हे नाते जन्मांतरीचे.(भाग 7)

मधु आणि आर्यनच्या प्रेमाची कहाणी नव्याने प्रवास करू लागली आहे. कुठवर हे प्रेम तिकडून राहिलं की वेळ आल्यावर जागेवरच त्यांचा प्रवास थांबले.

#प्रेमकथा (भाग 7)

मागितलं भागात बघितलं की आर्यन आणि मधुचे एकमेकांनावर प्रेम होऊन जाते. त्या नंतरचे त्यांचे जीवन अगदी मजेत चाललेलं असतं.

सुट्टीचा दिवस आला की ते दोघी समुद्रचौपाटीवर आपला दिवस घालवत बसायचे.

आज मात्र मधु सायलीला आपल्या सोबत घेऊन आली होती, त्या दोघीही समुद्र किनाऱ्याच्या दिशेने धावत होत्या,मनसोक्त मजा घेत होत्या, सायली मधुच्या मागे धावत होती, मधेच मधु सायलीचा हात धरून समुद्राच्या दिशेने घेऊन जात होती. लाटांचे पाणी मुठीत घेऊन  एकमेकींच्या अंगावर उडवत होत्या, आता मात्र मधुची आणि आर्यनची रोजची जागा होती त्या ठिकाणी  सायली आणि मधु येऊन बसल्या गप्पा मारता मारता विषय प्रीतीचा निघाला मग आर्यनचा, तोच मधुला आठवण आली की आर्यन अजून पर्यत का नाही आला, असाच अर्धा तास उलटून गेला. पण त्याचा काही पत्ता नव्हता.पण तिने सायली समोर आपला राग दाखवला नाही, तिचा सारा उत्साह आता रागात बदलत चालला होता. मधु समुद्राच्या लाटांकडे बघू लागली. मनात नाना प्रकारचे प्रश्न घर करू लागले होते, काही झाले तर नसेल ना... का नाही आला अजून... की विसरला असेल...?की मुद्दामचं नसेल आला....

खवळलेल्या त्या लाटा जणू तिला वाकवल्या दाखवत होत्या. तिची हार झाल्याचे तिला भासवत  होत्या. हळूहळू सगळीकडे शांततेच वातावरण झाले. चंद्राचा सूर्यप्रकाश समुद्राच्या पाण्यात पडू लागला, आकाशातील चांदणे चंद्रामुळे लखलखीत करीत होते, मधु भानावर आली आणि हातात चौपाटीवर पडलेली वाळू घेऊन पाण्यात फेकू लागली.

सायली मधुला समजवत होती की, आता खुपच अंधार झाला आहे घरी जायला पाहिजे असे एकट्याने बसने नाही चांगले.

" मधु, अगं नाही येणार तो नको त्याची वाट बघू चल घरी जाऊ, ह्या विषयावर आपण घरी जाऊन निवांत बोलूया... मग तर झाले..!"(मधु मात्र सायलीच एक ऐकायला तयार नव्हती. नाराजीच्या स्वरातचं ती बोलत होती.)

" नको गं, आपण इकडून गेलो आणि मग तो इकडे यायचा अस नको गं व्हायला, मी जरा वेळ वाट बघते, वाटल्यास तू जा घरी!"

मधु मात्र ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती. शेवटी सायली तेथून निघून गेली.

आज तिला राग अनावर झाला होता. काहीही न बोलताच तिने घराचा मार्ग धरावा, तेवढ्यात एक विचार मनात  डोकावून गेला. गेल्या एका तासापासून ती आर्यनची वाट बघत एकटीच बसली होती. आर्यन आत्ता येईल तेव्हा येईल पण त्याचे काही येण्याचे चिन्ह दिसत नव्हते.

तरीही एवढा वेळ वाट बघितली मग अजून थोडा वेळ  अजून वाट बघू या, असा विचार करत ती एका नारळाच्या झाडाच्या आळोशाला येऊन उभी राहिली.

तिने आपल्या पर्स मधून मोबाईल काढला.त्याला कॉल ही केला पण फोनही लागतं नव्हता. तिचा राग तर आणखीनच वाढला. कसे तसें मनाला शांत करत,

जरा वेळ गाणे ऐकत वेळ घालवावा म्हणून तिने यु ट्यूब वर जुन्या गाण्यांचा कारवा लावला.

लग जा गले....

की फिर हसी रात हो ना हो...

शायद फिर इस जनम में

मुलाकात हो ना हो....

तेवढ्यात लांबून कोणीतरी  येतांना तिला दिसलें. कदाचित हा आर्यन असावा असा तिचा अंदाज होता  पण तसें काही  झाले नाही ते भलतेच कुणी होते. परत तिने एकदा उदास होऊन खाली मान घालून आपले गाणे ऐकणे सुरु केले.

परत एकदा कुणी आपल्या जवळ येतें आहे अशी  हलकीशी चाहूल लागताच मधुने घाबरून इकडे तिकडे बघितले. पण जवळ कुणी नव्हते.आता मात्र तिच्या अंगावर भीतीने काटा आला होता, असे एकटे किती वेळ आपण त्याची वाट बघायची. रागाच्या भरात मधु  इकडे तिकडे लक्ष न देता आपली पावले झपा झप  उचलू लागली. थोड्या अंतरावर चालत गेल्यावर तिला लक्षात आले की कुणी आपल्या जवळ येतें आहे, तो दुसरा तिसरा कुणी नसून आर्यन आहे. याची  खात्री झाल्यावर तिने मागे वळून बघितले.

त्याला बघताच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.  आर्यनने जवळ आल्यावर मधुला गच्च मिठी मारली. त्या चांदण्यांच्या प्रकाशात ते दोघी न्हहून निघाले होते.

मोकड्या चौपाटीवरला गार वारा त्यांना भेदून निघत होता. पाण्याच्या त्या ओसंबून येणाऱ्या लाटा त्यांना पायाला स्पर्श करू पहात होत्या.

पाण्याच्या त्या लाटामुळे त्यांच्या पायाला गुदगुल्या जाणवत होत्या. आता तर मधुचा ही राग कुठे तरी भुर्ररकन उडून गेले होता. डोळ्यातुन अश्रू, गालावर हसू, मनात प्रेम आणि डोळ्यात खुप काही स्वप्न ते रंगवत होते. आर्यनने मधुचा हात गच्च पकडून ठेवला होता.

तोच मधु बोलली...

"आर्यन, तुला माझी एवढीचं काळजी  लागून होती तर मग लवकर का नाही आलास...? केव्हापासून  मी तुझी वेड्यासारखी वाट बघत बसली आणि तू मात्र निवांतात आला. कसला एवढा कामात होतास तू... हम्म..!!"

" काही नाही गं मधु, असचं जरा कामात आठवण नाही राहिली. मीच तुला इकडे यायला सांगितलं होत म्हणून, सॉरी गं...मला नाही लक्षात राहिलं!"

आर्यन ने आपले कान पकडले.

" बस...बस, पुरे हा तुझे हे अर्धे खोटे आणि अर्धे खरे बहाने. बरोबर एक तास होऊन गेला. मी एकटीच होती रे इकडे, मला सारखी भिती वाटायला लागली होती."

असे बोलता बोलताच मधुचा चेहरा पडला.

" अगं मधु, मग असल्या वेळेस घरी निघून जायचे ना...

किती काळोख झाला आहे, तुला भीतीबीती नाही का वाटली ( मधु त्याच्याकडे एकटक बघत होती. बोलता बोलताच आर्यनचे ही लक्ष तिच्याकडे गेले. )

ये... वेडाबाई मी तुझ्याशी बोलतो आहे आणि तू आपली कुठे मग्न झालीस..?"


(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा आणि कथेचा हा भाग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक व कमेंट्स करा. )


कथा क्रमशा :

लेखिका :- सौं रुपाली बोरसे.

कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.

टीम :- ईरा नाशिक.

स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा.










  



🎭 Series Post

View all