Login

आणि ती स्वतःसाठी उभी राहिली भाग -1

स्वतःसाठी उभ राहा
"आई, ऐकतेस ना?? मी माझ्या नवऱ्याला माझा पगार पूर्ण त्यांच्या हातात देणार नाही म्हणून स्पष्ट शब्दात सांगितलं, मी बरोबर वागली ना ग? "

प्रिया तिच्या आईला सुलोचनाला विचारत होती. त्यावर सुलोचनाने एक मोठा श्वास घेतला आणि ती म्हणाली,


" हो प्रिया, तू योग्यच केलस, स्वतःसाठी उभ राहणे खूप गरजेचे असते. "


एवढं बोलून तिने कॉल ठेवला आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. रस्त्यावर वर्दळ सुरू होती, पण तिच्या मनात आता मात्र शांतता होती. इतक्या वर्षांनी! तिचं मन पुन्हा भूतकाळात गेलं. तिच्या लेकीने खूप लवकर स्वतःसाठी स्टॅन्ड घेतला, आता प्रियाची तिच्यासारखी फरफड होणार नव्हती. हे जाणवून तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं. पण ह्याने तिच्या आयुष्यातला तो भाग तिच्यासमोर उभा राहिला.  तिला आठवू लागलं, ती नऊवारी नेसून लग्नाच्या मांडवात उभी होती, सगळ्यांनी तिला दागिन्यांनी मढवलं होतं. पण तिच्या मनात मात्र वेगळीच भीती होती नव्या आयुष्याची, नव्या संसाराची, नव्या माणसांची. खूप अपेक्षा मनात ठेवून तिने घरात प्रवेश केला होता.


लग्न झाल्यावर ती सासरी आली, पण पहिल्याच आठवड्यात तिला समजलं की इथं तिला तिच्या नवऱ्याने पत्नीपेक्षा फक्त एक कर्तव्य बजावणारी व्यक्ती म्हणूनच आणलं होत. जिने फुकटच घरातलं काम केल जावं आणि वरून पैसे सुद्धा द्यावेत. तिचा नवरा मोहन एका खाजगी कंपनीत काम करत होता, पण त्याला तिच्या पैश्यांचा खूपच मोह होता. सुलोचना सरकारी नोकरीत होती, आणि तिचा पगार ठरलेल्या तारखेला तिच्या हातात येत असत, पण त्या पैशांवर तिचा हक्क नव्हता.

पहिल्या दिवशीच मोहनने तिला सांगितलं होत,


"घरातल्या बाईने पैसे सांभाळण्याची गरज नाही. मी आहे ना! तुला काही लागलं तर मला सांग. मी सगळं देईन तुला, शेवटी हे सगळं तुझंच आहे ना?


आणि मग तिचं महिन्याचं वेतन मोहनच्या हातात गेलं ते अगदी कायमचंच. तो तिला महिनाभरासाठी अगदी ठराविक पैसे द्यायचा, तेही सासूच्या देखरेखीत.

तिच्या सासूबाईंचा स्वभाव तर अजून विचित्र होता. त्या सतत तिला कमी लेखायच्या, तिच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करायच्या. तिच्या पेहरावापासून, बोलण्याच्या पद्धतीपर्यंत, तर दिसण्यापासून त्यांना तिचं काहीच पसंत नव्हतं. पण सर्वांत त्रासदायक गोष्ट म्हणजे, तिच्या नवऱ्याने प्रत्येक वेळी आईची बाजू घेतली.

"आईच्या विरोधात काहीही बोलायचं नाही. आईचं मन दुखावलं तर मला सहन होणार नाही,"

असं मोहन सतत तिला ठासून सांगायचा. आणि सुलोचना बिचारी हे गुपचूप सहन करायची. तिची हिंमतच झाली नाही कधी त्याच्या विरोधात जायची. कारण ती रंगाने सावली असल्याकारणाने तिचं जमत नव्हतं. त्यात तिला सावत्र आईचा खूपच जाच होता. त्यामुळे आलेल्या स्थळाला तिला न विचारता तिच्या वडिलांनी देऊन टाकलं. रंगाने उजळ असलेल्या मोहनने देखील तिची सरकारी नोकरी पाहुनच होकार दिला पण तिला लग्नाच्या पाहिल्या दिवसापासून ताब्यात ठेवलं.

तिला काहीही बोलण्याचा अधिकार नव्हता. सुलोचनाने नवऱ्याच्या हाती पगार देण्याच जरी मान्य केल असल, तरी कधी कधी तिला वाटायचं की आपल्यालाही काहीतरी हक्क असावा. दिवाळी आली की तिला एकच साडी मिळायची. आणि त्या सेम तशीच साडी तिच्या नवऱ्याच्या बहिणीला भेट दिली जायची. तिने विचारलं तर त्यावर सासूबाईंचं उत्तर ठरलेलं होतं,

"तू घरातली आहेस, तुला काय कमी पडतंय? आणि माझ्या मुलीला दिली तशीच साडी, तर तुझं काय जातंय???"



ह्यावर तिला काही बोलता यायचं नाही.

सुलोचना किती दिवस सहन करेल?
क्रमश आ ती स्वतः

🎭 Series Post

View all