‘यशोगाथा’ स्त्रीच्या मातृत्वाची भाग 1

‘यशोगाथा’ स्त्रीच्या मातृत्वाची भाग 1 “सरळ साध्या, आपल घर, आपली मुले हयालाच जग मानणाऱ्या लताबा??

यशोगाथास्त्रीच्या मातृत्वाची

भाग 1

 “सरळ साध्या,  आपल घर, आपली मुले हयालाच जग मानणाऱ्या लताबाई… माहेरची परिस्थीती बेताची असल्यामुळे जेमतेम 4 थी पर्यत शिक्षण झालेल…त्यामुळे व्यवहाराच फारस ज्ञान नाही..आपला नवरा जे आणुन देईल त्यात मुलांच शिक्षण व घर चालवायच एवढच माहीत.”

“लताबाईच्या नवऱ्याला म्हणजेच; ‘बाळासाहेबांना जुगार खेळायची सवय होती’. गावाकडे त्याला ‘आकडयाने खेळणे’ असे बोलले जायचे, सुरवातीला त्यांच आकडा खेळण्याचे प्रमाण थोड कमी होत;. पण सध्या त्यांना त्याची खुप सवय लागली होती. ‘सवय कसली व्यसनच लागल होतं;. त्यामुळे जो काही पैसा यायचा तो सगळा  आकडयावर उधळला जाऊ लागला. ‘दिवसभर जे काही कमवत होते तो सगळा पैसा रात्री आकडयामध्ये लावला जाई;.त्यामुळे घरात काही सामान आणुन देईनात मुलांना काही हव असेल तर सरळ नाही म्हणुन सांगु लागले. ‘मुल रडायची रडायची; पण त्यांना त्याचा काहीच फरक पडत नसे’. लताबाई मुलांना समजवत त्यांना शांत करत. काही तरी समजुत काढुन त्यांना गप्प बसवत. बाळासाहेब घरात सामान आणण्यासाठी पैसे देईनात म्हणुन लताबाई खुप काटसकरीने सगळ सामान वापरत असत. पण घरात जे काही सामान होत ते कसबस महिनाभर गेल; पण त्यानंतर काय कराव हे लताबाईना कळेना…पदरात चार पोर आहेत त्या मुलांना तर कस उपाशी ठेवायच. त्या बाळासाहेबांच्याकडे जातात व त्याच्याकडे सामानासाठी पैसे मागतात; पण बाळासाहेब माझ्याकडे पैसे नाहीत म्हणुन सांगतात व तेथुन निघुन जातात.”

“लताबाईंना काय कराव काहीच कळेना मुल शाळेतुन आली; तर त्यांना काय खायला देवु त्याना कस जेवण बणवु त्यांना कळेनाच…त्यांच्या डोळयात पाणी आल त्यांना काही कळेनाच..इतक्यात, ‘शेजारच्या कावेरीबाई तेथे आल्या लताबाई ओ लताबाई त्या बाहेरुनच हाक मारुन लाताबाईना बाहेर बोलवतात’…लताबाई पटकण डोळयातील पाणी पदराला पुसुन बाहेर जातात.”

‘कोवेरीबाई आता बर आलात……लताबाई’

“अहो लताबाई आमच्याकडे आज पुजा आहे त्याच जेवण आहे मुलांना जेवायला पाठवुन दया आणि तुम्ही पण या…..कावेरीबाई”

“कावेरीबाईचे शब्द ऐकुन लताबाईना थोडा दिलासा मिळाला….हो हो कावेरीबाई पाठवुन देईन मुलांना..लताबाई”

“आणि हो फक्त आजच नाही तर ‘पाच दिवस पुजा आहे’ व जेवण पण आहे, पाच दिवसही  मुलांना पाठवुन दया…मी येते मला तयारी करायची आहे कावेरीबाई एवढ सांगुन निघुन जातात…”

“देवालाच दया आली वाटत माझी माझ्या लेकरांची….लताबाई”

“संध्याकाळी मुल शाळेतुन आल्यावर लताबाईनी मुलांना काकुच्यात जेवायला जायच आहे ते सांगितल ते ऐकल्यावर मुलांना पण आनंद होतो तस मुल आपल आवरुन जेवायला जातात.”

“लाताबाई जात कावेरीबाईच्यात जेवायला जात नाहीत. त्या तशाच विचार करत बसुन राहतात.इतक्यात बाळासाहेब जेवायला येतात…’आता लताबाईना प्रश्न पडला आता हयांना काय वाढु’?….बाळासाहेब जेवायला वाढ बोल्यावर घरात काही शिल्लक नाही; त्यामुळे मी जेवण बणवल नाही. एवढ बोलुन त्या बाजुलाच बसुन राहतात. “लताबाई अस बोल्यावर बाळासाहेंबाना राग येतो”; व ते लताबाईना जोरात लाथेने मारतात दुकानातुन उधार आणता येत नाही का तोपर्यत अस बोलतात व बाहेर निघुन जातात. बाहेर जाऊन काही तरी खावुन घेतात. मुल ही जेवुन येतात पण लताबाईच काय त्यांना खायला काहीच नव्हत त्या फक्त पाणी पिवुन झोपी जातात. बघता बघता पाच दिवस असे निघुन जातात..पाच दिवस मुलांच जेवण तर भागल. बाळासाहेब पण जे काय पैसे होते त्याच बाहेर खावुन यायच. पण लताबाई उपाशीच होत्या त्या पाच दिवसात एक दिवस कोवेरीबाई बळजबरीने त्यांना जेवायला घेवुन गेल्या होत्या तेवढच..”

“बाळासाहेब संध्याकाळी चार पाच पिशव्या भरुन सामान आणतात. ते पाहुन लताबाईना आनंद होतो त्यांना वाटल आला नवरा सुधारला वाटत त्याला मुलांची दया आली. त्या कौतुकाने त्यांना सामानाला पैसे कुठुन आणलात.?”

“पैसे काय झाडाला लागल्यात काय …..’काय तुझ्या बापाने दिलय मला सामान आणायला’……उधार घेवुन आलो आहे…एवढ बोलुन बाळासाहेब बाहेर निघुन जातात.”

“किती तर महिने हे असच चालु होत. उधार आणायच आणि घर चालवायच.पण आता दुकारनदार उधारी मागायला घरी येवु लागले…त्यांना काही तरी सांगुन लताबाई शांत करायच्या; व ते दुकानदार जायचे.; पण नंतर नंतर ते दुकानदार सुद्धा उधारी दयायचे बंद केले. परत तसच घरात जेवण बनवायला काहीच नाही. आता काय कराव हेच कळेना. बाळासाहेबांची एक छोटीशी पानपट्टी होती. पानपट्टी तर कसली ओ…आकडा खेळायचा आड्डाच होता तो..लताबाई मन घट्ट करुन पानपट्टीत जातात….बाळासाहेब कलिंगड खात बसले होते. तेवढयात तेथे त्यांचा एक मित्र आला. ते पाहुन तो मित्र म्हणाला. अरे बाळासाहेब तुझी पोर उपाशी आहेत आणि तु इथे एकटा खात बसला आहेस.?”

“कुठली पोर?…..’पोर बिर काही नाही आपल भागल तर जगाच भागल’…..कळल काय……अस बोलुन बाळासाहेब परत कलिंगड खाऊ लागले.”

“हे बोलण ऐकुन लताबाईना खुप वाईट वाटल स्वत:च्या मुलांच्या बद्दल जरा पण प्रेम माया काहीच कस वाटत नाही हया माणसाला अस म्हणुन त्या रडु लागल्या…..बाळासाहेबाच्या मित्राच लक्ष लताबाईंच्याकडे जात त्यांना त्या रडताना दिसतात….ते लताबाईच्याकडे जातात.”

“लताबाई अस रडु नका. अस रडुन काही होणार नाही आता तुम्हालाच खंबीर व्हाव लागेल. तुमच्या मुलांसाठी आता तुम्हालाच बाहेर पडाव लागेल. बाळासाहेबाच्या मित्राच बोलण ऐकुन लताबाईनी; पण विचार केला माझ्या मुलांसाठी मला खंबिर व्हावच लागणार आता अस रडत बसुन काही होणार नाही. त्या तशाच पाठमोऱ्या फिरल्या व दुकानदाराकडे गेल्या दादा हया महिन्या पुरत मला उधार दया मी तुमचे सारे पैसे देईन लताबाई त्यांना गयावया करु लागल्या.”

“ओ लताबाई कस उधार दयायच तुम्हाला सांगा बर? तुमची आधीच वर्षभराची उधारी बाकी आहे. ती तुम्ही आजुन दिला नाहीत. नाही जमणार मला….या तुम्ही..दुकानदार”

“दुकानदाराच बोलण ऐकुन लताबाईचा चेहरा पडला त्या परत माघारी फिरल्या व घरी जाऊ लागल्या….हा सगळा प्रकार गावातील एक वयस्कर व्यक्ती पाहत होता. तो लताबाईच्या मागे जातो व त्यांना आवाज देतो………ये लताबाई थांब जरा”

आपल्याला कोण आवाज देत आहे हे पाहुन लताबाई मागे पाहतात……..दादासाहेब….?दादासाहेब तुम्ही बोलावलत का मला..लताबाई

***

क्रमश:

(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

हा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all