स्त्रीत्व भाग १६

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग १६
क्रमश : भाग १५
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादचे आई बाबा त्यांच्या गावी निघून गेले .. आनंदात .. आपली मुलं आता संसारात रमली असेच त्या दोघांना वाटले.
रागिणी सकाळी उठली आणि तिची बॅग भरू लागली ..
रागाने पटपट तिने तिचे सामान बॅगेत भरून झाले .. जीन्स आणि टीशर्ट घालून ती तर आज एकदम भारी दिसत होती
रागिणी ने प्रसाद ला उठवले
रागिणी " प्रसाद .. ह्या बॅग्स एकदा चेक कर .. ह्यात तुमची काही वस्तू नाहीये असे मला एका कागदावर लिहून दे .. मी निघून जातेय इथून .. मला तुझ्या बरोबर रहायला काहीच इंटरेस्ट नाहीये .. तू बघून घे तुझ्या घरी काय सांगायचे ते .. आणि एक लग्न करण्या पेक्षा भाड्याने बायको मिळते का ते बघ .. म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू चांगला वागशील आणि नको असेल तेव्हा तिरसटा सारखा वागशील ?"
प्रसाद " काय झालंय ? उगाच कशाला राईचा पर्वत करते ग ? आणि जायच्या धमक्या कुणाला देतेस ? या शहरात तुझ्या ओळखीचे तरी कोण आहे का ? "
रागिणी " दयाटस नन ऑफ युअर कन्सर्न .. मी माझे बघून घेईन .. मी सेल्फ डिपेन्डन्ट आहे आणि माझे ना अक्खे आयुष्य हॉस्टेलला गेलंय .. त्यामुळे एकटीने कसे रहायचं ते मला चांगलेच जमते .. तू मला फसवलं आहेस .. आणि या बद्दल मी तुझ्यावर केसही टाकू शकते .. पण जा तुला मी माझ्या कडून मोकळे केलं .. चल बॅग चेक कर पटकन .. मला वेळ नाहीये .. मला बँकेत जायला उशीर होतोय .. आज रात्री मी इथे राहीन .. उद्या सकाळी मी माझी सोय केलेली असेल .. "
रागिणीचा पारा खुपच चढला होता
प्रसाद " हे काय ? आज नाश्ता नाही बनवलास का ?"
रागिणी " मी काय नोकर आहे का रे तुझी ? तुझा नाश्ता बनव , डबा बनव , कपडे धु , इस्त्री कर .. काय केले नाही मी ते बोल आणि तू निर्लज्ज वरती माझ्या प्रेमाला वासना म्हणतोस ? तुला कळतो का रे फरक वासना आणि प्रेम मधला ? "
प्रसाद " ए .. हॅलो .. नीट बोलायचं माझ्याशी .. आणि मी तुला सांगितलेलं का माझी काम करायला ?" घे तुला पैसे ट्रान्फर करतो .. किती करू १०००० करतो . आधीची बाई सगळे काम ८००० रुपयात करायची .. तुला म्हणून १०००० हजार देतो " आणि त्याने तिला G pe केले ..
आता तर तिचा खूपच भडका उडाला .. तिने जाऊन त्याची कॉलरच पकडली
रागिणी " नाही तुला माझे पाय पकडून माफी मागायला लावली तर नाव लावणार नाही रागिणी प्रसाद ****** " डोळ्यांत अश्रू आग ओकत होते ..
तेवढ्यात मागे काहीतरी पडल्याचा आवाज आला तर पुढचे दार उघडे होते आणि उज्वला शेखरच्या हातात पडली होती
प्रसाद आणि रागिणी दोघी " आई ... " म्हणून ओरडत दारा जवळ गेले ..
------------------------------------
सकाळी स्पृहा उठली तर सुनंदा होती तिच्या जवळ .. उठली आणि तिने आवरून तिचा कालचा ड्रेस घातला .. घरी जायच्या आधी एकदा आदिला बघायला म्हणून वर जात होती तर ती किचन मध्ये गेली आणि तिने चहा केला त्याच्यासाठी .. बाजूलाच थर्मास होता त्यात भरला .. बाहेरच आदिराज ची सॅक होती .. त्यातला नोटबुक चा एक कागद काढला आणि चिठ्ठी लिहिली
डिअर आदी ,
मी घरी जातेय .. तुझ्या साठी चहा करून ठेवलाय .. उठलास कि नक्की घे .. काल नाही बोलू शकले पण आज बोलते " आय लव्ह यु आदिराज .. "पण लक्षात ठेव हा .. तुझे पैसे . घर बघून नाही बोलत मी ..मी दि आदिराज ओनर ऑफ फॅक्टरीज त्याच्यावर नाही प्रेम करत .. मी माझ्या आदी वर प्रेम करतेय .. मला खरंच तुझ्यातला साधेपणा , प्रामाणिकपणा जास्त भावला .. तुझ्या मॉम डॅडने तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत .. आता त्यांची स्वप्न पूर्ण करायची वेळ आहे असे समज आणि १०० टक्के स्वतःला कामात झोकून दे .. तुला मोस्ट सक्स्सेफुल झालेलं बघायचंय मला .. बाकी सगळे आपण ठरवल्या प्रमाणे होऊ दे हीच देवीमाते ला माझी प्रार्थना असेल ..
बाय ..
हि चिठ्ठी त्याच्या रूम च्या टेबल वर ठेवून आणि त्यावर थर्मास ठेवून स्पृहा तिचे आवरून सहाच्या ट्रेन साठी घरी जायला घरा बाहेर पडली ..
गेट वरून आदिला कॉल गेला कि काल आलेली मुलगी घरी जायला निघालीय .. जाऊ देऊ का ? चालत निघाली आहे "
तसा आदी ने सांगितले मी दोन मिनिटात गेट वर पोहचतो .. तुम्ही तिला थांबवून ठेवा .. पटकन चेहऱ्यावर पाणी वरच्या वर ब्रश करून आदी कार घेऊन गेट जवळ आला ..
स्पृहा " मी जाईन "
आदिराज " आय सेड गेट इन " त्याचा आवाज ऐकूनच ती पटकन आत बसली .. बसल्या बसल्याच त्याने सीट बेल्ट लावून दिला
स्पृहा " तू कशाला उठलास ? झोपायचं होतं ना ?"
आदिराज "मला न भेटता जाणार होतीस ?"
स्पृहा " नाही .. मी तुला भेटूनच निघाले .. तू झोपला होतास म्हणून नाही उठवलं मी तुला ?"
आदिराज " घराचा ऍड्रेस दे ...मी तुला घराच्या जवळ सोडेन .. मला घर बघायचंय तुझं? मला माहित असलं पाहिजे तुझं घर .. आणि एक.. जरी मी तुझ्या घरी नाही येऊ शकत तरी तू आपल्या घरी कधीही येऊ शकतेस .. तुला आता ऍड्रेस माहीतच आहे .. तुला आपल्या ड्राइवरचा नंबर देऊन ठेवतो .. तुला पाहिजे तेव्हा तू कार बोलावून घेऊ शकतेस .. आणि मला केलास तरी चालेल .. मी तर २४ तास अव्हेलेबल आहे तुझ्यासाठी "
स्पृहा " आदी काही गरज नाहीये याची ? मला सवय आहे ट्रेन ने जायची .. मी करेन मॅनेज "
आदिराज " म्हणजे तू मला कॉल करणार नाहीस ना ?"
स्पृहा " आदी .. आपले काय ठरलंय ?"
आदिराज " अरे हो .. पण फोनवर पण नाही बोलणार का तू ? कसे काय राहणार मी ?"
स्पृहा " आदिराज .. मला ट्रेन स्टेशन ला सोड .. मी तुला ऍड्रेस देते .. तू नंतर एकटा कधीही ये आणि बाहेरच्या बाहेरून घर बघून निघून जा "
आदिराज " ठीक आहे "
आणि त्याने गाडी स्टेशन कडे वळवली ..आणि स्टेशनच्या बाहेर गाडी थांबली
स्पृहा " आदी .. निघू मी .. मला जायला पाहिजे आता .. नाहीतर ट्रेन मिस होईल माझी .. "
आदिराजने तिचा हात हातात घेतला आणि हातावर ओठ ठेवले " प्लिज स्वतःची काळजी घे .. माझ्यासाठी .. प्लिज "
स्पृहा " तू पण तुझी काळजी घे .. खूप मन लावून ऑफिस मध्ये काम कर .. तुला माहितेय एका स्त्रीला सर्वात जास्त आनंद कधी होतो ?"
आदी "कधी ?"
स्पृहा " जेव्हा तिचा नवरा खूप मोठा माणूस होतो .. त्याचे समाजात नावं होते .. सक्सेसफुल होतो "
आदी "अच्छा !! मी नक्की नक्की तुला हा आनंद मिळवून देण्याचा प्रयन्त करेन "
स्पृहा " मला खात्री आहे .. तू नक्की यशस्वी होशील .. तुला मोठा बिझनेस मॅन ऑफ द इअर असा अवॉर्ड मिळेल .. तुझा फोटो बिझनेस मॅगझीन च्या कव्हरपेज वर असेल "
स्पृहा उघड्या डोळ्यांनी आदीला असा अवॉर्ड घेताना बघत होती
आदी " मग मी सांगेन कि हा अवार्ड मला माझ्या बायकोमुळे मिळाला "
स्पृहा " नाही .. तू म्हणायचंस .. हा अवार्ड मला माझ्या मॉम डॅड आणि बायको मुळे मिळाला "
आदी " ठीक आहे .. तू मला स्पीच लिहून दे .. ते मी बोलेन "
आणि दोघेही खळखळून हसले .. पण .. डोळे का भरून आले होते .. उगाचच .. विरहाची भीती .. डोळ्यांनाचं कळली होती फक्त ..
आदिराज " आज कॉलेजला येशील का ?"
स्पृहा " हो येईन "
आदिराज " ठीक आहे .. तुझ्या समोरच सगळ्यांना सांगेन कि हिला आता चिडवू नका "
स्पृहा तशी गालात हसली .. आणि लगेचच निघून गेली .. आदिराज तिला ती दिसे पर्यंत बाय करत होता ..
दोघांच्याही डोळ्यांत पाणी होते ..
[इक वारि आ भी जा यारा
इक वारि आ..
राह तकुं मैं बेचारा
इक वारि आ..] x 2
ढल रही शाम है
दिल तेरे नाम है
इसकी आदत बनी है तेरी यारियां
चाँद हूँ मैं, तू है तारा
इक वारि आ
इक वारि आ भी जा यारा
इक वारि आ..
ये इश्क की इन्तेहां
लेने लगी इम्तेहान
हद से गुजरने लगी हैं मेरी चाहतें
धड़कन की बेताबियाँ
करने लगी इल्तेजा
लग जा गले से ज़रा
तो मिले राहतें
बस तुझे चाहना
इक येही काम है
काम आने लगी सारी बेकरारियां
उसपे शमा भी है प्यारा
इक वारि आ
इक वारि आ भी जा यारा
इक वारि आ..
https://www.youtube.com/watch?v=zXLgYBSdv74&ab_channel=T-Series
------------------------
प्रसादने आणि रागिणीने मिळून आईला उचलले आणि हॉस्पिटलला नेले .. लगेच ट्रीटमेंट सुरु झाली म्हणून हार्ट अटॅक येता येता वाचला .. अर्धा एक तासाच्या ट्रीटमेंट नंतर त्यांना शुद्ध आली ..
बाहेर रागिणी आणि प्रसाद फेऱ्या मारत होते .. आणि बाबा शांतपणे एकदम निराश ,हताश होऊन बसले होते .. जे काही त्या दोघांनी पाहिले होते त्यावर विश्वासच नव्हता बसता त्यांचा पण
तेवढ्यात नर्सने सांगितले कि "पेशन्ट ला शुद्ध आलीय . रागिणी कोण आहे त्यांना भेटायचय त्यांना "
रागिणी लगेचच आत जायला निघाली तर प्रसाद " जस्ट स्टे अवे .. शी इज माय मदर.. आय कॅन टेक केअर ऑफ ऑफ हर "
नर्स " सॉरी त्यांना फक्त आणि फक्त रागिणी लाच भेटायचंय "
रागिणीने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि आतमध्ये निघून गेली..
उज्वलाने रागिणी समोर लिटरली हात जोडले ..
रागिणी " आई काय करताय ?
प्रसाद बाहेरून काचेतून आत मध्ये बघत होता .. दोघीजणी बराच वेळ बोलत होत्या .. एकदा उज्वला एकदा रागिणी दोघी एकमेकींना हात जोडत होत्या आणि डोळ्यांत अश्रू वाहत होते ..

🎭 Series Post

View all