Login

‘यशोगाथा’ स्त्रीच्या मातृत्वाची भाग ४

‘यशोगाथा’ स्त्रीच्या मातृत्वाची भाग 4 ( “संगिता म्हणजे लताबाई त्याच्या पाहुण्याती एक मुलगी स??

यशोगाथास्त्रीच्या मातृत्वाची

भाग 4

( “संगिता म्हणजे लताबाई त्याच्या पाहुण्याती एक मुलगी साभाळली होती. तिचे आई वडिल लहानपणीच वारले होते. पण आपली परिस्थ‍िती अशी आहे; आपण तिला कस सांभाळू याचा विचार लताबाईनी केला नाही. त्या तिला घेवुन आल्या. ती त्याच्यापाशीच रहात होती.; तिच शिक्षण वगेरे सगळ लताबाई बघायच्या आपल्या पोटच्या मुलीसारखं तिच सगळ केल्या. आणि सुहास म्हणजे लताबाईचा लहान मुलागा तो कॉलेज करत होता 11वी ला होता.” )

आता पुढे...

“सुधिरने सांगितल्याप्रमाणे सगळयांनाच हे पटल सगळे ठरल्याप्रमाणे करायच ठरवतात. दुसऱ्या दिवशी सुनिल त्याच्या कारखाण्यात जाऊन सांगतो की आम्ही सगळयांच जेवण करुन देतो. तेथे ही त्यांना काहीच हरकत नव्हती त्यामुळे सामानाची बाधाबाध करुन लताबाई व संगिता 100 लोकांचे जेवण रोज सकाळ संध्याकाळी बनवु लागल्या. पहाटे चार उठुन त्या स्वयंपाकाला लागायच्या हया कामामुळे आता थोडा पैसा येवु लागला होता.”

“पण देवाला लताबाईच सुख बघवतच नव्हत की काय माहीत…..एके दिवशी लताबाई नेहमी प्रमाणे काम करत होत्या त्यावेळी त्याच्या गावातील ओळखीचा माणुस त्यांना सांगत आला की शेताच बिल आल आहे आणि बाळासाहेब ते बिल काढायला जात आहेत. ते ऐकल्यावर तर लताबाईच्या पायातील त्राणच गेला आता काय कराव त्यांना कळेना एवढी मोठी रक्कम आता हा माणुस पाण्यात घालतो  म्हणुन त्या रडु लागल्या इतक्यात तिथे सुनिल आला आईला रडताना पाहुन तो आई जवळ गेला. आई काय झाल का रडत आहेस.?”

“तुझे बाबा शेताच बिल आलं आहे ते आणायला गेले आहेत आता एवढे पैसे त्यांनी आकडयावर उडवल तर काय करु मी कुठुन एवढा पैसा आणू लोकांचे घेतलेले पैसे दयायचे आहेत आजुन काय काय हा माणुस करणार आहे काय माहित.आस म्हणुन लताबाई रडु लागल्या…..”

“आई तु शांत हो मी बघतो बाबा ते पैसे नाही आकडयावर उडवणार माझा शब्द आहे तुला….मी आलोच जाऊन अस म्हणुन सुनिल सायकल घेवुन 10 किमी अंतर 15 मिनिटात पार केला. व डायरेक्ट सोसायटीमध्ये गेला. त्याला ही रुखरुख होतीच आईला आपण शब्द तर दिला आहे; पण बाबानी ते पैसे आकडयावर उडवले असती तर काय करु तसा विचार करतच तो सोसायटीमध्ये आला. तर बाळासाहेब नुकतेच पैसे घेत होते. ते पाहुन सुनिलच्या जिवातजिव आला.; पण बाळासाहेब पैसे काढु पर्यत तो काहीच बोलला नाही ते पैसे घेवुन बाहेर आले. तेव्हा तो त्यांना आडवला….”

‘बाबा हया पैशाच काय करणार अहात……..सुनिल’

काय करणार म्हणजे लोकांचे पैसे दयायचे आहे ते देणार आहे……….बाळासाहेब

कुठल्या लोकांचे पैसे देणार अहात ते माहितेय मला…..आजपासुन शेताच घराच काय व्यवहार असतील ते माझ मी बघेन इथुन पुढे तुम्ही हयामध्ये लक्ष घालायच नाही कळल का…..सुनिल जरा मोठया आवाजात बोलला

‘हे तु मला शिकवणार?…..बाळासाहेब चिडुन बोलले’

“हो तुम्हीच ती वेळ आणली आहेत. तुम्हाला जर हे सगळ कळल असत तर मला अस बोलावच लागल नसत. पण बास झाल आता मी माझ्या आईला त्रास होवु देणार नाही. इथुन पुढे घरच काय असेल ते माझ मी बघेन. एवढ बोलुन बाळासाहेबाच्या हातातील पैसे घेवुन सुनिल लताबाईच्याकडे आला.”

“लताबाई सुनिलचीच वाट पाहत बसल्या होत्या. त्यांना सुनिलची काळजी वाटत होती. तेवढयात सुनिल त्यांना येताना दिसतो. त्याला पाहुन त्यांच्या जिवात जिव आला. काय झाल सगळे पैसे उडवले असतील ना? लताबाई हताश होऊन बोलतात.”

“सुनिल त्याच्याकडे सगळे पैसे देतो……पैसे पाहुन लताबाईना आश्चर्य वाटल बाळासाहेबांनी पैसे कसे दिले हे त्यांना कळेनाच त्यांनी सुनिलला विचारल. मग सुनिलने झालेला सगळा प्रकार सांगितला.”

“सुनिलच बोलण ऐकुन लताबाईच्या डोळयात पाणी आलं त्यांनी ते पैसे सुनिलकडे दिल आज पासुन तुच हे सगळ बघ आता तु आहेस मला कशाचीच काळजी नाही.”

“नाही आई आजपर्यत तु सगळ आमच केली आहेस आणि‍ इथुन पुढे पण तुलाच करायच आहे हे घे पैसे कोणाचे दयायचे असेल तर सांग मी त्यांना देवुन येईल. मग लताबाईनी सुनिलला कोणाचे पैसे दयायचे होते ते सांगितले व ते पैसे सुनिलकडे दिले.”

“सुनिलने आपल्या पगारातील काही पैसे साठवुन ठेवले होते त्याला आपल्या आईसाठी काही तरी करायच होतं. त्याने लताबाईना सोन्याची बोरमाळ केली होती ती तो लताबाईना दिली ते पाहुन तर लताबाईच्या डोळयाती आश्रु थांबेनात आपला मुलगा कर्ता झाला. हयाची त्यांना जाणीव झाली.”

“असेच दिवस जात होते लताबाईनी सुनिलच लग्न केल नात्यातील मुलगी होती. तिचा पण त्यांना आधार झाला. ती सुध्दा त्यांना मदत करायची शेताची काम पहायची घर सांभाळायची.”

“गावातील हॉटेल सुध्दा चांगल चालु होत. त्यामुळे आता लताबाईनी गावी जायचा विचार केला. तिथेच आपण सगळे एकत्र राहुन करु काही तरी..अस म्हणुन त्या गावी निघुन आल्या. सुनिलने ही त्याची नोकरी सोडली व तो ही हॉटैल सांभाळु लागला.”

लताबाईच्या सुनेला सुधदा दिवस गेले त्यांना आनंदाची बातमी कळाली……त्यांनी त्याच्या लेकीला तिथेच गावात एक घर बांधुन दिल्या. संगिताच सुध्दा लग्न करुन दिल्या. त्यानंतर दुसऱ्या मुलाच सुध्दा लग्न केल.

थोडयाच दिवसात सुनिलला मुलगी झाली. घरात लक्ष्मी आली म्हणुन लताबाई खुश झाल्या लताबाईच आता सगळ छान मार्गी लागत होत. बघता बघता त्यांच कुटुंब 17 माणसांच कुटुंब झाल. घरात नाती नातवंड खेळु लागली.श्‍

“आज लताबाई 75 वर्षाच्या झाल्या आहेत. तरी सुध्दा आजुन घर त्याच साभाळत आहेत. दोन नातीच लग्न सुध्दा त्यानी करुन दिली……..”

“आज लताबाईंच्या मुलांनी दोन हॉटेल सुरु केले आहेत आणि स्वत:च बेकरी प्रोडक्शन सुध्दा सुरु केलआहे. जागा घेवुन दोन मजली घर बांधलं. आणि दोन तिन ठीकाणी जागा सुध्दा घेवुन ठेवले आहेत. हे सगळ करताना त्यांना त्यांच्या आईची चांगली साथ मिळाली.”

“लताबाईच छान मार्गी लागलं. त्या आता मुला –सुनांच्यात नातु-नातीच्यात सुखाने राहत आहेत.घेतलेल्या कष्टाच त्यांना चांगल फळ मिळाल. बाळासाहेब आता घरीच असतात त्याचही आता वय झाल आहे. बाळासाहेब आता 85 वर्षाचे आहेत पण अंगातले वाईट गुण काय कमी झाले नाहीत. घरातल्यांना चूकवुन अजुन सुध्दा दिवसातुन एकदा तरी आकडा लावतातच.”

‘ती म्हण एक आहे ना…….भगवान के घर मे देर हे पर अधेरा नही !…….तसच लताबाईच झालं वेळ लागला पण सगळ छान झाल.’

***

समाप्त

(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

हा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all