स्वाभिमान जपायलाच हवाय.....

प्रेरणादायी...


  #स्पर्धा 

#प्रेरणादायी कथा...

स्वरा ग्रॅजुएट झालेली एक चुचुणीत आणि अतिशय हुशार मुलगी.... परिस्थितीतीमुळे मात्र  पुढचं शिक्षण तर घेता आल नाही...शिक्षण सोबत  तिला नृत्यत्यकलेची ही मनापासून आवड.. नृत्य कला जेम तेम शिकली होती... पण अंगातच ती कला ठासून भरली होती... त्याच कलेत प्राविण्य मिळ्वन्याच तिच स्वप्न मात्र अधुरच राहील...परिस्थिती कारणीभूत होतीच सोबत मुलगी आहे वेलेत लग्न झालेलं बर या तिच्या घरातल्यांच्या मतामुळं तिच लग्न ग्रॅजुएशन नंतर लगेच लावून दिल...
                  समीर तिचा नवरा...एका उच्भ्रू घरातला सुशिक्षित मुलगा... पेशाने तो इंजिनियर होता.... आणि पुण्यातल्या एका मोठ्या it कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होता.... एके दिवशी स्वरा ची मैत्रीण प्रिया घरी आली... तशा दोघी वरच्या वर भेटत असायच्या... पण मागच्या काही बऱ्याच दिवसात त्यांची भेट न्हवती झाली. म्हणून आज मुद्दामहून भेटायला आली होती.. दोघी गप्पा मारत होत्या.. तेवढ्यात समीर तावातावत घरात आला... आणि स्वरावर ओरडला,  काय गं बावळट कुठची वरच्या टाकीतल पाणी भरून वाहतय आणि तू इथं निवांत गप्पा मारत बसलीयेस..स्वरा ला ओशाळ्लयासारखं झाल... आणि आत जाऊन तिने पाणी टाकीत चढवायची मोटारच बटन बंद केल.... प्रिया लगेच तिथेच बोलली... ठीकय स्वरl आपल्या लक्षात नाही आल... पण सांगण्याची एक पद्धत असते.. मी असताना कस काय बोलले ते अस.?? ... काही स्वाभिमान वगैरे आहे कि नाही तूला?? मी बसलीये ना इथे समोर, माझ्यापूढ कशाला अस बोलायचं... यावर स्वरा म्हन्ली.... अग नवरा आहे तो त्याच्यापुढं कसला आलाय  स्वाभिमान...समीर  च नेहमीच असायच हे...स्वरा स्वभावाने बोलकी असल्या कारणाने सगळ्यांशी मोकळी बोलून राहायची.....पण समीर मात्र  त्याच्या ऑफिस मधले लोक आणि त्यांच्या बायकl जरी घरी आल्या तर तिला बोलू द्यायचा नाही...आणि बोललीच तर तिथेच तिच्या बोलण्यात चूक काढून तिच्यावर सगळ्यांच्यात हसायचा..... स्वरा गप्प व्हायची... नंतर तिने याबाबद्दल विचारलं तर म्हणायचं काही नाही गं, गंम्मत करत असतो तुझी. तू काय मनाला लावून घेते.. मग आतून  ती कितीही  दुखावलेली असली तरी स्वतःला हेच समजवायची "असू दे स्वरा नवरा आहे तो चालत तेवढ "......
           ती कायम स्वतःला असेच समजावत आली होती.... जाउ दे,  खरच चुकत असेल आपलच काही त्यामुळं हे बोलत असतील..   पण त्यात झालं अस होत त्यांना एक मुलगा होता 12 वर्षाचंl  त्यानी हे हेरल होत.. त्यामुळं  तो ही आईला काही विचारायचl नाही.. किंवा तिच्या बोलण्याचा तिच्या रागवण्यचा त्याच्यावर काहीच परिनाम व्ह्याच नाही... जिथं आपले  वडीलाच विचारत नाहीत तिथं आपण काय विचारायच असा समज झाला होता...प्रिया कायम तिला समजवायची अग ठीकय.. तू नको त्याला रोख ठोक बोलूस पण प्रेमाने तरी सांगू शकतेस ना पण हीच मात्र कायम तेच... नवरा आहे पुराण चालू व्हायचं...
      एके दिवशी समीर चा खूप जवळचा मित्र घरी जेवायला आला...जेवायला बसायच्या अगोदर त्यांच्याकाही गप्पा चालल्या होत्या.. त्यात त्या मित्राने  स्वराला विचारला काय मग ताई काही विशेष, मधेच त्याला  तोडत समीर म्हणाला हिच्याकडे काय असणार आहे विशेष??? दोन टाईम खायच धुणीभांडी करायची,  जरा इकडं  तिकडं काम केल्या सारखं करायचं बाकी काय असणारे विशेष... स्वराच्या  डोळ्यांत चटकन पाणी आले पण परत तिनी हसण्यावर घेतल.....त्या रात्री एकटीच खूप रडली...बाकी सार ठीक होत पण फक्त खाते पिते, छोटी मोठी थोडी काम करते, अन हिचा कडे अजून काय असणार विशेष हे तिला बरच लागल होता....
    दुसऱ्या दिवशी तिने प्रियाला फोन केला... घरी बोलावून घेतले आणि तिच्या नृत्या चे क्लासेस घेण्यासाठी तिला माहिती विचारली... तिने आता स्वतःच्या पायावर उभा राहण्याच ठरविला होता... ती आतापर्यंत प्रत्येक गोष्ट सोडत होती, पण कदाचित याच गोष्टीचा गैरफायदा घेतला गेला..... समीरला जेव्हा नृत्य क्लासेसची गोष्ट कळाली त्यावर त्याने नाही म्हणून सांगितले.... यावेळी ती ऐकणार नव्हती... तिला स्वतःच्या पायावर उभ राहून आत्मविश्वासाने पुन्हा स्वतःला मिळवायचं होतं स्वतःचा स्वाभिमान मिळवायचा होता... ती म्हणाली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, त्या प्रेमासाठी मी तुझा सगळ्या गोष्टी ऐकून घेत होते.,  किंवा ते मी माझं कर्तव्य मानत होती पण मला कळालं आहे जोपर्यंत स्त्री स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत नाही तोपर्यंत तिला कशाचीही किंमत राहत नाही... तू माझा पती परमेश्वर आहेस  राहशील पण आता मी मला शोधणार आहे आणि माझा स्वाभिमान  जपतच हे नातं ही बहरवणार आहे...
    हो... माझा स्वाभिमान जपतच.....
   
कथेतून मला इतकंच सान्गायच आहे... प्रत्येक स्त्री ने आपला स्वाभिमान जपlयला हवाय...मग तो आपल्या घरात असो किंवा आपल्या समाजात असो...  किती अडचणी येऊ दे कितीही संकट त्यात स्वतःला जपत स्वतःच्या स्वाभीमनाला जपत त्याला सामोरं जायला हव..
कायम ताठ मानेने जगा आणि शिक्षण घ्या..आणि स्वतःच्या पायावर खंबीर आणि आत्मविश्वासअणे समाजात उभ राहण्याचा प्रयत्न करा.....
शिक्षण घेऊन स्वतःचा पायावर उभ राहणं केव्हाही चांगल....
स्वतःतला स्व हरवून देऊ नका.....

काय म्हणता पट्तय का????

समाप्त.....
     ..... कल्याणी राजगे शिंदे.... 
आवडल्यास नावासहीत च share करा.....