❤️ अजब प्रेमाची ❤️ गजब गोष्ट ❤️...६

Shodh Ticha ...



रागाने फेऱ्या मारत होता....त्याने एकदा आपल्या माणसांकडे पाहिले आणि ....


"थाड... थाड ...थाड..." तीन गोळ्या डायरेक्ट तिथे उभे असलेल्या त्याच्या माणसांच्या आरपार गेल्या....



सर्वजण एकदा श्रीकांत कडे तर एकदा मरून पडलेल्या माणसांकडे पाहत होते.


" साले sssss....एवढे पैसे देतो. पण साल्यांना एक मुलगी पकडता नाय आली. एकदाच नाही तर दुसऱ्यांदा सुध्दा यांनी तिला जाऊ दिलं...?" श्रीकांत च्या डोळ्यात अंगार फुलला होता. त्याने एक नंबर डायल केला.


" हॅलो.... वर्मा...सून. एक फोटो भेज रहा हुं. किसिभी हाल मे वो लडकी मुझे चाहिए. वो भी जिंदा...!! जितना पैसा चाहिए दुंगा, लेकीन अगर लडकी नही मिले तो याद रख वो दिन तेरे जिंदगी का आखरी दिन होगा...."


" येस सर...आप बिलकुल फिक्र मात किजिये. चार दीन मे वो लडकी आपके सामने होगी...?" वर्मा


"आता बघू तू किती दिवस लपून राहतेस ते. नाय तुला हालहाल करून मारलं तर श्रीकांत नाव नाही सांगणार. म्हणत तो मोठमोठ्याने असुरी हसू लागला.



???????????



समी आणि गार्गी पार्लरच्या मागच्या बाजूने खोलीत आल्या.


समी ने पिण्यासाठी पाणी आणलं. तेवढ्यात तो माणूस आता आला. त्याला पाहताच गार्गी सावरून बसली.


" अरे, ये ना...आत..." म्हणत समी ने त्याला बसायला खुर्ची दिली.त्याने ती खुर्ची गार्गी च्या समोर ठेवली.


गार्गी ने पाण्याचा ग्लास दोन्ही हाताने धरून तोंडाला लावला होता. (एखाद्या लहान मुलासारखा....) पाणी पीत पित ती त्याला न्याहाळून पाहत होती.


उंची जेमतेम पाच साडेपाच फूट. भारदस्त आवाज...तशीच त्याच्या आवाजाला सूट होणारी त्याची बॉडी लँग्वेज. एकदम बळकट....गोरापान... दाट बिअर्ड...काळेभोर डोळे....आणि डोक्यावर पगडी.


"अरे...हा तर पंजाबी आहे. पण छान मराठी बोलतो..." ती एक भुवई उंचावून मनात विचार करत होती. 


" पाणी संपलं त्या ग्लासातील. अजुन हवं असेल तर आहे. उगाच कशाला अगदीच पाणी नसल्यासारखं करतेस..."


तिने पटकन ग्लास खाली केला आणि दात काढत हसली.


"Hmm... तस पाहायला गेलं तर त्या श्रीकांत च्या हातातून सुटणं म्हणजे यमाच्या हातून सुटणं. तू खरच लकी आहेस. मला राघव सरांनी सगळ सांगितलं. पण तू तर जेलमध्ये होतीस ना...?? मग तिथून कशी निसटलीस...?"


गार्गी ने समी कडे पाहिले. तस ती पुढे होत त्याची ओळख करून देऊ लागली...


" हा राकेश सिंग. स्पाय आहे. राघव सरांना तुला मदत करता येणार नाही. त्यांच्यावर वरून प्रेशर आहे. म्हणून त्यांनी याला पाठवलंय..." समी


त्याने गार्गी कडे पाहिले आणि शेकाहेंड करण्यासाठी हात पुढे केला.


गार्गी ने त्याच्या कडे पाहिले आणि तिने नमस्कार केला.


"?.....?. हा...तर तू कशी सुटलिस....? " राकेश


"ते सर....मी.."


" एक...एक मिनिट. मला \" सर....सॉरी... थँक्यु \" या शब्दांचा राग येतो. जर तुला वाटतं की मी तुझी मदत करावी. तर plz...माझ्या समोर हे तीन शब्द चुकून सुध्दा काढू नकोस. तू एक काम कर मला रॉकी म्हण. मला सगळे याच नावाने हाक मारतात..." रॉकी


"ओके...रॉकी...भाई...चालेल..?" गार्गी


" नाही... पळेल...?" रॉकी


" मला आईबाबा संध्याकाळी भेटायला आले होते...."


फ्लॅशबॅक.....


संध्याकाळी आईबाबा गेल्यानंतर गार्गी जेलच्या एका कोपऱ्यात बसली होती. तेवढ्यात एक हवालदार तिला जेवण घेऊन आला. तिने जेवणाकडे पाहिले देखील नाही.


"आता तर मरायचच आहे तर जेवले.. नाही जेवले तरी काय फरक पडतो....??" गार्गी


" नाही पोरी....तू अशी हरू नकोस. हे बघ...." हवालदार असं बोलत खिशातून एक सुरा काढतो.


" हे घे...लपवून ठेव. तुला मदत होईल..." हवालदार


" पण तुम्ही माझी मदत का करता...? ?"गार्गी


" पोरी...तुझ्या एवढीच माझीही एक मुलगी आहे. उद्या तिच्यावरही असा प्रसंग येऊ शकतो. ते जाऊ दे...तू खाऊन घे. पळायला थोडी ताकत हवी ना...?" अस म्हणत तो निघून गेला.


थोड्याच वेळात काही हवालदार आणि तो इन्स्पेक्टर तिथे आले त्यांनी गार्गी ला पकडले आणि पोलिस व्हॅन मध्ये घातले. तो हवालदार त्या व्हॅन च ड्रायव्हर होता. त्याने तिला नजरेनेच शांत राहायला सांगितलं.


त्यांनी गाडी एक निर्जन जागी थांबवली. आणि ते कोणाची तरी वाट पाहू लागले. काही वेळाने तिथे तीनचार गाड्या आल्या. त्यात भरपूर माणसं होती आणि श्रीकांत ही होता. त्याने गार्गी ला आपल्या ताब्यात घेतले. हवालदाराने चपळाईने गार्गी च्या हातात हटकडींची चावी दिली. पोलिस व्हॅन तिथून निघून गेली. त्या लोकांनी गार्गी ला त्यांच्या गाडीत कोंबले आणि तेही तिथून निघून गेले.


त्या गाड्या एक मोठ्याश्या फॅक्टरीत येऊन थांबल्या.


त्यांनी गार्गी ला ओढून बाहेर काढले. श्रीकांतने तिला एकवार पाहिले


"अरे आपली किती मुलींची ऑर्डर आहे..." श्रीकांत


" पंधरा मुली पाहिजेत. तेरा आहेत आपल्याकडे. ही धरली तरीही एक कमी आहे..." संत्या ( श्रीकांत चा साथीदार)


" ह्म्मं...एक काम करा हिला बाकीच्या मुलींबरोबर ठेवा. आणि लवकरच एका मुलीचा बंदोबस्त करा. रात्रीच यांचं पार्सल पाठवून देऊ. " अस म्हणत तो गार्गी कडे आला. त्याने एका हाताने तिच्या हनुवटीला पकडले....


"माझ्या मुलाला मारलस ना....? आता तुला जिथं पाठवणार तिथे तू दर दिवशी मरशिल.? तू रोज देवाकडे मरण्याची भिक मागशील. पण तू मरुसुधा शकत नाहीस. तुला जगावं लागेल आणि हीच तुझी शिक्षा आहे समजलं...??" त्याच्या डोळ्यात प्रचंड घृणा ... द्वेष होता.


त्याच्या माणसांनी तिला एका बंद खोलीत टाकले आणि बाहेरून कडी लावली.


गार्गी ने आजूबाजूला पाहिले तिला तिथे भरपूर मुली दिसल्या. काही बेशुद्ध होत्या तर काही बऱ्यापैकी शुध्दीवर आल्या होत्या. गार्गी सरपटत एक मुलीकडे आली.


" माझी मदत करशील...plz ." म्हणत गार्गी ने तिच्या हातातली हतकडीची चावी तिच्या समोर केली.


त्या मुलीने एकवार गार्गी ला पाहिले आणि तिने पाठ करून स्वतः चे बांधलेले हात दाखवले. तस गार्गी ने तिचे हात सोडले. तस त्या मुलीने आपल्या तोंडावरची पट्टी काढली आणि गार्गी ची हतकडी खोलली.


"Thanks....आपल्याला इथून पळून जावं लागेल ते लोक आज आपल्याला इथून घेऊन जाणार आहेत. मला साथ देशील तर मी तुम्हाला मदत करू शकते....इथून पळण्यासाठी...." गार्गी


" माझं नाव निकिता....." निकिता


"मी गार्गी.... चल आपण यांना शुध्दीवर आणू. आपल्याला यांची सुध्दा मदत लागेल...." गार्गी


दोघींनी सर्व मुलींना शुध्दीवर आणले. गार्गी ने ती खोली पूर्ण पहिली. तिथे एका दरवाज्याशिवाय काही नव्हते आणि तोही बाहेरून लॉक होता. ती विचार करू लागली...तिला एक कल्पना सुचली.


" निकिता ..इकडे ये...." निकिता गार्गी जवळ आली गार्गी ने तिला आपला प्लान सांगितला. निकिताने हमी भरली आणि बाकीच्या मुलींनाही समजावले. सर्वांनी आपापली पोज घेतली.


"१....२....३...स्टार्ट...." गार्गी दरवाज्याचा बाजूला लपून राहिली.


अचानक मोठमोठे आवाज आणि किंचाळ्या त्या खोलीतून बाहेर पडू लागल्या.


आवाज ऐकुन बाहेर उभे असणारे गार्ड आत आले. तसं गार्गी ने दरवाजा बंद केला. बाकीच्या मुली त्या गार्ड वर तुटून पडल्या. 


तो गार्ड फक्त मरायचं बाकी होता. गार्गी ने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिले. बाहेर अजुन दोन गार्ड होते. तिने हातानेच इशारा केला तस त्या मुलींनी पुन्हा आरडाओरडा सुरू केला. यावेळी दोन्ही गार्ड आत आले. सगळ्या मुली त्यांच्यावर तुटून पडल्या.


गार्गी ने दरवाजा उघडून बाहेर पाहिले. कुणीही नाही याचा अंदाज घेऊन तिने निकिताला इशारा केला. आणि गार्गी बाहेर आली. तिच्या मागे निकिता आणि साऱ्या मुलीही बाहेर आल्या.


सर्व मुली बाहेर आल्या आणि वाट मिळेल त्या मार्गाने पळून गेल्या. गार्गी ही तिथून पळून थेट घरी यायला निघाली.


श्रीकांतला जेव्हा कळले की त्याने पकडलेल्या सर्व मुली गार्गी मुळे पळून गेल्या आणि त्यामुळे त्याला लाखोंचं नुकसान झालं आहे. तो पार वेडापिसा झाला. त्याला आता गार्गी कोणत्याही परस्थितीमध्ये हवी होती. त्याने तिच्या घराभोवती आपल्या माणसांना पाठवले.


गार्गी घरी यायला निघाली होती पण तिला घरी श्रीकांत चि माणसं दिसली. जी तिचीच वाट पाहत होते आणि तिला पाहतच तिचा पाठलाग करू लागले.


त्याच्या पासून पळताना ती एका गाडीत चढली. पण त्यांनीही तिचा पाठलाग सोडला नाही. त्यांच्या पासून पळता पळता गार्गी मुंबईत दाखल झाली..


फ्लॅशबॅक संपला....


त्यानंतर तिच्या बरोबर काय घडले. ती समी कडे कशी आली हेही तिने सांगितले.....


"हम्म्मम....." रॉकी


अचानक रोकीचा मोबाईल वाजला. त्याने तो रिसिव्ह केला आणि एका बाजूला झाला.


गार्गी ला आता थोडं हलकं वाटलं. पण तिला कंटाळा आला होता....


समी ने पाहिले की रॉकी फोनवर बोलता बोलता फार गंभीर झाला.


" काय झालं....?? सगळं ठीक आहे ना....? ?" सामी


" नक्कीच नाही....हा श्रीकांत राक्षस आहे. त्याने गार्गी ला पकडण्यासाठी एका क्रूर पोलिसाला हायर केले आहे. इन्स्पे्टर वर्मा.....पूर्ण खात्यात तो एक लालची. एक नंबर नालायक आणि पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारा एकमेव व्यक्ती आहे. तो फार हुशार आहे. एव्हाना तो गार्गी च्या शोधत बाहेर सुध्दा पडला असेल आणि असं जर झालं तर तो केव्हाही इथे पोचेल. त्या अगोदर आपल्याला गार्गी ला इथून हलवाव लागेल....."रॉकी फार टेन्शनमध्ये आला होता.


समी आणि गार्गी ही विचार करत होती. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी कंटाळून तिने बाजूचा टीव्ही लावला. आणि ती movie पाहत बसली.



"बनवाबनवी...?अशी ही बनवाबनवी..हे..हे ..हे..?

बनवाबनवी....?अशी ही बनवाबनवी.....??"


गाणं सुरू होताच गार्गी गाणं ऐकत. गुणगुणत होती.


समी तिच्याकडे हैराण होऊन पाहत होती.



\" काय मुलगी आहे....? इथे जीवावर बेतलय आणि या मॅडम गाणं ऐकातायेत...?\"


" गार्गी तुला काही लाज शरम ग....? आम्ही इथे विचार करून करून डोकं फोडतोय आणि तू....? आरामात गाणी ऐकत बसलीस....?" समी


"अग....टेन्शन घेऊन डोकं सुन्न झालय. म्हणून movie  पाहतेय. तेवढंच थोडं फ्रेश वाटेल...." म्हणत गार्गी पुन्हा मूवी पाहू लागली.


रॉकी तिला पाहत होता...." कशी आहे ही मुलगी.... एवढं टेन्शन असतानाही खुश राहण्याचा प्रयत्न करते....आणि एक वेद आहे...." रॉकी मनात


गाणं ऐकाताना त्याच विचारचक्र चालू होतं. आणि अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली. त्याच्या चेहऱ्यावर एक मोठ्ठी स्माईल आली.


" समी इकडे ये....लवकर " रॉकी


"काय झालं.....??" समी


समी त्याच्या जवळ आली. तसं रॉकी त्याचा प्लान तिला सांगितला.


"????....तुला वेड लागलंय का....? "समी


" माझ्याकडे अजुन कोणताही पर्याय नाही. तुझ्या कडे कोणती आयडिया आहे तर सांग. पण एक लक्षात ठेव तो वर्मा एक नंबर नालायक आणि हुशार आहे. तो कोणत्या बाजूने विचार करेल. काही सांगता येत नाही..." रॉकी


"hmm... हे तिला कसं सांगणार आहेस...? " समी गार्गी ला पाहत बोलली


"तिला मी सांगतो. तोपर्यंत तू याच्यासाठी जे साहित्य लागेल ते घेऊन ये...जा " रॉकी


" तूच सांग. पण जरा सांभाळून. नाही म्हटलं...त्या लकिच्या बाजूचा बेड रिकामी आहे..." समी त्याला भुवाईने गार्गी कडे इशारा केला. आणि ती सामान आणायला बाहेर गेली...




गार्गी मूवी पाहण्यात दंग होती.


"गार्गी....एक आयडिया आहे...." रॉकी


" हा ... सांग ना..."गार्गी


रोकीने त्याची कल्पना तिला सांगितली.


" तू ठीक आहेस ना....? नाही...म्हणजे तुझं डोकं वैगेरे ठिकाणावर आहे का...? तू काय सांगतोस ते तुला तरी समजतंय का....? अरे...हे रियल लाईफ आहे. कोणती फिल्म नाही. प्रॉब्लेम माझा आहे...पण परिणाम तुझ्या डोक्यावर झालाय का....?" गार्गी एका दमात चित्र विचित्र एक्स्प्रेशन देत बोलून मोकळी झाली.


"झालं तुझं......" रॉकी


"हमम्म..."गार्गी


"तुला माझ्यावर विश्वास आहे का...?"रॉकी


"बिलकुल नाही..."गार्गी


" गुड ...मग तू तुझ्यावर विश्वास ठेव. हे बघ गार्गी मी एक स्पाय आहे . आणि तू माझ्यासाठी एक मिशन आहे. म्हणून मी हे करायला सांगत नाहीय. तर तू मला भाई म्हटलस आणि मी माझ्या बहिणीला वाचवण्यासाठी कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहे. समजलं?....मी सगळं ठीक करेन..."रॉकी


"?.... "गार्गी मोठमोठ्याने हुंदके देऊन रडायला लागली.


तिला रडताना पाहून रॉकी अचंभित झाला." काय झालं...रडायला...??" रॉकी


" भाऊ....भाऊ. मला भाऊ नाही. आज पहीलिवेळ कोणीतरी भावासारखा अधिकाराने बोलला. माझा तर ऊर भरून आला..."गार्गी


" ?? नौटंकी साली..." रॉकी ने डोक्यावर हात मारला.


"?..."गार्गी ने दात दाखवले.


तेवढ्यात समी ने लागणारं साहित्य घेऊन आली.




" हिला व्यवस्थित तयार कर. तो वर्माच काय...? हिच्या वडिलांनी सुध्दा हिला ओळखता कमा नये.." रॉकी रूम बाहेर निघताना समिला वॉर्निंग देत बोलला.




जाता जाता त्याने गार्गी ला पाहिलं. तिचे डोळे काठोकाठ भरलेले होते. त्याला पाहताच तिने मान वळवून डोळे पूसले नी पुन्हा एक गोड हसू आणून त्याच्याकडे पाहु लागली.☺️


त्यानेही स्माईल केली आणि तो बाहेर आला.



"काय मुलगी आहे. मनात सगळं दुःख ठेऊन चेहऱ्यावर नेहमी हसु असतं हिच्या. पण हिला माहित नाही की हीचे डोळे सगळं सांगतात..." त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन मध्ये एक नंबर डायल केला. आणि तो त्याच्याशी बोलू लागला.




क्रमशः



🎭 Series Post

View all