हिमानी भाग 4

I like to read.

हिमानी  भाग 4

(  हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

   "काका,जरा बोलायचं होत. " हिमानी

जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे काका टीव्ही वर  10च्या बातम्या बघत होते. बाजूला काकू  पुस्तक वाचत होती.
"हा,बोल ना मनू काय म्हणतेस कसा चालला आहे अभ्यास.आणि ट्युशन ."काका
"छान .काका तुम्हाला विचारायचं होत."हिमानी
हिमानीने रेवतीताई ने सांगितलेल सगळं काकांना सांगून टाकलं.
"तुम्हाला काय वाटतं ,करू का जॉब" हिमानी
"मला काय वाटतंय त्यापेक्षा तुला काय वाटतंय ते सांग आधी  मग मी माझं सांगेन. "काका
"मला तर ठीक वाटतंय. म्हणजे जास्त लांब पण नाहीये.तेव्हढच नवीन काहीतरी शिकायला मिळेल."हिमानी

"पण तुला जमणार आहे का "काकूने मधेच तीच बोलणं तोडलं
"न जमायला काय झालं.  रेवती नि काहीतरी विचार करूनच सांगितलं असेल .तुला जमेल असा विश्वास आहे  ना मग ठीक आहे.  कर तु काम.पण अभ्यासावर   परिणाम नाही व्हायला पाहिजे." काका

"ओके काका, थेंक्यू."म्हणून ती झोपायला गेली

दुसऱ्या दिवशी ट्युशन झाल्यावर  हिमानी आणि रेवती  पथॉलॉजि मध्ये गेल्या.
"हाय रेवती,कशी आहेस ? माझं काम केलंस ?"आत जाताच एका मुलीने प्रश्न सुरू केले
"निशा ,अग थांब जरा तू बरी आहेस ना,कालच तर भेटलो. तरीपण मी मस्त.आणि तुझं काम केलंय. ही हिमानी, आणि हिमानी हि निशा माझी फ्रेंड".रेवती
"ओह,  हाय हिमानी मग येशील ना उद्यापासून इकडे" . निशा
"काय उद्या लगेच? पण माझा इंटरव्ह्यू नाही घेतला तुम्ही  आणि " हिमानीने गोंधळून रेवतीकडे पाहिलं.
" अग तिला आधीच मी तुझ्या बद्दल सांगितलं होतं."रेवती
"आणि मी माझ्या मॅम बरोबर बोलले आहे. एकदा त्यांना भेटून घे.   चल मी तुला घेऊन जाते.रेवती तू बस थोडयावेळ आम्ही आलोच" निशा

हिमानी  निशाबरोबर बाजूच्या  रूममध्ये गेली. ती छोटीशी आणि स्वच्छ केबिन होती.  समोर एका खुर्चीवर साधारण तीस वय असलेली एक बाई फाईल घेऊन बसली होती.
डॉक्टर सिया जोशी.
"हॅलो मॅम,"
"हॅलो निशा,कशी आहेस आता ,   काही त्रास नाही होत
ना. ही मुलगी कोण आहे?"
"नो मॅम ,काही त्रास नाही. मॅम  ही हिमानी मी कालच तुम्हाला संगीतल होत  मी सुट्टीवर जाण्यापूर्वी  कोणीतरी येईल".
ओह ,आठवल. तुझ्या मैत्रिणीची स्टुडंट,फर्स्ट   इयर ला  आहे. ओके.  हिमानी कॉम्पुटर वर काम आहे.येईल ना".
डॉक्टर जोशी
"हॅलो मॅम,  हो येईल.मी कॉम्पुटरचा बेसिक कोर्स केलाय". हिमानी

"ठीक आहे .टायमिंग तुला निशाने सांगितला असेलच संध्याकाळी 5 ते 8 . आणि सॅलरी पण निशा ने सांगितली असेल . ओके  मग कधीपासून येउ  शकतेस."डॉक्टर जोशी

"उद्यापासून आले तर चालेल का"?हिमानी

"हो चालेल .हरकत नाही भेटू मग परवा.तुझा नंबर दे मला".डॉक्टर जोशी

"माझ्याकडे फोन नाहीये.मी काकूंचा नंबर देते".हिमानीने  त्यांना  नंबर दिला.आणि बाहेर आली.
आणी रेवती ला बिलगली.
"थँक्स रेवती ताई".
आतमध्ये काय बोलणं झालं ते तिने सगळं रेवतीला सांगितलं.
रेवतीला पण खूप आनंद झाला.
तिच्या चेहऱ्यावरून ती खूप खुश दिसत होती.
निशा ला बाय करून दोघी आपापल्या घरी आल्या.
रात्री तिने काकांना संध्याकाळी काय झालं  आणि उद्यापासून जायचं आहे,सांगितलं.

आता तिचा नवीन दिनक्रम सुरू झाला.
सकाळी लवकर उठून ती थोडासा अभ्यास करायची. मग थोडीशी  घरात काकुला मदत, नन्तर कॉलेज ,  कॉलेजवरून आल्यावर जेवण झाल्यावर  थोड्यावेळाने दुपारी ट्युशन  मग संध्याकाळी जॉब.
रात्रिची जेवण झाल्यावर ती  परत अभ्यासाला बसायची.
पहिला पगार  तिने काकूंच्या हातावर ठेवला तसं काकुला खूपच  आनंद झाला. त्या रात्री त्यांनी   हॉटेल मध्ये मस्त  डिनर पार्टी केली.

तीच काम मॅम ला आवडलं होत.म्हणूनच निशा आल्यावर सुद्धा तिला  कामासाठी  ठेवून घेतलं होतं.

***********

हिमानी च कॉलेजचं शेवटचं वर्ष होत. दोन महिन्यांनी तिची लास्ट एक्झाम होती.   म्हणून  तिने लॅबमधला जॉब  सोडला होता.  तिला तीच पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित  करायचं होत.
हिमानी लायब्ररीमध्ये बसून पुस्तक वाचत होती.

"हिमानी,तू  ईथे काय करतेस  चल लवकर गेस्ट लेक्चर ची वेळ झालेय. मी तर खूपच  उत्सुक  आहे. "मोहिनी

"हो येतच होते.तू पुढे हो मी मागून आले."खरतर तिला अजिबात जायचं नव्हतं.गेस्ट लेक्चरर नाव ऐकूनच तिला नकोस वाटत होत.
"मागून का ? आताच चल उशीर होईल."
दोघीही क्लास  रूम मध्ये आल्या. पहिला बेंच रिकामा होता. दोघीही तिथेच बसल्या.
अचानक क्लास रूम मध्ये खूपच शांतता पसरली.
आणि तो आला.  दरवाज्यातून आत येतच होता तेव्हाच,
ति हळूच पुटपुटली ,"ताड माड च झाड"

क्रमशः

कथेचा भाग कसा वाटला प्लिज सांगाल का.















 

🎭 Series Post

View all