हे नाते जन्मांतरीचे.(भाग 6)

प्रस्तुत कथेच्या ह्या भागात मधुची आणि आर्यनची मैत्री तर झाली आहे, लवकरच ते एकमेकांना आवडायला ही लागले आहे.त्यांच्या मैत्रीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आहे.
#प्रेमकथा ( भाग 6)
एके दिवशी काॅलेजच्या लायब्ररीत बरीच गर्दी होती. आर्यन गर्दीतून वाट काढत सवयीप्रमाणे अवांतर वाचनाच्या रॅकपाशी पोहोचला. तिकडे वाचनाच्या बाकांवर आज मधु आणि सायली बसलेल्या त्याला दिसल्या, त्याला पूर्णतः कल्पना होती की आज परत मधुची भेट होणार.आणि ती देखील पहिल्या भेटीच्या जागेवरच, त्या आशेने तो आज परत लायब्ररीकडे फिरकला होता,कारण सर्व  कॉलेज कॅम्पन्समध्ये आपल्याला आवडणारी मुलगी कुठे दिसत नसल्यावर असून असून ती असणार कुठे म्हणून लास्ट ऑपशन लायब्ररी असू शकते असे गृहीत धरून तो आला होता.
आज तर प्रीतीला पण आर्यनला सांगायचं होत तिच्या मनातलं. ती कॉलेजला येऊन त्याला शोधत होती. आरती तिला हात ओढत  क्लासरूममध्ये यायला सांगत होती पण प्रीतीचे सारे लक्ष आर्यनकडे लागलेले होते. म्हणून  तिने क्लासरूममध्ये जाणे टाळले ती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका झाडाखाली बसून त्याची वाट बघू लागली. पण आर्यनचा काही पत्ता नव्हता. आज तर बिचारी मस्तपैकी नटून थटून आली होती. पण काय उपयोग ज्याला भेटायचं तोच कुठे दिसत नव्हता.
तेवढ्यात आर्यन लायब्ररीमध्ये आला समोर मधु आणि सायली बसलेल्या होत्या.
मधुला बघताच आर्यन बोलला. त्याला त्या क्षणाला मधुच नावच आठवत नव्हते. तो समोर तर आला पण अगदीच गडबडवून गेला त्याला मधुच नावच सुचेना.
"ऐ.....फुलराणी.... साॅरीफ्रेंड" (असं तो मधुला बोलला. स्वतःशीच जीभ चावत सॉरी म्हणाला )
मी काल तुमचे नाव विचारायला विसरलो, आणि चुकून  तुम्ही शोधत असलेल्या पुस्तकाचे नावचं मला आठवले.(शरमेने हसत हसत )तुमचे नाव काय...?"
आर्यनच्या या मिश्किल स्वभावाला त्या दोघंही एकमेकांकडे बघत खळखळून हसल्या.
"मी मधुमिता, मला मधु म्हटलं तरी चालेल"आणि
"मी सायली...!"
"माझी ओळख करून देतो, मी आर्यन देशमुख "
आपण असे रोज भेटत राहिलो की आपली चांगलीचं ओळख होणार आहे हे निश्चित आहे.
"तुम्ही दोघी रोज येत असतात का इकडे...? मी ही रोजच येतो मला तसें वाचनाची आवड आहे लहानपणापासून"
"हो, आम्ही दोघी येत असतो रोज कॉलेज लेक्चर  चालू होण्याच्या अगोदर किंवा लेक्चर नसेल तेव्हा , नाही तरी आमची अजून ह्या कॉलेजमध्ये आणि क्लासरूममध्ये फारशी ओळख नाही त्यामुळे आमचा वेळ आम्ही इकडेच घालवत असतो"
"अरे वा... छान आयडिया, मलाही जास्त मित्रमैत्रिणी नाही म्हणून मी पण इकडे येऊन माझा वेळ घालवत असतो, आणि पुस्तकांच्या सहवासात किती बरे वाटते ना..!"खरं तर आर्यन त्यांच्याशी खोटं बोलत होता. फक्त त्यांना दाखवण्यासाठी की मला अजून कुणी मित्र मैत्रिणी नाहीत असे. 
कॅम्पसमध्ये यानंतर हळूहळू तिघांची भेट वाढू लागली. कॅन्टीनमध्ये गरमागरम चहा घेत गप्पा मारणं, लायब्ररीत पुस्तक वाचत बसणं  हे अगदी रोजचचं होऊन गेल होत. खरं तर आर्यनला मधुसोबत जास्त वेळ घालवायचा असायचा पण सायली मात्र कबाब मे हड्डी होती. आता करणार तरी काय...?
सायली थोडाही वेळ मधुला एकटी सोडायला तयार नसायची. आर्यन नेहमीच मधु कधी एकटी दिसेल याची वाट बघत असायचा. त्या तिघांना सोबत बघून प्रीती मात्र जडत असायची. अशीही प्रीतीला मधु आवडतं नव्हती. तिच्या सौंदर्यावर ती फार ईर्षा करायची आणि त्यांच्या सोबत आर्यनला पाहून तर तिच्या जीवाची अधिकच आग होत असायची. तिची तळ पायाची आग मस्तकाला भिनायला लागली होती.
एक दिवस असचं प्रीतीला आर्यन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये  एका झाडाखाली बसलेला दिसला. चेहऱ्यावरून तर तो कुणाची तरी वाट बघत असावा असे वाटत होते. प्रीतीला आज चांगला मोका हाताशी आला होता. आपल्या मनातले सांगण्याचा. ती त्याच्या दिशेने जाणार तेवढ्यात  मधु आणि सायली कॅम्पसमध्ये येतांना दिसल्या .
मधुचे लक्ष आर्यनकडे बिलकुल नव्हते पण आर्यनची नजर केव्हापासून मधुला शोधत होती . मधूला कॉलेजच्या गेटात येतांना पाहून, आर्यनच्या आनंदाला पारावर  रहीला नाही पण त्याला असही दाखवायचं नव्हतं  की आपण मधुला किती लाईक करतो. म्हणून तो पटकन आपल्या बॅगेतून एक कादंबरी काढून वाचण्याचा अर्धा खोटा बहाणा करू लागला.
तेवढ्यात त्या दोघींना आर्यन  एका झाडाखाली निवांत पुस्तकं वाचतांना दिसला.
"हाय आर्यन, इकडे काय बसून वाचतो आहेस..??आम्ही लायब्रीत चाललो अहोत, तू येतोस का आमच्या सोबत!"
सायलीच्या अश्या बोलण्यावरून आर्यनला चांगली  संधी चालून आली होती .
"हो, का नाही "
अस म्हणतं तो त्यांच्या सोबत चालू लागला.
प्रीती जागेवर तशीच उभी राहिली, तिला आर्यनचा अधिकच राग आला होता.नंतर उदास होऊन ती घरी निघून गेली.
अस रोजच त्यांचं लायब्ररीमध्ये भेट होन, नंतर कॅन्टींग मध्ये जाणे, रोज वेगवेगळ्या विषयावर गप्पा करणे, तसेच हसी मजाक करणे, त्यामुळे त्यांच्यात मैत्रीच नात अधिक घट्ट व्हायला वेळ लागला नाही. तसेही 
मैत्रीचे रूपांतर आता प्रेमात व्हायला वेळ लागणार नव्हता.
सुट्टी राहिली की ते तिघही समुद्र चौपाटीवर जात असायचे  तासन तास ते तिकडे बसून गप्पा करायचे.
मधु आणि आर्यन एकमेकांच्या प्रेमात कधी पडून गेले हे दोघांना ही समजल नव्हतं. रागवण, भांडण, रडणं हे सगळं चालू असतांना दोघेही मात्र एकमेकांच्या जास्तच जवळ येत होते. दोघांना ही आपण एकमेकांच्या प्रेमात असणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट वाटायला लागली होती. त्या चौपाटीच्या उथळ समुद्राच्या लाटा ते डोळ्यात साठवत  तासन तास चौपाटीवर बसायचे.

(कथेच्या पुढील भागात बघू या की यांची मैत्री कुठपर्यत टिकून रहाते.ह्या भागात मैत्रीचे रूपांतर  प्रेमात झाले आहे. आता प्रेमाचे रूपांतर  अजून कश्यात होते. की येथेच थांबतो हा प्रेम प्रवास. हे बघण्यासाठी वाचत रहा ही कथा. )


कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा


🎭 Series Post

View all