"अरे अन्या, इथे आहेस होय. मी केव्हाचा तुला शोधत आहे?" वैभवने विचारले.
अनिकेत म्हणाला,
"काय रे, काय झालं? "
"काय रे, काय झालं? "
"अरे तू एवढ्या मोठ्या आजारातून बरा होऊन आलास, मग सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. चल चल, सगळे तुझी खाली वाट बघतायत." वैभव अनिकेतचा हात धरुन म्हणाला.
अनिकेत म्हणाला,
"जा तू, मी थोड्या वेळाने येतो."
"जा तू, मी थोड्या वेळाने येतो."
"अरे, येतो बितो काय नाय, तुला आणायला मला वर पाठवलंय. तेव्हा गुमान माझ्याबरोबर चल." वैभवने सांगितले.
अनिकेत म्हणाला,
"माझ्यावर जबरदस्ती? बरं चल येतो."
"माझ्यावर जबरदस्ती? बरं चल येतो."
कॉलेजच्या तळमजल्यावर सगळे अनिकेतची वाट बघत होते.
केक कापून अनिकेतच्या आयुष्याचं ग्रँड कम बॅक साजरं होत होतं, पण अनिकेत कुठल्यातरी वेगळ्याच विचारात होता.
त्याला असे एकट्यात हरवलेले बघून वैभव म्हणाला,
"अनिकेत, तू हॉस्पिटल मधून आताच आला आहेस, आता घरी जाऊन आराम कर."
"अनिकेत, तू हॉस्पिटल मधून आताच आला आहेस, आता घरी जाऊन आराम कर."
"मी ठीक आहे. " अनिकेतने सांगितले.
वैभव म्हणाला,
"ते काही नाही, काकूंची आज्ञा आहे, केक कापून झाला की अनिकेतला घरी आणून सोड. तुला इथे आणायला एकतर त्यांच्याकडून कशीबशी परवानगी मिळवली होती, मी तुला घरी सोडतो. उगाच रिस्क नको."
"ते काही नाही, काकूंची आज्ञा आहे, केक कापून झाला की अनिकेतला घरी आणून सोड. तुला इथे आणायला एकतर त्यांच्याकडून कशीबशी परवानगी मिळवली होती, मी तुला घरी सोडतो. उगाच रिस्क नको."
अनिकेत म्हणाला,
"एक मिनिट थांब, माझी बॅग राहिलीये वरती, ती घेऊन लगेच येतो. "
"एक मिनिट थांब, माझी बॅग राहिलीये वरती, ती घेऊन लगेच येतो. "
यावर वैभव म्हणाला,
"अरे बॅग ना, थांब मी घेऊन येतो."
"अरे बॅग ना, थांब मी घेऊन येतो."
अनिकेत चिडून म्हणाला,
"वैभव, माझी सगळीच कामं तू करणारेस का? ठीक आहे, पण मी माझी बॅग आणू शकतो. उगाच माझ्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करू नकोस. "
"वैभव, माझी सगळीच कामं तू करणारेस का? ठीक आहे, पण मी माझी बॅग आणू शकतो. उगाच माझ्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करू नकोस. "
वैभव म्हणाला,
"अरे अन्या, तुझी काळजी वाटते, म्हणून बोललो. तुला दुखवायचं नव्हतं. "
"अरे अन्या, तुझी काळजी वाटते, म्हणून बोललो. तुला दुखवायचं नव्हतं. "
वैभव अनिकेतला त्याच्या घरी सोडतो.
अनिकेत त्याच्या खोलीत आराम करत बसलेला होता. शरीराचा आराम आणि मनाला विचारांचा व्यायाम, अशी त्याची अवस्था झाली होती. बऱ्याच वेळाने सगळं काम आवरून आई त्याच्या खोलीत आली.
"बाळा, तुलाकाही त्रास नाही ना होत आहे? " आईने विचारले.
"नाही. " अनिकेतने लटकं हसून उत्तर दिलं.
आई म्हणाली,
"अनिकेत, इतक्या मोठ्या संकटावर मात करून तू परत आलास, पण तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. काही झालंय का? "
"अनिकेत, इतक्या मोठ्या संकटावर मात करून तू परत आलास, पण तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. काही झालंय का? "
" नाही, कुठे काय, सगळं ठीक आहे. " अनिकेतने उत्तर दिले.
आई म्हणाली,
" जी खात्री मला शब्दात देतो आहेस, ती तुझ्या मनाला खरंच पटतेय का? एखाद्या गोष्टीचा जेव्हा प्रचंड त्रास होत असतो ना, तेव्हा आपल्या माणसापुढे भडाभडा बोलून टाकावं किंवा त्यातून बाहेर पडण्याचा आपला आपण मार्ग शोधावा. "

अनिकेत यावर काहीच बोलला नाही.
" तू चहा घेणारेस की कॉफी? " आईने विचारले.
" चहा चालेल. " अनिकेतने उत्तर दिले.
कधीही चहा न पिणारा मुलगा आज चक्क चहा चालेल म्हणतोय, हे ऐकून आईलाही आश्चर्य वाटलं. पण ती काही न बोलता निघून गेली.
दोन - तीन दिवसांनी अनिकेत सकाळीच लवकर बाहेर पडला. पत्ता शोधत शोधत तो एका अनाथ मुलींच्या आश्रमात पोहोचला. तिथे त्याने एक फेरी मारली. तिथल्या संचालकांना आपली काही मदत लागली तर सांगा, असं सांगून आपला मोबाईल नंबर दिला.
आजकाल त्याचं कॉलेजपेक्षा आश्रमात जाणंयेणं वाढलं होतं. तिथल्या मुलांसाठी काम करताना त्याला वेगळंच समाधान मिळत होतं. तिथली छोटी, मोठी कामं करणं, कधी काही आर्थिक मदत लागली तर ती करणं, हे आता त्याच्या अंगवळणी पडलं होतं.
त्याच्यात खूप मोठा बदल झाला होता, त्या एका हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरीने त्याचं अख्ख आयुष्य बदलून गेलं होतं.
एके दिवशी रात्री उशिरा अचानक अनिकेतचा फोन वाजला. त्या आश्रमाच्या संचालिका शुभदा खरे यांचा तो फोन होता. त्याने नाव बघून लगेच फोन उचलला.
शुभदा खरे म्हणाली,
"अनिकेत, अरे जान्हवी, आपली जान्हवी तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तू आता श्री हॉस्पिटलला येऊ शकशील का?"
"अनिकेत, अरे जान्हवी, आपली जान्हवी तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तू आता श्री हॉस्पिटलला येऊ शकशील का?"
अनिकेतला काय बोलावं तेच कळेना. समोरच्या व्यक्तीला आपली गरज आहे आणि आपण त्याची मदत करायला हवी, इतकंच त्याला तेव्हा कळत होतं. तो तडक निघाला. दरवाजाच्या आवाजाने आईला जाग आली, ती बाहेर आली तेव्हा अनिकेत दरवाजाच्या बाहेर उभा होता.
"इतक्या रात्री कुठे चालला आहेस? " आईने विचारले.
अनिकेत म्हणाला,
"अगं, आज वैभवचा वाढदिवस आहे ना. तिकडेच चाललोय."
"अगं, आज वैभवचा वाढदिवस आहे ना. तिकडेच चाललोय."
आई म्हणाली,
"अरे मग उद्या साजरा करायचा ना, तुम्ही मुलं आता रात्री कशाला त्याच्या आईवडिलांची झोपमोड करताय? "
"अरे मग उद्या साजरा करायचा ना, तुम्ही मुलं आता रात्री कशाला त्याच्या आईवडिलांची झोपमोड करताय? "
अनिकेत म्हणाला,
" आई, अगं मी लगेच येईन, इथे जवळच तर आहे. तू झोप, माझी वाट बघत जागी नको राहूस. "
" आई, अगं मी लगेच येईन, इथे जवळच तर आहे. तू झोप, माझी वाट बघत जागी नको राहूस. "
"लवकर ये." सांगून आई झोपायला गेली.
अनिकेत बाईक वरून हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
शुभदा म्हणाली
" अनिकेत, बरं झालं तू आलास. मला तर काय करावं ते काही कळत नव्हतं."
" अनिकेत, बरं झालं तू आलास. मला तर काय करावं ते काही कळत नव्हतं."
"आता जान्हवी कशी आहे? " अनिकेतने विचारले.
शुभदा म्हणाली,
" अजून डॉक्टरांनी काही सांगितलं नाहीये. मला खूप काळजी वाटतेय, तिला काही व्हायला नको. "
" अजून डॉक्टरांनी काही सांगितलं नाहीये. मला खूप काळजी वाटतेय, तिला काही व्हायला नको. "
अनिकेत म्हणाला,
"तिला काही होणार नाही. मी डॉक्टरांशी बोलून येतो. "
"तिला काही होणार नाही. मी डॉक्टरांशी बोलून येतो. "
तितक्यात डॉक्टर बाहेर आले.
" डॉक्टर, जान्हवी कशी आहे? " शुभदाने विचारले.
" ती आता ठीक आहे. थोड्या वेळाने तिला शुद्ध येईल, तेव्हा तुम्ही तिला भेटू शकता. " डॉक्टरांनी उत्तर दिले.
शुभदा थोड्या वेळाने आत गेली. दोन दिवसांनी जान्हवीला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं.
अनिकेत तिला भेटायला आश्रमात गेला, त्याने शुभदाला जान्हवीने इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण विचारलं.
" जान्हवीच्या पोटात ट्युमर आहे. डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलं आहे. पण ऑपरेशन करण्यासाठी लागणारे पैसे नाहीत आणि त्या खर्चाचा भार कुणावर टाकण्यापेक्षा तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. " शुभदाने सांगितले.
अनिकेत म्हणाला,
"ऑपरेशनचा खर्च आपल्याला परवडणार नाही, म्हणून आयुष्य संपवायचा निर्णय घेतला? सगळंच विचार करण्याच्या पलीकडचं आहे. मी तिच्या ऑपरेशनसाठी प्रयत्न करेन."
"ऑपरेशनचा खर्च आपल्याला परवडणार नाही, म्हणून आयुष्य संपवायचा निर्णय घेतला? सगळंच विचार करण्याच्या पलीकडचं आहे. मी तिच्या ऑपरेशनसाठी प्रयत्न करेन."
अनिकेतने त्याची एफडी मोडली. पण तरीही पूर्ण जमवाजमव झाली नव्हती. त्याने बँकेतून कर्ज घेतलं आणि सगळे पैसे घेऊन तो आश्रमात गेला.
त्याने ते पैसे शुभदाकडे दिले. त्यानंतर लगेच जान्हवीला शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
जान्हवीवर शस्त्रक्रिया सुरु झाली. सुदैवाने ती यशस्वी झाली. जान्हवीला नवं आयुष्य मिळालं.
हॉस्पिटलमधून परत आल्यावर आश्रमात सगळ्यांनी जान्हवीचं जंगी स्वागत केलं. सगळ्या तयारीत अनिकेतने स्वतः सहभाग घेऊन मदत केली.
सगळी मुलं त्या वातावरणात मग्न होती. पण अनिकेत कुठे दिसत नव्हता. त्याला शोधत शुभदा बाहेर आली. तो एकटाच बाहेर बाकावर बसला होता. शुभदाने त्याला हाक मारली, पण त्याचं लक्ष नव्हतं. ती त्याच्या जवळ गेली.
" अनिकेत, अरे सगळे आत जान्हवीच्या येण्याचा आनंद साजरा करतायत आणि तू इथे काय करतोयस? " शुभदाने विचारले.
" काही नाही, असंच. " अनिकेतने उत्तर दिले.
शुभदा म्हणाली,
" तुझं खरंच खूप कौतुक वाटतं आणि अभिमानही. आजकालच्या जगात कोण कुणासाठी एवढं करतं? तू आश्रमात खूप मदत करतोस. आज जान्हवीला तुझ्यामुळे नवीन आयुष्य मिळालं. ग्रेट आहेस तू. "
" तुझं खरंच खूप कौतुक वाटतं आणि अभिमानही. आजकालच्या जगात कोण कुणासाठी एवढं करतं? तू आश्रमात खूप मदत करतोस. आज जान्हवीला तुझ्यामुळे नवीन आयुष्य मिळालं. ग्रेट आहेस तू. "
अनिकेत म्हणाला,
" मी माझ्या मनावरचं ओझं कमी व्हावं म्हणून हे सगळं केलं. "
" मी माझ्या मनावरचं ओझं कमी व्हावं म्हणून हे सगळं केलं. "
" कसलं ओझं? "शुभदाने विचारले.
अनिकेत म्हणाला,
" काही महिन्यांपूर्वी माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मी आज जो तुम्हाला दिसतोय, तसा अजिबात नव्हतो. खूप घमेंडी होतो. कॉलेजमध्ये एक गौरी नावाची मुलगी होती. अनाथ होती बिचारी. मी तिला नेहमी त्यावरून, तिच्या गरिबीवरून हिणवायचो. ती निमूट ऐकून घ्यायची. पण कर्माचा नक्कीच हिशोब होतो. काही दिवसांनी मला छातीत खूप त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी हृदय फेल झाल्याचं सांगितलं. परिस्थिती क्रिटिकल होती. गौरीला कॉलेजमध्ये ही बातमी कळली. ती मला भेटण्यासाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये येत होती. माझ्या काळजीने, मला लवकरात लवकर भेटता यावे म्हणून रस्त्याने धावत निघाली, तिचं कुठेच लक्ष नव्हते, भावनेच्या भरात ती पळत होती." बोलता बोलता अनिकेतचा कंठ दाटून आला होता.

"आणि?" शुभदाने काळजीने विचारले.
"आणि तेवढ्यात एका भरधाव ट्रकने तिला उडवलं. तिला त्याच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, जिथे मी होतो. मी ही तिथेच आहे, हे तिला माहिती होते. माझी अवस्था बघून तिची अवस्था आणखीनच बिकट झाली. शेवटचा श्वास घेताना तिने तिचं हृदय मला देण्याचं डॉक्टरांकडून वचन घेतलं. तिने तिचं हृदय दान केलं आणि मला नवीन आयुष्य मिळालं. डॉक्टरांना तिचं नाव फक्त मलाच कळावं, अशी अट घातली. " अनिकेत आज कित्येक दिवसांनी त्याचं मन मोकळं करत होता.
"मला शुद्ध आल्यावर मी डॉक्टरांना विचारलं, तेव्हा गौरीमुळे मला नवीन हृदय मिळालं, असं त्यांनी सांगितलं. ती अनाथ होती, त्याक्षणी माझा जीव वाचवण्यासाठी तिने मागचा पुढचा कसलाही विचार केला नाही. मी तिच्याशी जे वागलो, त्याबद्दल मला तिची माफी मागता आली नाही, ना तिने माझ्यासाठी जे केलं, त्याबद्दल कधी तिचे आभार मानता आले. मी तिच्याशी इतकं वाईट वागलो, तरी तिने माझी मदत केली. एक अशी मदत ज्याची परतफेड नाही होऊ शकत. माझ्या वाईट वागण्याचं तिने तिच्या चांगुलपणाने सणसणीत उत्तर दिलं. तिने तिचं हृदय नाही दिलं मला, माझं हृदयपरिवर्तन केलं." अनिकेतच्या डोळ्यांतील अश्रू गालांवर ओघळू लागले.