संकेत भाग सतरा.
सदानंदने तिला घरातून धक्के मारून हाकलून दिले, तशाच विस्कटलेल्या कपड्यांच्या अवस्थेत ती घरी आली, समोर सूर्यकांतराव बसले होते. त्यांनी शाल्मलीला तशा अवस्थेत पाहिले आणि धावत जाऊन तिच्या अंगावर स्वतःचा कोट चढवला. मागोमाग शरद आणि घरातील बाकी लोक आले. तिच्या आईने तिला अशा अवस्थेत पाहिले आणि त्या जागीच बेशुध्द झाल्या. सूर्यकांतरावांनी कोणी केले असे विचारले तेंव्हा सगळा प्रकार तिने तिच्या बाबांना सांगितला. त्यांनी वेदनेने व्हीवल झालेल्या आपल्या पोरीला कुशीत घेतले तर शरद तडक सदानंदकडे गेला.
ये ये शरद तुझीच वाट पहात होतो, कशी आहे माझी प्रिय बायको शालू ?? म्हणत सदानंद मोठमोठ्याने हसायला लागला. शरदला आता राग आवरणे शक्य नव्हते त्याने सदानंदवर हल्ला केला पण सदानंद आज पूर्ण तयारी निशी बसला होता. त्याच्या हातात असलेली मिरचीची भुकटी त्याने शरदच्या डोळ्यात टाकली आणि दुसऱ्या हातात असलेला कोयता सरळ त्याच्या पाठीत घातला. शरदने तिथेच शेवटचा श्वास घेतला आणि सदानंदने सूड.
इकडे शरदचे प्रेत सदानंदने दारासमोर फेकले आणि तो पुन्हा निघून गेला. सूर्यकांतराव आता वाट पाहून थकले होते त्यांनी त्यांची काही माणसे सदानंदच्या घराकडे पाठवली पण ती लोकं दारातच थबकली काय झालं बघण्यासाठी सूर्यकांतराव बाहेर आले आणि पोटच्या पोराला मृत अवस्थेत पाहून त्यांनी जागच्या जागीच श्वास सोडला. शाल्मलीने दारात येऊन पाहिले तेंव्हा ती वेडीपिशी झाली.
बिचारी शाल्मली. काय करावे आणि काय नाही तिला काहीच समजत नव्हते. तिच्या खोलीत एकसारखी रडत होती ती. डोळ्यातील पाणी रडून रडून आटले होते आणि डोळे लाल होऊन सुजले होते. तेवढ्यात तिच्या खोलीत कोणीतरी आल्याची चाहूल तिला लागली, तिने मान वर करून पाहिले तर तो सदानंद होता. काय कशा आहात मिसेस सदानंद त्याने मोठ्याने हसत विचारले. तुझ्या भावाची अवस्था पाहून तुझा बाप जागच्या जागी गेला असं ऐकलं मी. अरे रे खूप वाईट झालं ना ?? पण माझा बदला पूर्ण झाला आणि मी खऱ्या अर्थाने मोकळा झालो. मला तर फारच मजा आली. तुझी अवस्था पाहून तुझा भाऊ रागाने मला मारायला आला होता पण तोच मला हा हा हा सदानंद हसत म्हणाला. शाल्मली त्याला काहीच बोलली नाही. तिने तिचे मन घट्ट केले. हो तुझ बरोबर आहे तू तुझा बदल पूर्ण केला आणि मोकळा झाला पण मी अजून मोकळी झाले नाही सदानंद. माझ्या बापाला आणि भावाला तू मारले आणि माझी अवस्था पाहून आई कधीच कोमात गेली. ती नव्वद टक्के गेल्यात जमा आहे. ती पण जगणार नाही माहित आहे मला. त्यामुळे आता माझ्याकडे गमावण्यासारखे काही म्हणजे काहीच उरले नाही सदानंद. मला एक सांग एवढं सगळं करून तुला तुझा बाप मिळाला का ??
तिच्या या प्रश्नाने सदानंद खूप चिडला आणि म्हणाला माझा बाप कधीच मला मिळणार नाही पण तुझा सूड घेऊन मला आत्मिक समाधान नक्कीच मिळाले आहे. अच्छा, खरंच सदानंद ?? शाल्मलीने विचारले ?? तू त्या दिवशी मला पेटीतून काढलेले जे काही कागदपत्रे , पेपर आणि फोटो दाखवले तेवढंच सत्य होत हे कशावरून ?? म्हणजे काय म्हणायचे आहे तुला ?? सदानंदने विचारले. म्हणजे हे सदानंद इथून घरी गेल्यावर माझ्या मनात जितका तुझ्याबद्दल राग होता त्याच्या कितीतरी पटीने तो माझ्या बाबांबद्दल होता. मी त्यांना घरी जाऊन विचारले की तुम्ही असे का वागलात ?? तुमच्या चुकीच्या कर्माची फळं मला भोगावी लागली आहेत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यावर त्यांनी मला असे काही पुरावे दाखवले जे तुझ्या पुराव्या पेक्षा खूप वेगळे होते आणि त्यात अशी बातमी होती की हनुमंत देशमुख यांच्या गैरव्यवहारामुळे कारखान्याला अफाट नुकसान शिवाय सूर्यकांत साबळे यांना सहन करावी लागली मानहानी.
माझ्या बाबांनी तुझ्या बापाला डावा हात मानले आणि अनेक निर्णय ते त्यांच्यावर विश्वास ठेवून घेत होते पण याचाच गैरफायदा तुझ्या बापाने घेतला आणि कारखान्याच्या व्यवहारात अफरातफर केली. त्यामुळे त्यांना खडी फोडायला जेलमध्ये जावं लागलं. पण माझ्या बाबांच्या विरोधात असलेल्या काही लोकांनी उलट सुलट बातम्या छापून आणल्या आणि शिक्षा पूर्ण झाल्यावर माझ्या बाबांनी तुझ्या बापाला एक संधी देण्याचे ठरवले कारण त्यावेळी तू खूप लहान होतास. तुझ्या बापाने केलेल्या चुकीची शिक्षा आयुष्यभर तुला सहन करायला लागू नये म्हणून माझ्या बाबांनी मोठ्या मनाने तुझ्या बापाला संधी द्यायचे ठरवले. तेंव्हा तुझ्या बापाला स्वतःच्या कृत्याची लाज वाटली आणि त्याने जीव दिला. तुझी आई जेंव्हा माझ्या बाबांच्या दारात आली तेंव्हा तिने माझ्या पूर्ण कुटुंबाला त्याचे जबाबदार धरले आणि खूप शिव्या शाप दिले म्हणूनच माझ्या बाबांनी तुझ्या आईला धक्के मारून घराबाहेर काढले. त्यात एक शाप असाही होता की तुझ्या पोरीचं सगळं वाटोळं होईल आणि तेच झालं सदानंद. इथेच तुझी आई थांबली नाही तुझ्या आईने तुला तेच दाखवल आणि सांगितल ज्याने तुझ्या मनात माझ्या बाबांबद्दल राग आणि तिरस्कार निर्माण होईल आणि सुडाची भावना जागृत होईल.
तुझ्याकडे काय पुरावा आहे या सगळ्यांचा ?? त्याने पुरावे मागितले तसे शाल्मलीने तिच्या बाबांनी दिलेले सगळे पुरावे त्याच्या तोंडावर फेकले. त्याने ते पुरावे पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे माझा बाप चुकीचा असताना आईन मला खोटं सांगून माझ्याकडून हे करून घेतलं का ?? सदानंद म्हणाला तशी शाल्मली खुनशी हासून म्हणाली अजूनही तुला प्रश्न पडतो म्हणजे कठीण आहे ना सदानंद ?? पण तुझ्या बाबांनी दाखवलेले पुरावे खरे कशावरून ?? कारण माझे बाबा कधीच खोट बोलत नाहीत आणि त्यांनी माझ्या समोर कृष्णाची शपथ घेऊन तसे सांगितले आहे आणि सगळ्यात महत्वाचे तुझ्यापेक्षा माझा माझ्या बाबांवर विश्वास आहे. तरीही तुला पुरावा हवा असेल तर अजून एक पेपर तुला दाखवते ज्यात तुझ्या बापाने घालवलेली सगळी जमीन माझ्या बाबांनी तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी स्वतः सोडवून आणली. बघ हे त्याचे पेपर. त्याच जमिनीच्या जीवावर तुम्ही जगलात आणि ज्याने जगवले त्यालाच उध्वस्त केलेस तू सदानंद. ते पेपर पाहून सदानंद पुरता चक्रवला आणि तसाच बसून राहिला.
आता काय म्हणणे आहे तुझे ?? यावर सदानंदकडे बोलायला उत्तर नसतेच. तो शांत बसून रहातो. शाल्मली मात्र त्याला निरुत्तर पाहून त्याच्याकडे डोळे फाडून बघते. आता तू काहीही म्हणालास काय आणि काहीही केले काय माज झालेलं नुकसान भरून देऊ शकणार नाहीस सद्या. तू माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाही आणि तुझ्या पापांची शिक्षा मी तुला दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सदानंद तिच्याकडे बघितले तर तिच्या हातात चाकू होता आणि ती सदानंदकडे येत होती. तिचे आक्रमक रूप आणि डोळे पाहून सदानंद घाबरला आणि म्हणाला, हे बघ शाल्मली जे झालं ते व्हायला नको होत पण माझ्या आईवर विश्वास ठेवून तिने सांगितल तेच खर मानून मी असा वागलो. मला खरंच माफ कर. तुला इतकच वाटत होत तर एकदा फक्त एकदा माझ्या बाबांशी बोलायला हवं होतास तू पण तुझी बुद्धी आईच्या ओंजळीने पाणी पीत होती ना .शाल्मली एक एक पाऊल पुढे टाकत होती तसा तसा सदानंद मागे सरकत होता शेवटी तो बेडवर पडला. आठवतंय का तुला तुझ्या पुढे मी भीक मागत होते आणि तेंव्हा अशीच बेडवर पडले होते पण तू दया काय साधी माणुसकी दाखवली नाही. आज माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस सद्या. म्हणून तिने चाकू त्याच्या अंगावर उगारला पण त्याने शाल्मलीचा हात पकडतो.
शाल्मली खूप त्वेषाने आणि जोर लावून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती पण कधी सदानंदच्या शक्तीपुढे तिची ताकद कमी तर कधी पुरेशी पडत होती. बराच वेळ दोघांची झटापट चालू होती. शेवटी सदानंदचा हात बाजूला करत तिने चाकू त्याच्या अगदी गळ्याजवळ धरला आता सदानंदच्या गळ्यातून आरपार चाकू जाणार आणि तो मरणार इतक्यात सदानंदने पायाने तिला लाथ मारली तशी ती मागे टेबलवर पडली तेवढ्यात सदानंद उठला आणि तिच्या हातातला चाकू घेण्यासाठी धावला पण शाल्मली सावरली होती आणि पुन्हा त्याच्यावर वार करायला तयार झाली पण सदानंदच्या शक्तीपुढे तिच्या हातातला चाकू पडला तसा सदानंदने तो घेतला आणि सरळ तिच्या पोटात घातला . शाल्मलीने त्याही अवस्थेत सदानंदला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती खाली कोसळली आणि शेवटच्या क्षणी ही कृष्णाचा धावा करत गतप्राण झाली.
वर्तमान :
डायरी वाचून झाल्यावर आदित्य आणि निशा जरावेळ गप्पच होते. कोणीच कोणाशी काहीच बोलले नाही. निशा खूप भावूक झाली होती, तिने तिचे दोन्ही हात एकमेकात घट्ट गुंफून घेतले होते आणि डोळे मिटलेल्या अवस्थेत ती तशीच बसून होती. काही वेळाने आदित्य जरा नॉर्मल झाला आणि निशाची अवस्था पाहून तिच्या हातांवर स्वतःचा हात ठेवत तो म्हणाला निशा, सावर स्वतःला. निशाच्या बंद डोळ्यातील अश्रू त्याच्या हातावर पडले तसे त्याने निशाकडे पाहिले तर अजूनही तिने डोळे मिटलेलेच होते.
निशा : आदित्यने तिला पुन्हा हाक मारली तशी ती भानावर आली आणि म्हणाली किती वाईट झाले ना शाल्मलीच्या बाबतीत. असे कसे कोणी वागू शकते मला तर काहीच सुचत नाही आदित्य.
आदित्य : आदित्य तिला काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजतो. तो बघतो तर फोन आईचा असतो.
आई : अरे किती वेळ आदी, अजून किती वेळ लागणार आहे तुम्हाला ??
आदित्य : निघतोच आहोत आई आम्ही. काळजी नको करू अर्ध्या तासात पोहचतो म्हणून आदित्य फोन ठेवतो आणि निशाला म्हणतो, निशा हे पाणी पी. शांत हो आणि चल घरात आई आणि मिसेस पत्की वाट पहात आहेत त्यामुळे आपल्याला निघायला हवे.
गाडीत पण निशा खूप गप्प असते. आदित्य पण तिला काही बोलत नाही. दिघे ही जेवतात आणि झोपायला जातात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा