छान वेळ घालवला, आणि मस्त साजरा पण केला...???? आणि असे अनेक वर्ष त्या दोघी साजरे करतीलच...????

काय मैत्रिणींनो बरोबर ना..! आपल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील अशा नाही, मग समजून घेणे आणि समजून देणे हे प्रत्येक नात्यात गरजेचे आहे.. कोणतंही नातं असो....✌️
मी पहिल्यांदाच लिहिते आहे काही चुकल असेल तर क्षमा असावी.????

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Snehal Malokar

Fashion designer

I'm Snehal. I like to read intersting Stories, intersting books. I love to design dress..