‘यशोगाथा’ स्त्रीच्या मातृत्वाची भाग 2

‘यशोगाथा’ स्त्रीच्या मातृत्वाची भाग 2 ( “दुकानदाराच बोलण ऐकुन लताबाईचा चेहरा पडला त्या परत म

यशोगाथास्त्रीच्या मातृत्वाची

भाग 2

( “दुकानदाराच बोलण ऐकुन लताबाईचा चेहरा पडला त्या परत माघारी फिरल्या व घरी जाऊ लागल्या….हा सगळा प्रकार गावातील एक वयस्कर व्यक्ती पाहत होता. तो लताबाईच्या मागे जातो व त्यांना आवाज देतो………ये लताबाई थांब जरा”

आपल्याला कोण आवाज देत आहे हे पाहुन लताबाई मागे पाहतात……..दादासाहेब….?दादासाहेब तुम्ही बोलावलत का मला..लताबाई )

आता पुढे...

“हो बोलावल….तुझ व त्या दुकानदाराच बोलण मी ऐकल…..काय अडचण आहे तुझी सांग मला…दादासाहेब”

“लताबाई झालेला सगळा प्रकार दादासाहेबांच्या कानावर घालतात. हे सांगताना त्यांच्या डोळयात पाणी येत….”

‘अग ये बाय कशाला रडतेस’….अस रडुन तुझ्या लेकराच पोट भरणार आहे का…? मी करेन तुला मदत……पण ती मदत म्हणुन नाही. ‘मी तुला पैसे देतो; पण व्याजान तु ते कस फेडायच तुझ तु बघायच….चालेल का सांग?…….दादासाहेब’

“त्यावेळी लताबाईना पोरांच्या जेवणाची काळजी पडली होती. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता हो म्हटलं.”

‘दादासाहेबांनी त्यांना पाच हजार रुपये देले व दोन महिन्याच्या वायदयावर ते परत कर म्हणुन सांगितले.’

“लताबाई तशाच मागे फिरल्या व दुकानदाराकडे गेल्या मागची सगळी उधारी दिल्या व महिनाभराच सामान घेवुन घरी आल्या. आल्यावर पटकण जेवण बणवुन मुलांना खाऊ घातल. सगळी आवराआवर केली; व त्या दारात जाऊन बसल्या पण त्याच्या डोक्यात विचार घोळत होता की दादासाहेबाच पैसे कसे फेडायचे?…’मी काय काम करु मी तर आडाणी बाई बाहेर पडुन माहीत नाही काय करु कस पैसे फेडु’; आणि त्यानंतर तर घर कस चालवायच काहीच कळत नव्हतं.”

‘घरासमोरुन काही बायका बडबडत चालल्या होत्या शेतात कामाला बाई पाहीजेल हाय कुठ मिळना झाल्या……….ते शब्द लताबाईच्या कानावर पडलं……त्या मागचा पुढचा विचार न करता त्या बायकांच्याकडे गेल्या……ओ बाई आता तुम्ही कामाला बाई पाहिजे म्हणत होता नव्हं……लताबाई’

हो….तुमच्याकडे कोणी आहे का बाई….? असेल तर सांगा………..त्यातील एक बाई बोलते

“मी आल तर चालेल का..लताबाई त्यांना विचारतात….”

“अहो बाई तुम्ही तर चांगल्या घरातल्या दिसता…तुम्ही कस येणार………त्यातील एक बाई”

‘अस काही नाही मला गरज आहे म्हणुन मी तुम्हाला विचारतेय..लताबाई’

“तुम्हाला चालणार असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही…उदया सकाळी 9 वाजता जायच आहे बघा तयार राव्हा आम्ही तुम्हाला जाताना हाक मारतो. अस बोलुन त्या निघुन जातात…..”

‘रात्रीच स्वयंपाक करुन मुलांना जेवायला वाढत होत्या इतक्यात बाळासाहेब तिथे येतात घरात जेवण पाहुन त्यांना प्रश्न पडला मी तर आणल नाही? मग घरात जेवण आल कुठलं?’

‘काय ग सामान कुठल आणीलीस’…..त्याला पैसे कुठल आणलीस?…बाळासाहेब

दादासाहेबांच्याकडुन पैसे घेतले आणि आणलो सामान………लताबाई जरा भित भितच बोल होत्या…..

पण बाळासाहेब काहीच बोलले नाहीत त्याना पैशाशी आणि जेवणाशी संबध होता ते कोठुन आणले ,?कोणाकडुन आणले,? हयाच त्यांना काहीच पडलेल नव्हतं……पोटभर जेवुन परत मित्रांसोबत आकडा खेळायला गेले…..

“दुसऱ्या दिवशी लताबाई मुलांच सगळ आवरुन घरच आवरुन त्या बायकांच्या सोबत शेतात कामाला गेल्या. दोन महिने असच गेले त्या कामाला जाऊन पेसै आणुन साठवुन दादासाहेबांना दिल्या. ‘ते पैसे कसे आणले ते? दादासाहेबांनी विचारल’……लताबाईनी त्यांना सागिंतल की मी शेतात मजुरी करायला जाते. ‘ते ऐकुन दादासाहेबांना थोड वाईट वाटल पण आता लताबाई खंबिर होत आहे हयाचा त्यांना आनंद होता.’ लताबाई खुश होत्या की आपली मुल उपाशी राहत नाहीत. आपण काम करुन त्यांना पोटभर जेवण करुन घालतोय……….पण देवाला तो आनंद पहावला नसेल ना………’बाळासाहेबांच हे व्यसन फारच वाढल होत.’ त्यांना आकडा खेळायला पैसा कमी पडत होता. आता ते लताबाईच्या पैशावर डोळा ठेवुन होते. ते त्यांच्याकडे पैसे मागु लागले. पण लताबाई माझ्याकडे नाहीत म्हणुन सांगत होत्या पण आता त्यांची मझल त्यांना मारण्या इतपत गेली. लताबाईंना मारताना पाहुन मुल घाबरु लागली. हे रोजच होवुन बसल त्या दिवसभर राबायच्या आणि आलेला पैसा बाळासाहेब घेवुन आकडा खेळायला जाऊ लागले.”

“लताबाईना आता तर काहीच कळत नव्हत त्या आता पुर्ण हताश झाल्या. त्याच्या मनात काही तरी येत व त्या परत दादासाहेबांच्याकडे जातात.”

“दादासाहेब मला परत पैसे लागणार होते…लताबाई थोडया दबक्या आवाजातच बोलतात.”

“किती पाहिजेत दादासाहेबांनी विचारलं……..?”

‘दादासाहेब ते मला जरा जास्त पैसे पाहिजे होते…….लताबाई’

जास्त म्हणजे किती पाहीजे?……दादासाहेब

पन्नास हजार रुपये पाहीजेत…….लताबाई जरा आडखतच बोलल्या..

एवढं?……….एवढं कशाला हव हाय तुला?……….दादासाहेब

दादासाहेब ते मला जनावर घ्यायच होत.मी तुम्ही दिलेल्या वेळेत पैसे परत करीन………लाताबाई

दादासाहेबांना माहित होत की ही पैसे फेडते त्यामुळे त्यांना जास्त विचार न करता लताबाईला पैसे देवुन टाकले.

“लताबाई ते पैसे घेवुन येतात व आपल्या मोठया मुलाला घेवुन सांगलीला जातात व तेथे जनावरांच्या बाजारातुन एक म्हैस घेवुन येतात……येताना भांड जास्त जात म्हणुन त्या जनावरा सोबत 30 किमी अंतर चालत येतात.”

“आता जनावरांच्या दुधावर त्यांच घर चालु लागल. त्यातील थोडे पैसे बाजुला ठेवुन महिन्याला जसे जमेल तसे थोडे पैसे दादासाहेबांना देवुन यायची. नंतर लहान जणावर आणुन त्यांना मोठ करुन विकु लागल्या.आता तर सगळ व्यवस्थित होईल अस वाटत असतना बाळासाहेबांनी लताबाई बाहेर गेल्या असताना ती म्हैस विकुन ते पैसे घेवुन आकडा खेळायला जातात.”

‘लताबाई कामावरुन येतात तर म्हैस दारात कुठे दिसेना पाहुन मुलांना विचारतात….बाळांनो म्हैस कुठे गेली?’………

***

क्रमश:

(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

हा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all