हे नाते जन्मांतरीचे.(भाग 13)

प्रस्तुत प्रेम कथेच्या भागात मधुच्या प्रेमाच्या संघर्ष दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. एका विधवा असणाऱ्या स्त्रीला कोणत्या परिस्थितीतून जावे लागते हे ह्या भागात दाखवले आहे.


#प्रेमकथा (भाग 13)
"कमलाsss जा मधुलातिच्या रूम मध्ये नेऊन सोड...!" वसुंधरा हळूच कमलाला म्हणाली.
" हो बाईसाहेब... छोट्या मालकिणसाहेब चला... ", मी तुम्हाला तुमची खोली दाखवते.
कमला एका रूममध्ये घेऊन गेल्यावर तिकडे एक वेगळा सुगंध पसरला होता वाटतं होते,नुकतेच कोणी तरी रूम फ्रेशनर मारले असावे. पण तसें नव्हते त्या रूममध्ये एका पितळी भांड्यामध्ये  पाण्यात मोगऱ्यांची फुले ठेवली होती. समोरच मोठा आरसा ठेवलेला होता. त्या सुगंधाने मधुला खुप छान वाटलं.
" आज पासून ही तुमची खोली असणार आहे बरं का छोट्या मालकिणबाई... ", मधुनी फक्त मान हलवली, कमला खोली दाखवून निघून गेली,मधुने चारही बाजूंना नजर फिरवली... त्या बेडरूममध्ये मधु पहिल्यांदाच आली होती. बेडरूमच्या भिंतीवर आर्यनची लहानपणीची फोटो लावलेली होती.
"मधु.. अगं हे काय पाहत बसलीस हे तर तुला रोजचं दिसणार आहे आता"
हसत आर्यनने मधुला अलगत मिठीत घेतलं.
"हे काय आर्यन... कुणी येईल आणि आपल्याला असं पाहिलं म्हणजे काय म्हणेलं... सोडा पाहू!!" (लाजत लाजत मधु आर्यनच्या मिठीतुन दूर गेली.
"अगं वरच्या खोलीत कुणीच नाही येणार आणि असेही घरात कुणी नाही दिसलं मला...!"
"कुठे गेलेत सर्व..?"(मधुने विचारलं )
" नो आयडिया... असतील की खालच्या मजल्यावर  कुठे तरी. पाठवू का त्यांना.(आर्यन मस्करी करत म्हणाला )
"नको नको... कशाला पाठवतात"
मी जरा खाली जाऊन येतो. तु कर जरावेळ आराम...
"हम्म...!!"मधु जरा हसली आणि म्हणाली.
"बरं पण लवकर या"
तो तर निघून गेला तेवढ्यात तिचं लक्ष बेडकडे गेले. बेडवर  गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. ती बेडवर जाऊन बसली.
थोड्या वेळाकरीता ती स्वतःचे भान हरवून गेली होती . गालातचं स्मित हास्य करून लागली. अचानक खोलीचा दरवाजा बंद करण्याचा आवाज आला तिने मागे वळून बघितले तर आर्यन आलेला होता. थोड्या वेळातच वरती येतो सांगून गेला आर्यन आता आला होता त्याला पाहून ती आनंदित झाली, उभी रहात पटकन त्याच्या जवळ जाऊन त्याला बिलगली.
"सॉरी गं जरा वेळचं झाला बघ परत यायला...!"
पण तिला असं वाटलं की आत्ताच तर गेला होता मग, हा असं का म्हणून बोलतो आहे की उशीर झाला म्हणून...
ती विचारात एवढी मग्न होती की तिला एवढा वेळ कुठे गेला हेच समजले नव्हते.
असेच दिवसा मागून दिवस निघत होते. एके दिवशी आप्पासाहेब शेताच्या कामासाठी तालुक्याला गेले असतांना. वसुंधरने चांगला मोका साधला. ती मुद्दाम  आर्यनजवळ येऊन त्याला सांगू लागली. तेव्हा जवळ मधु  नव्हती.
"आर्यन sss  आज आप्पासाहेब  तालुक्याला गेले आहेत. त्यांनी तुम्हांला शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी सोडायला सांगितलं आहे. तेवढं कराल ना तुम्ही...?"
शेतात गहू चांगला बहरला आहे असे सांगत होते ते...
"हो, जातो मी गव्हाच्या पिकाला पाणी सोडायला!"
असं म्हणतं आर्यन शेताकडे निघाला, वाऱ्यावर गव्हाचे पीक डोलत होते. रब्बी हंगामातला तो गहू मोसमात आला होता.
इकडे वसुंधरणे आर्यनला एकटे शेतात पाठवून त्यांच्या पाठोपाठ  दोन बलदंड  माणसांना पाठवले. वसुंधराच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी विहिरीवरली मोटर बंद करून ठेवली होती.
आर्यन विहिरीवर येऊन पोहोचला तसं त्याला जाणवलं की मोटर पाणी घेत नाही हे म्हणून, त्याने सर्व परीने उपाय केले शेवटी शेतातल्या भल्या मोठ्या विहिरीवर येऊन तो जरा डोकावून पाहू लागला तोच मागून त्याला कुणी जोरदार धक्का दिला.
तसा तो पाण्यात जाऊन पडला, त्याला पाण्यात पोहणे फारसे जमत नव्हते आणि तो बऱ्यापैकी  खोल पाण्यात  जाऊन बुडाला होता. वर कुणी मदत करणारे ही जवळपास दिसत नव्हते. असेच तीन तास होऊन गेले म्हणून मधुचं मन अस्वस्थ झालं. कुठे गेला असेलआर्यन..? अजून का नाही आला म्हणून ती आपल्या बैठक  खोलीतुन बाहेर आली तशी तिला कमला दिसली.
मधुने कमलाला जाऊन विचारलं.
कमलाने छोट्या मालकीणबाई सोबत आर्यनला बोलतांना पाहिलं होत म्हणून तिने मधुला सांगितलं की  मालकीणबाईन सोबत आर्यन बाबाला बोलतांना बघितलं होत. त्यानंतर ते घरी आलेच नाही.
मधु धावपळ करत वसुंधरेजवळ आली त्यांना विचारू लागली. तिही पटकन सांगत नव्हती. तेवढ्यात आप्पासाहेब दारात आले त्यांना पाहून मधु त्यांच्याकडे धावली. तेवढ्यात वसुंधरा जरा नाटक करतच बोलली  की आर्यन शेतात जातो म्हणून गेलेले एवढं आठवत आहे मला फक्त...
आप्पासाहेबांना ही आता काळजी वाटून राहिली होती. तीन तास होऊन गेले तरी आर्यन अजून घरी आलेला नाही म्हणजे नक्कीच काय झाले असावे त्याच्या सोबत ह्याच विचारता ते मग्न झाले.
आप्पासाहेब शेतातल्या मजुरांना सोबत घेऊन आले होते. शेताच्या चैफेर बाजूना मजूर आर्यनला हाक मारत होते. पण त्याचा काही पत्ता नव्हता.शेवटी आप्पासाहेब शेतातल्या मोठ्या विहिरीवर  आले त्यांनी आत डोकावून पाहिले असतात. त्यांना आर्यन विहिरीत पडलेला दिसला. त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता.  हे बघून त्यांना चक्कर आल्या सारखे झाले. तेवढ्यात काही मजूर आले त्यांनी आर्यनला विहिरीतून बाहेर काढले असतात समजले की. आर्यन आता ह्या जगात नाही राहिला म्हणून. हे ऐकल्यावर मधुचे आयुष्य एका क्षणात नर्क बनून गेले हॊते. नेमके लक्ष्मीपूजन होते त्या दिवशी आणि हे असे हाऊन बसले , ह्या गोष्टीला दिवस उलटून गेले होते. मधु तशीच उदास एकटी बसून रहायची. आता तिला तिच्या घरीही जाता येत नव्हते. कारण पडून जाऊन लग्न केलेले म्हटल्यावर घरचेही दारात उभे करणार नाही हे तिला चांगलेच माहीती झाले होते.
आता आपले आहे, नाही ते फक्त सासरचे असे समजून तिने  आपल्या पतीची विधवा पत्नी बनवूनचं रहायचं मनाशी  ठरवलं होतं.
घरात फारसे तिच्याशी  कुणी बोलणारे नव्हते. वसुंधरा आप्पासाहेबांना नेहमीच काहींना काही भरवत रहायची की ही मुलगी आपल्या मुलासाठी अशुभ होती म्हणून, नेहमीच तिच्या विरोधात बोलणे.
आप्पासाहेब घरी नसले की वसुंधरा मधुचा छळ  करत असायची तिला वाटेल तसें अपशकून म्हणून हीनवायची. कधी तिला पांढऱ्या पायाची घरात आली आणि आपल्याच पतीच्या मृत्युला कारण झाली असं म्हणून त्रास देत असायची. पण मधुची ती मजबुरीचं बनून गेली होती. वसुंधरा बोलेल ते एका कानाने ऐकायचं दुसऱ्याने सोडून द्यायचं असं तिचं झालं होत.
असेच दिवसामागून दिवस निघत होते. दोन वर्ष उलटून गेली होती. ह्या घटनेला


(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा.मधुची ह्या वाड्यातून लवकर सुटका होईल की नाही? की तिला असेचं आयुष्य जगावे लागेल..? की कुणी येऊन घेऊन जाईल आपल्या सोबत कायमचं...?)

कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

🎭 Series Post

View all