हे स्त्री तैयार हो

हे स्त्री तैयार हो
हे स्त्री तैयार हो

अबला नारी म्हणूनी , खेळ मांडला सारा हो
पेटूनी उठूदे असा , रखरखता अंगारा हो

वार कराया हाताने , तु कट्याराची धार हो
तीक्ष्ण नजर ठेवाया , जणू आभाळातील घार हो

बांधू नको स्वप्नांना , बेभान असा ध्यास हो
अडकू नको बंधनात , मोकळा असा श्वास हो

बेछूट सुटलेला असा , धनुष्यातील बाण हो
दु:ख धरुनी बसू नको , आनंदाची जाण हो

कागदावर उमटवलेल्या , लेखणीतून व्यक्त हो
स्वार्थीपणाच्या घुसमटलेल्या , विळख्यातुन तु मुक्त हो

आकाशी विहार कराया , पक्षासम तु पतंग हो
बिंधास्त मुक्त फिराया , मर्दानी तु दबंग हो

बुरसटलेल्या विचारांवर , उठुनी आता स्वार हो
हे स्त्री भीऊ नको चल , उठ आता तरी तैयार हो ...
आता तरी तैयार हो ... !!!