Aug 06, 2020
प्रेम

हे बंध रेशमाचे - भाग 23

Read Later
हे बंध रेशमाचे - भाग 23

हे बंध रेशमाचे - भाग 23

आनंदने आणलेली साडी आईला दिली आणि तो वरती आपल्या रूम मध्ये आला. नेहा अजून घरी आली नव्हती. त्यामुळे त्यानं तो वन पिस वोर्डरोब मध्ये ठेवला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. हळूहळू रात्र गडद होऊ लागली. नेहा तोपर्यंत घरी आली. आनंद लवकर घरी आलेला तिला माहीत नव्हतं. तो आवरून खाली डेकोरेशन वगरे बघायला गेला. पण नेहाने त्याला पाहिलं नव्हतं. पार्टीसाठी काय घालू असा तिचा विचार चालू होता. ती कधीच अशा पार्टीजना गेली नव्हती. त्यामुळे पार्टीला कोणते कपडे घालतात ,काय करतात या बाबत तिला काहीच कल्पना न्हवती. नेहमीप्रमाणे तिनं आवरायला घेतलं. आपल्यासाठी तिनं एक छानशी काठाची साडी नेसायला बाजूला काढली. गुलाबी आणि जांभळ्या रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसत होती. तिनं केसांची सैलसर वेणी घातली. कपाळाला चंद्रकोर लावली आणि स्वतःलाच निरखत ती आरशा समोर उभी होती. तेवढ्यात खोलीचं दार ढकलून आनंद आत आला. त्यानं नेहला पाहिलं ती साडी नेसून तयार होती. तिचं आनंदकडे लक्ष गेलं. 

"माझी तयारी झालेय..." तिनं सांगितलं.

"तू......तू अशी येणारेस पार्टीला....??? " आनंदने विचारलं

" का ? चांगली नाही का दिसते ? " ती स्वतःला निरखत म्हणाली.

"छानच दिसतेयस गं ...." तो पटकन बोलून गेला. 

"काय....??? " तिला आश्चर्य वाटलं

आपण कसे काय एकदम असं म्हणालो हे त्याला कळेना.

" काही नाही.....I mean  तू साडी चेंज कर....आपल्याकडे पार्टी आहे सत्यनारायणाची पूजा नाही..."  असं म्हणून त्याने वोर्डरोब मधून तिच्यासाठी आणलेला वन पिस बाहेर काढून तिला दिला.

"मी ड्रेस आणलाय तुझ्यासाठी....हा घाल.." तो बोलला

आनंदने आपल्यासाठी ड्रेस आणला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिनं बॉक्स उघडून ड्रेस बाहेर काढला. रेड कलरचा सिवलेस, पाठीमागून नेटेड आणि पुढून डीप नेकचा लॉंग वन पिस होता. तीन तो बघितला. पण हा कसा घालायचा आता असा तिला प्रश्न पडला.

"पण ......पण मी घालत नाही असे कपडे..." तिनं घाबरतच आनंदला सांगितलं.

"आजच्या दिवस घाल...माझे सगळे फ्रेंड्स येणारेत त्यांच्यासमोर अशी काकूबाई सारखी येऊ नकोस...." एवढं बोलून तो आपले कपडे घेऊन दुसऱ्या रूम मध्ये तयार होण्यासाठी निघून गेला.

तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे हे कारण आहे तर ....म्हणून हे माझ्याशी धड वागत नाहीत का...ती स्वतःशीच बोलत होती. शेवटी आज त्यांच्या लोकांसमोर आपण त्यांचा मान राखायला हवा असं तिला वाटलं. पण तो ड्रेस घालवासा तिला वाटेना. ती कितीतरी वेळ तशीच बसून होती. लॉन वरती पाहुणे यायला सुरुवात झाली. आनंद आवरून खाली आला...क्रीम कलरचा शर्ट त्यावर डार्क नेव्ही ब्लू कलरचा कोट ..त्याच कलरची पॅन्ट.. अशा लूक मध्ये तो हँडसम दिसत होता.. आनंदचे फ्रेंड्स स्नेहा , पियुष , निहार हे पण आले होते. बराच वेळ झाला नेहा खाली आली नाही म्हणून आनंदने स्नेहाला तिची तयारी झालेय का ते बघायला पाठवलं. तिनं वरती येऊन आनंदच्या रूमच दार वाजवल. तशी नेहा भानावर आली. डोळ्यात आलेलं पाणी तिनं पुसलं आणि दार उघडलं. 

" हाय.......मी स्नेहा आनंदची फ्रेंड..." ती आत येत म्हणाली

"हाय...." नेहा कसनुस हसू आणून म्हणाली

"तुझी तयारी झालेय का ते बघायला पाठवलंय मला आनंदने...." तिनं सांगितलं

"हमम....." ती काहीच बोलली नाही. तिनं तिच्यापुढे तो ड्रेस ठेवला आणि म्हणाली..

"हा ड्रेस आणलाय त्यांनी माझ्यासाठी पण मला सवय नाही गं..." नेहाने सांगितलं.

"अग छान आहे की ड्रेस....तू असं कर थोडा वेळ हा ड्रेस घाल.. त्याने एवढा आणलाय तर...नंतर वाटल्यास चेंज कर ...." स्नेहा म्हणाली

तसं नेहाच्याही चेहऱ्यावर थोडंस हसपे आलं. 
"हो चालेल..." ती म्हणाली.

मग स्नेहाने तिची तयारी केली. तिचे केस छान पिनअप करून वरती बांधले. त्यावर तिला मोठे एअरींगस घालायला दिले. चेहऱ्याच्या बाजूने दोन बटा कर्ली करून सोडल्या.
गळ्यात एक डायमंडचा नेकलेस घातला आणि तिच्या थोडासा मेकअप करून रेड कलरची लिपस्टीक लावली. खूप सुंदर दिसत होती नेहा....!!! 

"छान दिसतेयस....आज तुमचा दिवस आहे सो आज तू स्पेशलच दिसायला हवस  "...अस म्हणून स्नेहाने तिचा एक फोटो काढला आणि एक सेल्फी काढून ती तिला खाली घेवून आली. तोपर्यंत खाली बऱ्यापैकी पाहुणे जमले होते. हॉस्पिटलचा स्टाफ देखील आला होता. नेहा आली तशा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आनंदची तर नजरच हटत नव्हती नेहा वरून...!!! 'she is looking beautiful..' तो मनातच म्हणाला. नेहा खाली आली तसं त्यानं पुढे होऊन तिला हात दिला आणि तिला घेऊन तो स्टेजवर आला. लॉंग वन पिस मुळे आणि अशा कपड्यांची सवय नसल्याने नेहाला त्यातून चालता येत नव्हतं. कसंबसं आनंदला धरून ती जात होती. एकेकजण येऊन त्यांना भेटत होता. आनंद तिची सगळ्यांशी ओळख करून देत होता. ती ही हसून प्रत्येकाला प्रतिसाद देत होती. पण ड्रेसच्या डीप नेक मूळे तिला फार ऑकवर्ड वाटत होतं. मग हळूहळू येणारी माणसं पांगली. प्रत्येकजण आपापल्या माणसांसोबत जाऊन बोलू लागला. वेटर ड्रिंक्स घेऊन फिरत होता. सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स ज्याला जे आवडेल त्याला तो सर्व्ह करत होता. आनंदही बाकीच्या फ्रेंड्सना भेटायला खाली आला. 

"हाय डूट.... कैसा है भाई..." त्याच्या केदार नावाच्या मित्राने त्याला मिठी मारत म्हटलं.

"एकदम मस्त....तू कसा आहेस ? कधी आलास भारतात ? " आनंदने विचारलं

"झाला एक महिना...बाकी बायको छान पटवलेयस हा " त्यानं आनंदला डोळा मारत म्हटलं. तसं सगळेचजण हसले.इतक्यात तिथे मिताली आली. ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पिस..त्यावर मॅचिंग इअररिंग्स...मोकळे सोडलेले केस...त्यात ती खूपच हॉट दिसत होती. सगळ्यांनी तिला हाय हॅलो केलं. 

"हाय आनंद " तिनं त्याला सगळ्यांसमोर मिठी मारली

"हाय...You are looking Gaugioues !!! " तो म्हणाला.

"Thank you..... तुझी बायको कुठाय पण ? " मिताली

"आहे इकडेच. " त्याने  बोटानेच परब मॅडमशी बोलणाऱ्या नेहाकडे बोट दाखवलं. तिला वन पिस मध्ये बघून मितालीने नाक मुरडल आणि ती पुन्हा बाकीच्या फ़्रेंडस सोबत बोलू लागली. मग पियुष देखील त्यांना येऊन जॉईन झाला. 

"काय आनंद काय म्हणतंय हॉस्पिटल आणि तुझा अभ्यास ? " पियूषने विचारलं

"छान चाललंय...आता पुढच्या महिन्यात दिल्लीला जायचंय कॉन्फरन्स आहे.." तो म्हणाला. 

"पण काय रे ...एवढी छान बायको कुठे शोधलीस...? आम्हाला वाटलं होतं तू या मितालीलाच पटवशील..." असं म्हणून तो हसू लागला. 

"नाही रे असं काही....तुम्ही पार्टी enjoy करा.....मी तोपर्यंत बाकीच्यांना काय हवं नको ते बघून येतो " असं म्हणून तो तिथून सटकला आणि हॉस्पिटलच्या ग्रुप जवळ आला. 

 

..........................

डॉ. साठे, परांजपे या सगळ्यांनीच नेहाची स्तुती केली.आनंदच लक्ष नाही असं बघून नेहाने ड्रेस चेंज करून यायचा विचार केला. स्नेहाला सोबत घेऊन ती वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली. मगाशी नेसलेली गुलाबी आणि जांभळ्या कॉम्बिनेशनची साडी पुन्हा नेसून ती खाली आली. आता जरा तिला बरं वाटत होतं. सगळ्यांशी हसून बोलत ती वृषालीताई उभ्या होत्या तिथे येत होती. इतक्यात  तिथल्या एका दगडाला पाय लागून तिचा तोल गेला. ती समोर धपकन पडणार इतक्यात बाजूलाच असणाऱ्या पियूषने तिला सावरलं. तशी मग ती नीट उभी राहिली पण तिला पाय टेकवता येत नव्हता. 


" वहिनी मगाच्या ड्रेसपेक्षा तुम्ही साडीत खूप सुंदर दिसताय..." पियूषने सांगितलं


"Thank you " त्याच्या अशा कॉम्प्लिमेंट ने ती हरखली आणि तिच्या चेहऱ्यावर छानसं हसू आलं होतं. अजूनही तिचा हात पियुषच्या हातात होता कारण ती एका पायावर उभी होती.तो तिला धरून खुर्ची जवळ नेऊ लागला. इतक्यात आनंदच तिकडे लक्ष गेलं..त्याला पियुषचा खूप राग आला...तरातरा चालत तो त्या दोघांजवळ आला.


क्रमशः...