हिमानी भाग 7

I like to read


हिमानी भाग 7
( कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


   "हा बोल ना रुक्ष " तिने मान वर करून पहिलं.

"फ्रेंडस" म्हणत त्याने हात पुढे केला.
तिने डोळे बारीक केले. आपण फ्रेंड्स आहोतच.
रुद्राक्ष "हम्मम,तरीही आपण नवीन सुरुवात करूया.जून सगळं विसरून."
"ठीक आहे."
 त्याच्या चेहऱ्यावर हलकस हसू आलं.
ह्याला हसता येत.ती हळूच बोलली
रुद्राक्ष "काही म्हणालिस का."
हिमानी "'मी जाते आता.दिव्या वाट बघत असेल
रुद्राक्ष "हॉरर मूवी "
हिमानी "हॉरर आणि कॉमेडी.
रुद्राक्ष "म्हणजे"?
हिमानी,"अरे मुव्ही बघतात कमी घाबरतात जास्त.  सर्व लाईट चालू करुन हॉरर मुव्ही चालू असतो. जरा भीती वाटली की लगेच कुठलितरी कॉमेडी फिल्म लावतात. नाहीतर झोपून जातात."
रुद्राक्ष "काय, एव्हढ सगळं कशाला".
हिमानी "अरे कॉलेजमध्ये  स्टोरी सांगायला.फ्रेंड्स मध्ये शायनिंग मारायला.तिघी पण तश्याच आहेत. त्यांना सांगायचं असत की त्या खूप धीट आहेत.एकट्याच हॉरर मुव्ही पाहू शकतात."
"मनू ताई , ये ना लवकर " अनु नि बाहेरुन आवाज दिला तशी ती बाहेर आली.
 थोड्यावेळाने रुद्राक्ष बाहेर आला .
नीता ,"दादा ,तुला काही हवंय का?"
रुद्राक्ष  "तुमच्यासोबत मुव्ही बघु शकतो."
दिव्या,"चालेल,हो बस ना. पण तू लगेच जाणार होतास ना.
रुद्राक्ष," रात्री निघेन. चला मूवी लावा."

सोफ्यावर एकमेकींना पकडून तिघीही पॉपकॉर्न  कोल्ड ड्रिंक समोसा घेऊन बसल्या होत्या. थिएटर वाला फील. 

खाली हिमानी आरामात पाय पसरून बसली होती.
रुद्राक्षला त्यांच्याकडे बघून हसायलाच आलं 
रुद्राक्ष  हिमानी च्या बाजूला बसला.
रुद्राक्ष,"आता बघ पूर्ण मूव्ही आजच बघतील."
मूवी संपली तस हिमानी ने मागे बघितलं तर तिघीही डोळ्यांवर हात ठेवून बसल्या होत्या. 
आणि रुद्राक्ष बसल्या जागीच झोपला होता.
दिव्या,अनु उघडा डोळे, मुव्ही संपला. चला फ्रेश व्हा.
तिघीजणी उठून रूम मध्ये गेल्या.
हिमानी ने किचन मध्ये  जाऊन कुकर लावला.
 बरोबर च भेंडी चिरली. 

कुकरच्या आवाजाने रुद्राक्ष ला जाग आली.
मावशी कुठे आहेत?
त्यांच्या बहिणी कडे गेल्यात.उदया मावशीच्या भाचीची एंगेजमेंट आहे.
Ok, तू इथे काय करतेस.
डान्स करतेय
"काय? किचनमध्ये डान्स" त्याने भुवई वर केली.
नाही ना करू शकत. दिसतय ना  जेवण बनवतेय
रुद्राक्ष"ओह,भेंडी फ्राय"
"हो, भेंडी फ्राय.माझी आवडती."हिमानी
"माझिपण" रुद्राक्ष
"कधीपासून"हिमानी
"माहीत नाही,पण आवडते. बघूनच मला भूक लागली.
मी आलोच  फ्रेश होऊन." म्हणत रुद्राक्ष त्याच्या रूम मध्ये गेला.
" मनु ताई किती पोळ्या आणू ."अनु ने दारातून विचारले.
"10 घेऊन ये."हिमानी
एव्हढ्या, तिने आश्चर्य ने विचारले.

हो,जा आता नऊ वाजयला आलेत. आत्ता गरम मिळतील पोळ्या."हिमानी
ओके." म्हणत अनु जवळच्याच  पोळी भाजी केंद्र होत तिथे गेली.

सगळया जणी हॉल मध्ये  जेवायला बसल्या.
हिमानी"दिव्या ,हे घे ताट  त्याला नेऊन दे."
मगाशी जेव्हा दिव्या जेवायला बोलवत होती.तर त्याने आतच आण सांगितलं. 
लॅपटॉप वर काम करत होता.
 
दादा चल ना रे,किती दिवसांनी आपण असे सगळे एकत्र अचानक भेटलो आहोत.प्लिज
नो,दिवू मला काम आहे.नेक्स्ट टाइम पक्का"रुद्राक्ष
जेवण झाल्यावर दिव्या आईस्क्रीम खायला बाहेर जायचा हट्ट करत होती.
तुम्ही ज आणि खा ना लवकर या.
म्हणून तर तू पण चल.म्हणजे आम्ही लवकर येऊ. 
तो रूम मध्ये जाणार तिघीनी त्याचा रस्ता अडवला.
आणि रडतच गायला लागल्या,
भैया मेरे राखी के बंधन को निभाना
स्टॉप, चला जाऊया "दुसरं कडवं बोलण्याआधीच रुद्राक्ष ने त्याच्या  पुढे हात जोडले. 
हिमानी मात्र त्यांची नाटकं बघून गालातच हसत होती.

आणि मनातच विचार केला.चांगली आयडिया आहे. ह्याच्या कडून जर काही पाहिजे असेल तर गाणं गायचं आणि थोडसं रडायचं.

  आईस्क्रीम खाऊन घरी आल्यानंतर तिघीही यांच्या रूम मध्ये जाऊन झोपल्या. 
थोड्या वेळाने रुद्राक्ष पण तिथून निघून गेला.
हिमानी हॉल मध्ये तीचा अभ्यास करत बसली.
**********

 दुसया दिवशी   सकाळी लवकरच हिमानी आणि अनु घरी आल्या.
दरवाजा जरासा उघडाच होता.

बाहेर बोलण्याचा आवाज येत होता.दाराबाहेर  वेगळ्या चपला पण होत्या. 
"अनु, कोणीतरी आलाय वाटत".हिमानी
"हो, न्यू चपला आहेत.चल."अनु
बाबा आई,तुम्ही"हिमानी ने दार ढकललं.
तिचे डोळे भरू आले होते. आज खूप दिवसांनी तू आई बाबा ना पाहत होति.
तिने पटकन पुढे होऊन आईला मिठी मारली.
मनू कशी आहेस बाळा." आई
मी मजेत तू कशी आहेस." हिमानी
 नंतर बराच वेळ मायलेकींच्या गप्पा चालू होत्या.  मधूनच काकूंचाही सहभाग होता.

*********

दुपारचं उन्ह ओसरायला आलं होतं.
हॉल मध्ये खूपच  गप्पा रंगल्या होत्या.
हिमानी, जरा इकडे ये बस"बाबा नि तिला समोर बसायला सांगितलं.
बाकीची मुलं पण बसली होती.
आई, काका, काकू पण आले.
"आम्हाला तुम्हा मुलांना काहीतरी सांगायचं आहे.खासकरून तुला हिमानी.तू नेहमी विचारतेस ना मी तुझ्याशी अस का वागतो. आणि तो ड्रॉवर मधला फोटो कोणाचा आहे. माझ्या आणि काकांच्या मध्ये ती मुलगी कोण आहे."बाबा
 "हो, सांगा ना बाबा.ती ना थोडी थोडी माझ्यासारखी दिसते."हिमानी
"नाही, ती नाही. तू तिच्यासारखी दिसते."बाबा
"म्हणजे मला नाही कळल ".हिमानी
"ती तुझी आई आहे"बाबा

क्रमशः

🎭 Series Post

View all