स्त्रीत्व भाग 13

Story Of Women's Facing Tough Situation

स्त्रीत्व भाग १३

क्रमश: भाग १२

सागर आदिराजशी बोलून खूप हताश झाला होता .. रात्री त्याला खूप बेचैनी आली आली होती .. कसाबसा जेवला आणि निहारिकाला भेटायला आला
निहारिका रडतच " सागर .. तुला कळले का ? सुनंदा नावाच्या कोणत्या तरी मैत्रिणी च्या घरी स्पृहा राहिलीय .. मी आताच काकूंना फोन केला होता ..
सागर " मला माहितेय स्पृहा कुणीकडे आहे ते ?"
निहारिका " अरे मग चल .. बसलास काय ? तू बाबांची कार घे .. आपण जाऊ आणि तिला घेऊन येऊना .. कोण कुठची सुनंदा मला तर माहित नाही ? ती नक्कीच काही तरी प्रॉब्लेम मध्ये असेल .. सागर मला जाम भीती वाटतेय ?"
सागर " भीती मला पण वाटतेय .. आपली स्पृहा धोक्यात आहे .. पण तिला तिथून कसे बाहेर काढू ? काहीच कळत नाहीये ?"
निहारिका " आपण पोलिसांची मदत घेऊ .. चल ना ..सागर .. असा थंड कसा काय राहू शकतोस तू ? नक्की कुठे आहे माझी स्पृहा "
सागर " आदिराजच्या घरी ?"
निहारिका " काय ? काय वेड लागलय का तुला ? काहीपण काय बोलतोय ?"
सागर " हे खरं आहे ? माझे आदिराज जवळ बोलणे झालंय .. मला म्हणाला " स्टे आऊट ऑफ धिस .. ती माझ्या बरोबर सेफ आहे .. माझी होणारी बायको आहे ती "
निहारिका " मला नंबर दे त्याचा ? मी बोलते त्याच्याशी ?"
सागर " काही उपयोग होणार नाही ?"
निहारिका " अरे पण ती .. खरंच सेफ आहे कि नाही हे बघणे गरजेचे आहे ?"
निहारिकाच्या हट्टापायी सागरने पुन्हा एकदा आदिराजच्या मोबाईल वर फोन लावला
सागर " स्पृहा कशी आहे ? मला आणि निहारिकाला बोलायचंय तिच्याशी ?"
आदिराज " हा एक मिनिट देतो तिच्याकडे "
आदिराज " स्पृहा तुझ्यासाठी फोन आलाय "
स्पृहा " हॅलो .. "
निहारिका " हॅलो .. स्पृहा ? कशी आहेस तू ? तू ठीक आहेस ना ? तू .. तू घाबरू नकोस ? मी आणि सागर आता लगेच निघतो .. बाबांची कार घेऊन .. तुला घ्यायला येतो आम्ही "
स्पृहा ने आदिराज कडे बघितले
आदिराजला वाटले कि आता ती जायला तयार होईल .. त्याला आज अजून खूप गप्पा मारायच्या होत्या तिच्याशी .. तिच्या कडून ऐकायच्या होत्या .. पण निहारिका जर घ्यायला येत असेल तर ते सगळ्यांत सेफ होते ..
स्पृहा " निहारिका .. मी ठीक आहे इकडे .. म्हणजे मी माझ्या स्वखुशीने थांबली आहे इकडे .. आणि मी आदिराज बरोबर सेफ आहे .. बाकी सगळे मी तुला उद्या सांगेन . माझि काळजी नको करू .. आदिराज आपल्याला वाटतो तितका वाईट मुलगा नाहीये "
आदिराज तिच्याकडे एकटक पाहत होता .. मोठ्या विश्वासाने ती निहारिकाला सांगत होती .. प्रेम नाही कबुल केलं तरी मी वाईट नाहीये हे तरी तिला कळलं हेच त्याच्यासाठी भरपूर होते .
निहारिका " हो .. अग तो चांगला मुलगा असेलही .. तुला त्याने मदतही केली असेल .. पण आता माझ्या घरी यायला काय प्रॉब्लेम आह तुला ? आम्ही दोघे येतो ना तुला घ्यायला ? पत्ता पाठव ?
स्पृहा " अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहिल्यात अग .. पुन्हा अशी वेळ कधी येईल सांगू शकत नाही .. आज मलाही बोलायला जमतंय .. तर सगळे बोलून घेते .. आणि खरंच मी सेफ आहे त्याच्या बरोबर .. "
निहारिका " ठीक आहे .. सॉरी .. आज सकाळी तुला माझ्यामुळे एकटीला जावे लागले "
स्पृहा " हमम .. त्यावर आपण उदया बोलू .."
निहारिका " ठीक आहे .. आणि रात्री सुद्धा काहीही वाटले तर लगेच कॉल कर .. मी कधीही येऊ शकते "
स्पृहा " हो .. गुड नाईट .. "
आदिराज खुश झाला
आदिराज " थँक थँक यु .. तू आज थांबल्या बद्दल .. थँक यु "
---------------------------------------------------------
रागिणी संध्याकाळी बँकेतून घरी येताना तिच्या घराच्या स्टेशन वर उतरली आणि स्टेशन बाहेर आली तर तिला एक सुखद धक्का बसला .. खुद्द प्रसाद तिला घ्यायला स्टेशन ला आला होता ..
प्रसाद " हॅलो "
रागिणी " हॅलो .. तू कसा काय ? आज आलास ?"
प्रसाद " बस गाडीत .. मग सांगतो "
रागिणी आनंदातच गाडीत बसली
प्रसाद " मग कसा गेला आजचा दिवस ? बाकी आज जेवण खूप छान बनवले होतेस .. आई आणि बाबा तुझे खूप कौतुक करत होते . "
रागिणी " अरे वाह .. आज तू पण मला माणसात गणना केलीस म्हणायची "
प्रसाद " सॉरी जरा मी जास्तच वाईट वागतोय तुझ्याशी ? थोडे वेगळे टेन्शन आहे . आणि उगाचच तू या मध्ये भरडली जातेस "
रागिणी " प्रसाद .. मी काही मदत करू का ? म्हणजे मला सांगितलेस तर मी नक्की तुला काहीतरी हेल्प करेन .. एकदा सांगून तर बघ .. "
प्रसाद " नाही नको .. सध्या तरी काही नाही "
गप्पा मारत हसत दोघे घरी आले .. दोघांना एकत्र बघून आई आणि बाबा एकदम खुश झाले .. आणि हेच प्रसाद ला साध्य करायचे होते .. आई बाबांना दर्शवून द्यायचे होते कि आमचं सगळं व्ययस्थित आहे ..
दोघे हसत बेडरूम मध्ये गेले
प्रसाद " रागिणी .. गिजर ऑन कर ना .. आय वॉन्ट टू टेक बाथ "
रागिणीने गरम पाणी काढायला लावले .. त्याचे घालायचे कपडे काढून ठेवले .. हे सगळे आई आणि बाबा बघत होते .. रागिणी पण एकदम खुश झाली होती .. प्रसाद छान बोलतोय .. बायको सारखा वागवतोय .कदाचित सुधारला वाटतं .. आणि आता तो सुधारलाय तर उगाच विषय वाढवायचा कशाला .. आणि ती पण एकदम बायको मोड वर गेली ..
ती संध्याकाळ चौघे मस्त गप्पा मारत जेवले ... जेवण झाल्यावर चौघे पत्ते खेळले .. मध्ये मध्ये चेष्टा मस्करी चालूच होती .. आनंदाने भरले होते घर .. कोणाचीच दृष्ट लागू नये असेच तिथले वातावरण होते ..
पत्ते खेळल्यावर सगळे झोपायला निघाले ..
रागिणी आणि प्रसाद दोघे बेडरूम मध्ये आले आणि आनंदात झोपले ..
--------------------------------------------
सुनील हॉस्पिटल आणि घराच्या चकरा मारत होता .. तेजू चे ऑपरेशन झाले होते .. तिचे आई बाबा आले होते .. सुनील ची आई पण आली होती .. जे झाले त्या बद्दल सगळ्यांचं वाईट वाटत होते .. आणि सुनील बिचारा .. आपल्या कोणत्याही कर्तव्यात कमी पडत नव्हता .. जावई असावा तर असा .. नवरा असावा तर असा .. आणि मुलगा असावा असा .. असाच एक चांगला मुलगा होता तो ..
त्याला तेजूला समजवायचं होते कि हे सगळे आता आपण थांबवू .. नको आता .. तेजू रिकव्हर झाली कि हळू हळू तिला समजवायचं होते त्याला .. आणि तिच्या डोक्यातून बाळाचं फ्याड .. हो त्याच्यासाठी आता हे फ्याडंच झाले होते ..
--------------------------------
रुक्मिणी आणि मोहिनी दोघींनी मस्त पार्टी केली
मोहिनी " आजे .. आज अशी नाराज का आहेस ग ?"
रुक्मिणी " खरं आहे .. यकटी राहून कंटाळलोय मी .. कोना साठी आणि कशासाठी जगू असं झालंय बघ "
मोहिनी " आज्जे .. काय ग असला विचार करत बसलीस ? मला आई बाप हाय .. दिसतो माझा बाप मला ट्रेन मध्ये कधी कधी .. तो नजर चुकवतो .. आता नाही बघू शकत माझ्याकडे .. काय फरक न्हाय पडत .. कोण असो नाहीतर नसो .. जिन्दगी है .. जिना पडेगा "
रुक्मिणी " व्हय .. ते पण खरं हाय ग .. पण आता ताकद नाही राहिली माझ्यात .. टोपली उंचवलत नाही .. काम न्हाही केलं तर पोटाचं काय ? हि अशी पार्टी रोज रोज तर न्हाय ना करू शकत आपण ?"
मोहिनी " कशाला नको त्या फनद्यात पडते ग . आजचा दिवस आपला म्हणायचं ना जगायचं .. "
रुक्मणी" असे न्हाई ग .. मरून गेले तर चार लोक खांदा द्यायला पण न्हाईत .. “

बोलता बोलता रुक्मिणी तिला नक्की कशाची भीती वाटतेय ते बलून दाखवलेच

रुक्मिणी " अग म्या मेलो तर कोनाला कळणार पण न्हाई ..आणि कोण रडणार पण न्हाई .. "

मोहिनी " अस्से कसं .. मी ह्या ना तुझ्यासाठी .. तू कशाला काळजी करतेस ?"

रुक्मिणी " अग .. तू जर न्हाई आलीस आणि मी आत खोलीत मरून पडलो तर .. जवा घाण वास येईल ना तवा लोकांसला कळलं .. आणि मग मुनिसिपाल्टी वाले मेलेल्या कुत्र्याला नेतात तसे मला नेतील "

मोहिनी " आजे .. " जरा ओरडलीच ती " काय चालवलय .. सगळी पार्टीची मज्जा घालवलीस तू .. तू ना असे बोलायला लागली ना तर मी पण येणं बंद करिन हा "
रुक्मिणी " न्हाय ग .. पोरी अस नग बोलू .. तुझ्याशिवाय कोण हाय ह्या म्हातारीला "
मोहिनी " बरं चल झोप आता .. आज थकलीय तू .. म्हणून असे विचार मनात येतात तुझ्या "