Aug 12, 2020
प्रेम

बंध प्रेमाच्या सहवासाचे...भाग 11

Read Later
बंध प्रेमाच्या सहवासाचे...भाग 11

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 11

 

(हो ना.........काय तु पण मेघना... एवढा सॅड चेहरा करुन बसायला काय झाल.......सुरज

अरे हो तुम्ही आहातच की..........मेघना

बर चला कॅन्टीला जाऊया आत्ताच लेक्चर ऑफच आहे ना.........सुरज

अरे नको  तुम्ही या जाऊन मी बसेन नोट्स वाचत.......मेघना)

 

आता पुढे........

 

मेघना आम्ही तुला तुझे मित्र वाटतच नाही ना म्हणुन आमच्या सोबत येत नाहीस.........हो ना......मानस मुद्दाम ति येण्यासाठी बोलतो..........

 

अरे अस काही नाही खरच......मेघना

 

नाहीये ना मग चल ना आमच्या सोबत कॅन्टीला.........सुरज

 

अरे पण......ऐक तर थोङ.........मेघना

 

तु खरच आम्हाला तुझे मित्र मानत असशील तर येशील आमच्या सोबत.......मानस

 

मेघनाला काय कराव काहीच कळेना जाव तर एक आणि नाही जाव तर एक......जायला काय हरकत आहे बाबा थोडीच इथे बघायला येणार आहेत......मेघना मनातच विचार करते.........बर चला जाऊया..

 

मानस व सुरज खुश होतात.........हा चल......

 

तिघेजण कॅन्टीनला येतात कोल्ड कॉफी ऑर्डर करतात.....व गप्पा मारत असतात.......थोडयावेळाने मानस श्वेताने सांगितलेला विषय काढतो.......

 

मेघना.........श्वेताने आम्हाला काल सांगितल सगळ........अस बोलल्यावर मेघना मानसकडे बघते.......तिला काय बोलाव कळेनाच........

 

मानस ते ते........मेघना

 

अग एवढ ऑक्वड वाटुन नको घेवुस.......बिन्धास्त बोल.......मानस

 

मानस ते तुम्हाला कस सांगायच म्हणुन नाही बोलले.....मग श्वेता म्हणाली मी सांगते म्हणुन.....मेघना

 

अग हो......हे बग मेघना.... असतो एकेकाचा स्वभाव आणि तुझ्या बाबाच्या अश्या वागण्यामागे काही तरी कारण असेल ना म्हणुन असे करत असतील तु जास्त विचार नको करत जाऊस......आणि हो आमच्यासोबत बोलताना वगेरे संकोच नको करत जाऊस......आणखीन एक म्हणजे बग तुला माझी आयडीया कशी वाटते.........घरी असताना तु त्यांना हव तस रहात जा आणि कॉलेजला आल्यावर तुला हव तस.......त्यामुळे कोणालाच वाईट वाटणार नाही.......मानस

 

तुझ सगळ पटत रे मानस पण मनात एक भिती असतेच ना........आजपर्यत मी अशीच रहात आलेय मग अस अचानक अस बिन्धास्त वागायला कस जमेल.........मेघना

 

अचानक नको करु पण हळु हळु तर सवय होईल ना..........मानस

 

हा मी नक्की ट्राय करेन..........मेघना

 

ट्राय नको अस वाग आज पासुन.........सुरज...

 

हो हो वागेन.........हयाला तर सगळयाचीच गडबड असते बग.........मेघना हसत बोलते........

 

आता कस अस हसत राहत जा...........मानस

 

हो......थॅक्स मानस........खुप छान समजुन सांगतोस.........मेघना

 

ओय.........मैत्रीचा नियम विसरलीस का.........मानस

 

ओ.........सॉरी सॉरी विसरलेच.........मेघना

 

परत तेच........बर बाबा नाही बोलत ओके.........मेघना

 

इस बात के लिये पार्टी तो बनती हे.........सुरज

 

हयाला तर कोणतही कारण लागत बग पार्टीसाठी......मेघना

 

अरे हो मग काय पार्टी करण्यासारखच कारण आहे.....तु आज पासुन न घाबरता..... बोले तो बिनधास्त वागणार आहेस.....सुरज नोटंकी करत बोलतो.....

 

मेघना त्याला एक फटका मारत बास आता नोटंकी........ सांग काय खाणार...

 

ये हुयी ना बात.......आता कस छान वाटत तुला अस हसताना बघुन......इस बात मे एक हॉट कॉफी हो जाये......मानस....

 

अरे पण आत्ता तर हॉट कॉफी घेतली आहेस ना मग लगेच हॉट कॉफी.......मेघना

 

मला चालते..........मानस..........

 

बर थांब मी ऑर्डर देवुन येते........मेघना

 

ए थांब की मी जातो......सुरज

 

आत्ता तर बोललास ना बिनधास्त वागत जा म्हणुन.....मग..........? मेघना

 

बर बर जा तुच दे ऑर्डर.......मानस

 

मेघनाला अस रीलॅक्स बघुन मानसला खुप छान वाटत........अशीच नेहमी हॅपी रहायला हवी आहेस तु मला.........कारण.........अस म्हणुन मानस मध्येच थांबतो.......तो हळु आवाजात पुटपुटत होता.....

 

मानस काय म्हणालास का तु........सुरज

 

अरे काही नाही..........मानस

 

काही तर बोलत होतास तु.....सांग काय म्हणत होतास........तेवढयात मेघना ऑर्डर देवुन येते

 

काय झाल........मेघना

 

बग ना आत्ता हा काही तरी पुटपुटत होता आणि आता विचारतोय तर सांगत नाहीये........सुरज

 

काय रे मानस काय झाल.......मेघना

 

काही नाही सांगतोय त्याला मगाच पासुन पण ऐकतच नाहीये..........मानस

 

पण तु बोलत होतास काही तरी मी ऐकलय......सुरज

 

तुझे कान वाजत असतील.......सगळ लक्ष खाण्याकडे असेल त्या नादात आवाज ऐकु येत असतील.....मेघना त्याला चिडवत म्हणाली

 

ए गप्प ग अस काही नाहीये मी ऐकला होता आवाज.......सुरज

 

तेवढयात वेटर कॉफी घेवुन येतो......असु दे कॉफी घे........मानस

 

तुला नंतर बघतो आता ही कॉफी पितो.......सुरज

 

त्याला अस गडबडीने कॉफी पिताना बघुन मानस व मेघना हसायला लागले.........

 

कॉफी घेवुन झाल्यावर......बर आता निघुया का......मेघना

 

हो चालेल निघुया...उदया भेटु.......बाय.....मानस

 

हो बाय.......मेघना

 

बघता बघता दोन दिवस कधी झाले कळलेच नाही...........

 

श्वेताच्या दी ची एन्गेजमेंन्ट दोन दिवसावर आली पण मी आजुन बाबाना विचारलेच नाहीये.....मेघना स्वत:शीच बोलत होती.....

 

काय ग मेघना एकटीच काय बडबडतेयस........सुमनताई

 

अग आई ते श्वेताच्या दी ची एन्गेजमेंन्ट आहे ना.......मग मी अजुन बाबा ना विचारलेच नाहीये........बाबा पाठवुन देतील ना ग..........मेघना

 

अग कार्यक्रमाला का नाही बोलतील ते........आणि तस ही मी काल बोलता बोलता बोललेय त्याना तुझ्या मैत्रीणीच्या बहिणीचा साखरपुडा आहे.........सुमनताई

 

मग काय म्हणाले....अस काहीच बोलले नाहीत.....पण नाही पण म्हणाले नाहीत.....तु विचार ना आज.....सुमनताई

 

हो आज जेवताना विचारते की.......आलेत ना ग बाबा......मेघना

 

हो आलेत.....तुला मी जेवायलाच बोलवायला आले होते.......चल जाऊया...सुमनताई

 

बर चल जेवताना बोलतेच आता....मेघना

 

सगळे जेवायला बसतात.......नेहमीच्या गप्पा मारत जेवत असतात.........

 

बाबा ते माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचा साखरपुडा आहे दोन दिवसात.....तर ते मी जाऊ ना साखरपुडयाला......मेघना घाबरतच पण पटपट बोलुन मोकळी झाली.......

 

हो ते काल तुझी आई बोलत होती.....कुठे आहे साखरपुडा....माधवराव

 

 इथेच आहे मैत्रीणीच्या घरी.......मेघना

 

बर........जा तु......माधवराव

 

थॅक्स बाबा.....मेघना

 

बाळा.... माझा बाहेर फिरण्यावर विरोध आहे........कार्यक्रमाला जाण्याला नाहीये......माधवराव......

 

हो बाबा........मेघना एवढच बोलुन पटपट जेवुन आपल्या रुममध्ये जाते........

 

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला येते.......आल्या आल्या मानस व सुरजला शोधत असते.......पण ते कुठे दिसतच नाहीत........मग क्लासमध्यल्या मुलांना विचारते तर ते सांगतात की ते पार्किंग मध्ये आहेत....

 

बर....‍थॅक्स.....अस म्हणुन पार्किंगमध्ये येते.....ऐ काय किती वेळ झाला शोधतेय तुम्हाला......मेघना

 

***

क्रमश:

 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....