हॅप्पी ब्रेकअप डे अहो..

हॅप्पी ब्रेकअप डे अहो..

अहो.. ऐका ना.. काहीतरी सांगायचंय.. तर वाचा हा.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

आपल्या नात्यातील गैरसमजुतींशी.. 

खोट्या अफवांशी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

होणाऱ्या मतभेदांशी.. 

क्षणिक पण प्रभावी ठरणाऱ्या त्या रागाशी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

नात्यास पोकळ करणाऱ्या ईर्षेशी,

निरर्थक संशयाशी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

माझा पाठलाग करणाऱ्या भूतकाळाशी.. 

तू दूर जाण्याच्या भीतीशी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

या नीरव शांत एकांताशी..

नकारात्मक विचारांशी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

या जाचक विरहाशी.. 

या क्रूर दुराव्याशी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

मला छळणाऱ्या स्वप्नांशी.. 

इतरांसाठी स्वतःसह तुझं मनंही दुखावण्याच्या सवयीशी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

त्या सगळ्यांशी..

जे निर्माण करतात दुरावा आपल्यात नेहमी.. 


मला ब्रेकअप करायचा आहे, 

या पोकळ कारणांशी.. 

आणि व्हायचंय तुझ्या मिठीत कैद आयुष्यभरासाठी.. 


तर हॅप्पी ब्रेकअप डे अहो.. 


           हो, माहिती आहे, कालंच होता ब्रेकअप डे.. पण मी आज तुम्हाला विश करतेय कारण मी कालच केलाय ब्रेकअप या सगळ्यांशी आणि झाली कायमची तुमचीच आयुष्यभरासाठी.. सो.. जर तुम्ही काल सेलिब्रेट नसेल केला ब्रेकअप डे तर आज करून घ्या. काळजी घ्या .. लव्ह यू खूप सारं.. मिस यू खूप सारं.. 


तुमचीच होणारी हक्काची बायको..