.संकेत भाग पंधरा.
शाल्मली आणि सदानंद रस्त्यात एकदम गप्प असतात. एक दोन वेळा त्यांची नजरानजर होते फक्त. सदानंदचे गाव येते. एका छोट्या पण नीट नेटक्या घरासमोर येऊन तो उभा राहतो आणि शाल्मलीला म्हणतो, हे आपले घर आहे शाल्मली. शाल्मली तिथेच जराशी थांबते, आजवर मोठ्या बंगल्यात राहिलेल्या शाल्मलीला इतक्या छोट्या घरात रहावे लागणार या विचाराने ती जरा थबकते. तिच्या मनाची घालमेल सदानंदच्या लक्षात येते आणि तो म्हणतो, शाल्मली मला कळतंय तुला आता कसे वाटत असेल ते पण इथे तुला मी कसलाही त्रास होऊ देणार नाही प्लीज विश्वास ठेव.
शाल्मली कसे बसे खोटेच हसते सदानंदला बरे वाटावे म्हणून आणि सदानंद दार वाजवतो. तसे एक पन्नास पंचावन्न वर्षाची बाई दार उघडते. सदानंद म्हणतो ही माझी आई आणि आई ही शाल्मली तुझी सून. त्याची आई दोघांकडे बघते आणि म्हणते सून म्हणजे सद्या, तू लग्न केलेस ? कधी ?? कुठे ?? कोणाशी ??? आणि मला हे आता सांगतोस ?? काय भानगड आहे ही ?? तू हिला पळवून आणले आहेस का ??
अग आई, किती प्रश्न विचारणार आहेस ?? आधी आम्हाला आत तर येऊ दे. मी सगळं सांगतो तुला, प्रवासाने खूप दमलो आहोत दोघेही, त्यामुळे जरा थांब आधी फ्रेश होऊ दे. त्याची जरा बाजूला सरकते, आणि म्हणते हा या आत. दोघेही घरात येतात, सदानंद शाल्मलीसाठी पाणी आणतो आणि स्वतःही जरा पाणी पितो. तेवढ्यात त्याची आई पुन्हा त्याला विचारते, सांग मला लवकर, तू कसेकाय लग्न केले आहेस ?? मग सदानंद घडला सगळा प्रकार त्याच्या आईला सांगतो आणि त्या एकवेळ शाल्मलीकडे बघून काहीच न बोलता आत निघून जातात.
आता सदानंद शाल्मलीला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो. त्याची रूम लहान पण नेटनेटकी असते. एका बाजूला काही पुस्तके असतात, दुसऱ्या बाजूला कपाट आणि त्यावर काही पेट्या आणि कोपऱ्यात बेड अशा पद्धतीची रूम असते त्याची. शाल्मली दारातच थबकते. सदानंद तिचे सामान पुस्तकाच्या शेजारी ठेवतो आणि तिला हातानेच बेडवर बसण्यासाठी खुणावतो. शाल्मली बसते आणि तो रूमच्या बाहेर जात म्हणतो, तू इथेच थांब मी पाच मिनिटात येतो. शाल्मली इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात सदानंद येतो, त्याच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात जेवणाचे ताट असते. तो शाल्मलीच्या शेजारी बसत म्हणतो, आज दिवसभर तुझ्या पोटात फारसे अन्न गेलेले नाही. तिथून निघताना पण तू नीट जेवली नाहीस आता तुला भूक लागली असेल ना ?? चल पटकन खाऊन घे, म्हणत तो त्याच्या हातात घास घेऊन तिच्या तोंड समोर धरतो. शाल्मली त्याच्याकडे बघतच बसते. आजवर सदानंद सोबतच्या घडलेल्या सगळ्या आठवणी तिला आठवतात. त्याचे बाल्कनी मधून येणे, मुलीच्या वेशात येऊन तिला भेटणे, कॉलेजमध्ये गेल्यावर त्याची तिलाच शोधणारी नजर, भर रस्त्यात मैत्रीचा पुढे केलेला हात, आणि त्याने खाल्लेला मार. तिच्या डोळ्यात पुन्हा आसावे उभे राहतात आणि तशीच त्याच्याकडे बघत बसते. मला बघून तुझ पोट भरणार आहे का शाल्मली, माझा हात अवघडला अग खाऊन घे ना पटकन मला पण खूप भूक लागली आहे सदानंदच्या बोलण्याने शाल्मली भानावर येते आणि त्याच्या हातातला घास खाते.
शाल्मली चार घास खाऊन पुन्हा अवघडून बसते. सदानंद तिला म्हणतो, शाल्मली मी तुझ्याशी अशा प्रकारे लग्न केले आणि तुझ्या मोठ्या बंगल्यातून तुला या साध्या घरात आणले त्याबद्दल खरंच मला माफ कर. पण तू एकसारखी रडत होती आणि तुझ्या घरचे सगळेच लोक खूप उदास झाले होते त्यामुळे काय करावे ते मला सुचले नाही. मला माहित आहे तुला मी आवडत नाही, म्हणूनच तर तू माझ्याशी मैत्री पण केली नाहीस आणि मी मात्र तुझ्याशी लग्न करून तुला इथे घेऊन आलो. नाही सदानंद तू केलंस ते योग्य की अयोग्य हे वेळच ठरवेल. पण आज तू वेळेत येऊन माझी अब्रू वाचवलीस त्याचे उपकार मी जन्मभर फेडू शकणार नाही. त्याबद्दल मला तुझा आदरच वाटत आहे. उरला प्रश्न या लग्नाचा तर ते मी माझ्या कृष्णावरच सोपवत आहे. त्यांनी माझ्या आयुष्याचा जो निर्णय घेतला असेल तो विचार करूनच घेतला असेल. पण तुझ्या आईला मी अशा प्रकारे लग्न करून आले ते आवडले नाही का ?? त्या काहीच न बोलता का निघून गेल्या ?? शाल्मली म्हणते. अग तस काही नाही, जरा जुन्या विचारांची असतात ना ही माणसं. लवकर स्वीकारू शकत नाहीत काही गोष्टी पण तिची काळजी तू करू नकोस. मी आहे ना?? मी करतो सगळं नीट सदानंद शाल्मलीला धीर देतो आणि त्या रात्री सदानंद खाली तर शाल्मली बेडवर झोपते.
दुसऱ्या दिवशी शाल्मली उठते तर सदानंद खोलीत नसतो. ती उठून बाहेर येऊन बघते तर तिच्या सासूबाई घरातली कामं आटपात असतात. ती त्यांना कामात मदत करायला जाते, तशा त्या म्हणतात काहीच गरज नाही मला मदतीची. आजवर मी एकटीनेच केली आहेत कामं आणि इथून पुढेही एकटीच करेन. शाल्मली म्हणते, मी या घरात आलेले तुम्हाला आवडले नाही का ?? काल पण काहीच न बोलता तुम्ही गेलात. त्यावर त्या म्हणतात, माझ्या पोराने मला विचारलं तर लांबच पण साधं सांगितल पण नाही. माहिती ना तुला ?? मग मी तुला काही बोलणार नाही. तू दिसायला देखणी आहेस, चांगल्या घरातली आहेस. पण तुझ्या बाबतीत चुकीचं घडल म्हणून माझ्या सद्यान तुझ्याशी लग्न करून आणलं ते काय मला पटलं नाहीच. आम्ही गरीब माणसं, तुझ कोड कौतुक आम्हाला झेपणार नाही. पण सद्या काय ते बघून घेईल. मला काय त्याच ??? जाऊदे म्हणून त्या निघून जातात. शाल्मली खिन्न होऊन खोलीत येते. तेवढ्यात सदानंद तिथे येतो आणि तिला उदास पाहून काय झालं ते विचारतो, पण शाल्मली काहीच बोलत नाही आईची आठवण येत होती म्हणून वेळ मारून नेते.
दिवस जात असतात, अजूनही शाल्मलीला तिच्या सासूने सुनेच्या रूपात स्वीकारलेले नसल्याने ती जरा अस्वस्थच असते पण सदानंद बद्दल तिच्या मनात जरा काळजी निर्माण होत आहे याची तिलाही जाणीव होते.
सदानंद रोज त्याच्या शेतात जात असतो आणि संध्याकाळी घरी येत असतो. शिवाय त्याने नोकरीसाठीही प्रयत्न सुरू ठेवलेले असतात. त्याने शाल्मलीशी लग्न जरी केलेले असले तरीही अजून नवऱ्याचा अधिकार त्याने गाजवला नाही हीच गोष्ट शाल्मलीला खूप आवडली होती. सदानंद घरी येतो, जेवणे आटोपतात आणि दोघेही झोपलेले असतात. शाल्मलीवर आणि खाली सदानंद असे रोजच्याप्रमाणे झोपलेले असतात. तेवढ्यात शाल्मलीला पाल दिसते ती तिच्याच बेडच्या दिशेने येत असते आणि ती घाबरून कडेला जात असते असे दोनदा, तीनदा होते आणि शेवटी ती खाली झोपलेल्या सदानंदच्या अंगावर पडते. दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात. काय झालं शाल्मली, तू खाली कशी पडलीस सदानंद विचारतो तसे ती उठन्याचा प्रयत्न करत सांगायला जाते तिकडे पाल आहे, पण साडीत तीचा पाय अडकतो आणि ती पुन्हा पडते. आता तिचे तोंड सदानंदच्या अगदी तोंडासमोर असते आणि ओठाजवळ ओठ. शाल्मली त्याच्याकडे बघते तर त्याचे लक्ष शाल्मलीचा ओठाकडेच असते. तिचे लाल चुतुक, नाजूक ओठ इतक्या जवळून तो पहिल्यांदाच बघत असतो. शाल्मली लाजून लाल होते आणि दूर जायला वळते पण सदानंद तिच्या कमरेभोवती स्वतःच्या हातांची पकड घट्ट करतो आणि तिला म्हणतो, घाबरतेसना पालीला मग झोप ना इथेच. माझ्या कुशीत, मी रात्रभर असाच पकडुन ठेवेन त्यामुळे तुला भीती वाटणार नाही. ती मानेनेच नकार देते, त्यावर सदानंद म्हणतो, नको खरंच नको ?? ती मान वर करून त्याच्याकडे बघते तर तो हसत असतो ती पण हळूच खाली मान घालून हसते आणि त्याच्याच कुशीत झोपते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा