Aug 06, 2020
प्रेम

अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 57

Read Later
अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 57

वृषभ, राज आणि टॉनी तिघेही शौर्यची रिकामी रूम बघुन एकमेकांकडे बघु लागले...

वृषभ : ह्याची रूम अशी खाली खाली का वाटतेय?? सामान कुठेय ह्याच...

शौर्यच्या बेडवर त्याच गिटार ठेवलेला असत आणि त्या गिटारच्या तारांवर शौर्यने एक चिट्ठी अडकवुन ठेवली असते..  गिटारच्या बाजुलाच त्याचा मोबाईल आणि मोबाईलवर त्याने तोडुन ठेवलेलं त्यातल सिम कार्ड..

टॉनी : मोबाईल इथे ठेवुन..शौर्य गेला कुठे???

राज : चिट्ठीत बघ काय लिहिलंय..

वृषभ चिट्ठी उघडुन वाचु लागतो..

बाय गाईज.. मी जातोय दिल्ली सोडुन कायमचा.. तुम्ही लोक खुप त्रास देताय मला.. सहनच नाही होत आहे यार मला.. एवढा त्रास होतोय की मला शेवटचा पेपर लिहिण्यासाठी सुद्धा इथे थांबावस वाटत नाही.. फक्त एक संधी मागत होतो तुमच्याकडे एक्सप्लेनेशन देण्यासाठी. ती तर तुम्ही देऊच शकत होता ना मला.. 

राज आणि टॉनी तुम्ही दोघांनी खुप हसवलात मला.. खुप मस्ती केली यार आपण.. पण जाता जाता मात्र तुम्ही पण रडवल मला.. सॉरी राज तुला गिटार नाही शिकवू शकलो बट तुझ्यासाठी गिटार ठेवुन जातोय.. नक्की शिक... 

वृषभ.. आयुष्यात तुझ्यासारखा मित्र मिळाला म्हणजे मी माझं भाग्य समजत होतो.. प्रत्येक क्षणात तु मला साथ दिलीस यार.. पण जेव्हा मला खरच तुझी गरज होती तेव्हा तु पण साथ सोडलीस रे..  तुझी एक गोष्ट मी ऐकायला हवी होती वृषभ.. तु एकदा बोलता बोलता सहज बोललास मला मोबाईल लॉक करून ठेवत जा.. नाही ठेवला.. म्हणुनच सगळा इस्यु झालाय लाईफमध्ये.. पण ह्यापुढे नक्की ठेवत जाईल..

रोहन... प्रत्येक वेळेला तु मला चुकीच ठरवुन मोकळा होतोस रे..  ह्या वेळेला पण तु तेच केलंस..

सीमा.. तुझी फ्रेंडशीप पण छान वाटली मला.. 

समीरा.. कधीच तुला माझ्या मनातल्या फिलींग नाही कळल्या.. नेहमीच दिसत ते सत्य नसत ग.. ज्यो वरून तु माझ्यावर डाऊट घेतेस.?? ज्यो माझी फक्त आणि फक्त मैत्रिणच आहे.. फक्त मैत्रिणीच नाही तर बेस्ट फ्रेंड पण.. तुझ्या सारख्या मुलीला नात्यातला फरकच कळत नाही ह्याच गोष्टीच आश्चर्य वाटत मला. माझी फक्त एकच अपेक्षा होती तुझ्याकडुन की तु मला समजुन घ्याव.. पण तु कधी मला समजुन घेण्याचा प्रयत्नच नाही केला.. तु दिलेली चैन मी माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवलीय.. मला पण तु माझ्या आयुष्यात परत नकोयस.. फक्त समीराच नाही तुम्ही सगळेच.. माझा मोबाईल इथेच ठेवुन जातोय.. खर तर नव्हतो ठेवणार पण तुम्ही सगळ्यांनीच नंबर ब्लॉक केलाय माझा.. मला तुम्हांला काही तरी दाखवायचं होत माझ्या मोबाईलमध्ये. प्लिज एकदा कॉल रेकॉर्ड ऐका मोबाईल मधला.. त्यादिवशी काय घडलं त्याचा अंदाज येईल तुम्हांला तो कॉलरेकॉर्ड ऐकुन.. 

एवढा खराब आरोप करण्याआधी एकदा तरी विचार करायला हवा तुम्ही लोकांनी.. खुप हर्ट केलंत यार तुम्ही... खुप म्हणजे खुप.. हे 7 दिवस मी कसे काढलेत मी नाही एक्सप्लॅन करू शकत.. तुम्हा लोकांना मी परत दिसणार नाही ह्याची काळजी मी घेईल.. तुम्ही खुश रहा.. आणि एक रिक्वेस्ट पुन्हा माझ्या आयुष्यात परत येऊ नका.. प्लिज.. 

ऑल दि बेस्ट फॉर युअर फ्युचर.. आणि गुड बाय....

शौर्यने लिहिलेली चिठ्ठी वाचुन वृषभच्या डोळ्यांतुन पाणी येऊ लागलं.. बाजुलाच असलेला त्याचा मोबाईल घेत कॉल रेकॉर्ड चॅक करतो.. मनवीच बोलणं ऐकुन तिघांना एकदम धक्काच बसतो..

राज : ओहहह शट.. मनवी अस कस वागु शकते यार.. 

वृषभ : आणि आपण.. आपण पण कुठे ऐकुन घेतलं यार त्याच.. तो दुसऱ्यादिवशी सकाळीच मला येऊन सांगत होता.. पण मी सुद्धा एकुनच नाही घेतलं यार.. 

वृषभ लगेच रोहन, समीरा आणि सीमाला फोन करून कॉलेज गेटजवळ बोलवुन घेतो..

समीरा : काय झालं वृषभ??तु अस अचानक का बोलवलस?? आणि तु असा रडतोस का??

सीमा : सगळं ठिक आहे ना..

राज : रोहन येऊ दे मग बोलुयात

थोड्याच वेळात रोहन बाईकवरून येतो..

रोहन : काय झालं?? एवढ्या घाईत का बोलवलं..

वृषभ : शौर्य दिल्ली सोडुन गेलाय कायमचा....

रोहन : तु हे सांगायला मला इथे बोलवलंस?? असल्या रेपिस्ट मुलाने इथे न राहिलेलंच बर.. 

वृषभ: Shut your mouth Rohan.. आणि शौर्यला काही बोलण्याआधी हे ऐक...

वृषभ शौर्यच्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग चालु करतो.. रेकॉर्डिंग ऐकताच रोहन आणि समीराला जबर धक्काच बसतो.. समीरा रडतच खाली बसते..

राज : ही चिट्ठी त्याने ठेवलीय आपल्या सगळ्यांसाठी...

रोहन थरथरत्या हातानेच राजच्या हातातुन चिट्ठी घेऊन वाचु लागला... चिट्ठी वाचुन त्याने समीराकडे दिली.. 

समीरा : अस का वागली मनवी.. मला आत्ताच्या आत्ता मनवीच्या घरी जायचय..

वृषभ: मला पण..

सगळीजण रागातच मनवीच्या घरी जायला निघतात...
★★★★★

इथे विराजला अचानक अस घरी आलेलं बघुन ज्योसलीन घाबरते..

विराज : शौर्य कुठेय?? शौर्य... शौर्य..

(विराज जोर जोरात शौर्यला आवाज देतो)

ज्योसलीन : मी बोलली ना तुला तो झोपलाय.. उद्या येईल ना घरी तो.. तु एवढ का इस्यु करतोयस..

ज्योसलीनचे आई वडील पण बाहेर येतात..

विराज : ज्यो शौर्य कुठे आहे?? 

(विराज जोरातच ज्योसलीनवर ओरडतो)

ज्योसलीन : चल मी दाखवते तुला.. 

ज्योसलीन विराजला घेऊन शौर्यच्या रूममध्ये घेऊन जाते.. शौर्य गाढ झोपला असतो..

विराज त्याच्याजवळ जातच त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो.. तसा त्याच्या नाकात दारूचा वास शिरतो..

विराज : ह्याने ड्रिंक केलंय??

(ज्योसलीन शांत बसते..)

ज्यो तुझ्याशी बोलतोय.. ह्याने ड्रिंक केलंय??

ज्योसलीन : अ... हो.. प्लिज आंटीला काही बोलु नकोस..

विराज रागातच ज्योसलीनकडे बघतो..

विराज : शौर्य उठ.. आणि चल घरी..

ज्योसलीन : झोपु दे ना इथे..

विराज : will you please shut up Jyo.. शौर्य.. उठ.. शौर्य डोळे बंद करूनच उठुन बसतो.. त्याच त्याच्या शरीरावर नियंत्रण राहिलेलं नसत..

शौर्य उठ... विराज त्याला रागातच उठवत होता.. पण शौर्य काही उठत नव्हता..

विराजच लक्ष बाजुलाच असलेल्या झाकुन ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाकडे जात.. तो ग्लास हातात घेतच त्याच्यातील पाणी शौर्यच्या तोंडावर मारतो.. तस शौर्य डोळे उघडतो.. समोर सगळं त्याला दुरकट दिसत असत.. 

शौर्य : विर...

विराज : उतरली तुझी सगळी.. निघुयात इथून..

विर त्याला हाताला खेचतच जबरदस्ती उभं करतो..

ज्योसलीनचे डॅड विराजला समजवत असतात.. पण विराज त्यांच्या बोलण्याकडे लक्षच देत नसतो.. जबरदस्ती शौर्यला तो तिथुन घेऊन जात असतो.. शौर्यला काय चालु असत ते काहीच कळत नसत.. चालून जाण्याचे त्राण त्याच्यात उरले नसतात.. 

विराज : शौर्य शुद्धीवर ये आणि चल घरी..

ज्योसलीन : विर त्याला शुद्ध नाही.. तु का अस फोर्स करतोयस त्याला.. प्लिज सोड त्याला.. त्याला त्रास होतोय दिसत नाही का तुला..

विराज : माझा भाऊ आहे... मी बघुन घेऊल.. आणि तुला माहिती ना तो ड्रिंक घेत नाही ते.. तरीही तुम्ही..

(विराज रागातच ज्योसलीनला बोलला..)

ज्योसलीन : ए विर.. शौर्यने स्वतःहून ड्रिंक घेतलीय.. आम्ही सगळे डान्स करत होतो.. हा नैतिक आणि रॉबिन सोबत बसुन ड्रिंक करत होता.. त्या दोघांना वाटलं दिल्लीत राहुन तो ड्रिंक घ्यायला लागला असेल म्हणुन त्या दोघांनी त्याला अडवलं नाही.. 

विराज शौर्यला पकडतच उभं करतो.. पण त्याचा तोल जात असतो.. आणि तो पुन्हा खाली पडत असतो.. विराज त्याला आपल्या हातावर उचलुन घेतच घरी आणतो.. त्याच्या रूममध्ये घेऊन जात त्याला बेडवर झोपवतो..  कपाटातून त्याचे कपडे काढतो... अंगावरचे भिजलेले त्याचे कपडे तो चेंज करतो.. तोच त्याच लक्ष त्याच्या दंडावर झालेल्या काळ्या निळ्या निशाणाकडे जात.. विराज अजुन तस निशाण कुठे दिसत का ते बघतो.. तसे सेम निशाण त्याला त्याच्या पाठीवर एक दोन ठिकाणी आणि मानेच्या थोडं खाली दिसतात.. शौर्यच्या अंगावर पण त्याला मार लागल्याचे निशाण असतात..

विराज शौर्यचा मोबाईल कुठे भेटतो का ते बघतो.. त्याचे खिसे चॅक करतो.. खिश्यात त्याला ब्रेसलेट भेटत.. आणि त्याच पॉकेट.. त्या व्यतिरिक्त काहीच नसत.. त्याच्या बेगेत त्याचा मोबाईल आहे का बघतो.. जेणेकरून त्याच्या मित्रांना फोन करून तरी विचारता येईल नक्की काय झालं ते..

विराज : शौर्य मोबाईल कुठेय तुझा???

शौर्यच्या गालावर मारतच तो त्याला विचारत होता.. 

शौर्य काहीच बोलत नव्हता..

विराजला कधी सकाळ होतेय आणि तो शौर्यसोबत बोलतोय अस झालं असत..

इथे बाकीची मंडळी मनवीच्या घरी पोहचली असतात..

रोहन : मनवी कुठेय??

रोहन तिच्या घरात गेल्या गेल्या तिच्या डॅडला प्रश्न करतो..

डॅड : तुम्ही असे अचानक..  थांबा मी बोलावतो तिला..

रोहन : आम्ही जाऊन भेटतो तिला.. रूममध्येच असेल ना ती..

डॅड : अ हो...

सगळी मित्र मंडळी तिच्या रूममध्ये जातात.. 

सगळ्यांना अस अचानक रूममध्ये बघुन मनवी घाबरते..

रोहन आणि इतर मंडळी तिची रूम बघतच रहातात.. 

वृषभ : हे शर्ट तर शौर्यच आहे ना...?? लास्ट टाईम पार्टीमध्ये घातलेलं त्याने..

भिंतीच्या एका हुकवर मनवीने शौर्यच शर्ट अडकवल असत ते दाखवतच वृषभ बोलतो..  

मनवी : तुम्ही लोक मला न विचारता माझ्या रूममध्ये कसे आलात.?

मनवी काही बोलणार तो समीरा एक कानाखाली तिला मारते..

मनवी : तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची??

अस बोलत मनवी तिला मारायला धावली तस रोहन तिच्या समोर येतो.. आणि तो पण तिला एक कानाखाली मारतो..

रोहन : का केलंस हे अस..?? सरळ सांगितलं असतस तर तुझ्या पाठी फिरलो नसतो.. शौर्य नेहमी सांगायचा तुझी मनवी अस वागते, मला इरिटेट करते,  मला ब्लॅकमेल करते.. त्यादिवशी पण सांगत होता तो तु खोटं बोलतेयस.. मी मूर्ख त्याच्यावर विश्वास न ठेवता तुझ्यावर विश्वास ठेवला.. 

समीरा : फक्त रोहन तूच नाही आपण सगळेच मूर्ख.. हिच्यामुळे आपण एवढ वाईट वागलो शौर्य सोबत... का अस वागलीस मनवी.. सांगणं..

मनवीचे डॅड तिथे येतात..

डॅड : काय चाललंय तुमच.. का तिला त्रास देतायत??

रोहन : त्रास आम्ही हिला नाही ही आम्हांला देऊन आलीय.. विचारा तुमच्या मुलीला काय पराक्रम करून आलीय ते.. हिच्यामुळे शौर्य कायमचा मुंबईला निघुन गेला.. 

मनवी : काय?? अस कस जाऊ शकतो तो मुंबईला.. मला न सांगता.. डॅड शौर्य निघुन गेला.. मला एकटीला टाकुन तो कस जाऊ शकतो..

समीरा : मनवी काय चाललंय तुझं?? ही सगळी नाटकी थांबव आत्ता..

वृषभ : हो आणि त्यादिवशी काय झालेलं ते आत्ता तरी सांग आम्हांला...

डॅड : ती नाटक नाही करत आहे.. तीच्यावर Delusional disorder ची ट्रिटमेंट चालु आहे.. ज्या गोष्टी घडल्या नाही त्या गोष्टी ती खऱ्या समजुन जगते.. खर तर माझी चुक आहे ह्यात मी रोहनला तरी सांगायला हवं होतं..

रोहन : का नाही सांगितलं तुम्ही.. तुमच्या ह्या मुलीमुळे मी त्यादिवशी शौर्यची काही चुक नसताना त्याच्यावर हात उचलला.. त्याला हवं नकोते बोललो.. रोहन डोक्याला हात लावत रडतच खाली बसतो..

वृषभ आणि राज त्याला सावरतच बाजुलाच असलेल्या चेअरवर बसवतात..

समीरा : मनवी काय झालेलं त्यादिवशी प्लिज सांग.. मी तुझ्या पाया पडते..

मनवी एकटक कुठे तरी बघण्यात हरवुन गेली असते..

रोहन : मनवी आम्ही तुझ्याशी बोलतोय.. सांग काय झालेलं ते??

रोहन जोरात ओरडतो तस ती घाबरते आणि रडु लागते..

मनवी : फैयाज आणि मी प्लॅन केलेला सगळा.. फैयाजला समीरा हवी होती आणि मला शौर्य.. एन्युअल डेच्या दिवशी मी फैयाजच्या सांगण्यावरून रोहनचा फोन फ्लाईट मोडवर ठेवला.. फैयाज आणि त्याचे मित्रमंडळी शौर्यवर लक्ष ठेवून होते.. फैयाजला शौर्यला फक्त 4th फ्लॉरवर घेऊन जायच होत.. त्याला ते लोक 4th फ्लॉरवर कसे घेऊन गेले हे मला नाही माहित.. तिथे गेल्यावर त्याच्यासोबत काय झालं ते पण मला माहिती नाही.. फैयाज मला शौर्यच्या मोबाईलवरून बरोबर 7 वाजता मेसेज करणार होता.. मी जाणुन बुजून सीमाला तुम्हा लोकांपासून थोडं लांब घेऊन गेली आणि माझा फोन सीमाकडे दिला.. जेणेकरून तिला अस वाटावं की खरच शौर्य मला मेसेज करतो.. सीमाने फोन आणला नव्हता हे पण मला माहीत होतं.. आणि एवढ्या मोठ्या ग्राऊंडवर तुम्हां लोकांना तिला शोधायला टाईम लागेल ह्याचा पण अंदाज  होता.. मी जेव्हा 4th फ्लॉरवर आली तेव्हा शौर्य खाली जमिनीवर पडला होता.. त्याला अस खाली पडलेलं बघुन मला अंदाज आला होता की फैयाजने नक्कीच त्याच्या सोबत काही तरी केलं असणार.. मी त्याला उठवायला जाणार तोच फैयाज माझ्याकडे येऊ लागला.. त्याला अस माझ्याकडे येताना बघुन मी एक एक पाऊल मागे टाकत होती.. पाठी मागुन त्याच्या मित्रांनी दरवाजा बंद करून घेतला.. मी फैयाजवर ओरडत होती.. फैयाज क्या कर रहा हे रुक.. 

मेने प्लॅन चेंज किया अस तो बोलला.. आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला.. माझा आवाज ऐकून शौर्य डोकं धरतच उठला आणि त्याच्यापासुन मला वाचवु लागला.. फैयाजचे मित्र पण तिथेच होते.. ते त्याला पकडुन मारू लागले.. शौर्यपण त्या लोकांना मारत होता..  फैयाजने शौर्यच लक्ष नाही हे बघुन त्याच्या पाठीवर कसलं तरी इंजेक्शन खुपसल.. त्याला त्रास होत होता खुप.. पण एवढं करून पण तो मला वाचवत होता.. तोच बाहेरून त्याचा मित्र ओरडला की तुम्ही लोक आलेत.. तसा फैयाज आणि त्याचे मित्रमंडळी तिथुन पळ काढु जाऊ लागले... 
अगर तु ये सब इसने किया ऐसा सबको बोलगी तो समीरा इसके लाईफ में से हमेंशा के लिये दूर हो जायेगी.. फिर शौर्य सिर्फ तेरा..सोच ले.. मला अस बोलुन फैयाज तिथुन पळाला.. त्या क्षणाला त्याच बोलणं पटलं मला..

तुम्ही येत होते तेव्हा मीच शौर्यचा हात पकडत त्याला हे सांगत होती की मी हे सगळं तुझ्यासाठी केलं.. माझं त्याच्यावर प्रेम आहे.. पण तो मला सारख ढकलुन देत होता.. माझं काही ऐकुनच घेत नव्हता.. मी रागातच त्याची कॉलर पकडली तस तो माझा हात सोडवत होता आणि तितक्यात रोहन तिथे आला.. तुम्हां लोकांना खरच अस वाटावं की हे सगळं शौर्यने केलंय म्हणुन मी त्याला खाली ढकललं.. पण त्याने काहीच केलं नव्हतं

रोहन : मनवी किती वाईट आहेस ग तु.. अस वाटत ना इथेच तुला...

मनवी : हो मी अशीच आहे. कारण मला शौर्य आवडतो.. आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते.. समजलं तुला.. तो माझा आहे.. ही समीराच आमच्या आयुष्यात आली..

डॅड : मनवी काय केलंस तु हे..

मनवी : डॅड मला शौर्य पाहीजेय.. तुला माहिती ना सगळ.. मी परत नाही अस करणार.. त्याला सांग परत इथे यायला.. नाही तर आपण मुंबईला जाऊयात.. पण मला शौर्य पाहिजे.. मनवी रागातच रूम मध्ये असलेल्या सामानाची आदळा आपट करू लागली..

सगळे स्तब्ध होऊन तिच्याकडे बघतच राहिले..

तिच्या डॅडने पटकन तिथेच असलेल्या ड्रॉवर मधुन झोपेची गोळी काढुन तिच्या तोंडात टाकली आणि तिला पाणी दिलं..

थोड्या वेळांत ती अगदी शांत पणे झोपली..

रोहन : खुप मोठी चुक केलीय तुम्ही.. स्वतःच्या मुलीच्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्याच्या जिवासोबत खेळालात.. 

डॅड : मला माहिती मी चुक केली.. पण एक बाप म्हणुन मी काय करायला हवं होतं.. तुला कळल्यावर तु पण तिला सोडुन गेला असतास तर ती वेडी झाली असती..

रोहन : तुमची मुलगी तुमच्यावर गेलीय.. अगदी स्वार्थी... स्वतःचा विचार करणारी.. जर त्यादिवशी त्या फैयाजने शौर्यला मारून टाकलं असत तर.. तुम्ही काय केलं असत.. तेव्हा पण तुमच्या मुलीची बाजु घेतली असती का?? दुसऱ्याच्या जिवा पेक्षा तुम्हाला तुमच्या मुलीचे हट्ट महत्वाचे वाटतात का.. मेंटल हॉस्पिटलमध्ये एडमीट करा हिला.. सगळी जिंदगी नरक बनवून टाकली.. 

रोहन रागातच मनवीच्या डॅडवर ओरडतो..

वृषभ : रोहन चल इथुन.. इथे रहाणाऱ्या माणसांकडे हृदय नावाचा प्रकार नाही..

रोहन : कसा शांत राहू यार.. आयुष्य पुर्ण पणाला लावलं तरी शौर्यसारखा मित्र भेटणार नाही यार मला.. ह्यांच्या मुलीने....

वृषभ रोहनला शांत करतच तिथुन बाहेर घेऊन जाऊ लागला.. सगळे निघाले पण समीरा मात्र तिथे रडतच बसली..

सीमा : समीरा चलना.. 

सीमा समीराला धरतच तिथुन बाहेर घेऊन येते..

समीरा : मी का नाही विश्वास ठेवला शौर्यवर.. रोज माझ्या मागे मागे करायचा मला समजवण्यासाठी.. त्याने न केलेल्या चुकीची मी त्याला शिक्षा दिली..

रोहन : मनवी का अस वागली यार???

वृषभ : शौर्यच्या घरचा नंबर आहे का कोणाकडे???

रोहन : शौर्यचा मोबाईल तुझ्याकडेच आहे ना.. त्याच्यात असेलना..

वृषभ : त्याने फक्त रेकॉर्डिंग ठेवलय मोबाईलमध्ये त्या व्यतिरिक्त काहीच नाही.. समीरा तुझ्याकडे तरी असेल ना त्याच्या घरचा नंबर..

(समीराला मगाशी ज्योसलीनने फोन केलेला आठवतो)

सीमा : समीरा वृषभ काही तरी विचारतोय...

समीरा : मला ज्योसलीन ने मगाशी फोन केलेला.. शौर्यला काय झालंय ते विचारत होती.. तो रडतोय खुप अस सांगत होती.. पण मी रागात तिला पण नको ते बोलुन गेली..

वृषभ : तिचा नंबर दे मी बोलतो तिच्यासोबत..

समीरा लगेच ज्योसलीनचा नंबर वृषभला देते.. वृषभ आपल्या फोनवरून ज्योसलीनला फोन लावते..

ज्योसलीन : हॅलो...

वृषभ: हेय.. ज्योसलीन.. मी वृषभ बोलतोय.. शौर्यचा मित्र. प्लिज आम्हांला शौर्यशी बोलायचंय.... एकदाच... प्लिज.. 

ज्योसलीन : हा... पण त्याच्याशी बोलायच असेल तर उद्याच फोन कर.. आत्ता तो झोपलाय.. आणि प्लिज तिथे समीरा असेल ना तर तिला सांग.. शौर्य आणि मी फक्त एक चांगले मित्र आहोत.. जर तिला नाही आवडत ना मी शौर्यशी बोललेलं तर मी नाही बोलणार त्याच्याशी.. पण त्याला अस त्रास नको देऊस.. त्याला एवढ टेन्स मध्ये मी कधीच बघितलं नाही.. आणि बघु पण नाही शकत.. माझा खुप छान मित्र आहे तो.. आणि फक्त मित्रच.. ती अस डाऊट कस घेऊ शकते..

वृषभ : मी बोलतो तिच्याशी.. पण तु उद्या शौर्यच्या घरी गेल्यावर मला फोन करशील... प्लिज.. आणि जमल्यास लवकर जा घरी..

ज्योसलीन : काही झालय का वृषभ??

वृषभ : ते सगळं आता नाही सांगु शकत पण प्लिज तु उद्या जेवढ लवकर जमेल तेवढ्या लवकर त्याच्या घरी जा आणि आम्हांला फोन कर.. प्लिज..

ज्योसलीन : ओके..

★★★★★

इथे सकाळचे 8 वाजुन गेले असतात.. विराज रात्रभर शौर्यच्या जवळच बसुन असतो.. शौर्य अजुनही गाढ झोपेत असतो...विराज फ्रेश होऊन एक टक त्याच्याकडे बघत त्याच्या बाजूला बसुन रहातो.. तोच मनवी त्याच्या रूममध्ये येते..

ज्योसलीन : उठला नाही का अजुन??

विराज : नाही.. 

ज्योसलीन : विर प्लिज शौर्यवर नको रागवूस.. तो खुप स्ट्रेसमध्ये वाटत होता काल.. म्हणजे मी त्याला एकदा दोनदा विचारलं पण त्याने टाळाटाळ केली... आणि जेव्हा त्याला आम्ही घरी घेऊन येत होतो तो सारख आय वॉन्ट टु डाय... आय वॉन्ट टु डाय अस बोलत होता.. 

विराज : तो उठल्यावरच कळेल..

ज्योसलीन आणि विराज तिथेच बसुन शौर्य कधी उठतो त्याची वाट बघु लागले..

जवळपास अर्ध्या एक तासाने शौर्य उठतो.. डोळे उघडुन स्वतःला आपल्या रूममध्ये बघुन त्याला आश्चर्य वाटत.. विर त्याच्याकडे एकटक बघत असतो.. त्याच डोकं अजुन ही गरगरत असत... विर त्याला उठवुन बसवतो..

शौर्य विरच्या पुढ्यात मान खाली घालून असतो.. आपण काल खुप मोठी चुक केलीय ह्याची जाणीव झाली असते शौर्यला.. विराजच्या नजरेला नजर मिळवायची किंवा त्याच्यासोबत बोलायची त्याची हिंमत होत नसते.. विराजला पण ते कळत असत.. आणि आपल्या भावाला कस बोलक करायच हे पण त्याला माहिती असत...

विराज : ज्यो तुला माहिती आम्हां दोघा भावांना ना दारू हा चेप्टर आमच्या आयुष्यात कधीच नको होता.. पण काल ह्याने ड्रिंक केलं ग. मुळात हा ड्रिंक करूच कस शकतो..?? हा खरच माझा शौर्य आहे ना.. मला नाही वाटत हा माझा शौर्य आहे.. हा माझा शौर्य असुच शकत नाही...कारण माझ्या शौर्यला जरा पण टेन्शन आलं ना तो सगळ्यात मला आधी येऊन सांगतो.. अगदी त्याच छोट्यातल छोट सिक्रेट पण.. लास्ट टाईम त्याने प्रॉमिज पण केलेलं मला.. जर हा माझा शौर्य असता तर ह्याने मला ह्याच्यासोबत तिथे काय चालु आहे हे सांगितलं असत.. रोज अभ्यासाच कारण देऊन फोन ठेवुन द्यायचा हा.. मला वाटायच खरच अभ्यास असेल ह्याचा.. लेक्चर पण खुप मिस झालेले ना ह्याचे.. मुळात मिच मूर्ख...मला पण तुझ्याकडे बघुन कस नाही कळलं तुला त्रास होतोय ते.. खरच मी तुझा आहे ना शौर्य???

विराज अस बोलताच शौर्यला रडु येत... शौर्य विराजला घट्ट मिठी मारतच रडु लागतो... 

विराज : काय झालंय शौर्य??? किती त्रास करून घेतलायस तु स्वतःला...

शौर्य : आय एम सॉरी.. विर तु मला परत ओरडशील म्हणुन नाही काही बोललो.. आणि मला कळत पण नव्हत मी तुला कस सांगु.. तुझं मी ऐकलं असत तर बरं झालं असत विर.. मी का नाही लास्ट टाईम तुझ्यासोबत मुंबईला आलो.. मला खुप त्रास होतोय विर.. मला सहन नाही होत आहे रे हे सगळं.. मला ते लोक वेडा करतील विर.. मला ती लोक माझ्या आयुष्यात नकोयत परत.. मला खुप त्रास दिलाय त्यांनी.. मी ओरडुन ओरडून सांगत होतो मी काही नाही केलं.. पण माझं कोणी ऐकतच नव्हतं... मला त्रास होतोय विर.. मला नाही जगावस वाटत आहे.. मला लांब घेऊन चल कुठे तरी...

विराज : शौर्य शांत हो... प्लिज... 

(शौर्य अगदी लहानमुलासारखं रडत असतो.. विराज पण त्याला रडायला देतो.. )

ज्योसलीन : धर पाणी पी.. बर वाटेल तुला... 

शौर्यला पाणी पिल्यावर थोडं बर वाटत.. 

विराज : बर वाटतंय ?

शौर्य शांत बसुन असतो...

विराज : ए शौर्य... काय झालं सांग बघु...

शौर्यला त्यादिवशी घडलेला प्रसंग अगदी जसाच्या तसा डोळ्यांसमोरून जाऊ लागला..

शौर्य विराजच्या फोनची वाट बघत कॉलेजच्या गेट जवळच उभा होता.. जवळपास पाच दहा मिनिटांनी विराज त्याला फोन करतो.. त्याच्याशी बोलुन शौर्य ग्राउंडवर जायला निघतो.. तोच फैयाजचे मित्र मंडळी त्याच्या बाजूने जातात..

आज रोहनच काही खर नाही.. एकटाच बसुन रहाणार 4th फ्लॉरवर.. मुळात त्याने फैयाजसोबत पंगा घ्यायलाच नाही पाहिजे होता..

एकमेकांशी बोलतच ती दोघ तिथुन जाऊ लागली..

शौर्यला त्यांच्या बोलण्यावर डाऊट आलेला.. म्हणुन 4th फ्लॉरवर न जाता त्याने रोहनला आधी फोन लावुन बघितला.. पण त्याचा फोन अजुन पण आऊटऑफ कव्हरेज येत होता..

शौर्य पळतच 4th फ्लॉरवर जातो.. रोहनला आवाज देत तो सगळे क्लासरूम शोधतो.. सगळे क्लासरूम बंद असतात शिवाय एक.. शौर्य रोहनला आवाज देतच त्या क्लासरूमध्ये जातो.. कोणी तरी त्याच्याकडे पाठ करून उभं असत.. 

रोहन.. तुच आहेसना..??? अस बोलत शौर्य त्याच्याजवळ जाऊ लागला.. तस क्लासरूमचा डॉर बंद झाला.. आणि अंधारात लपुन बसलेल्या फैयाजच्या एका मित्राने क्लासरूमची लाईट लावली.. आत्ता पर्यंत शौर्यकडे पाठ फिरवुन असलेला फैयाज सरळ उभं राहुन शौर्यकडे हसतच बघु लागला..

शौर्य : रोहन किधर हे फैयाज??

फैयाज : वो तो मस्त एन्यूअल फंक्शन एन्जॉय कर रहा हे.. 

शौर्य रागातच त्याच्याकडे बघुन तिथुन जाऊ लागला..

फैयाज : किधर जा रहा हे.. हिसाब बाकी हे यार.. वो तो पुरा करके जा..

शौर्य त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जाऊ लागला..

फैयाज : ए डबल बाप कि औलाद.. मेने बोला ना तेरा आज हिसाब करना हें मुझे.. किधर जा रहा हे । तिसरी शादी में..

(फैयाज अस बोलताच त्याचे मित्र मंडळी हसु लागतात)

शौर्य रागातच फैयाजजवळ जात जोरातच त्याच्या पोटात लाथ मारतो..आणि त्याला मारू लागतो.. तसे फैयाजचे सगळे मित्र शौर्यला मारायला येत असतात.. शौर्य त्या सगळ्यांना मारतो..

फैयाज दरवाज्याजवळच आपला हात मागे धरून शौर्यकडे घाबरतच बघत असतो..

शौर्य : हो गया हिसाब तेरा??? अब जाऊ में..

शौर्य दरवाजा उघडुन बाहेर जाणार तोच फैयाजने जोरात ड्रग्सने भरलेलं इंजेक्शन त्याच्या दंडावर मारतो.. 

शौर्य हात धरत कलवळतच खाली पडतो.. ड्रग्सची नशा त्याच्या डोक्यात भिनते..

फैयाज त्याच्या खिश्यातुन मोबाईल काढत मनवीला मेसेज करतो.. आणि मोबाईल परत शौर्यच्या खिश्यात ठेवतो..

फैयाज : तुने मुझे सवाल तो पुछा पर मेरा जवाब सुने बिना कैसे जा रहा हे तु.. कोई बात नही... अब सूनले मेरा हिसाब ओर भी बाकी हे...अस बोलत तो शौर्यला मारू लागतो.. शौर्य डोळ्यांवर येणारी नशा उडवतच त्यांना मारायला बघत असतो.. तो पुन्हा कोणी तरी पाठून जोरातच इंजेक्शन त्याच्यापाठीत खुपसत..

आणि शौर्य पुन्हा खाली कोसळतो.. आणि तेवढ्यातच तिथे मनवी येते...

(शौर्य घडलेला सगळा प्रसंग विराज आणि ज्योसलीनला सांगु लागला)

विराज : शौर्य तु मला का नाही सांगितलं एवढं सगळं झाल तुझ्यासोबत.. आपण पोलिस कंप्लॅन्ट केली असती ना.. 

शौर्य : जिथे मित्र माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते तिथे पोलिस काय करणार विर.. जिच्यावर मी जीवापाड प्रेम करत होतो ती मला रेपिस्ट बोलली मग काय म्हणुन पोलिस कंप्लॅन्ट करू मी विर.. कोणाला प्रुफ करून दाखवण्यासाठी पोलिस कंप्लॅन्ट करू.??  एक्साम हॉलमध्ये पण Shaury is Repist म्हणुन लिहिलेलं विर.. मग मला सहनच नाही झालं.. मला इथे पण नाही रहायच.. मला USA ला जायच.. इथे राहिलो तर ते लोक मला शोधत इथे पण येतील.. मला त्यांच्यापासून लांब जायचय.. मला त्या लोकांपैकी कोणीच माझ्या आयुष्यात परत नकोय.. मला USA ला जायचय.. मला भीती वाटते त्या लोकांची आत्ता.. रोहनने तर रेपिस्ट म्हणुन मारलं पण मला.. मी रेपिस्ट नाही आहे वीर.. तुझा आहे ना माझ्यावर विश्वास.. मला लांब जायचय इथुन.. प्लिज विर.. माझं माझ्यावर कंट्रोल नाही रहात आहे... मला खरच त्रास होतोय विर..

विराज शौर्यला घट्ट मिठी मारत त्याला शांत करतो.. 

शौर्यची अशी अवस्था बघुन विराज आणि ज्योसलीनच्या डोळ्यांतुन पण पाणी आलेलं.. 

ज्योसलीनच्या मोबाईलवर वृषभचा फोन येत असतो... 

ज्योसलीन रागातच वृषभचा फोन कट करते.. आणि त्याचा नंबर ब्लॉक करून टाकते..

★★★★★

चार दिवसांनी...

एक्साम देऊन आपापलं सामान घेत सगळेच हॉस्टेलमधून बाहेर पडले... शौर्यला सॉरी बोलुन सगळे तिथुन आपापल्या घरी जाणार असतात..

रोहन : शौर्य करेल ना आपल्याला माफ???

वृषभ : मी पुढचा विचार नाही करत.. पण त्याची माफी मागितली की मला मोठ्या अश्या गुन्ह्यातुन मी मुक्त झालोय अस वाटेल..

समीरा : माझी तर हिंमतच नाही होत त्याच्या समोर जायची.. कसा रिएक्ट होईल तो आपल्याला बघुन.. 

शौर्यचे मित्र मंडळी एअरपोर्टवर चर्चा करत बसले असतात..

सगळेच शौर्यला भेटायला मुंबईच्या दिशेने रवाना झाले..

शौर्यचा एड्रेस शोधतच ते त्याच्या घराबाहेर येतात..

शौर्यच घर बाहेरूनच बघत सगळे एकमेकांकडे बघु लागतात..

राज : नक्की शौर्य इथेच रहातो ना???

समीरा : माझ्या दादाने तर हाच एड्रेस दिलाय मला..

शौर्य देशमुख इथे राहतो का...? वृषभ बाहेर असलेल्या सिक्युरिटीला विचारतो..

सिक्युरिटी : हो आपण??

वृषभ : आम्ही त्याचे मित्र.. त्याला भेटायला आलोय दिल्लीवरून..

सिक्युरिटी फोनवर कोणाशी काही तरी बोलतो.. आणि मग सगळ्यांना आत सोडतो..

आत येताच शौर्यच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाड्या असतात.. 

राज : शौर्यकडे Roll-Royance Cullinan खरच आहे..

वृषभ : हो तो बोललेलं मला..

सगळे बाहेरून त्याच घर बघतच घरात येतात.. बाहेरून जेवढ घर सुंदर दिसत असत त्याहुन पण सुंदर आतुन असत.. सगळेच शौर्यच घर बघतच रहातात.. घरात प्रवेश करताच समोर असलेला फॅमिली फोटो सगळ्यांच लक्ष आकर्षित करून घेतो..  आणि हॉलमध्ये लावलेले शौर्य आणि विराजचे फोटो..

तुमच घर बघुन झालं असेल तर आपण इथे बसुन बोलुयात...

सगळेच आवाजाच्या दिशेने बघु लागतात..

विराज सोफ्यावर बसुन सगळ्यांकडे रागात बघतच बोलत होता..

विराजला बघुन सगळे घाबरतच एकमेकांकडे बघु लागतात.. आणि त्याच्या जवळ जातात..

(आत्ता पुढे काय होईल??  विराज शौर्यला भेटु देईल त्याच्या मित्रांना?? पहा पुढील भागात आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल