Aug 13, 2020
प्रेम

बावरे मन...भाग-2

Read Later
बावरे मन...भाग-2

बावरे मन..भाग 2

(रेवा चे बोलणे मध्येच थांबवत सुजय तिच्यावर ओरडला....उशिर होण्याची कारणं चालणार नाहीत.... मला उशिर झालेला आजीबात चालत नाही...वेळेतच आल पाहीजे...बॅक 9.30 उघडते तर शार्प 9.30 ला इथे टच हव..ओके )....आता पुढे..

 

 

सूजयचा आवाज ऐकुन रेवा घाबरलीच तिचा चेहरा पडला....ती नुसत एस सर...एवढच बोलली आणि शांत उभी राहीली.....

 

आता तुम्ही जावु शकता. सुजय दाराकडे हात करत म्हणाला....

 

तशी ओके सर म्हणून बाहेर आली...रेवाच्या डोळयात पाणी आलं...कारण अस तिच्यावर कधी कोणी ओरडलच नव्हत..आधीचे मॅनेजर साहेब तीला कधी वेळ झाला तर समजुन घेत होते...त्यामुळे ओरडा खायचा प्रश्नच नव्हता...त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं..

 

रेवा बाहेर आल्यावर तिच्या डोळ्यातील पाणी पुसते व आपल्या डेस्कवर येवुन बसते...आणि आपल काम करु लागते...पण ती शांतच असते...रोजच्या सारखी बडबड नाही..हसण नाही..

 

तिचा चेहरा बघुन स्नेहा तिथं येते...काय झाल रेवा..एवढी शांत का आहेस..घरी काही झालय का..आई ओरडली आहे काय....

 

नाही ग स्नेहा.........कुठे काय.. आहे की नेहमी सारखी...रेवा नेहमी सारख आसल्याच दाखवत म्हणाली...

 

रेवा मी तुला काय आज ओळखत नाही....तेवढ कळत तुझ्या चेहऱ्याकडे बघुन... सांग बरं काय झालय......(स्नेहा....रेवाची बॅकेतील मैत्रिण....साधी सरळ मनमिळावु कोनालाही आपलस करेल अशी होती स्नेहा..दिसायला ही सुंदर....खुप छान मैत्री होती त्याची..1वर्षापासूनच ओळखत होत्या पण खुप घट्ट मैत्री होती त्यांची..)

 

ते जाऊदे तुझी पिकनीक कशी झाली सांग...रेवा विषय बदलत स्नेहा गेलेल्या पिकनीकच विचारते...

 

स्नेहाला ते लक्षात येत..पण आता तिला सांगायच नसेल म्हणून सोडून देते...मग ती तीच्या पिकनीकच सांगू लागते...सगळ सांगून झ्याल्यावर स्नेहा तीला तूला सरांनी का बोलवल होत अस विचारते..तसा तिचा चेहरा पडतो...काय ग रेवा सांग ना काय झाल..का बोलवले ‍होते सर...

 

ते मला यायला उशीर झाला ना.....मग त्यासाठी......एवढच बोलून रेवा थांबते....

 

ओ..आता लक्षात आलं...तुला यायला वेळ झाला म्हणून सर तुला आरडले..हो ना...

 

हममम....म्हणून रेवा कॉमप्युटरकडे बघु लागली...

 

स्नेहाच्या लक्षात आलं...की तीला खुप वाईट वाटल आहे..सर ओरडले म्हणून....मग ती तीचा मुड ठिक करायचा प्रयत्न करते.....

            

काय गं रेवा तु पण एवढयाश्या गोष्टीच मनाला लावुन घेतेस...सोडून दे....अस म्हणून ती पिकनीकचे काही किस्से सांगुन तीचा मुड  ठिक करायचा प्रयत्न करत होती....तिचा मुड थोडा ठिक झाल्यावर स्नेहा तिच्या डेस्कवर जाते.....

 

इकडे...बॅकेतील प्रत्येक व्यक्तीला सुजय आत बोलवत होता सर्वजण आत जाऊन आले की काही तरी चर्चा करत होते........रेवाला व स्नेला ला काहीच कळेना काय झालय.. सगळे असे  का जमलेत...तोपर्यत तेथुन शरद जात असतो....तशी स्नेहा त्याला बोलावते...

 

शरद इकडे ये...एस स्नेहा मॅडम काय हवय का तुम्हाला.....चहा कॉफी काही आणु का अस म्हणत शरद त्यांच्याजळ आला...बोला काय आणु....अरे काही नको..तो सगळा स्टाफ ‍तिकडे का जमला आहे...

 

अहो मॅडम ते नविन मॅनेजर साहेब सगळयांना आत बोलवत आहेत...काही तरी कामाच विचारत आहेत...मग काय.. सर ओरडत आहेत..काम पेंन्डीग का आहेत वगेरे....म्हणून चर्चा सुरु आहे....

 

ओ.....अस आहे होय........खडुसच आहे वाटत ‍ नविन मॅनेजर...अस म्हणून स्नेहा हसायला लागली...तशी रेवा हो म्हणत ती पण हसायला लागली...

 

हो..तुम्हाला आत बोलवल की कळेलच की..अस म्हणत शरद पण हसु लागला....ए गप्प रे शरद...स्नेहा थोडी चिडत म्हणाली.....जा आम्हाला 2 कॉफी आणून दे.......आता विचारलो होतो तेव्हा नको म्हणालात ना........हो.........पण आता हवी आहे.....ओके मॅडम म्हणत शरद हसत गेला...

 

ए रेवा खरच खडुस आहे काय ग हा मॅनेजर....हमममम......तुझा नंबर येईल ना तेव्हा कळेल तुला........रेवा हसत म्हणाली........ए काय ग रेवा तु पण............अस म्हणत स्नेहा तीच्या डेस्कवर जाते....

 

थोडयावेळाने शरद कॉफी घेवुन आला.....हे घ्या रेवा मॅडम...मस्तपैकी कॉफी घ्या...थॅक्स शरद..... स्नेहा मॅडम कॉफी तुमच्या डेक्सवर देवू की रेवा मॅडमच्या सोबत घेणार....

 

थांब आले तिथेच....रेवा सोबतच घेते....तेवढ्याच गप्पा तर होतील....बर इथे ठेऊ का मग..हो हो... ठेव तिथे..आलेच...

 

सकाळपासून बॅकेतील वातावरण शांतच आहे....आता कॉफी घेतल्यानंतर थोड मस्त वाटतयं ना.....हो ग रेवा...छान वाटतयं....आज कस्टमर पण खुप होते ना... हो गं...10 मिनिट कॉफी घेत छान गप्पा झाल्यानंतर दोघींना पण फ्रेश वाटत होत....

 

स्नेहा कॉफी घेवून आपल्या डेस्कवर जात असते....तेवढयात शरद तिथे येतो..स्नेहा मॅडम सरांनी तुम्हाला बोलावले आहे.....आ........

 

अग ह्यांना काय स्वप्न पडल की काय ग....आपण थोडावेळापुर्वीच बोलत होते ना....माझा नंबर कधी......लगेच बोलवल पण.....

 

सरांनी बोलावल आहे म्हटल्यावर स्नेहाला थोड टेंन्शन आल.. कारण सकाळ पासुन जो कोणी केबीन मध्ये जाईल त्याचा मुड ऑफ होत होता....

 

ए शरद सरांनचा मुड कसा आहे रे.....चिडलेले आहेत काय....होय मॅडम....दिसत तर तस आहे...अस सांगुन शरद तेथुन जातो..... अस म्हटल्यावर स्नेहा जास्तच घाबरली....

 

ए स्नेहा एवढ कशाला घाबरतेस..बग जा काय म्हणतायत....बर रेवा...जाऊन येते....हमममम..बेस्ट लक....हा..जाते...

 

मे आय कमिंग सर..........एस कमिंग....