Login

स्त्री स्वतंत्र आहे का ?

नाते नवरा बायकोचे


स्त्री स्वतंत्र आहे का ??


आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारी माणसं असतात.प्रत्येक माणसाशी आपलं एक विशिष्ठ नातं असत. काही नाती कठीण परिस्थितीत तुटून जातात तर काही नाती आपल्या सोबत राहतात.जी नाती आपल्या सोबत राहतात ती आणखी घट्ट होतात.

कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत रहाणारं,एकाच नव्हे तर सात जन्मांची साथ देणारं,आयुष्याची सुख दुःख वाटून घेणारं असं नातं म्हणजे नवरा - बायको च नातं.

असच एक आयुष्यभर सोबत करणार नातं म्हणजे नवरा - बायको च नातं.


नवरा - बायकोच्या नात्यामध्ये अनेक रंग, छटा,चढ - उतार,कठीण परिस्थिती येते पण हे नात कधीही कोलमडत नाही उलट जास्त घट्ट होत जातं कारण या नात्याचा पाया एकमेकांवर च विश्वास,बांधिलकी,जबाबदारी हा असतो. एकमेकांसाठी काहीही करायची तयारी असते या नात्यामध्ये.

पण प्रत्येक नवरा - बायको च नातं अस असत का ?? प्रत्येक नात्यामध्ये समानता,आदर,प्रेम विश्वास,स्वातंत्र्य असते का ??

कसं असायला हवं नवरा - बायको च नातं ???

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत आजही बऱ्याच घरांमधे पुरुष म्हणतील तीच पूर्व दिशा असते.सगळ्या गोष्टींचे निर्णय पुरुष च घेतात.नवरे म्हणतील तसच बायकांना वागावं लागतं.बायकोचं अस्तित्व,विचार स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य,निर्णय या बाबी लक्षात घेतल्या जात नाहीत.

अशा वेळी बायकोची घुसमट होते.मुलांची शिक्षणं,त्यांचं राहणीमान, खाणं पिणं इतकंच काय तर तिचं स्वतःच रोजचं आयुष्य जगण्याची सुद्धा मुभा तिला नसते.कधी तिला मैत्रिणी सोबत बाहेर जायचं असेल तर नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते.कधी जाणार, कधी येणार,काय काम आहे,जायलाच हवं का,बाहेर का भेटायचे आहे,घरीच का बोलावत नाहीस असे एक ना हजार प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागतात.

मालिका बघत असेल तर तिने घरातील सगळी कामे केली आहेत का हे बघितलं जातं आणि कामे उरकून जरी बायको टीव्ही समोर बसली असेल तरी मला बातम्या किंवा मॅच बघायची आहे काय रोज रोज मालिका बघतेस,उद्या तू घरीच आहेस ना.अस ऐकवलं जात.


मुलं काही चुकीचं वागत,बोलत असतील तर तुझ लक्ष कुठे असत.काय करत असतेस दिवसभर ,घरात बसून मुलांकडे लक्ष देता येत नाही का ?? हे ऐकाव लागतं.

कधी कोणत्या गोष्टीत बायको ने आपलं मत मांडलं तर तू मधे बोलू नकोस, यातलं तुला काय कळतंय ?? हे ऐकुन घ्यावं लागतं.

घरातल्या छोट्या मोठ्या चुकांसाठी बायकोलाच जबाबदार धरलं जातं.मग चूक मुलांची असो,सासू सासर्यांची असो नाहीतर कुटुंबातील बाकी सदस्यांची.

काही झालं तरी अगदी कामवाली बाई जरी आली नाही तरीही बायकोला च दोष दिला जातो.

पण काही चांगलं झालं तर सगळं श्रेय नवरा स्वता: कडे घेतो.म्हणजे उदाहरणार्थ मुलांना चांगले मार्क मिळाले तर मुलं माझ्यावर गेलेत अस म्हणून मोकळे होतात नवरे मंडळी पण या मागे रोज मागे लागून आपल्या बायको ने त्यांचा अभ्यास घेतलाय हे मान्य करणार नाहीत किंवा तिची पाठ थोपटत नाहीत.

बायकोच्या हातात हिशोब करुन पैसे दिले जातात.ती कमावत जरी असली तरी तिच्या पगाराचा हिशोब विचारला जातो.हे फक्त बायको पुरते मर्यादित असते,नवरा कधीच बायको
ल हिशोब देत नाही.

घर हे दोघांचं असत,मुलं दोघांची असतात,घरातील माणसं दोघांची असतात मग जबाबदारी ही दोघांनी मिळून घ्यायला हवी ना.
घर म्हणल्यावर काही कमी जास्त होणारच,चुका होणारच. प्रत्येक गोष्टीसाठी बायकोला जबाबदार धरून कसं चालेल??

घरात लग्न करून आलेली ती व्स्त्री ही एक स्वतंत्र विचारांची,वेगळ्या वातावरणात राहिलेली एक व्यक्ती आहे जी तुमचा हात पकडुन,तुमच्या विश्वासावर पूर्ण आयुष्य तुमच्या सोबत तुमच्या माणसांसोबत तुमच्यासाठी जगणार असते.घरातील लक्ष्मी असते.तिला तिचं व्यक्ती स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य मिळायलाच हवं.

घरात मान,सन्मान,आदर मिळायलाच हवा. तिचं ही एक वेगळं आयुष्य असूच शकत.ज्या मध्ये तिच मित्र मंडळ,नातेवाईक,आई वडील,आवडी निवडी,छंद,कलागुण
असतील.त्या सगळ्या गोष्टी जपण्याचा आणि करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे ज्यामुळे तिला आनंद मिळेल.

जर तुम्हाला तुमची तुमच्या बायको क्या चेहऱ्यावर खरा आनंद बघायचा असेल तर तिचं वेगळं अस्तित्व,स्वातंत्र्य मान्य करा.

तिच्या कलागुणांना वाव द्या.

तिला विचार मांडायला संधी द्या आणि त्यावर विचार करा.

तिला धकातून कटकटीतून मोकळं करा.

सगळ्या बंधनातून मोकळं करा.

वेगळी ओळख निर्माण करू द्या.मोकळे पणाने जगू द्या.तिचा छान मित्र बना.

जास्तीत जास्त वेळ द्या.

बायकोला समजून घ्या.

तिच्या आनंदात सहभागी व्हा.

तिला तिच्या मनासारखं जगू द्या.

तिचे दोष दाखवत बसण्यापेक्षा चांगल्या गुणांची कदर करा.

नातं कोणतही असो नात्यामध्ये विश्वास निर्माण होयला,नातं घट्ट व्हायला वेळ लागतो.जी व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबाला,जबाबदाऱ्या ना आपलं मानते त्या तुमच्या बायकोला अपेक्षा असते ती फक्त समजून घेण्याची,प्रेमाची,आदराची.


शेवटी नवरा - बायको च एकमेकांसाठी असतात आयुष्यभर.