हे नाते जन्मांतरीचे.(भाग10)

आर्यन आणि मधुच्या प्रेमाचा प्रवास आता वेगळ्याच वळणावर जातो आहे. कथेच्या पुढील भागात काय होते हे बघण्यासाठी वाचत रहा ही कथा.


#प्रेमकथा (भाग 10)
आजच्या पावसाने वातावरण धुसर झाले होते. खुर्चीवर बसल्या बसल्या अवस्थेत त्याचे कंटाळून डोळे जड झाले होते.
तेवढ्यात कमला काकू (वाड्यात काम करणारी मोलकरीण बाई.) धावतपळ करत त्याच्यापाशी आली.
तिला धाप लागतं होती. तोंडून शब्द फुटत नव्हते, तो खिडकीजवळ असलेल्या खुर्चीमध्ये बसून पाऊसाला निहारत होतो. त्याच तिच्याकडे अचानक लक्ष गेलं. धाप लागल्या सारखी ती बोलू लागली.
"आर्यनबाबा....बाईसाहेबांची तब्यत जरा जास्तच खालवली आहे...त्या मगापासून बऱ्या होत्या पण आता त्यांची तब्यत बरी नाही...आणि आप्पासाहेब पण आज घरी नाहीत!"
अचानक आईची तब्यत खराब झाली हे एकताचं तो ही खाली धावला...घरात  कुणी नव्हते अख्खा वाडा सुमसाम पडलेला होता. त्याला त्या क्षणाला काही सुचेनासे झाले आप्पासाहेब शेताच्या कामासाठी तालुक्याला गेले होते. हल्ली यांची वरचेवर तालुक्याच्या गावी काहीतरी कामे निघत असायचे घरी येणे सुद्धा ते टाळत असतं.
त्यावेळेस त्याला फारसे काही सुचले नाही त्यामुळे त्याने तिला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे ठरवले. बाहेर पावसाला सुरवात झाली होती. तो छत्रीमध्ये आईला घेऊन बस स्टॅन्डवर आला,
तेवढ्यात तालुक्याला जाणारी बस ही येतांना दिसली जशी तशी जागा करत ते दोघी बसले ,आई त्याच्या खांद्यावर विसावली होती.ती तापाने अगदी फनफनात झाली होती, आज त्याच्या आईसाठी हॉस्पिटलची शेवटची अपाॅयमेंट होती.
एस.टी तल्या इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्याने आईचे दोन्ही हात हातात घट्ट पकडून ठेवले होते. मधेच जाग येऊन आई शेजारच्या प्रवाशांला मोठ्याने ओरडेल, चिडेल ह्या भीतीपोटी,आर्यन आईला काहीतरी बोलून तिची समजूत घालत परत परत खांद्यावर झोपायला सांगत होता. आता त्याचा खांदा जड झाला होता. कसेबसे थोडे अंतर काढावे म्हणून शांत बसून होता, एसटीतील सगळेच प्रवसी आर्यनच्या वागण्याकडे तिरप्या नजरेने बघत असल्याने त्याला लाजिरवाणे वाटत होते.
त्याच्या आईला कॅन्सर झालेला होता. गेल्या एक वर्षांपासून त्या आजाराशी झुंजत होत्या.त्यामुळे मनाने त्या चिडक्या झाल्या होत्या.
दिवसेंदिवस त्यानंची तब्यत खालावत चालली होती.
आर्यनच्या आईचे आता हातचे काम सुटले होते. एवढा मोठा वाडा सांभाळायचा म्हटला तरी सुद्धा घरात एका बाईची गरज होती. शेवटी बाई शिवाय घराला घरपण नसतेc म्हणतात ते अगदीच खरे होते, त्यामुळे आप्पासाहेबांनी नवीन लग्न केले ते पण आर्यनपेक्षा काहीच वर्ष मोठ्या वसुंधरा सोबत. पण काही केल्या आर्यन तिला आई मानायला तयार नव्हता. घरातील कुटुंबीयांच्या हट्टापायी अप्पासाहेबांनी हे दुसरे लग्न केले होते. आपल्या मुलाला आईचे सुख मिळावे यासाठी त्यांची खटपट होती. आप्पासाहेबाच्या ह्या दुसऱ्या लग्नामुळे आर्यनचे मन जरा दुखावलेच होते पण अजून करणार तरी काय..? आप्पासाहेबांना नेहमी वाटायचं की वसुंधरा आणि आर्यन, मायलेकरांमध्ये मैत्री होईल आणि थोड्या दिवसात त्याच्या आईचे काही झाले तर त्याला सावरायला कुणी जवळ राहिले तर त्याला त्याचे जास्त वाईट वाटणार नाही आणि तो लवकरच त्यातून बाहेर येईल. वसुंधरा आर्यनला व्यवस्थित सांभाळेल असे आप्पासाहेबांना वाटत होत. पण त्यांना एक समजून होते. की आपल्या ह्या निर्णयावर आर्यन जरा नाराजच होता असं...
हळू हळू तेही आता आपल्या मुलापासून दुरावतांना आर्यनच्या आईला दिसत होते. माझ्या गेल्या नंतर माझ्या मुलाचे काय होईल, ह्याच विचारात त्या नेहमी असायच्या. त्या नेहमीचं वसुंधरेला बोलावून सांगत, माझ्या गेल्यानंतर माझ्या मुलाला आईची माया दे म्हणून....
पण आर्यन वसुंधरेला आई म्हणून हाक मारायला तयार नव्हता. त्याच्या तोंडून तिच्यासाठी \"आई\" हा शब्द कधी निघालाचं नाही.
थोड्याच दिवसांनी त्या वाड्यात शांतता पसरली ह्या वेळेस आर्यनच्या आईने कायमचे डोळे मिटले होते. आर्यन एकटाचं पडला होता. घरात सारखा एकटा बसायचा जास्त कुणाशी  बोलणे नाही काही नाही, त्यातच थोड्या दिवसांनी वसुंधरा पोटाने (गर्भवती ) होती, हे बघून तर त्याला घरची आणखीनच चिड वाटायला लागली होती.घरचे हे असे वातावरण त्याला आता असह्य वाटू लागलं होत, शिक्षणा करीता आप्पासाहेबांनी आर्यनला पुण्याच्या भगवती  कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिले होते. निदान घरा पासून दूर राहून तरी निवांतात तो जगू शकेल आणि थोड्या दिवसात हे सारे विसरून परत नव्याने घरची ओढ लागेल म्हणून त्यांची खटपट सुरु होती.
आर्यनला घरची आठवण आलीच नाही पण आता तरी घरी जायचे नाहीअसा मनाशी विचार करून त्याने घरातून पाय काढता घेतला होता.सलग दोन वर्ष निघून गेली होती. तो कॉलेजजीवनात बराच मग्न झाला होता. अधून मधून आप्पसाहेबांचा फोन येत असायचा पण त्यांच्याशी ही फार काही बोलण व्हायचं नाही. आज तर घरून चक्क कमला काकूने कॉल केला होता. त्यामुळे त्याला घरी जाणे भाग झाले. नक्कीच काही तरी बिनसले असावे. ह्या भीतीने त्याने लगबगीने  आपली बॅग भरली आणि मिळेल त्या बसने घरचा रस्ता पकडला होता.
घरी आल्यावर समजले की आप्पासाहेबांची तब्यत काही दिवसापासून बिघडली आहे. शेवटी वडील होते त्याचे, काहीही झाले तरी....
वसुंधरा त्यांच्या जवळ बेडवर बसून पाय चेपत बसली होती. दोन वर्षाचे एक बाळ (राम )आर्यनचा सावत्र भाऊ वाड्याच्या ओसरीवर एकटाच खेळत होता. आप्पाची अशी तब्यत बघून आर्यनच्या डोळ्यात पाणी आले इतक्या दिवसांनी त्याने अप्पासाहेबांना गच्चमिठी मारली होती. तसें आप्पाच्याही डोळ्यातं पाणी आले होते. पहिल्यांदाच त्याने वसुंधरेला आई म्हणून हाक मारली होती. हे बघून आप्पांना ही बरे वाटले होते.
असेच दिवसामागे दिवस निघत होते.आर्यन मागच्या गोष्टी हळू हळू विसरत चालला होता. तो आता बऱ्यापैकी त्या घरात एकजीव झाला होता तोच त्याला परत मधुची आठवण झाली. तिला परत एकदा कॉल करावा आणि समजावून सांगावे म्हणून त्याचा प्रयत्न चाललेला होता.
मधुला कॉल करण्यासाठी आर्यन वाड्याच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बैठकीच्या खोलीतील खिडकीत येऊन बसला. त्याने झाला गेला तो सारा प्रकार मधुला सविस्तर संगितलं. मधुला ही आता त्याचे म्हणने पटले होते. थोड्याच दिवसात मी तुझ्यासोबत लग्न करून तुला घरी  आणेल हे आश्वासन ही त्याने तिला दिले होते.

(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा.आर्यन मधुला खरचं लग्न करून घरी आणेल का..?)

कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा




 

🎭 Series Post

View all