Aug 06, 2020
प्रेम

का कळेना... (भाग १)

Read Later
का कळेना... (भाग १)

© शुभांगी शिंदे


का कळेना!!  (भाग १)


रिसेप्शनने मिटींग सुरू असताना urgent call म्हणून मेघाला फोन लाइन transfer केली….
रिसेप्शन : मेघा Mam…. This is urgent call for you….

मेघा : OK… Please transfer….

(पलीकडून आवाज येतो)

Hello….. ताई???, ताई… मी… रेवतीशी आता register marriage करतोय…. मी… तुला न सांगता लग्न करुच शकत नव्हतो म्हणून आधी तुला सांगितलं… मन हलकं झाल ताई….

(समोरून प्रमोद भराभरा बोलुन गेला)

तिने फक्त OK म्हणून फोन ठेवून दिला….


मेघा…… एक passionate Interior designer….. या कामाची तिला प्रचंड आवड…. प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची…. जिव ओतून घराला घरपण द्यायची…. डोळ्यांचे पारणे फेडणारे डिझाइन तयार करायची…..
मेघा आज खूप बिझी होती…. 

 

आज फायनल डिझाइन क्लायंटला सादर करायच होत तिला….. आणि ते क्लायंटला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला…. तिच कामच तस होत की क्लायंटला नेमक काय हवय हे तिला कळल की बस्स काम फत्ते….

 

पण प्रमोदचा फोन आल्यापासून थोडी अस्वस्थ झाली होती…. पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केल…. आणि as usual …. क्लायंट खुश झाले…. मेघाने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी निघून आली ….


प्रमोद मेघाचा लहान भाऊ… आईवडील कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते…. मेरीट वर अभ्यास करून आज प्रमोद मोठ्या पदावर कार्यरत आहे… कॉलेजमध्ये त्याला रेवती भेटली आणि तिथूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले….


मेघाला त्याने रेवतीवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते…. मेघालाही रेवती पसंत होती…. पण हे असं अचानक register marriage??
डोक भणभणायला लागल विचार करून….. तिने कॉफी बनवली आणि मस्त सोफ्यावर बसून एक एक घोट घेत मन शांत करत होती….. इतक्यात दारावरची बेल वाजली…..


मेघाने दार उघडले समोर प्रमोद आणि रेवती उभे…. दोघांच्या गळ्यात फुलांचा हार आणि रेवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळ सांगुन जात होत की खरोखरच यांनी लग्न केले…..


मेघाने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली….आतुन गाडीची चावी घेऊन आली …..


मेघा : चला. ….


प्रमोद : ताई???? (प्रश्नार्थक मुद्रेने) कुठे ?????


मेघा : रेवतीच्या घरी…


प्रमोद : अगं पण????

मेघा : सगळं आत्ताच सांगू???? चल आधी…. हि घे चावी…. गाडी स्टार्ट कर…..

प्रमोद : OK

मेघा : रेवती घरी अजून काही माहित नसेलच तुमच्या लग्नाबद्दल ??

रेवती : नाही ताई, पण मला खूप भीती वाटतेय … 

मेघा : लग्न करताना नाही वाटली???? मग आता का घाबरतेस????

प्रमोद : ताई नको ना…. खुप राडा होईल….


मेघा : काय घाई होती लग्नाची…. आपण रीतसर मागणी घातली असती….. हे Direct register marriage करायची काय गरज होती???

प्रमोद : मीही तेच बोलत होतो हिला... पण ही ऐकायलाच तयार नव्हती….. जिव द्यायला निघाली होती…. 


मेघा : कसल्या गं तुम्ही सुशिक्षित मुली??? आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता की स्वतःवर???


रेवती : नाही ताई…. तस नाही…. पण आमच्या घरी Love marriage ला परवानगी नाही आणि प्रमोदचे आईवडीलही नाही म्हणजे तो अनाथ आहे….. म्हणून पण परवानगी नाही….


मेघा : मी बघते काय ते….. ते हार काढून गाडीतच ठेवा…. आणि रेवती तु ते मंगळसूत्रही बाजुला काढुन ठेव…..


(अनाथ हा शब्द ऐकून तर तिचा पाराच चढला पण तस तिने दाखवले नाही….. गाडी रेवतीच्या घरासमोर येऊन थांबली)

घर कसला सुंदर असा बंगला होता तो…..

मेघा : प्रमोद गाडीतल्या दोन बॅग सोबत घे….

प्रमोद : काय आहे यात????

मेघा : चल आधी…. मग कळेल….

तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात…. मेघा एक दीर्घ श्वास घेऊन… दारावरची बेल वाजवणार …. त्याआधीच आतून दार उघडते….. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात…. 


रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते… घरातून रेवतीचे आईबाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते…. रेवतीला बघून तीची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली…. आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले…. तोपर्यंत मेघा आणि प्रमोद शांतच होते… पाहुणे निघून जाताच….


(रे) आई : रेवती तुला सांगितलं होतं ना…. आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून….. आज तरी घरी थांबायचे होते….

(रे) बाबा : जाऊ दे ग लहान आहे अजून ती…..

(रे) आई : लहान??? आता तिच्यासाठीच पाहुणे बोलावले होते ना????

रेवती : म्हणजे????


एव्हाना मेघाला घरच्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता की ते पाहुणे रेवतीला पसंत करण्यासाठी आले होते…..


रेवतीला मध्येच थांबवत मेघाने स्वतःची आणि प्रमोदची ओळख करून दिली…..


मेघा : सर मी मेघा….. मेघा सबनीस आणि हा माझा लहान भाऊ प्रमोद…. MBA केल आहे याने…… आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे…. आज मी याच्यासाठी रेवतीला मागणी घालायला आले आहे….


(रेवती आणि प्रमोद एकमेकांना आश्चर्याने बघतात…. आपली ताई आपल्याला यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षाच नव्हती त्यांना…. )


इतक्यात रेवतीचा मोठा भाऊ विक्रम आत येतो जो पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो…..


विक्रम : Sorry…. पण ते शक्य नाही…. रेवूच लग्न आम्ही आत्ताच माझ्या मित्रासोबत पक्क केलं आहे…. So….. तुम्ही निघालात तरी चालेल…..


मेघा : (शांतपणे रेवतीच्या बाबांना) सर…. रेवती आणि प्रमोद एकमेकांना पसंत करतात…. प्रेम आहे त्यांच एकमेकांवर…..


रेवतीचे आईबाबा आणि विक्रम रेवतीकडे बघतात, रेवतीची खाली झुकलेली मान त्यांना सर्वकाही सांगून जाते…..


(रे) बाबा : (काहीसा विचार करून ) मग तुमच्या आईवडीलांना माहित आहे का हे…. कि तुम्ही परस्पर ठरवुन आलात…. का सबनीसांच्या मुलांना आगाऊपणा करण्याची सवयच आहे……


मेघा : (तरीही शांतपणे) नाही आम्हा सबनीसांच्या मुलांना मूळात आगाऊपणा जमतच नाही…. आमचे आईबाबा नाही म्हणून मी प्रमोदची मोठी बहीण या नात्याने माझ हे कर्तव्य समजून इथे आली आहे…..


(रे) बाबा : I am sorry….. वाईट वाटले ऐकून की तुमच्यावर आईबाबांच छत्र नाही… ते असते तर एकवेळ आम्ही विचार केला असता…. पण आता हे लग्न शक्य नाही… 


मेघा : अहो पण का???? हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात…. आपल्या मुलीला सासूसासरे यांचा त्रास नको म्हणून….. मग काय हरकत आहे???


(रे) आई : मुलांना वेगळ केल की ते आपलीच मनमानी करतात…. घर संसार याच त्यांना काहीही पडलेल नसत… घरात मोठी माणसे असली की दोघांतले वाद विकोपाला जात नाही….. त्यांची चूक त्यांना वेळीच उमगली की संसाराचा गाडा सुरळीत पार पडतो….. ते उमगण्यासाठीच घरी मोठी माणसे हवीच…


विक्रम : अशी मुलं प्रेम तर करतात पण family bonding काय असते हे न कळल्याने नात टिकवू शकत नाही….


मेघा : (विक्रमच बोलन मध्येच थांबवत) एक मिनिट Mr. ……? Whatever your name is….. 

Family bonding आम्हाला चांगलीच कळते…. पंधरा वर्षे झाली आईबाबा कार अपघातात जाऊन…. आमचा प्रमोद फक्त दहा वर्षाचा होता… तेव्हा पासून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत….


लग्न न जमवण्यासाठी कोणतीही शुल्लक कारणं देऊ नका….


प्रमोद : ताई आपण निघूया इथुन…. अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको….


मुळात रेवती यासगळ्यांत काहीही बोलत नाही याचा राग प्रमोदला येतो…..प्रमोद मेघाचा हात धरून निघायला लागतो….


मेघा : (तशीच मागे वळून) आमच्या आईवडिलांनी फार चांगलेच संस्कार आमच्यावर केलेत म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो आणि आमची family bonding इतकी चांगली आहे की रेवतीशी  register marriage करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले…. तरी की, ” ताई…. मी रेवतीशी register marriage करतोय”… 
But unfortunately तुमच्यात ती bonding नाही….. तुमची बहिण पळून जाऊन लग्न करते इथेच तिचा तुमच्या वरचा विश्वास कळतो…. 


रेवती आज माझ्या भावाची बायको आहे पण तिने पळुन लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको म्हणून मी इथे आले होते….. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत ज्यांनी मला आधी रेवतीचा आणि तिच्या घरच्यांचा  विचार करायला भाग पाडलं……. येतो आम्ही……


(मेघा आणि प्रमोद निघून जातात)


क्रमशः

 

(हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.. काही त्रुटी असल्यास तेही कळवा.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल