मुलीची स्त्री कधी झाले कळलच नाही
आई-बाबांकडे हट्ट करणारी
कधी मुलांचा हट्ट पुरवू लागले कळलच नाही
हसणारी बागडणारी पटकन रुसणारी
कधी सगळ्यांना समजून घ्यायला लागली
कळलच नाही
शाळेतल्या, मैत्रिणींच्या, सगळ्या गोष्टी
आईला सांगणारी
गोष्टी मनात कधी ठेवायला लागेल कळलच नाही
आईच्या पदरात राहणारी
आई शिवाय पान ही हलत नसणारी
सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला
कधी शिकली कळलच नाही
आई तू घरात नसली की करमत नाही म्हणणारी
स्वतः आईची जबाबदारी कधी पार पडायला लागले
कळलच नाही
एका कन्या ची स्त्री, बायको, आई, सून
कधी झाले मला कळलंच नाही.
डॉ. रीया राजपूत
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा