‘यशोगाथा’ स्त्रीच्या मातृत्वाची
भाग 3
(“आता जनावरांच्या दुधावर त्यांच घर चालु लागल. त्यातील थोडे पैसे बाजुला ठेवुन महिन्याला जसे जमेल तसे थोडे पैसे दादासाहेबांना देवुन यायची. नंतर लहान जणावर आणुन त्यांना मोठ करुन विकु लागल्या.आता तर सगळ व्यवस्थित होईल अस वाटत असतना बाळासाहेबांनी लताबाई बाहेर गेल्या असताना ती म्हैस विकुन ते पैसे घेवुन आकडा खेळायला जातात.”
‘लताबाई कामावरुन येतात तर म्हैस दारात कुठे दिसेना पाहुन मुलांना विचारतात….बाळांनो म्हैस कुठे गेली?’ )
आता पुढे ....
“आई बाबांनी ती विकुन टाकली व ते आता आकडा खेळायला गेलेत गावाबाहेर………हे ऐकल्यावर लताबाईच्या पायाखालची जमीनच सरकली………’त्या तशाच पळत सुटल्या गावाबाहेर गेल्या जाऊन पाहतात तर बाळासाहेबांनी सगळा पैसा उडवुन टाकला होता’…….’लताबाई त्या लोकाना गयावया करत होत्या मला माझे पैसे परत दया पण कोणीच ऐकल नाही’…….सगळे निघुन गेले….बाळासाहेब; पण जात होते लताबाई उठल्या त्याच्या हाताला ओढुन मागे ढकल्या बाप हायस की वैरी स्वत:च्या पोटच्या पोरांची माया येती का नाही तुला?……..एवढ दिवस आकडा खेळुन कीती पैसा कमवलास तु……सगळया घराची वाट लावलीस माझ्या सोन्यासारख्या पोरांसनी उपाशी ठेवलास तु…..तुझ्यातला बाप मेलाय का?”
“कुढली पोर कुढला बाप….मला फक्त पैशाशी मतलब आहे…….कळल काय…..लताबाई बोलत होत्या पण त्यांना ढकलुन बाळासाहेब तेथुन जातात.”
“लताबाईच्या डोळयासमोर अंधार दिसु लागला काय कराव काहीच कळेना आता मुलांच पोट कस भरु दादासाहेबांच पैसे कस परत करु……लताबाई हताश झाल्या त्यांच्या मनात काय आल काय माहीत त्या सुसाट पळत सुटल्या आणि वहिरी समोर जाऊन उभ्या राहील्या…….त्या वहीरीत उडी मारणार तोच त्यांना त्यांची मुल डोळयासमोर आली.”
“हा माणुस मी जिंवत असताना माझ्या मुलांना बघना मग मी मेल्यावर तर काय बघेल माझ्या लेकरांना.?मी हया माणसासाठी माझ जीव देतेय पण माझ्या लेकरांनी काय केलय त्यांचा काय दोष नाही त्यांच्यासाठी तर मला ‘जगायलाच हवं’… ‘जगायलाच हवं’;त्या तशाच दादासाहेबांच्याकडे गेल्या.दादासाहेबांना झालेला सगळा प्रकार सांगतात व त्यांच्याकडुन पैसे परत करायचा वेळ वाढवुन घेतात. तेथुन घरी परत आल्यावर मुलांना मिठी मारुन खुप रडुन घेतात.”
‘आई रडतेल पाहुन मुलं ही रडु लागली……..पण मुलांना रडतेल पाहुन लताबाईनी स्वत:ला सावरलं…मुलांना शांत केल त्यांना खाऊ घालुन झोपवलं……परत नव्याने प्रश्न उभा राहीला होता आता काय करु?…..आता कस घर चालवू ?‘
“लाताबाई कामाला जाऊन यायच्या परत विचार करायच्या आता काय करु?……थोडीफार शेती होती ती सुध्दा बाळासाहेब व्यवस्थित करत नव्हते त्यामुळे लताबाई आहे ती शेती करायची ठरवतात त्या मोठया मुलाला हाताशी धरुन शेती करु लागल्या;. पण शेतात पाणी पाजायची वेळ आली की अवघड होई कारण पाणी पाजायची वेळ रात्रीची यायची आणि एकटया बाईने रात्री पाणी कस पाजायच;? पण लताबाई घाबरल्या नाहीत त्या मोठया मुलाला सोबत घेवुन जायच्या त्या त्याला झाडाखाली आंथरुन घालुन दयायच्या व स्वत: पाणी पाजायच्या असे दिवस जात होते; पण शेताचे पैसे तर वर्षानी मिळायचे रोजच्या खर्चाचे काय करावे हे लताबाईना कळत नव्हते मजुरीवर तर घर चालत नव्हते त्यात आणि दादासाहेबांचे पैसे परत दयायचे होते दोन तीन दिवस तर नुसते असे विचार करण्यातच गेले कारण काही जरी करायच झाल तर सगळयाला पैसा हवा असतो….एके दिवशी असाच विचार करत बसल्या होत्या इतक्यात शेजारच्या कावेरीबाई तिथे आल्या…..लताबाई बुंदीचे लाडु बांधायचे आहेत जरा पाक करायला येता का ओे…….तुम्हाला छान जमतो….कावेरीबाई”
“आहो येताय का काय……चला येते……त्यात काय एवढं आपल्याला काही येत असेल आणि त्यामुळे दुसऱ्याला मदत करता येत असेल तर करावी….चला करुन देते……लताबाई बुंदिच्या लाडुचा पाक धरुन देतात….व त्यांना लाडु सुध्दा वळायला मदत करतात……”
“लताबाई खरचं खुप छान जमतात तुम्हाला सगळे पदार्थ……तुम्ही जर हॉटेल काढलत ना तर ते कसल भारी चालवाल माहीतेय का………….कावेरीबाई”
“काय ओ कावेरीबाई चेष्टा करताय का माझी……लताबाई हसत बोलतात लाडु वळुन झाल्यावर त्या घरी येतात. पण त्यांच्या डोक्यातुन कोवेरीबाई बोलेले जातच नव्हते काय हरकत आहे आपल्याला हॉटेल चालवायला?…. तसही माहेरी तर सगळे पदार्थ बनवुन देत होते वडिलांना त्यामुळे त्याचाही अनुभव आहेच…….शिवाय जागेचा पण प्रश्न नाही रसत्यालाचा जागा आहे एक खोली बांधलेली आहे तशी ही ती रिकामीच पडली आहे. त्यालाच जरा स्वच्छ करुन हॉटेल सुरु करु शकतो. लताबाईंनी हॉटेल काढायचा विचार पक्का केला. आपल्या मुलांच्या मदतीने त्या हॉटेल चालवु लागल्या मुले पण शाळा करुन त्यांना हॉटेलमध्ये मदत करत होते. थोडा थोडा जम बसत होता. पण बाळासाहेब त्याला नजर लावायला होतेच. आता ते हॉटेल सुरु झाल्यापासुन कामच करायचे बंद केल. हॉटेलमधीलच पैसे आता ते घेवुन जाऊ लागले. पण हयावेळी लताबाई गप्प बसणार नव्हत्या त्या बाळासाहेब येणार हयाचा अंदाज आला की त्यातील थोडे पैसे बाजुला काढुन ठेवायच्या त्यामुळे सगळे पैसे वाट लागण्यापेक्षा थोडे पैसे बाजुला रहायला लागले. बघता बघता वर्ष सरत गेली. मुल सुध्दा आता मोठी झाली होती. मुलांनी घरची परिस्थिती बेताची होती म्हणुन पुढे शिक्षण घेतल नाही मोठया मुलागा 12वी करुन एका कारखाण्यात नोकरी करु लागला. दोन नंबरचा मुलगा तर 7 वी पर्यतच शिक्षण घेतल. व लताबाईंना हॉटेलमध्ये मदत करु लागला. लहान मुलगा अजुन शिकत होता. व लताबाईनी त्याच्या मुलीच लग्न करुन दिल. पण तिथ पण देवाने लताबाईंची परिक्षा बघायची ठरवली होती वाटत. मुलगी नवऱ्या व मुलासकट लताबाईच्याकडे रहायला आली. लताबाईना घरच थोड झाल होत की परत आता जास्तच माणसांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यात जावई ऐतखाऊ निघाला. तो नुसत बसुन खायचा जावई असल्यामुळे त्याला काही बोलता ही येत नव्हत.”
असच दिवस कसे तरी जात होते. मोठया मुलाची नोकरी चांगली चालु होती. त्याच्या काखान्यावर कामगारांना जेवण करण्यासाठी कोणी तरी हव होत. अस लताबाईच्या मोठया मुलाला म्हणजेच सुनिलला कळलं. तो संध्याकाळी घरी आल्यावर लताबाईना बोलला आई आपण करु शकतो का कर्मचाऱ्यांना जेवण पैसे पण रोख मिळतील. लताबाईच्या डोक्यावर कर्जाच ओझ होत. त्यामुळे आता त्या कोणतेही कष्ट करायला तयार होत्या. त्यामुळे त्या जेवण बनवायला तयार झाल्या. पण इथल्या हॉटेलच काय ते कस सोडुन जायच. त्यावर मधल्या मुलाने म्हणजेच सुधिरने एक मार्ग काढला. गावातील हॉटेल मी बघतो एक आचारी पाहु आपण आणि तिथे तु आणि संगिता जा आणि सुहास पण कॉलेज करुन येत जाईल मदतीला चालेल ना?”
“संगिता म्हणजे लताबाई त्याच्या पाहुण्याती एक मुलगी साभाळली होती. तिचे आई वडिल लहानपणीच वारले होते. पण आपली परिस्थिती अशी आहे; आपण तिला कस सांभाळू याचा विचार लताबाईनी केला नाही. त्या तिला घेवुन आल्या. ती त्याच्यापाशीच रहात होती.; तिच शिक्षण वगेरे सगळ लताबाई बघायच्या आपल्या पोटच्या मुलीसारखं तिच सगळ केल्या. आणि सुहास म्हणजे लताबाईचा लहान मुलागा तो कॉलेज करत होता 11वी ला होता.”
***
क्रमश:
(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
हा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा