❤️अजब प्रेमाची ❤️गजब गोष्ट ❤️....२

The battle for one's own existence.





प्रत्येकाच्या जीवनात एक असा क्षण येतो, जो त्याच्या आयुष्याचा " टर्निंग पॉईंट" ठरतो.  तसाच आज गरगीच्या जीवनात आला होता. नेहमी भित्री भागुबाई म्हणून जगणाऱ्या गार्गी ने आज हिम्मत करून दोन माणसांना त्यांची लायकी दाखवली होती. पण हे तिचे विचार होते....! तिला स्वतः वर अभिमान वाटू लागला होता. तिने मनोमन ठरवलं की आता कॉलेजला गेल्यावर त्या सिनियर मुलांना चांगलाच समाचार देईल. ती मनात स्वप्न रंगवत झोपली होती. 


रात्रीचे एक दीड वाजला असेल. गार्गी ला असं वाटलं जणू तिला कोणीतरी दंडाला पकडून घेऊन जात आहे. तिने डोळे उघडले. तिला दोन खाकी वर्दी वाले दिसले. तिने डोळ्यांची उघडझाप करून नीट पाहिलं. तर दोन हवालदार तिच्या दंडाला पकडून फरफटत तिच्या खोलीबाहेर घेऊन आले.


तिने आजुबाजुला पाहिले तर आई बाबा एका बाजूला इन्स्पेक्टर शी बोलत. नाही नाही...बोलत नाही विनंती करत होते. 


गार्गिला अजुन काही समजलं नव्हत. पोलिस तिथे का  आले...? त्यांनी तिला का पकडलं...? आईबाबा त्यांच्याशी काय बोलतायत...? काही कळत नव्हतं. बस एवढ मात्र नक्की की काहीतरी मोठ्ठं संकट आलंय तेही तिच्यामुळे.


एव्हाना तिला पोलिस जीपमध्ये अक्षरशः ढकलले होते. तिचे आईबाबा जीप पर्यंत आले. पण त्या इन्स्पेक्टर ने त्यांचं काहीएक ऐकून घेतलं नाही. त्याने जीप सुरू केली...


गार्गी मागे वळून पाहत होती. तिची आई धाय मोकलून रडत होती तर बाबा त्या जीप मागून धावत येत होते. गार्गी ही आता मोठमोठ्याने रडत होती. तिने एकदोनदा बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला पण तिच्या बाजुला असलेल्या हवालदाराने दोन सणसणीत चपराक दिली. तशी गार्गी आसवं गाळीत गप बसली. 


गार्गी खाली मान घालून रडत होती. गाडी थांबली आणि बाजूच्या हवालदाराने तिला बाहेर ओढलं तशी ती बाहेर आली. 


गाडी पोलिस स्टेशनला आली होती. सर्वजण तिला घेऊन आत आले. काही तासांपूर्वी या स्टेशनवर कुणीही नव्हतं आणि आता तिथे कमीतकमी सहा सात ऑफिसर होते. नक्की काय चाललंय ते कळायला मार्ग नव्हता. गार्गी एका बाजूला उभी होती. तेवढ्यात तिथे तिचे बाबा आले.


त्याना पाहताच गार्गी त्यांच्या दिशेने जाऊ लागली. पण हवालदारने तिला दम देत तिथेच उभ राहायला सांगितलं.


बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि ते इन्स्पेक्टर च्या केबिन मध्ये गेले. इन्स्पेक्टर फोनवर कुणाशी तरी बोलत होता. त्याने फोन ठेवताच गार्गीचे बाबा बोलू लागले....


" साहेब .....माझी पोरगी निर्दोष आहे हो......"


" घ्या... एका माणसाचा जीव घेतला. दुसऱ्या माणसाला मरणाच्या दारात ठेऊन आलेली यांची पोरगी निर्दोष...!" इन्स्पेक्टर साहेब उसनं हसू आणत बोलले. 


" साहेब यात तिची काही चुकी नाही हो. त्या...त्या पोरांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ....."


"..... दुसऱ्याचा जीव घेतला...???" इन्स्पेक्टर साहेब जाग्यावरून उठत रागात ओरडले.


" बरं....ज्याचा जीव घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती तरी आहे का.....? तो कोण आहे ? माहित आहे तुम्हाला?" 


गार्गी च्या वडिलांना त्या माणसांबद्दल काही माहित नव्हतं. त्यांनी  फक्त मानेने " नाही" म्हटलं.


" जो मेलाय तो....तो पारगड मधील मोठ्या असामीचा मुलगा. त्याने जर इशारा केला तर तुमच्या बरोबर तुमचं अख्खा खानदान मिटवून टाकू शकतो तो....आणि त्यावर कहर म्हणजे...." त्या इन्स्पेक्टर ने एक आवंढा गिळला... 

" तो लकी.....! जो आता कोमात आहे. त्याचा बाप मुंबईत डॉन आहे.. त्याने तर सरळ सरळ धमकीच दिली आहे. की ज्याने त्याच्या पोराची ही अवस्था केलीय त्याला हाल हाल करून मारणार आहे. त्यात उद्या आणि परवा सुट्टी. त्यामुळे कायद्यानुसार कोर्ट सोमवारी उघडणार. म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे ते परवा करावं लागेल. तोपर्यंत तुमची पोरगी पोलिस कोठडीची पाहुणी आहे. जा आता तुम्ही. ए नारंग यांना घेऊन जा रे...."


हवालदार नारंग आत आला. त्याने गार्गी च्या वडिलांना बाहेर जायला सांगितले. तिचे बाबा बाहेर आले. गार्गी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होती. पण त्यांनी गर्गिंकडे पाहून मान खाली घातली. गार्गी काय समजायची ते समजून गेली. 


तिचे बाबा तिच्याजवळ आले.त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. 

" मी तुला काहीही होऊ देणार नाही बेटा. माझी सगळी जमापुंजी लावून तुला यातून सोडविन." त्यांनी तिला पुन्हा एकदा पाहिले.


गार्गी ला त्यांच्या डोळ्यात चिंता दिसत होती. तिनेही त्यांना हो म्हटलं.


तिथून थेट गार्गीचे वडील घरी आले. घरी नितुताई त्यांचीच वाट पाहत बसल्या होत्या. गार्गी चे वडील दिसताच त्या धावत बाहेर आल्या. त्यांनी आजुबाजुला पाहिले पण त्यांना गार्गी दिसली नाही. त्यांनी एकदा गार्गी च्या वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात निराशा आणि अपयश दिसत होते. इतका वेळ मोठ्या धीराने थांबवून ठेवलेल्या अश्रूंचा बांध आता फुटला. त्यांना रडताना पाहून गारगीच्या आईला रडू आले. 


क्षणात होत्याच नव्हतं झालं होतं. लाडाने वाढवलेली एकुलती एक मुलगी. तिच्या जन्मापासून ते आतापर्यंत झालेल्या अनेक आठवणी जणू दोघांपुढे एखाद्या चित्रपटासारख्या त्यांच्यासमोरून जाऊ लागल्या.



















सकाळचे आठ वाजले होते. नंदादेवी हॉस्पिटल मध्ये मात्र सगळ्यांची धावपळ सुरू होती. मोठ्या डॉक्टरांची एक तुकडी त्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाली होती. चार डॉक्टर एका खोलीत बसून चर्चा करत होते. काही वेळ बोलून सगळी टीम "आय सी यू" मध्ये गेले. 


आत असलेला रुग्ण बेशुद्ध होता. त्याच्या एका डोळ्याला पत्ती बांधली होती. तर त्याच्या कुशीत दहा बरा टाके घालून पट्टी बांधली होती. चार डॉक. पैकी एका डॉक.ने त्याचा बाजूला लावलेलं रिपोर्ट घेतला व वाचू लागला.


" याचा तर एक डोळा पार निकामी झालाय आणि जखम फार खोल आहे. " पहिला डॉक्टर.


" कुशिवरची जखमही फार खोल आहे. दहा बारा टाके बसले असतील." दुसरा डॉक्टर त्याच्या जखमेची पाहणी करत बोलला.


" ह्म्म्म्म..... जखम पाहून तर अस वाटतंय की रक्त खूप गेलंय. पण मारमारीच्या खुणा जास्त नाहीत."

चारही डॉक. बाहेर आले." मोठ्या बापाची औलाद वाटते. " 


तेवढ्यात तिथे चार काळया ड्रेस मध्ये असलेली माणसं आली. त्यांना पाहून ते बॉडी गार्ड असावेत. त्यांच्या मधोमध एक चाळीस पंचेचाळीस वर्षाची धिप्पाड व्यक्ती येत होती. त्यांनी ग्रे कलरचा कोट घातला होता. डोक्यावर नाम लावलेला. डोळ्यात प्रचंड राग. त्यामुळे डोळे लालेलाल झाले होते. हाताच्या पाचही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या. त्याला बघून कुणालाही तो बडा उद्योगपती वाटला असता. पण हे त्याचे दाखवायचे रूप होते. 


खर तर तो एक नामचीन गुंड होता. त्याला सर्वच घाबरायचे. राजकारणी, उद्योगपती आणि सर्वसामान्य माणूस सुध्दा त्याच्या हाताखाली होता. त्याच्या एका शब्दावर त्याची सगळी कामे होत होती. आणि जो कोणी त्याला अडवत असे त्याचा तो पत्ता कट करत असे.


तो "आय सी यू " मध्ये आला. लकी ला या अवस्थेत बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली.

" गाडी काडा रे...." म्हणत तो तडक बाहेर आला. त्याने गाडी सरळ पोलिस स्टेशनला थांबवली. सरळ तो त्या कोठडी पाशी येऊन थांबला जिथे गार्गीला ठेवण्यात आले होते. त्याने हवालदाराला दार उघडायला सांगितले. 


गार्गी एका कोपऱ्यात बसली होती. तो ताड ताड कन तिच्याजवळ आला. गार्गी आपल्या ढोपरत मान घालून रडत होती. तेवढ्यात कुणीतरी येण्याची चाहूल लागली वर बघतच होती की तिच्या सनकण......कानाखाली वाजवली. काही समजायच्या आतच दुसरी.... तिसरी.....


" साहेब ...साहेब आवरा स्वतःला. नाहीतर मरेल ती....." इन्स्पेक्टर आत येत बोलला.


"मेली तर मरू दे.... साली. माझ्या मुलाला मारते काय...." म्हणत त्याने तिच्यावर एक लात मारली.


" अरे ये....दरोगा या मुलीला कशाही परिस्थितीत माझ्या हवाली करायचं....."


"अहो पण ..... श्रीकांत साहेब....."


" तू काही टेन्शन घेऊ नको. तुझ्या मोठ्या साहेबांना मी सांभाळीन. त्यांना काय सांगायचं ते मी सांगिन पण ही  मुलगी मला हवी....समजलं." 


" हो श्रीकांत साहेब. पण आता नको. रात्री काय तो बंदोबस्त करा....." इन्स्पेक्टर.


तो गुंड तिथून निघाला पण जाताना पुन्हा एकदा गार्गिकडे खुनशी नजरेने पाहिले. आणि निघून गेला.




संध्याकाळी गार्गीचे आईबाबा तिला भेटायला आले होते. सकाळी पण आले होते. पण त्या इन्स्पेक्टर ने त्यांना भेटू दिलं नाही. 


" साहेब...एकदा माझ्या मुलीला भेटू द्या हो...." गर्गिची आई त्या इन्स्पेक्टर च्या समोर पदर पसरून विनंती करत होती. इन्स्पेक्टर ने एकदा त्यांच्या कडे पाहिलं...


" नाहीतरी पुन्हा यांना त्यांची मुलगी दिसणार तर नाही. एकदा शेवटचं बघू दे..." त्याने मनात विचार केला आणि गार्गी ला भेटण्याची परवानगी दिली.


दोघेही धावत गार्गी कडे आले.

" गार्गी....पोरी...  आम्ही आलोय. ए पोरी.....इथे ये तुझ्या आईकडे ये बेटा..." गार्गीची आई


गार्गी हळू हळू चालत आईबाबांच्या समोर आली. तिचे केस विस्कटलेले होते. डोळे रडून रडून सुजले होते. गालावर चापट मारलेल्याचे निशाण होते. मार जबरदस्त पडल्यामुळे ओठ फुटून त्यातून रक्त येऊन ते सुकले होते. चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. तिला पाहून तर तिच्या आईला घेरी आली. बाबंचीही तीच हलत होती.

तिने एकवार त्यांच्याकडे पाहिलं आणि निर्विकार पण बोलू लागली." आई बाबा मला माफ करा. मी खूप वाईट मुलगी आहे. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागला. पण आता नाही. आता तुम्हाला काही त्रास होणार नाही. आज मी मुक्त होईन आणि तुम्हीही. बस एक रुख रूख राहिल की मी तुम्हाला कोणतंच सुख नाही देऊ शकले. एक मुलगी म्हणून माझी जबाबदारी नाही पार पडू शकले. मला माफ करा." म्हणत तिने दोघांच्या समोर हात जोडले आणि खाली बसून त्याच्या पायांना हात लावला.


गार्गी च्या आईबाबांना काही समजत नव्हतं की गार्गी असं का वागते आहे. ते खाली बसले आणि तिला काय झालं ते विचारू लागले. तेवढ्यात एक हवालदार तिथे आला.


" मी सांगतो...काय झालं ते." असं म्हणत घडलेला प्रकार त्याने सांगितला.


" आता ते हिला कोणत्या ना कोणत्या कारणाने इथून घेऊन जातील आणि...आणि हिला मारून टाकतील." 

गार्गी च्या आईच्या काळजात चर्र झालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबेनात. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर आला. त्याने त्या दोघांना बाहेर काढलं.


आता गार्गी शांत होती. तिने एकदा तिच्या आईबाबांना पाहिलं आणि ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली..



क्रमशः



🎭 Series Post

View all