हिमानी भाग 5

I like to read.


हिमानी भाग 5

( ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

        रुद्राक्ष ने नेमकं तेव्हाच तिच्याकडे बघितलं.ती काय बोलली त्याला लगेच कळलं. त्याने पण डोळ्यांनीच एक जळका वार केला.
तिनी  नाक मुरडल. तो हसून पुढे गेला.
    तो त्या कॉलेजचा माजी विद्यार्थी होता. पण आज तो एक बिझनेसमन म्हणून स्टुडंटस्ना मार्गदर्शन करायला आला होता.   प्रिन्सिपल सरांनी  आग्रह केल्यावरच हो म्हणाला होता.
मॅनेजमेंट  सेक्शनमध्ये त्याच लेक्चर होत. त्याने सगळीकडे एक नजर फिरवली. आणि बोलायला सुरुवात केली. ज्या पद्धतीने तो मुलांना गाईड करत होता,त्याच बोलणं ऐकून सगळ्यांनी टाळ्यांचा  वर्षाव केला.  नन्तर त्याने सर्वांच्या प्रश्नांची न कंटाळता उत्तर दिली.
हिमानी तर खूपच सरप्राईज झाली होती.तो हुशार आहे,तिला माहिती होत. लहानपणी कितीतरी वेळा त्याने अभ्यासात तिची मदत केली होती.
पण इतका हुशार असेल असं वाटलं नव्हतं.
थोड्यावेळाने सत्कार समारंभ झाला. सरांनी त्याचे आभार मानले. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला. यावेळी तिने पण टाळ्या वाजवल्या.  तो तिच्याकडे बघून हळूच  हसला आणि  निघून गेला. तिने पण हलकेच स्माईल केलं. 
ती तिच्या मैत्रिणीकडे वळली. सगळे रुद्राक्ष बद्दल बोलत होते. मोहिनी पण त्याची तारीफ करत होती.
हिमानी,काय झालं गप्प का आहेस.
मी काय बोलू.सगळे बोलत आहत.

    तेव्हाच हिमानीच्या मोबाइल वर मेसेज ची टोन वाजली.तिने दुर्लक्ष केलं. परत एक मेसेज आला. तिने बघितलं तर रुद्र चा मेसेज होता .

पहिला मेसेज  ,"प्लिज ,बाहेर येशील का?   आय निड युवर हेल्प."
दुसरा मेसेज ,"प्लिज आजीसाठी तरी."

तिने लगेच "ok आलेच" असा रिप्लाय केला.

त्याला माहित होतं आजीचं नाव घेतलं तर ती नाही बोलणार नाही.
हिमानी कॉलेजच्या बाहेर आली.पण तिला तो कुठे दिसला नाही.समोर रस्त्याच्या दुसऱ्या साइड ला  कार ला टेकून उभा होता. त्याने तिला तिथूनच हात उंचावून तिकडे बोलावले.
"काय काम आहे?.काय मदत हवीय?. आजी कशी आहे.?"
  "अग हो,जरा धीर धर, सगळं सांगतो . आधी आत चल."

सनशाईन केफे.
रुद्र तिला घेऊन एका टेबल जवळ आला.
तिथे एक मुलगी आधीच बसली होती. 
जी साधारण हिमानीच्या वयाची होती.
तो त्या मुलीच्या समोर बसला. हिमानी त्याच्या बाजूलाच बसली.
"हिमानी, ही प्रिया. आणि प्रिया ही हिमानी. "रूद्राक्ष ने ओळख करुन दिली.
"हाय हिमानी."
"हाय प्रिया".
तितक्यात एक  मुलगा  प्रिया च्या बाजूला बसला.
"हाय,मी राज. ".

हिमानी पूर्णपणे गोंधळून गेली.
"रुक्ष, ओळख परेड झाली असेल तर प्लिज आता सांगणार का? काय मदत पाहिजे."हिमानी हळूच रुद्राला म्हणाली.

" आजीची इच्छा आहे मी प्रिया बरोबर लग्न करावं.  ही   सुमन आत्याच्या मैत्रिणीची मुलगी आहे. आत्या खुपच मागे लागली होती, म्हणून मी आज तिला भेटायला आलो होतो.तर  तीच आधीच ठरलं आहे.
तसही मला कोणाशीच  लग्न करायचं नाहीये.
पण आजी ऐकतच नाही.
तू जर आजीला समजावलस तर खूप मदत होईल.". रुद्राक्षने एकदम तिला सांगितलं

"म्हणजे मी नक्की काय करू."तीला अजुनही नीटस कळलं नाही.
"आजीला माहीत आहे मी आज तुझ्या कॉलेजमध्ये आलोय.सकाळी मला कॉल करून तिने ही भेट फिक्स केली.  तिनेच मला सांगितलं, तुला घेऊन प्रियाला भेट".

"अस का बोलली ती "हिमानी
"कारण तिचा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. तर तू तिला पटवून दे की आम्ही दोघे एकमेकांसाठी योग्य नाहिये.प्लिज".रूद्राक्ष
"ओके ओके ठीक आहे ,इतकं प्लिज बोलायची गरज नाहीये.मी सांगेन तिला फोन करून."हिमानी
"आताच कॉल कर ना ".रुद्राक्ष
"ठीक आहे. करते." हिमानीला माहीत होतं , हा काय ऐकणार नाहीये.
"आणि प्लिज , स्पीकर ऑन कर".रुद्राक्ष

किती घाई झालीय. ह्याच्यासाठी नाही निदान प्रियासाठी तरी आजीला समजवाव लागेल.हा राज नसता तर  असलं काही केलं नसत.  हिमानी मनातच विचार करत होती.

ठीक आहे, म्हणत हिमानि ने आजीला कॉल केला.

क्रमशः