हे नाते जन्मांतरीचे.(भाग 9)

आर्यन आणि मधुची प्रेम कहाणी कुठपर्यंत चालेल की आर्यन मधुला सोडून असचं गावी निघून जाईल.. हे ह्या कथेच्या भागात दाखवण्याचा पर्यंत केला आहे.
#प्रेमकथा (भाग 9)
आज त्यांचा कॉलेजचा शेवटचा दिवस आणि त्यांची शेवटची भेट होती. आज काय ते त्याला सांगून टाकायचं ठरलं होत. मधुच्या डोक्यात विचार चाललेला होता.
"नक्कीच काही तरी बिनसलय त्याचं. गेले तीन चार दिवस झाले रोज ती त्याला काहीतरी विचारलं तर तो तिला टाळत होता. आज परत ती केव्हा पासून त्याची वाट बघत बसली , पण त्याचा अजुनपर्यंत काहीचं पत्ता नव्हता. शेवटी वैतागून ठरवलं की आज त्याच्या रूमवर जायचचं, अगदी जायचं म्हणजे जायचं आणि त्याच्याशी बोलून कायमचा संबंध तोडायचा.
आज बरोबर त्यांच्या \"रिलेशनशीप\"ला बघता बघता दोन वर्ष पूर्ण होणार होती म्हणून काॅलेज पलीकडच्याचं बागेत भेटायचंही दोघांच ठरलं होत. पण तेही राहीलच आणि चौपटीवरची भेटही राहिली.
आर्यनने आज तर मधुच्या आवडीचा लाल रंगाचा  टाॅप आधीच घेऊन ठेवलेला. आज तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आणि तिच्या सोबत लग्न करायचे असे त्याने मनापासून ठरवले होते, त्याने सांगितलेल्या वेळात मधु बागेत येऊ पोहचली पण आर्यनचा काही कुठे पत्ता दिसत नव्हता.
बराच वेळ गेल्यावर शेवटी वैतागून तिने आपल्या पर्समधील  मोबाईल काढल. त्याला चांगलेच फोन वर खडसवावे म्हणून तिने त्याला कॉल केला पण कॉल ही लागत नव्हता. शेवटी ती दुपारी घरी गेली. नंतर तिलाच वाटलं की तो नेहमी प्रमाणे काही तरी सरप्राईज  देणार म्हणून ती नकडत त्याची वाटत बघण्यासाठी समुद्रचौपाटीवर  येऊन  बसली होती. तिच्या लक्षात आले होते की आता त्याची वाट बघण्यात काहीचं अर्थ नाही. अगदीच निराश होऊन तिने घरची वाट धरली.शेवटचा निर्णय घेण्या अगोदर  परत एकदा का होईना त्याला कॉल करावा, असा विचार क्षणभर तिच्या डोक्यात फिरून गेला. परत तिने त्याला कॉल केला आता मात्र रिंग जात होती.
"हॅलो...आर्यन..!"
" कुठे आहेस तू...? आणि किती वेळ झाला..? तुला समजत नाही का...?निदान आज तरी मला भांडण नको करायला लावू... मी अजिबात त्या मूडमध्ये नाही हे..?"मधुच्या क्षणभराततल्या एवढ्या प्रश्नांनी  आर्यनला दडपण आले पण तो शांतच राहीला.
"मधु...साॅरी अगं, अचानक घरून फोन आला आणि मला गावी घरी यावं लागलं, मी तुला सांगून यायला हवं होतं. पण ह्या साऱ्या गडबडीत डोक्यात राहीलचं नाही  बघ..!!"
मधुने त्याचे बोलणे ऐकले तशी ती अति संतप्त  झाली.
आर्यनच बोलणं पूर्ण होण्याआधीच मधुने त्याचा फोन कट केला.
आर्यनने बराच वेळ तिला कॉल ट्राय केला पण मधुने  मात्र त्याचा काॅल रिसिव्ह केलाच नाही.
*******
दोघांचा हा दोन वर्षांचा प्रवास आणि शेवटच्या मिनीटा पर्यंतचा फोनवरचा तो संवाद आर्यनला झरझर आठवून गेला. खिडकीतला वारा आता बराच थंड झाला होता.अचानक वाऱ्याची मंद झुळूक अंगावर येताचं आर्यन भानावर आला. एस.टी. भर वेगात असतांना आपण या आठवणीत रमून गेल्याच त्याला स्वतःवरच हसू आले. मनात भीतीही वाटत होती की तिला काय वाटलं असेल ती गैरसमज तर नाही करून घेणार ना...?
मधुचा अजून पर्यंत फोन का आला नाही...? हा प्रश्न बराच वेळ आर्यनच्या मनात डोकावून गेला, पण त्यावर विचार करायच्या आतच एस.टी. ने वेग पकडला.
आर्यनला खिळकीजवळची सीट भेटली होती. मधुच्या विचाराने त्याचा जीव कसाही करू लागला होता. डोके गरगरून निघत होते. जीवाला गुदमरल्या सारखे जाणवत होते,  म्हणून त्याने खिडकी उघडली खरी पण गाडीच्या वेगा बरोबर दोन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग त्याच्या समोर येऊन उभा राहिला. गाडी सुसाट पुढे धावत होती आर्यन मात्र चाकासारखा मागच्या आठवणीत रेंगाळू लागला होता. तो क्षण होताच तसा कधीच विसरता न येणारा...
********
तीन वर्ष्यापूर्वीची ही घटना....
सज्जनगड येथील आमचा वाडा शेताला लागूनच आहे.गाव जरी लहान पण वाडा  चिरेबंदी होता अगदी एखाद्या कादंबरीत वाचलेल्या वाड्यासारखाच चारही बाजूने उंच उंच चिरांच्या भिंतींनी वेढलेला! प्रवेशद्वाराला भला मोठा नक्षीदार लोखंडी दरवाजा आत शिरतानाच समोर सुंदर तुळशी वृंदावन चारही बाजूंनी  रांगोळीने सजविलेलं..! घरात  शिरण्या अगोदर आधी  ओसरी, चारही बाजूंना नक्षीदार सागवन खांबांनी आणि महिरपींनी वेढलेली!वाड्याला लागूनच समोरच्याबाजूस रस्ता आहे. वाड्याच्या वरच्या मजल्यावर पंधरा वीस माणसे बसू शकतील अशी बैठकीची खोली होती. खास बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी बैठक खोली, त्या खोलीत बैठकीसाठी दोन गाद्या खाली टाकल्या. त्यावर पांढराशुभ्रम मलमलच्या कपड्यांचा अभ्रानी  व्यवस्थित अच्छादन केलेली, तकीये आणि लोड ठेवलेले. एका बाजूस भला मोठा लोखंडी पाळणा, गाद्या समोर मोठी सतरंजी अंथरलेली. बैठकीच्या समोर कौलारू छप्पर असलेल्या, पण दोन बाजूंनी भिंती नसलेल्या भागाला आम्ही छपरी म्हणायचो. तिचे तोंड शेताकडे होते बाजूलाच लागून नारळाची मोठी मोठी झाडें.ओसरीच्या चारही बाजूनी रंगीबेरंगी चाफ्याची झाडें आजूबाजूला उंच उंच अशोकाची सिताफळची, चिकूची झाडे. घरात शिरताच बसण्यासाठी सागवान सोफे आणि खुर्च्या, उजव्या बाजूला वर चढणारा जिना वरती चार खोल्या खाली जिन्याच्या बाजूने देवघर  देवघरात मोठे सागवान मंदिर त्यात श्री कृष्ण भगवान विरजमान...!स्वयंपाक घर अगदी तांब्या पितळाच्या भांड्यांनी सजलेले.
आलिशान वाड्याचं हे सौंदर्यच तिथल्या इनामदाराची  श्रीमंती असल्याची प्रचिती देणारे, बायका पोरी नेहमी नऊवारी साडी घातलेल्या असायच्या.
********
तेव्हाश्रवणमहिन्याला नुकतीच सुरवात झालेली होती, असचं एक दिवस....
श्रावणसरींनी सकाळपासूनचं बरसणे सुरू केले होते. आकाशात काळ्या मेघांचे पुंजके, कासेमध्ये दूध जमा व्हावे तसे आकाशात ढग जमा झालेले होते. पान्हा दाटलेल्या सहस्रावधी स्तनाग्रातून दुग्धधारा फुटाव्यात तशा श्रावणधारा धरतीवर बरसत होत्या.
मनातील श्रावणातील गाणी अलगद ओठावर येऊन पुन्हा पुन्हा मनातचं गायली जात होती. बैठकीच्या छपरीत बसून मी जलधारांच्या कथ्थक नृत्याचा, दृतलयीतील तरांना अनुभवत होतो. विविध पानांवर टपटपणारे पावसाचे टपोर थेंब तबल्यासारखी साथ संगत करीत होते, थडथडणार्‍या वीजेच्या टिपक्यानंचा, ढगांच्या नगार्‍यावर आदळून होणारा घनगंभीर निनाद स्वर सारा आसम धरतीला हादरवून टाकत होता. मंत्रमुग्ध होवून सारे डोळ्यात आणि कानात मी साठवत होतो.
आजच्या पावसाने वातावरण धुसर झाले होते. खुर्चीवर बसल्या बसल्या अवस्थेत कंटाळून डोळे जड झाले होते.


(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा. नेमके काय घडले असेल असे आर्यनच्या आयुष्यात की त्याला गावी जाणे भाग पडले तेही मधुला न सांगता..? आणि त्या दोन वर्ष्याअगोदर  असे काय घडले असेल की त्यांला ते आठवते आहे...? )

कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा


🎭 Series Post

View all