Login

Stritva Bhag ६९

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग ६९
क्रमश: भाग ६८
प्रसाद आणि रागिणीचे अल्मोस्ट अर्धे प्रॉब्लेम्स सॉल्व झाले होते .. पोलिसांकडे केस गेल्यामुळे पोलीस त्या अपराध्याला शोधत होते .. ई-मेल आय डी वरून त्याचे लोकेशन ट्रेस करत होते .. कधी गोवा , कधी पुणे कधी मुंबई आणि कधी सिंगापूर कधी दुबई असे लोकेशन दिसायचे .. बहुदा तो अपराधी कॅन्टिन्यूअस प्रवास करत असे ..
लिझाला शुद्ध आल्यावर पोलिसांनी तिला भेटून त्याचे स्केच तयार करून घेतले आणि सगळीकडे पाठवण्यात आले .. लिझाच्या मोबाईल वर तो कोणत्याही अननोन नंबर वरून कॉल करून तिला धमकावयाचा त्यामुळे लीझाचा मोबाईल पोलिसांनी त्यांच्याकडे घेतला आणि आलेले कॉल डिडेटल्स वरून त्याचे लोकेशन शोधायचे काम खूप जोरात चालू होते ..
शिवाय रागिणी आणि रोहन दोघांनी मिळवून ल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून ते लोक कसे फसले हे ऐकून घेतले .. बऱ्याच जणांना ट्रॅव्हल करता नाच ओळख वाढवून शिकार बनवण्यात आले ..
लिझा ने सांगितलेले कॅफे त्याचे CCTV फुटेज चेक करण्यात आले आणि त्यात तो बऱ्याचदा दिसला होता .. तिथे CCTV फुटेज वरून असे कळले कि तो स्वतः गुंगीचे औषध कॉफीमध्ये मोठ्या शिताफीने टाकायचा .. कोणाला कळणार पण नाही अशा पद्धतीने .. पण त्याचा अजून एक साथीदार जो कि बुरख्या मध्ये कायम त्याच्या बरोबर वावरताना दिसला .. ती व्यक्ती बुरख्या मध्ये असल्याने नक्की कोण आहे हे कळू शकले नाही .. हॉटेल चा मालक निर्दोष सध्या तरी दिसत होता .. पण राहून राहून एकच पोलिसांना वाटे कि एवढी बेशुद्ध व्यक्ती कॅफे मधून बाहेर तो व्यक्ती घेऊन जातो तरी कॅफेच्या मालकाला कळत कसे नाही ? पुन्हा पुन्हा CCTV बघितल्यावर असे दिसले कि जेव्हा माणूस शुद्धीत असतो तेव्हाच तो त्याला बाहेर काढतो .. आणि लगेच कार मध्ये बसवून घेऊन जातो .. आणि कार मध्ये बसल्यावर कदाचित बेशुद्ध पडत असावे
मग CCTV मध्ये कार नंबर मिळतोय का ते बघण्यात आले .. म्हणजे तो एकटाच आहे कि त्याचे रॅकेट आहे .. यावर पोलिसांचा शोध चालू होता .. लिझा आणि प्रसाद ने सांगितलेल्या फ्लॅट वर पोलीस दबा धरून बसले होते पण गेले कित्येक दिवस तो फ्लॅट बंदच होता .. त्यामुळे काहीच कळत नव्हते .. पण व्हिसिटर्स एन्ट्री वरून अफसाना , शाहिद आणि अब्दुल अशी तीन नावे प्रामुख्याने समोर आली ..
काही केल्या त्यांचे लोकेशन सापडेना .. पोलिसांनी सर्वांना सांगितले कि कोणीही पैसे ट्रान्सफर करू नका .. म्हणजे तो काहीतरी ऍक्शन घेईल आणि मग त्याला पकडू शकतो ..
कधी एकदा तो पकडला जाईल याची सर्वच जण वाट बघत होते .. पोलिसांनी जणू सापळाच लावून ठेवला होता ..आणि खरंच त्याला कोणीही पैसे न पाठवल्यामुळे त्याचे पेशन्स संपले होते आणि त्याने सर्वांना ई-मेल पाठवला .. पैसे लवकर ट्रान्सफर करा नाहीतर फोटो इंटरनेट वर अपलोड करेन ..
प्रसादने रागिणीला मेसेज दाखवला प्रसाद जाम वैतागला होता
प्रसाद " यार रागिणी , हि इज स्ट्रॉंग .. आपली इतकी तयारी पण कमी पडतेय .. त्याचा ई-मेल आलाय .. कि पैसे १ तासांत नाही पाठवले तर तो सगळे फोटो इंटरनेट वर अपलोड करेल .."
रागिणी " प्रसाद .. पोलिसांना पाठव तो ई-मेल .. “लगेचच रोहनच्या मदतीने तो ई-मेल केस हॅन्डल करणाऱ्या ऑफिसरला पाठवण्यात आला आणि त्याचे लोकेशन ट्रेस करू लागले .. त्याने एका सायबर कॅफे मधून सर्वांना ई-मेल पाठवला होता
अभय त्रिवेणी आणि प्रसाद रागिणी त्यांच्या नेहमीच्या कॅफे मध्ये बसले होते .
रागिणी वॉशरूम मधून बाहेर आली तर जेन्टस टॉयलेटच्या जवळ एक बुरखा घातलेली बाई तिला दिसली .. जरा विचित्रच वाटले तिला कारण उंची इतकी त्या बाईची .. तो बुरखा कसाबसा पुरत होता तिला .. झटकन रागिणीचे लक्ष त्या बाईच्या पायाकडे गेले तर तिने पायात स्पोर्ट्स शूज घातले होते .. रागिणीकडे पाठ होती तिची आणि कोणाशी तरी फोनवर ती बोलत होती ..
रागिणीला काहीतरी विचित्र वाटले .. तिने तिथूनच प्रसादला मेसेज केला आणि वॉशरूम जवळ बोलवून घेतले . प्रसाद लगेचच धावत आला तिथे ..
प्रसाद तिथे येइ पर्यंत ती विचित्र वाटणारी स्त्री फोन वर बोलत पुढे पुढे चालत गेली .. आणि एका कॉर्नरला अजून दोन लोकांच्यात बसली ..
एक जण पुरुष होता आणि एक दोन स्त्रिया बसल्या होत्या ..
प्रसादने अभय ला खुणावले " पोलिसांना कॉल कर " कारण खरंच त्यातल्या एका स्त्रीने स्पोर्ट्स शूज घातले होते आणि ऍव्हरेज स्त्री पेक्षा जास्त उंच आणि धिप्पाड वाटत होती ..
दोघांचे चेहरे तर दिसत नव्हते .. पण त्याच्याकडे लगेज खूप होते जसे कि आता इथूनच एअरपोर्ट जातील
रागिणी मुद्दामून त्याच कॉर्नर ला त्यांच्या बाजूला असलेल्या रिकाम्या टेबल खुर्चीवर बसली .. म्हणजे ते काय बोलत आहे ते कळेल
प्रसाद जाम वैतागला रागिणीवर .. तो अभय शी बोले पर्यंत हिने हा शहाणपणा केला होता आणि आता ती त्या तिघांच्या एकदम जवळ बसली होती .. उगाच एवढी रिस्क वर कशाला घ्यायची .. प्रसादल एकदम समोर जायाला टेन्शन आले कारण प्रसादचे फोटो त्याच्याकडे आहेत म्हणजे तो प्रसादला लगेच ओळखेल .. म्हणून मग त्याने अभयला आणि त्रिवेणीला तिच्या समोर बसायला पाठवले.. आणि तो मागे थांबला ..
त्याने रोहनला पण फोन केला .. रोहन ने लगेचच पोलिसांना सांगितले आणि पोलिसांना अब्दुलचे लोकेशन त्याच कॅफे मध्ये आहे कळलं होते त्यामुळे पोलीस सुद्धा ह्या कॅफे कडे रवाना झाले होते ..
प्रसाद लिटरली येरझाऱ्या घालत होता ..
रागिणी त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न करत होती
त्यातली एक जण " शाहिद भाई , अभी ना थोडे टाईम के लिये ये सब काम बंद कर दो "
दुसरा " हा अफसाना , अभि तुम लोग नहीं रहोगे तो मैं अकेला क्या कर सकता हूं ।"
अफसाना म्हणजे अभय ला पण खात्रीच पटली कारण कुरिअर बॉय कडून त्यांना मिळालेल्या माहिती नुसार अफसाना नावाची मुलगी तिथे राहत होती जिथे लिझा ने प्रसादला ऑफिसच्या कामासाठी बोलावले होते
अभय ने प्रसादला व्हाट्स अँप वर सांगितले ,, हीच ती गॅन्ग आहे .. आपल्याला ह्यांना थांबवून ठेवावे लागेल .. कारण ते निघायच्या गडबडीत आहेत .. वेटर बिल घेऊन येतोय "
प्रसादने धावतच जाऊन त्या वेटर ला मुद्दामून अडवले " काही तरी मुद्दाम त्यांच्याशी बोलू लागला आणि तो वेटर न थांबता चालत बोलत होता आणि त्यांच्या टेबल पाशी यायला निघाला होता ..
अभय आणि प्रसाद विचार करत होते कि ह्या लोकांना कसे इथे पोलीस येई पर्यंत थांबवावे तोपर्यंत रागिणी आणि त्रिवेणी ने काही प्लॅन केला
त्रिवेणी ने रागिणीच्या अंगावर बॉटल मधले पाणी फेकले
त्रिवेणी "हाऊ डेअर यु ? माझ्याशी असे बोलतेय ? "
रागिणी " यु शट युअर माऊथ " आणि तिने तिच्यावर पाणी उडवले ..हिने पुन्हा तिच्यावर असे पाणी उडवले कि त्या तिघांच्या टेबल वर पाणी पडेल
त्या तिघांनी दुर्लक्ष केले .. हे दोघींनी पाहिले आणि पुन्हा पाणी उडवले .. तसा तो बुरख्यातला तिसरी व्यक्ती पटकन उठली
ती " ए दिखता नहीं क्या ? हम लोग इधर बैठे है ?"
ती व्यक्ती रागात पटकन बोलून गेली पण तिच्या लक्षात आले नाही कि तो स्वतःची आयडेंटी लपवण्यासाठी बुरख्यात आहे .. ती बोलताना पुरुषी आवाजात बोललीय ..
तसा तो शाहिद आणि अफसाना त्याला मागे खेचू लागला ..
रागिणीला जेव्हा कळले कि तो पुरुष आहे .. तशी रागिणी एकदम रणरागिणी झाली
रागिणी " ए ... अब्दुल .. तू अब्दुल आहेस ना .. लाज वाटत नाही एका स्त्री वेशात वावरतोय .. कुणीकडे पळून जायचा विचार आहे ?"
तसा तो पटकन तिच्या अंगावर धावून जाऊ लागला आणि हे सगळे पाहून प्रसाद कसा गप्प बसणार ..
अब्दुलचा हात रागिणीच्या केसांपर्यंत सुद्धा पोहचला नसेल .. प्रसादने त्याचा हात मागेच पकडला
अब्दुल " शाहिद , अफसाना को लंके भाग .. मै इन लोगोंको देखता हूं .. तसे अभयने जाऊन पटकन शाहिदला पकडलं
त्रिवेणी जाऊन अफसानच्या बाजूला उभी राहिली ..
रागिणी " लाज नाही वाटतं का रे ? असली कामं करायला ? तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याला यात अडकवायची "
रागिणी जणू त्याला डोळ्यांनी आग ओकत होती .. आणि त्यातच त्याला जाळून काढायचे होते तिला
अब्दुल ने पटकन प्रसादला एक जोरात हिसका दिला .. तसा प्रसाद जरा लांब ढकलला गेला .. आणि तो सावरे पर्यंत त्याने रागिणीच्या हाताला पकडले आणि तिच्या मानेवर चाकू ठेवला ..
अब्दुल "अभय कडे बघून , सोड त्याला ... "
अब्दुल " त्रिवेणी कडे बघून .. हात लावायचा नाही अफसानाला .. हो बाजूला .. नाहीतर हिचा जीव गेलाच समजा
प्रसाद " ए.... सोड तिला ... आधी लिझा, आता रागिणी , किती स्त्रियांचा आधार घेत जगणार आहेस तू . सोड .. पुरुष असलास तर माझ्याशी लढ "
अब्दुल " ए गप ए " चल वाट सोड , जाऊ दे . हे बघ .. मी हा देश सोडून चाललोय .. मला जाऊ दे .. पोलिसांनी पकडले तर जेल मध्ये टाकतील .. मला जाऊदे तुझी आणि लिझा ची केस कायमची बंद करेन .. खुदा कसम .. मेरे को जाना है अभी इधरसे
अभयने शाहिद ला सोडले .. आणि त्रिवेणीच्या बाजूला येऊन उभा राहिला
प्रसाद " तिला सोड .. तिला जर काय झाले ना तर मी जीव घेईन तुझा " प्रसाद चे डोळे आता आग ओकत होते
अब्दुल " ऐसे कैसे .. अभी यही लड़की मेरा एअर पोर्ट तक का तिकीट है "
शाहिद आणि अफसाना " बॅग्स उचलू लागले आणि अब्दुल रागिणीला खेचत खेचत पुढे चालत होता
प्रसाद आणि अभय रागिणी ला तो काही करू नये म्हणून थोडे लांब आणि मागेच थांबले ते लोक जरासे पुढे गेले असतील तर प्रसादने मागून एक तिकडची जवळची एक प्लेट त्याच्या पायाच्या पोटरीवर भिरकावली ,, आणि क्षणांत तो पायातुन वाकला गेला नि रागिणी पुढे ढकलली गेली ..
रागिणी समोरच्या टेबलवर आदळली आणि तिच्या कपाळाच्या एका बाजूने भळभळ रक्त वाहू लागले ..
तो जो खाली पडला होता तो पुन्हा वर उठायच्या आतच अभय आणि प्रसादने त्याला दोघांनी पकडले .. दोन्ही बाजूने
त्रिवेणी रागिणी जवळ गेली तर .. रागिणी तिच्या हातांवर बेशुद्ध पडली ..
शाहिद आणि अफसाना बॅग्स घेऊन गेट च्या बाहेर जात होते तर गेट च्या आत रोहन पोलीस घेऊन आला .. आणि एके मागो माग एकी असे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतली ..

🎭 Series Post

View all