हे नाते जन्मांतरीचे.( भाग 2)

प्रस्तुत प्रेमकथे मध्ये मधुच्या जीवनातला प्रेमप्रवास मांडला आहे. प्रेमासाठी करावा लागणार संघर्ष अचूक रित्या मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

 #प्रेमकथा (भाग :-2)

" ये चल मधु, उशीर होतो आहे गं मला 7.30 ची लोकल सुटायची तुझ्या नादात आणि हो....संध्याकाळची जरा लक्षात ठेव बरं का...

दादर स्टेशनवर वाट बघतोय तुझी. नेहमीच्याच ठरलेल्या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 9 वर"
" अरे प्रितम... मला आज जरा उशीरच व्हायचा बघ.ऑफिस वरून यायला.
सायंकाळचे 7.30 तरी वाजतील . सध्या कामाचा लोड जरा वाढला आहे रे... नको ना वाट बघूस माझी प्लीज !"
" होऊ दे ना मग, मी तरीही थांबेल तुझ्यासाठी,
तुझ्यासाठी नाही मग कुणासाठी वाट बघायची गं मी!"
" नाही तरी आजवर तेच करत आलो आहे मी, असे गालातच हसत स्वतःवर विनोद करत प्रितम बोलला.
आणि बोलता बोलताचं प्रितमच्या डोळ्यात पाणी महावेनासे झाले. तीला हे सारे दिसत होते, मधूने प्रितमच्या डोळ्यातले पाणी आपल्या हाताने अलगद पुसले.
" अग मधु, आवर आत्ता उशीर होतोय गं, पण एक निश्चित आहे, मी तुझी वाट नक्कीचं बघणार!"
मधु ने एकदा भरल्या डोळ्यांनी प्रितमकडे पाहिले आणि भरकन ती बेडरूममध्ये निघून गेली. तसा प्रितमही आपला डबा घेऊन घराबाहेर पडला. मधुनी आपली नेहमीची पर्स भरायला घेतली. त्यात तिने आठवणीने आपल्या दुपारच्या जेवणाचा डबा ठेवला. मग ती कपाटात आपला नेहमीच्या लोकलचा पास शोधू लागली. तेवढ्या तिच्या नजरेस एक जुनी आठवणींची डायरी पडली. सोनेरी कव्हर असलेली. आज ती डायरी मुद्दाम वाचावी म्हणून तिने आपल्या पर्समध्ये ठेवून घेतली. तीही आता घराबाहेर  निघाली होती. मधु  7:45 लोकल मिळावी म्हणून रेल्वे स्टेशनवर येऊन उभी होती. अजूनही ठाण्याकडे जाणारी लोकल यायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक राहिला होता. लोकलची वाट बघत तशीच ती उभी राहिली तेवढ्यात लोकल आली महिलांच्या डब्यात शिरत चपळाईने मधूने एका शिटावर कशीबशी जागा मिळवली.
" बर झाले देवा...!!"
आज तरी उभा राहून प्रवास करण्याची वेळ नाही आली माझ्यावर!"
असे स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात तिला आठवण झाली त्या आपल्या पर्समध्ये ठेवलेल्या सोनेरी कव्हर असलेल्या आठवणींच्या डायरीची. जुन्या आठवणींची एक बंध गाठ होती ती डायरी.
प्रत्येक पानांवर लिहिलेला भूतकाळात उलटून गेलेला आजवरचा जीवन प्रवास होता त्यात. मधुची आणि प्रितमची प्रेम कहानी  सुरू होण्याच्या अगोदरचा सारा इतिहास त्या डायरीत  विराजमान होता.
मधूने अलगत आपल्या पर्समधील डायरी बाहेर काढून वाचायला सुरुवात केली. असाही पुढील स्टेशन येण्यास अर्धा तासाचा तरी अवधी होता. कळत नकळत जुन्या आठवणीं नव्याने हिरव्या झाल्या. भूतकाळातला सर्व इतिहास एका मागोमाग भुर्रर्रर्रकन उडावा तसा डायरीतून डोळ्यांसमोर येऊन उभा राहिला. तो विस्मरणीय क्षणांचा मागोवा.जणू काही ती वेळा करीता स्वतःच भूतकाळात शिरली होती.
**********
सध्याच्या परिस्थितीला मधु एका लहानश्या कंपनीत कामाला होती.
मधुचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावीच झालेले. पुढील शिक्षणासाठी ती आता मुंबईला आली होती. मधु अभ्यासात हुशार आणि तर्फेभेज होती. तसेच ती उत्तम गृहिणी व पाककलेमध्ये पारंगत होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने पुढील शिक्षणासाठी आपला उत्साह निर्माण केला होता. घरची परिस्थिती अगदी साधारण असली तरी मधूने शिक्षणाची जिद्द सोडली नव्हती. अजूनही ती काही ना काही तरी शिकायला मिळावं यासाठी नेहमीच तत्पर असायची.
मधुचे गाव चंदनपुर.

चंदनपुर म्हटलं की, चौफेर  हिरवाईने नटलेलं गाव. मधु चंदनपुरात असलेल्या एका सधन शेतकर्‍याची मुलगी. मधु म्हणजे अभ्यासाशिवाय बाहेरील गोष्टीत फारसा रस न घेणारी. अभ्यास एक अभ्यास हेच सारखा नजरे समोर असायचा. प्रेम बीम ह्यातलं काळीच नॉलेज नाही.
पण बघता बघता कधी होऊन गेले हे देखील तिलाचं तिचे समजले  नाही.
*******
डायरीच्या पहिल्यापानावर हात फिरवत मधू  सुन्न होऊन वाचू लागली. 
कॉलेजचा पहिला दिवस तो ,
आजपासून कॉलेजमध्ये ऍडमिशनला सुरवात होणार होती. जुने मित्रमैत्रीणी आपआपल्या मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप शोधत होते. तर कुणी नवीन ऍडमिशन घेत होते.

नवीन आलेले विद्यार्थी फारशी ओळख नसल्याने इतर कुणाशी बोलायला देखील  घाबरत होते. नवीन वातावरण सर्वांना अनुभवायला मिळणार होते , सर्वच सुरक्षित वातावरण सोडून आता एका नवीन जगात पाऊल टाकणार होते.
कॉलेजचे वातावरण फुलून  आले होते. कॉलेज म्हटलं की रॅगिंग हा विषय डोळ्यांसमोर येऊन उभा राहतो. त्या रॅंकिंगच्या भीतीपोटी  काही चेहरे तणावात दिसत होते. भगवती विद्यालयामधून बहुतेक  मुला-मुलींनी ज्योतिबा फुले ह्या  विद्यालयात  ऍडमिशन घेतले होते. भगवती विद्यालयाचा एक अख्खा ग्रुप नवनवीन गोष्टी बघण्यात मग्न होता. कुणी कॅन्टीन बघत होते तर कुणी नवीन वर्ग, तर कुणी बोर्डवर लावलेली नावांची लिस्ट, त्यापैकी तर बाकीचे भलतंच दुसरं काही पाहण्यात मग्न होते. कुणी  आपल्या मित्राला शोधत होती तर, कुणी आपल्या मैत्रिणीला. तर कुणी आपल्या  बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडला. असे सर्व एन्जॉय करत होते. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजची फारशी माहिती नसल्यामुळे ते लिस्ट बघून आपला वर्ग शोधत होते.

भगवती विद्यालयातून जो एक अख्खा  मुला मुलींचा ग्रुप आला होता त्यात आर्यन, हेमंत, विजय, माधव, प्रीती, साक्षी, वैष्णवी, आरती हे असे 8 जिवलग मित्र-मैत्रिणी लहानपणापासून सोबत शिकलेले. अगदी म्हणजे पाचवी सहावी पासूनचे हे जिवलग मित्र मैत्रिणी  होते. त्यात प्रामुख्याने 2 कपल  देखील होते. ते म्हणजे हेमंत आणि वैष्णवी तसेच विजय आणि साक्षी. शाळेच्या शेवटच्या वर्ष्या पर्यंत त्यांच्या मैत्रीचे रूपांतर लव्ह बर्ड मध्ये झाले होते.

सारे काही फिरून झाल्यावर हा ग्रुप आत्ता वर्गात आला  होता. सर्व आपल्या मर्जीने जिकडे आवडेल तिकडे जाऊन बसले. आर्यन मात्र एकटाच एका बेंचवर जाऊन, बसला होता तर कुणी आपल्या मैत्रिणी जवळ दिसाव्यात आणि फावल्या वेळात गप्पा गोष्टी करता याव्यात या करीता शेजारील शेजारील बेंच वर बसले.
ह्या ग्रुप मध्ये आर्यन मात्र अजूनही सिंगल होता. तसेच माधव ही सिंगलच होता. पण सद्या तरी तो डबल होण्याच्या जोरदार तयारीत होताचं. तसें तर आत्ता आर्यनलाही एकटे राहून बोर झाले होते म्हणजेच सिंगल राहून. तोही डबल होण्याच्या बेतात होताच. पण अजून तरी अशी कुणी असे परफेक्ट त्यांच्यासाठी  त्यांच्या नजरेस आलेली नव्हती.
कॉलेजचा पहिला दिवस म्हटल्यावर हळूहळू विद्यार्थी वर्ग शोधत शोधत येऊ लागले. ते नवनवीन चेहरे आज पाहायला मिळत होते.
आर्यन मात्र क्लासरूमच्या दाराकडे येणाऱ्या नवनवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघत होता.



(बघूया कथेच्या पुढील भागात काय होते ते . आर्यन आणि माधव यांना गर्लफ्रेंड भेटेल की नाही, किंवा असेच सिंगल रहाणार..कि मग दोघांना एकच गर्लफ्रेंड असणार...?)

कथा क्रमशः
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
विषय:- प्रेमकथा
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक  स्पर्धा. 
भाग :-2

🎭 Series Post

View all