Aug 12, 2020
कथामालिका

बंधन भाग 69

Read Later
बंधन भाग 69

भाग 69
 
(  गेल्या भागात तब्येत ठिक झाल्यानंतर विक्रम कोल्हापूरला गेला होता. तिला त्याच्याशिवाय करमत नव्हतं. गेल्या भागात अरुंधती आणि भाऊसाहेबांमधलं नातं थोडस उलगडल त्यावरुन तुम्ही अंदाज बांधा कथा पुढे जाईल तस त्याचा उलगडा होईल पण सद्या विक्रम अनघाकडे पाहुया.)

कॉलेजमधला नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतसमारंभाचा कार्यक्रम जवळ येत होता. करंबेळकर सर, निंबाळकर सर आणि काळेसरांच्या अतिआग्रहामुळे अनघाने कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करण्यासाठी होकार दिला होता पण नाही म्हटलं तरी थोडस टेन्शन आलं होतच तिला! ती कॉलेजला प्राध्यापिका म्हणून रुजु होऊन आता दोन वर्ष पुर्ण होत आली होती तरीही कुठल्या मोठ्या प्रोग्रॅमची जबाबदारी कधी तिच्यावरती आजतागायत आली नव्हती. त्यातून आपल्याच कॉलेजमध्ये आपणही कधीतरी विद्यार्थीनी होतो आणि तेव्हा इतकी छान छान भाषणं आपण स्पर्धांच्या निमित्ताने केली होती आणि आता सुत्रसंचालनाचं काम आपल्याच्याने नीट पार पडलं नाही तर सिनिअर प्राध्यापकमंडळींना काय वाटेल! आपलं त्यांच्यासमोर हसु नको व्हायला या विचाराने तिने कार्यक्रमाच्या तयारीचं फार मनावरती घेतलं होतं. तिच्या या सगळ्या उद्योगांची विक्रमला काहीच कल्पना नव्हती. तिने स्वतःहूनच त्याला याबद्दल काही सांगितलं नाही पण कार्यक्रमाच्या आदल्या रात्री त्याला शंका आली तस त्याने विचारलं.
" काय ग झोपायचं नाही का! इतकं मन लावून काय वाचतेस?" त्याने आपली मॅट्रेस खाली अंथरली.
" आ....नथिंग कुठे काय असचं उद्याच्या लेक्चरचं जरा." तिने तो कार्यक्रमाचा कागद पुस्तकात घातला आणि स्टडीटेबलच्या चेअरवरुन मागे वळून पाहिलं.
" तु झोप ना! मी झोपते थोड्यावेळाने " 
" ओके, लवकर झोप पण " त्याने बिछान्यावरती उशी टेकवली आणि जमिनीला पाठ टेकताच पुन्हा थोडस तिच्याकडे नजर वळवून म्हणाला, " ए गुड नाईट..."
" हं....Good nyt and sweet dreams " तिने पेन हातात घेत म्हटलं.
" हं......" त्याला पुढे म्हणायचं होतं, ' तु येणार का स्वप्नात ?' पण मनातूनच पुढचं वाक्य बोलून त्याने डोळे मिटले. तो झोपलेला बघून तिने पटकन कागद बाहेर काढला. ' विक्रम, मला सारखं म्हणतोस ना मी स्वतःची अवस्था पालापाचोळ्यासारखी करुन घेतलीय! I know पण माझा खरा स्वभाव तू कुठे पाहिलायस मी मुळमुळू रडणारी अजिबात नाहीय. उद्या बघतच राहशील तू! ' तिचं मन त्या  कागदाकडे पाहत म्हणालं. तिने कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थित वाचली पुन्हा एकदा कार्यक्रमाची रुपरेषा पाहिली नी कागद पुन्हा पुस्तकात घालून ठेवला. थोडासा आळस देत ती चेअरवरुन उठली आणि बेडवरती झोपायला गेली.
......................................
रात्रीची तिला भिती वाटते म्हणून रुममधले लाईट्स सुरुच असायचे. त्याने कूस बदलली तशी त्याला जाग आली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे तीन वाजत आलेले. त्याने बेडकडे पाहिलं तर पाय अगदी पोटाशी घेऊन अंग आखडून ती लहान मुलांसारखी झोपली होती. तो उठला आणि बेडजवळ गेला. तिच्या पायापाशीचं ब्लँकेट हलकेच तिच्या अंगावरती घातलं आणि बेडवरती तिच्या हाताशेजारीच तो थोडा वेळ बसला.
" काय मॅडम हल्ली खूश असता! काय चाललेल असतं हल्ली एकट्याच हसत असता, आरश्यात बघत असता मला काहीच समजत नाही अस नका हा समजू! बघा हा बोलायचं असेल तर बोला मी काही जास्त भाव खाणार नाही. माझं उत्तर ' हो 'च असेल. " तो मंदस हसत तिथून उठला आणि पुन्हा झोपायला बिछान्यावरती गेला. तो झोपलेला बघून तिने डोळे उघडले. ' विक्रम, मी काहीही बोलणार नाही. तू नक्की माझ्या मनातलं ओळखशील I know becuse I believe on you. ' ती ब्लँकेटमध्ये तोंड खुपसुन हसली.
............................... 
दुसर्‍या दिवशी उत्साहाने ती कॉलेजला जायला तयार झाली.  तो खाली गाडीपाशी तिची वाट पाहत ताटकळत उभा होता इतक्यात हातातला मोबाईल वाजला तर राजेशचा मेसेज होता. ' Thanks.....' मेसेज वाचून त्याच्या चेहर्‍यावरचा तणाव क्षणात दुर झाला. राजेशने सांगितल्याप्रमाणे त्याने त्याला पैसे दिले होते. त्याला क्षणभर वाटलं, ' आता राजेश गप्प बसला पण पुढे काय? नाही नाही पुढचं पुढे पाहता येईल पण आता इतक्यात तरी अनघाला काहीही समजायला नकोय. थोडी खूश असते ती हल्ली आणि हळुहळु तिची मानसिक स्थिती सुधारायला हवी आता. इतके महिने आपण प्रयत्न करतोय क्षणात पत्त्यांचा बंगला कोसळावा तस सगळ होत्याच नव्हतं होईल आणि सगळीच परिस्थिती हाताबाहेर जाईल! सद्या तरी राजेशने गप्प बसणच हिताचं आहे.' तो मेसेजकडे पाहत विचार करत होता इतक्यात ती समोर आली.
" चला सर निघूया " तिच्या आवाजाने तो भानावरती आला.
" आ हो चल " त्याने गाडीचा दरवाजा उघडला तोपर्यंत ती ड्रायविंगसीटशेजारी येऊन बसली.
" काय आज मूड फ्रेश एकदम !" गाडी स्टार्ट करित त्याने विचारलं तस तिने इकडची तिकडची कारणं दिली तिला सुत्रसंचालनाबद्दल त्याला सांगायचं नव्हतं.
" अस काही नाही हा मी रोजच फ्रेश मुडमध्ये असते." ती तोंड वेंगाडत बोलली तसा तो हसला. तिला सांगावस वाटलं आज मी अँकरिंग करणारय प्रोग्रॅमचं पण तिने थोडा धीर धरला आणि शांत राहिली.
............................
राजेशने त्याला मेसेज केला आणि मोबाईल टिपॉयवरती ठेवला. दोन्ही पाय टिपॉयवरती सोडले आणि आरामात कोचावरती टेकून बसला. हातातले एकेक फोटोग्राफज पाहताना त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. एका फोटोत तर नताशा समोर उभी होती आणि विक्रम तिच्या ट्रॅव्हलबॅगला हात लावतो असा एक फोटो होता दुसर्‍या एका फोटोत नताशा त्याला शेकहँन्ड करत होती. एकामागून एक फोटोज पाहताना त्या दिवशी संध्याकाळी विक्रम त्याच्या घरी आला होता आणि नताशासुद्धा होती तेव्हा संदिपने काढलेले फोटोज बघून त्याला हसु आलं.

" नताशा.....नताशा You're charming girl पण तुझ्यासारखी इगोइस्ट पोरगी आजवर नाही बघितली. काय म्हणालेलीस तू , ' राजेश किसी भी गलत काम में मैं तुम्हारा साथ नही दुंगी।' तो नताशासारखं बोलला आणि मोठ्याने हसला. " अरे लोकांच्या रात्री रंगवून पैसे कमावणारी पोरगी नी मला अक्कल शिकवते." तो स्वतःशीच बोलला आणि त्याला नताशासोबतची पहिली मुंबईतली भेट आठवली.
विक्रमने लग्नाचा त्याचा निर्णय ठाम असल्याचं राजेशला सांगितलं तेव्हा त्याला विक्रमचा राग आला होता. " I don't care कोणाला काय समजायचं ते समजू दे पण हे लग्न होणारच " या विक्रमच्या शब्दांनी आणि त्याच्या आत्मविश्वासाने त्याला विक्रमची चीड आली होती. त्याला गोडावूनवरुन विक्रमने ' जा ' म्हणणं अपमानास्पद वाटलं त्याला. इतकं बेपर्वा वागून हा कसा सुखी राहू शकतो ही एक असुया त्याच्या मनात निर्माण झाली आणि त्याच रागात थोडा चेंन्ज म्हणून तो मुंबईला काही दिवसांसाठी गेला होता. विक्रमला अस लग्नात आनंदी पाहायची त्याला अजिबातच इच्छा नव्हती म्हणून तो मुंबईवरुन लग्नासाठीही सांगलीला आला नव्हता. त्याच दरम्याने एका पबमध्ये त्याला नताशा पहिल्यांदा दिसली. रेड कलरचा पेन्सील ड्रेस, कर्ली ब्राउन हेयर, कानात गालावरती लोंबळणारे गोल इयरिंग्ज, चेहर्‍यावरचा डार्क पण तिला साजेसा मेकअप अशी पंचवीस एक वयाची ती एका साधारणतः चाळीशीच्या माणसासोबत बेधुंद होउन डान्स करत होती. तो थ्रीपीससुटातला  माणूस एखादा बिजनेसमेन असावा अस पाहताक्षणी राजेशला वाटलं. त्या माणसाने गाण्याच्या तालावरती डान्स करता करता तिला हाताला धरुन जवळ ओढलं आणि तिने त्याच्या गळ्यात हसत हात टाकले आणि दोघे छान रॉमॅन्टिक डान्स करायला लागले. राजेश दुरुनच सगळ पाहत होता त्याच्या मनात आलं, ' nice couple पण या दुप्पट वयाच्या माणसाशी काय लग्न केल असेल हिने!' तो त्या दोघांकडे पाहत पाहतच डान्स करत होता इतक्यात तो माणूस जायला बाहेर निघाला तशी ती त्याच्यापासुन दुर झाली. ते दोघं काहीतरी बोलले आणि ती त्या माणसामागोमाग बाहेर गेली तसा राजेशही थोड्यावेळाने त्या दोघांच्या मागून बाहेर आला आणि समोरचं दृश्य बघून त्याला आश्चर्य वाटलं.
त्या माणसाने नोटांचं एक पुडकं तिच्या हातात दिलं. तिने पैसे हँन्डबॅगमध्ये टाकले आणि हसत त्या माणसाला शेकहँन्ड केलं. जवळच त्याची मर्सिडीज उभी होती. त्या माणसाने मर्सिडीजचा दरवाजा उघडला. तिने गाडीच्या काचेतून आत डोकावत त्याला बाय केलं आणि काही सेकंदातच गाडी तिच्या समोरून निघून गेली. राजेश आश्चर्याने दूरुनच हे सगळ पाहत होता. ते नवरा बायको नव्हते इतकं तरी त्याच्या लक्षात आलं. 'कोण ही मुलगी ?' या कुतुहलापोटी तो चालत थोडा पुढे आला. तिचं राजेशकडे अजिबात लक्ष नव्हतं. तिने हँन्डबॅगमधून सिगारेट काढली आणि पेटवली.
"  Excuse me " राजेशच्या हाकेसरशी ती मागे वळली. मघापासून त्याने तिला दुरुन फक्त पाहिलं होतं पण अस समोर तिला बघून त्याला क्षणभर हरवून गेल्यासारख वाटलं.
" हॅलो....." तिने त्याच्या नजरेसमोर टिचकी मारली तसा तो भानावरती आला.
" आ....Yes I'm Rajesh...Is he your husband?" त्याने तिचा अंदाज घेत हळुहळु ओळख काढण्याचा प्रयत्न केला. राजेशच्या या बोलण्यावरती ती मोठ्याने हसली.
" No !  It's ok तुम क्यों इतना पुछ रहे हो पुलिस में हो क्या?" तिने सिगारेटचे झुरके घेत म्हटलं.
" नो नो सहजच...." राजेशने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं उगीच हिच्याशी बोलायला आलो. आता काय बोलायचं ते सुचेना. दोन तीन सेकंद तशीच गेली. ती आता त्याच्या चेहर्‍याकडे पाहत बोलली,
" कुछ काम है क्या ?" 
" काम....काम म्हणजे ते मी जस्ट...असच ओळख " त्याला कळेचना काय सांगावं तिला. तो सहजच कुतुहलापोटी तिच्याशी बोलायला आला होता.
" Oh ! सो I'm Natasha " तिने शेकहँन्डसाठी हात पुढे केला. रेड कलरची नेलपेंन्ट आणि हातात नाजुकसं ब्रेसलेट तिचा तो नाजूक हात हातात आल्यावरती त्याला तिच्या हातातून आपला हात मागे घ्यावासा वाटेना. तिने पटकन हात मागे घेतला.
" सॉरी....Mr. Rajesh असा फुकट हात नाही मिळणार हातात! " ती हसत बोलली.
" नो....तस काही नाही....Don't take it wrong!"  त्याच्या हळुहळु तिचं वागणं लक्षात आलं तसा तो बोलला. ती जायला वळली तशी त्याच्या डोक्यात विचारांची चक्र सुरु झाली आणि एका क्षणी त्याच्या चेहर्‍यावरती हसु आलं नी त्याने तिला थांबवलं.
" नताशा, I want your help!"  
तिने पटकन मागे वळून पाहिलं.
"What ! मैं क्या तुम्हे मदत कर सकती हूँ।"  ती थोडा वेळ त्याचे शब्द ऐकुन थांबली. राजेशने मोबाईल ओपन केला आणि तिच्यासमोर धरला.
" या माणसाला आयुष्यातून उठवायची किती प्राईज?" 
" क्या! ये क्या अनाबशनाब बाते कर रहे हो! " 
" पैसे तो मिल जाएगे तुम्हे ।"  त्याने खिश्यातून काही नोटा काढुन तिच्यासमोर धरल्या.
" देखो राजेश किसी भी अच्छे मर्द के जिंदगी के साथ मैं खेल नही करुंगी। पैसों की इतनी लालची नही हूं मैं।" ती रागात बोलली.
" हो का आणि मघाशी त्याच्या गळ्यात गळा घालून नाचत होतीस तेव्हा ग "
" क्युंकी वो लोग ही ऐसे नालायक है। कोनला तरी लुबाडून मिळवलेला money नी या लोकांशी पन असाच वागलं पायीजे म्हनून किसी को बरबाद करने का काम मैं नही करुंगी ।"  तिने त्या नोटा उडवून दिल्या आणि निघायला वळली.
" पण तुला वाटतं तस काहीच नाही. अरे एका बड्या बापाचा पोरगा आहे तो आणि अश्या लोकांनी कोणाला कसही चिरडून टाकलं तरी चालतं नाही! नताशा हा फोटो बघ एकदा." त्याने पुढे होउन तिच्या हातात मोबाईल दिला. तो फोटो अनघाचा होता.
" बिच्चारी ही मुलगी अग एका कॉलेजात प्रामाणिकपणे काम करते पण तेच ह्याला बघवलं नाही ना!"
" म्हन्जे ?"  तिने आश्चर्याने विचारलं.
" म्हणजे हेच या फोटोतल्या तुला सज्जन वाटणार्‍या माणसाने हिच्यावरती...."
" What ! O My God...so pretty girl " अनघाचा फोटो पाहून ती कळवळली.
" लेकीन ऐसा क्यु किया उसने ?"
" कॉलेजमधला मोठा स्कॅम तिने ओपन केला आणि यात त्याचं नाव खराब होऊ नये म्हणून." 
" Oh ! "  नताशाचा आता हळुहळु त्याच्या बोलण्यावरती विश्वास बसत होता तसा त्याने तो गॅदरिंगच्या रात्रीचा व्हिडिओ तिला दाखवला. " हे बघ तुला खोट वाटत असेल तर I know यात फक्त रेकॉर्डिंग ऐकू येतय but see अरे मला त्याचा प्लॅन कळला तेव्हा मी आटोकाट प्रयत्न केला शेवटी मी पोचलो त्या रात्री तिथे कसाबसा पण तोपर्यंत वेळ निघुन गेली होती. म्हणून मी हा प्रुफ म्हणून व्हिडीओ. छे! मला इतका त्रास होतो की मी तिला वाचवू नाही शकलो!"  त्याने डोळ्यात खोटे खोटे अश्रु आणत तिच्यासमोर आपण किती चांगले आहोत ते दाखवायचे प्रयत्न सुरु केले.
" तुम फिर पुलीस के पास क्यों नही गये ?"  तिने चालाखीने विचारलं.
" नताशा His father is politician मग तुला वाटत का हे प्रकरण पोलिसात गेल्यावर तिला न्याय मिळेल. अरे हे सगळ दडपून टाकणं त्याच्यासाठी खूपच easy आहे.शिवाय...शिवाय माझे डॅड त्याच इन्स्टिट्युटला जॉबला आहेत न जाणो मी त्याच्या विरोधात गेलो तर त्यांचा जॉब... नताशा I'm so helpless ग "  त्याने तिच्यासमोर हात जोडून गयावया करायला सुरुवात केली. 
" Yes you're right but she's innocent girl " नताशाचे डोळे ते सगळ ऐकून पाणावले तसा राजेश खूश झाला.
" हो न ग नी You know तिच लग्न यामुळे मोडलं तर याने आपण किती ग्रेट आहोत ते दाखवायला हिच्याशी लग्नसुद्धा...त्या बिचारीला ह्याचा खरा चेहरा माहीत पण नाही."
" So cheap यार, नायी तिला justice मिलाला हवा. इन लोगो को न फासी से भी कडी सजा मिलनी चाहिए।" रागाने तिचे डोळे लालबुंद झाले.
" हं......तेच तर करायचय आपल्याला. " राजेशने म्हटलं.
" हं....मी करेन तुला हेल्प sure " नताशा ठामपणे बोलली. 
इतक्यात दाराची बेल वाजली आणि राजेश नताशाच्या पहिल्या भेटीच्या विचारातून बाहेर आला. हसतच त्याने ते फोटोज ड्रॉवरमध्ये ठेवले.
..............................
 

सेमिनार हॉल नवीन विद्यार्थ्यांनी खचाखच भरला होता. कॉलेजची इमारत, प्रशस्त आवार, इकडून तिकडे जाणारे सिनीअर विद्यार्थ्यांचे ग्रुप सगळच वातावरण त्यांना नवीन होतं. सगळ्या नव्या विद्यार्थ्यांच्या नजरा कुतुहलाने स्टेजकडे पाहत होत्या. व्यासपिठावरती खुर्च्यांमध्ये काही डिपार्टमेंन्ट्सचे सिनिअर प्राध्यापक, प्राचार्य आणि विक्रम असे सगळेजण बसले होते. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर निंबाळकर सर माईकसमोर बोलायला आले. त्यांनी व्यासपिठावरच्या मंडळींचं स्वागत केलं. पुढे पहिल्या रांगेत बसलेल्या प्राध्यापकवर्गाबद्दल थोडक्यात ते बोलले आणि प्रस्तावना करुन त्यांनी अनघाला पुढे कॉलेजविषयी बोलण्यासाठी बोलावल. सरांनी तिचं नाव घेतल्यावरती त्याच्या चेहर्‍यावरती कौतुकमिश्रीत आश्चर्याचे भाव होते. त्याला अनपेक्षितच होतं ते. 
ती बोलण्यासाठी माईकसमोर आली. चेहर्‍यावरती छानस हसु ठेवत तिने बोलायला सुरुवात केली. 
"  Hello to everyone and welcome to our honourable principal sir Mr. Karmbelkar, our vice principal Mr. Nibalkar sir and the managing director of our institute Mr. Vikram Rajeshirke. I welcome to all respected professors of Gurukul. Guys,I want to welcome each of you to our Gurukul family. ती गुरुकुलला ' आपली फॅमीली ' म्हणाली आणि मुलं लक्ष देउन ऐकायला लागली. 
"  So I can see here many new, smart and charming faces with shiny eyes. My dear students now you're about to begin precious years in your life and off course it'll be really awesome days in your life becuse these college days' re always colorful days fill with lots of dreams, ambitions and ' Something something vali emotion feeling ' so before proceeding further I think you would like to hear about my college days so are you interested ? Raise your fingers  तिच्या ' समथिंग समथिंगवाली फिलिंग'  वाक्यावरती सगळीच मुलं हसायला लागली. ती मुलांसोबत एखाद्या त्यांच्या मित्रमैत्रिणीसारखं बोलत होती. ते फॉर्मल भाषण नव्हतं मुलांशी संवाद साधण होतं. विक्रमला तिचा पहिल्यासारखा तो आत्मविश्वास पुन्हा पाहून भारी वाटत होतं. ती तिच्या कॉलेजडेज बद्दल आता बोलायला लागली ज्यातून तिने गुरुकुलविषयी माहिती सांगायला सुरुवात केली. ' अनु, You're also good speaker यार, तु उगीच इकडे शिकलीस! माझ्या चेन्नईच्या कॉलेजला असतीस तर तेव्हाच पटवलं असतं तुला! मम्मा ला केल असतं कसतरी मॅनेज जस आता केलं नी भाऊसाहेब तुला बघून नाही म्हणाले नसतेच. किती भारी असतं ना आपलं लाईफ नी कदाचित आपण आधी भेटलो असतो तर माझ्यामुळे तुझ्या लाईफचं होणारं नुकसान तरी टळलं असतं!' त्याच्या मनात विचार सुरु होते इतक्यात त्याच्या शेजारी बसलेल्या खंदारे मॅडम हळु आवाजात बोलल्या,
" She's doing superb ना!" त्यावर त्याने हसतच हो म्हटलं आणि मुलांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. ती बोलत होती आणि तो पण मुलांसारखं शांतपणे ऐकत होता.
................................ 
 सकाळच्या कॉलेजमधल्या कार्यक्रमाचे फोटोज प्राचार्यांनी प्राध्यापकांच्या ग्रुपवरती संध्याकाळी टाकले. तिने उत्साहाने नितूला फोटोज दाखवले आणि कार्यक्रमाबद्दल पण सांगितलं. विक्रम रुममध्ये त्याचं काम करत बसला होता. त्याने कंटाळला आला म्हणून कार्यक्रमाचे फोटोज फेसबुकला पोस्ट केले. तीन दिवसांपुर्वीच अनघाने त्याची फ्रेन्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केलेली. तिने त्या घटनेनंतर हल्लीच पुन्हा फेसबुकवगेरे वापरायला सुरुवात केली होती पण अजुन नविन काही पोस्ट केलं नव्हतं. गॅदरिंगदिवशी तिने पोस्ट केलेल्या फोटोवरती अजुनही कमेंन्ट्स येत होत्या ज्याला तिने हल्लीच 'थँक्स 'चे रिप्लाय दिले होते. त्याने मूद्दामहून त्या फोटोखालच्या कमेंन्ट्स पाहिल्या नी त्याला आश्चर्य वाटलं. श्रीकांतच्या चार महिन्यापुर्वीच्या  'looking like Princes ' कमेंन्टला तिने दोन दिवसापुर्वीच ' Thank you so much' म्हटलं होतं. त्याला वाईट वाटलं ते बघून आणि श्रीकांतचा रागही आला आणि अनघाचासुद्धा! ' काय हे! आम्ही इतकं करतो तरी आमची काही कदर नाही परक्या लोकांना बरं थँक्स म्हणता येतं! ' यावर दुसरं मन म्हणालं, ' विक्रम, तुझ्या आधी तो तिच्या आयुष्यात होता. त्यांची एन्गेजमेंन्ट झाली होती आणि घरच्यांनी ठरवुन तिच्या पसंदीनेच ते लग्न ठरलं होतं याचा अर्थ तिला श्रीकांतमध्ये काहीतरी आवडलं असेलच ना! खरतर आपण तिच्या आयुष्यात घुसलोय आणि जास्तच अपेक्षा करतोय आता.' या विचारानेच त्याचं मन अस्वस्थ झालं. आपण तिला विचारलं आणि ती ' हो '  म्हणाली नाही आपल्या प्रेमाला तरी आमचं लग्न झालय म्हटल्यावरती ती आपल्यासोबत राहिल पण त्याला अर्थ असेल का? मला जगाला दाखवण्यासाठी फक्त बायको म्हणून तिची सोबत नकोय तिचं प्रेम हवय.' त्याने नाराजीनेच मोबाईल बाजूला ठेवला आणि कामात मन गुंतवायचा प्रयत्न केला.

क्रमशः
तुम्हाला हा भाग वाचल्यानंतर नताशाबद्दलच्या शंकांचं निरसन झाल असेल पण राजेश असा का वागतो इतक्या टोकाला जाऊन कोणाला त्रास देउन त्याला काय मिळणारय असा प्रश्न पडेल. पहा आजुबाजुला अशी काही माणसं असतातच त्यांना एखादा आपल्या चुका सुधारत असेल तर त्याला समजून घेऊन सपोर्ट करण्यापेक्षा त्या चूका चारचौघांसमोर आणून त्या व्यक्तीची निंदानालस्ती करण्यात रस असतो आणि त्यातून असुरी आनंद ती एक प्रवृत्तीच असते माणसांमधली आणि राजेशही याच प्रवृत्तीचं द्योतक आहे. बाकी भेटु पुढच्या भागात...

Circle Image

Sneha Dongare

Writer, Freelancer

Hiiii I'm Sneha Dongare. I'm passionate reader, writer & learner. Writing is not only my hobby but my passion so I like to work in the fields related literature. I completed my master degree in English Literature & now trying my best for Research Fellowship. I like to be always creative & energic person. I like to express my thoughts and link more people with me. I started to write from 2009 & currently my writing published in newspapers like Maharashtra Time, Lokmat & Loksatta. I wish you also join this journey with me. So Do Follow my blog & Don't forget to like, comment & share.