पुनर्भेट...(प्रेमकथा)

दुरावलेले दोन प्रेमवीर नीयतीने पुन्हा जोडले

,सनीने बाॅग भरली खरतर एवढ्या कठिण प्रसंगी आईवडिलांना त्याची सोबत हवी होती पण कर्तव्यात अडकलेला तो मन घट्ट करून जाण्यास तयार झाला इतक्यात आई म्हणाली,"सनी बघ बर बाळा लग्न झाल असतं तर तुझी बायको असती रे सोबत आमच्या ...किती हा कठिण काळ बाहेर ते मृत्युचे थैमान आणि तु असा दुर..मनात नाना विचार येतात रे बाळा "

सनी हसला," आई तुला माहित आहे ना ?मी थांबणार नाही ते ..माझी ड्युटी आहे गं..घेईल मी काळजी व माझे सहकारी मीत्र आहेत ना तुमची काळजी घ्यायला "


बाबांनी हळुच सनीच्या खांद्यावर हात ठेवला "काळजी घे रे बाबा..आम्ही नसू हं तिकडे. "

"हो "बाबा म्हणत त्याने आवरायला घेतलं.

खरतर गाडीच घेऊन जावी लगणार होती..सगळच बंद होत..व उद्या सकाळी जाईंटही व्हावं लागणार होत आँफिसला..


पटापट गाडीत सामान भरलं..आईने टिफिन केला होताच ..आईवडिलांचा नमस्कार करत जड अंतःकरणाने तो निघाला..कोरोनाने कहर माजवला होता..चिंता तर होतीच...पण वडिलांनी धिर दिला...गाडी रस्त्याला लागली सुनसान रस्ता फक्त ठिकठिकाणी पोलिस नजरेस पडत होती ..पशुपक्षी व जनावरांचे आवाज सोडलेत तर काही ऐकूही येत नव्हतं..सायंकाळ झाली सनी रूमवर पोहचला ..आज वाटत होत नोकरी करण किती जोखमीच काम आहे ते...हुशार , तल्लख बुध्दीचा सनीने BHMS केल वडिलांना वाटायच मोठ हाँस्पिटल सुरू कराव ,पण महाशय MD करण्यात व्यस्त झालेत ..आणि मग काय नंतर स्वतःला समाजसेवा व सरकारी नोकरीत झोकून दिलं..वडिलांच स्वप्न ते स्वप्नच राहिलं..

 गोरगरीबांची सेवा करतो ह्याच समाधान आई-वडिलांना होतेच व आजही तसच झालं.. जिल्हात कोरोनाने जोर धरला होता व त्यावर उपाययोजना व तो रोखण्यासाठीच तर तातडीने सनीला बोलवण्यात आलं होतं..भिती व कर्तव्य दोघात अटकला होता सनी.

दमलेला तो फ्रेश झाला आईने दिलेला टाफिन खायला बसणार तोच फोन खणाणला,"सर उद्या आठलाच मिटिंगला हजर रहा.."

"हो नक्किच.."

म्हणत त्याने फोन ठेवला व जेवण करून तो झोपी गेला..

सकाळी आवरून तो मिटिंगला निघाला.सारे राजकिय नेते ,आय पी ,आयुक्त सारेच होते .

मिटिंग संपली तशी ..संदेशने सनीला घरी येण्याचा आग्रह केला,

असचही सारच बंद होत...संदेश नव्यानेच आज ओळख झालेला सहकारी समवयस्क..मस्त टुनिंग जमलं होत दोघांच..


सनी व संदेश संदेशच्या घरी पोहचलेत..संदेशने बायकोला आवाज दिला ..

"दिया.."

सनी जरा बावरलाच ..किती दिवसांनी हा आवाज ऐकला होता त्याने...मनात काही क्षणात अनेक प्रश्नांनी भिडिमार सुरू केला..


"दिया .. आपलीच तर नसेल व असेल तर का आलोत आपण येथे.."मनाशीच संवाद सुरू झालेत..


तशी "आले "हा आवाज आला..सनीची तोवर संदेशच्या वडिलांशी व आईशी ओळख परेड झाली..


इतक्यात पैंजणांचा आवाज आला,दिया पाण्याचा ट्रे घेऊन आली होती..


संदेशने ट्रे हातात घेतला ..


सनीला म्हणाला ,"सर ह्या आमच्या धर्म पत्नी..."


बर्याच वेळ विचारांचा चाललेला कल्लोळ शांत झाला ..समोर दियाच..शब्द भावना सारेच मुके झाले होते....मन म्हणत होत," उठ चल पटकन बाहेर"पण तेही शक्य नव्हतं..


दियाही सनीला बघताच गोंधळली,..


इतक्यात सनीच म्हणाला

"नमस्कार"

तिनेही मान झुकवली,


"दिया हे सचिनसर आजच बदलून आलेत..एकटेच असतात सारच नविन आहे व बाहेर बंद मग म्हटलं चला घरी ..दोन घास खाऊ व सोबतच जाऊ हाँस्पिटलला.."

ती हलकेच हसली ..

संदेशची आई म्हणाली "बर केलं..हात धुवून घ्या देते मी वाढुन.."

दियाने दिर्घ श्वास सोडला कशी बर जाणार होती सनीसमोर..बरं झालं आई वाढायला तयार झाल्यात पण  त्याला बघून हायसही वाटल होत तीला ..डोळे भरून बघता तर आलं होतं...

जेवण झालं व संदेश व सनी दोघेही हाँस्पिटलला निघालीत...सनीच्या नजरेसमोरून दिया जातच नव्हती..किती बदली ही..निळी साडी ती लांबसडक वेणी..तो सोज्वळपणा,ते हलकेच गालावरचे हसू ..तशीच अजुनही फक्त जिन्समध्ये वावणारी साडीत बस.कोणत्याही परिस्थितीला हसत हसत आपलस करणारी त्यांच्याच तर प्रेमात होता तो...


आँफिसला पोहचला ..खरतर खुप दिवसांनी तोही खुलला होता ..तिचे घर माणसे व जीवनसाथी बघून तिच्यासाठी आनंदीही होता..संदेशसारखा समजदार जोडीदार मिळण्यासाठी पात्रच होती दिया ..त्याने स्वतःचीच समजूत काढली..कामात खुपच चोख होता तो पण आज मन काही साथ देत नव्हतं..सगळ आवरून तो रूमवर पोहचला ..आज त्याच्या हदयात पुन्हा घंटी वाजली होती...दिया कुणाचीतरी झाली असली तरी ती आनंदी आहे व डोळ्यासमोर आहे ह्याचा आनंद जास्त होता...

गाणे गुणगुणत त्याने आवरल आईला सांगितल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हताच ..त्याच्या प्रेमाची तीच तर साक्षिदार होती..आईलाही आवडायची दिया पण नशिबाने साथ दिली नाही बस...

त्याने फोन उचलला व आईला फोन लावला ,"आई.."

खरतर त्याचा "आई "हा शब्दच आईला आनंदी असल्याचा पुरावा देऊन गेला..

"काय चिरंजीव खुश दिसतात..?"


"हो आई ..खुपच खुश आहे ओळख बर काय असेल खुशीच कारण .."

"तुझ्यावर आयुक्त खूश झाले असतील "बरोबर ना?"

"काय आईतु पण ..जाऊ दे मीच सांगतो दिया भेटली मला .."


"हो का ?बोलली तुझ्याशी?कशी आहे रे ती ?मजेत ना ?घरचे बरे ना?"


आईच्या प्रश्नांचा भिडिमार सुरू होता तो थांबवत तो म्हणाला ,"आई दियाचे मिस्टर माझ्याच सोबत आहेत व मी फक्त बघितल गं तीला बोलण नाही झालं..संदेश त्याच नाव सकाळी तिकडेच जेवलो छान आहे स्वभावाला .."


"हो का ?बाळा तु आनंदी झालास ठिक आहे पण सांभाळून हं...!! बाईच्या चारित्र्याला तडा जाण्यास वेळ नाही लागत ...तुझीही छान ईमेज आहे आता .."


"हो आई मला कळत गं..."


"म्हणुनच म्हणते तुही जीवनात पुढे जा कि .."


"सोड ना आई आता नको पुन्हा तो विषय चल ठेवतो फोन .."म्हणत त्याने फोन ठेवला ..आज त्याला झोपच येत नव्हती...सारखा दियाचा चेहेरा समोर येत होता ..डोळे मिटले सारा भुतकाळ नजरेसमोर येऊ लागला...दिया होतीच तशी मनात घर करणारी सनीवर जीव ओवाळून टाकणारी ...बारावीपर्यन्त दोघेही सोबत दोघांची मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांच्याही लक्षात आल नाही..सनी होस्टेलला गेला व रंगू लागली हि प्रेमकहिणी...


दिया इंजिनिअरींगची विद्यार्थीनी व हा मेडिकलचा तरीही मने जुळली होती..तासनतास गप्पा व एकमेकांची ओढ वाढत होती..लागुन सुट्टी आली कि दियाच्या ओढीने सनी घरी येतच असे मग हाँटेलिंग फिरण व प्रेमाच्या गोष्टी व भविष्यातलेही डिस्कशन होई .दोघांची जोडी मेड फाँर इच आँदर अशीच ..मित्रमैत्रिणीचा व सनीच्या आईचा फुल सपोर्ट होता दोघांच्याही नात्याला ... BHMS झाल तस दिया लग्नाला फोर्स करू लागली पण सनीला एम डी करायच होत ..त्याचा इतक्या लवकर लग्नाला नकार होता ..पण तिच्याशिवाय जीवन अशक्य असही तो म्हणत असे..

एम डी च आँडमिशन झालं..दिया म्हणाली ,"सनी लग्नानंतर कर ना रे ..मी राहिल काका काकूसोबत..तुला नाही डिस्टर्ब करणार.."


तेव्हा ,सनी म्हणाला,"माझ्या घरचे पण आणि तुझ्या घरचेही होकार देतील का ?आपण दोघेही कमवत नाही सेटल झालो कि करू ना लग्न दिया थोडा धीर धर.."

पण तिला मान्य नव्हतं कारण तिच्या घरचे तयार होणार नाहीत हे तिला ठाऊक होत..


ती ऐके दिवशी म्हणाली"सनी आपण कोर्ट माँरेज करून ठेऊयात का?"


त्याने समजवल ,"दिया आपण सगळ्यांच्या संमतीने लग्न करू फक्त धीर धर ..आणि त्यातच दियाच्या वडिलांनी संदेशशी दियाच लग्न फिक्स केलं..

"दियाने घरी समजवण्याचा प्रयत्न केला पण कोणी ऐकायला तयार नव्हतं..."


"दिया दोन वर्ष थांबण शक्य नाही बेटा रेवाचही लग्न करायच व तुझही वय होतयं समजून घे ..त्यात संदेशसारखं स्थळ मिळणार नाही आणि ते पण नात्यातल ..आपली परिस्थिती समजून घेतील बेटा ते माणस माणुसकीने ओतप्रोत भरलेली माणसं परत येत नाहित बेटा कर विचार .."वडिलांसाठी ती संदेशशी लग्नाला तयार झाली.


खरतर सनीनेच नात्याला संपवल असच तिच म्हणणं होतं..लग्न ठरल कळल्यावर सनीने भेटण्याचा प्रयत्न केला पण दियाने सतत टाळलं व लग्न करून संदेशसोबत संसार थाटला .तिला पर्याय नव्हताच..पण सनी दियाला विसरू शकत नव्हता म्हणुन दुसरीचा विचारही करू शकत नव्हता म्हणुन तर आज तीन वर्ष होऊनही तो अविवाहित होता..


दियासोबतचे रंगवलेले क्षण आठवत तो झोपी गेला...आता संदेशच्या बोलण्यातुन त्याला दियाची खुशाली कळत होती पण तिच्या संसारात तिला डिस्टर्ब करायच नाही व संदेशपासून दुरी बाळगायची त्याने ठरवलं ,अशीही कामात जास्त धावपळ होतीच..काम वाढल होत कोरोना अटोक्यात येत नव्हता परिस्थिती हाताबाहेर जात होती ..आणि त्यातच एके दिवशी संदेशची तब्बेत बिघडली.काळजी घेऊनही तो पाँझिटिव्ह झाला आणि आँडमिट करण्याची वेळ आली..


संदेश एकुलता एक आईवडिलांना धीर देणार कुणी नाही ..मग काय मोठ्या मनाने सनीनेच जबाबदारी घेतली ..,"दिया काही काळजी करू नकोस मी संदेशला सहिसलामत परत आणतो" असे वचन देत तो संदेशवर उपचार करत होता ..पण उपचार त्यावर फोल ठरत होते..अखेरीस पंधरा दिवसाच्या प्रयत्नांती संदेशची प्राणज्योत मावळली...


आईवडिल तर खचले होतेच पण दियाही पुरती खचली होती माणुसकी नात्याने तिची व त्यांची काळजी सनी घेत होता पण एक अंतर ठेवूनच..

दियाची परिस्थिती त्याला बघवत नव्हती ..हसरी खेळती दिया आता संदेशच्या जाण्याने कोमजली होती..आता पुन्हा दोघांची जवळीक वाढली होती ती मैत्री म्हणुनच...संदेशचे आईवडिल सुशिक्षित व नवमतवादी ..सनीचे वागणे व स्वभावाच्या ते प्रेमात पडले होते..काही काळातच सनीने त्यांना आपलस केल होत सोबत कठिण काळात सनीने त्यांना आधारही दिला होता....दिवस जात होते घर सावरत होतं..सनीला दियाला मदत करायची होती ..पण एक मित्र म्हणून कारण सासू सासर्यांची जबाबदारी तिच्यावर होती .


ऐके दिवशी दियाच्या सासर्यांचा फोन आला व सनीला भेटायला बोलवलं..,असही सनी जातच होता मदतीला पण आज त्यांच्या बोलण्याचा सुर वेगळाच होता..


सनीचा हात हातात घेत ते म्हणाले,"सनी दियाशी लग्न करशिल?"


दोन क्षण सनीला समजलच नाही ..आनंद व शहारे दोघांनी शरिरावर राज्य केलं..


मन तर कधीच होकार देऊन मोकळ झाल होत फक्त शब्द ओठांवर यायचे बाकी होते..


"काका अहो ...काय बोलता तुम्ही अजुन संदेशला काहीच दिवस झालेत आणि ..."


"बेटा कळतंय मला ते पण  दियासाठी तिच्या सुखासाठी...तिच्या पदरात काही असत तर एकवेळ विचार केला असता पण आज मीच तर तिचा बाप आहे तिच्या सुखाचाच मी विचार करतो...सनीला वाचवण हातात नव्हतं तसं त्याला पुन्हा वापस आणणही शक्य नाही दियाच भविष्य घडवण्याचे पुण्य माझ्या हातात आहे ..करशिल लग्न..?"


"काका दियाला मान्य असेल तर मलाही काही हरकत नाही फक्त तिचा होकार माझ्यासाठी महत्वाचा आहे..बाकी मी बघुन घेतो.."


सनीच्या मनाने दिया सोडुन कोणाचा विचार केलेला नव्हताच कधी पण नियतीने पुन्हा एकत्र आणलं होत दोघांना..दियानेही होकार दिला ..


दोघांचेही दोघांच्या संमतीने व सर्वांच्या अशिर्वादाने आनंदात लग्न पार पडले ..दोन सच्चे मित्र व प्रेमवीर पुन्हा एकदा ह्या वळणावर एकत्र आले व एकमेकांचा आधार झालेत..दोन प्रेमवीरांची ही भेट विधीलिखितच असावी नाही का ??नाहीतर नियतीने दोघा समोरासमोर थोडीच आणल असतं...


काय वाटत तुम्हाला काँमेंट मध्ये जरूर कळवा ..


धन्यवाद..