Aug 16, 2020
नारीवादी

इरा टीम तुमचे भरभरून आभार

Read Later
इरा टीम तुमचे भरभरून आभार

"इरा टीम"..तुम्हाला भरभरून धन्य वाद..

आज मुद्दाम च इरा टीम विषयी लिहायचे ठरवले,बरेच दा मनात यायचे पण नेमके इरा टीम ला कशा प्रकारे धन्य वाद द्यावे हेच कळत नव्हते,शेवटी ठरविले आज इरा टीम चे धन्य वाद केलेच पाहिजे....

मग काय कुठलाही क्षण न गमवता लागले लिहायला,खर तर मला इरा वर्धापन दिनानिमित्त च लिहायचे होते,पण त्या वेळेला मी अगदीच नवीन होते,आणि माझ्या परिचयाचे कुणीच नव्हते शिवाय योगिता मॅडम च्या,,इच्छा खूप झाली होती लिहिण्याची पण मी विचार करत नाही तोपर्यंत बरेच लेखकांनी लिहिले सुध्दा,आणि त्यांच्या तुलनेत मला काहीच इरा टीम विषयी माहिती नव्हती,,मला इरा विषयी स्वतः चा अनुभव लिहायचा होता....

So आज लिहायला घेतले,सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मी इरा टीम पर्यंत पोहचू शकले अथवा ज्यांनी मला इरा वर लीहिण्या साठी मार्गदर्शन केले त्या म्हणजेच योगिता मॅडम,,,,यांच्याविषयी मला सांगावेसे वाटते की इरा ला जॉईन कसे व्हायचे नंतर ब्लॉग कसे सेंड करायचे,,असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात येत होते आणि मी योगिता मॅडम ला विचारात होते,त्यांनी कधीही न रागविता नेहमी मला प्रेरणा देत लिखण्याबद्दल नेहमी अचूक माहिती दिली...व मला एक लेखिका म्हणून ओळख दिली,,अशा आपल्या योगिता मॅडम यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच....पण तरीही आज मला त्यांना थांक्स म्हणायचे आहे....thank you योगिता मॅडम...

आणि तसेच योगिता मॅडम चे लेखन हे खूप छान असते,मी नेहमी च त्यांचे लिखाण वाचत असते,,तसेच त्यांचे न्यूज पेपर ला आलेले लेख तर उत्तम असतात आणि सोबतच प्रेरणादायी सुध्दा असतात,,मला लिहायला ला प्रेरणा त्यांच्या मुळेच मिळाली...म्हणजेच मी त्यांना आधी पासूनच ओळखते आणि त्यांचे बरेच लेख मी वाचलेले आहे,,त्यांच्या लेखातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात....अशा आपल्या योगिता मॅडम लिखणामार्फत नेहमी प्रेरणा देणाऱ्या त्यांना पुन्हा एकदा धन्य वाद म्हणते...

आता येते,इरा टीम च्या निर्मात्या म्हणजेच संजना मॅडम यांच्याकडे,,,,oh my God... किती ही सहनशक्ती बापरे...खरंच मला येवढं कौतुक वाटते ना मॅडम चे की खरंच....आपण कितीही प्रश्न विचारा संजना मॅडम नेहमी उत्तर देतात आणि ते सुध्धा न रागवत...कमाल आहे बुवा....किती सहजतेने सर्वांचे प्रोब्लेम सोडविता त,विशेष म्हणजे आपण एखादा प्रश्न केला तर त्यांचे उत्तर मॅडम देतातच... इग्नोर करत नाहीत....या गोष्टीमुळे मॅडम तुम्ही सहज आम्हा लेखकांचे मन जिंकून घेता...

मला ही बरेचदा इश्यू आलेत,आणि मी संजना मॅडम कडे सांगितले,आणि त्यांनी मला नेहमी सकारात्मक उत्तर देत माझे सर्व प्रोफाइल प्रोब्लेम दूर केलेत,,ब्लॉग सबमिट करतांना ही बरेच issue येतात पण मॅडम नेहमी च आपले issue solve करत असतात....यावरून च मॅडम चे nature कळते मॅडम तुम्हाला नक्कीच खूप प्रगती मिळणार...

आणि तुमचा लाईव्ह प्रशोंतरी कार्यक्रम मध्ये तुम्हाला प्रत्येक्षात बघितले तर खरंच तुम्ही खूप छान दिसता,त्या अगोदर तुम्हाला कधी बघितले नव्हते,,पण तो प्रोग्राम बघितल्यावर तुम्ही आणखीनच आपल्या शा झाल्या....खूप छान होता मॅडम तुमचा लाईव्ह प्रोग्राम...मी लाईव्ह तर नाही बघू शकले पण नंतर बघितला ,खरंच मस्त होता...

मला ही दीड वर्षाचा मुलगा आहे मॅडम,त्याला सांभाळताना नाकी नऊ येतात,पण तुम्ही कसं काय manage करता,तुमची तर कमाल च आहे,,आणि प्रत्येक लेखिकेला उत्तर द्यायला नेहमी तुम्ही सतर्क असता... खरंच तुम्हा स्त्रियांना पाहून आम्हा स्त्रियांना खूप चालना मिळते....

मी लिखाण लग्ना अगोदर सोडले होते पण इरा मुळे आणि MOMSPRESSO मुळे मला पुन्हा लिहायला मिळाले...आणि पुन्हा माझी लेखिका म्हणून ओळख निर्माण झाली...तर या बद्दल मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणायचे आहे...मॅडम तुम्हाला पाहून माझी लिहिण्याची इच्छा आणखीनच वाढत चालली आहे....आणि म्हणूनच thank you so much Madam

हा लेख मी संजना मॅडम आणि योगिता मॅडम ला प्रेरित होऊन लिहिला आहे त्यांचे आभार मानायला...आवडला असेल तर शेअर करण्यास काहीच हरकत नाही.....

Ashwini Galwe Pund.......