संकेत भाग चार.

कथा मालिका.


संकेत

भाग चार

निशाचा स्वभाव किती हट्टी आहे, हे आदित्यला वेगळं सांगण्याची गरज नव्हतीच. पण काहीही करून निशाला थांबवायला हवे होते. आदित्य आणि मिसेस पत्की नीशाची वाट पहात तिच्याच घरी थांबले होते. साडे सहा वाजून गेले होते निशा येण्याची वेळ झाली होती, आज आदित्य जास्तच अस्वस्थ झाला होता कारण वास्तूतील दोष आणि निशा वर येणारे संकट त्याला स्पष्ट जाणवत होते पण निशा ऐकणाऱ्यातली नव्हती. त्यात जमेची बाजु ही होती की, मिसेस पत्की त्याच्या प्रयत्नात त्याला सोबतच देणार होत्या, त्याला कसलीच अडवणूक करणार नव्हत्या, प्रसंगी निशाच्या विरोधात उभ्या राहणार होत्या. त्यामुळे आदित्यला जरा धीर मिळाला होता. 


निशा घरी आली, समोर आदित्यला पाहून सगळा प्रकार तिच्या लक्षात आला आणि काहीही झालं तरी माझा त्या रूममध्ये राहण्याचा निर्णय मी बदलणार नाही, तसा प्रयत्नही कोणी करू नये असे आदित्यकडे पाहत तिने स्पष्ट बजावले. आदित्यला ज्या गोष्टीची भीती होती, नेमके तेच झाले होते. पण आदित्यला हार मानणे माहीतच नव्हते. पण निशा ही त्याची जरा दुबळी बाजू झाली होती, त्यात ती मुलगी असल्याने जोर जबरदस्ती करण्याची त्याची इच्छा नव्हती. पण आज तो मागे हटणार नव्हता. 


आदित्य : हे बघा मिस निशा, तुमचा माझ्यावर आणि माझ्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही, हे मला माहीत आहे. 

निशा :मग झालं तर तुम्ही तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवत आहात मिस्टर आदित्य. आदित्य पुढे बोलणार तितक्यात निशा बोलून मोकळी झाली. आदित्यला ते खूप आवडले, आजवर त्याला असे स्पष्ट आणि ठणकावून बोलणारे कोणी भेटले नव्हते. 

आदित्य : पण तरीही माझे म्हणणे खरे केल्याशिवाय मी इथून जाणार नाही मिस निशा, आदित्य पण विश्वासाने बोलला.

निशा : ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण मी रूममध्ये जाते आहे, ते ही आता. बघू मला कोण अडवत, असे म्हणत निशा रूमच्या दिशेने जायला निघाली.

मध्येच मिसेस पत्की तिला समजावत म्हणाल्या हे बघ निशू आदित्य जे काही करत आहे ते तुझ्याच भल्यासाठी आहे बाळा. त्यामुळे जरा ऐक त्यांचं, उगाच हट्ट करू नकोस. निशा खूप चिडली होती,

निशा : आई इथे आल्यापासून रोज नवीन काहीतरी तू मला या घराबद्दल सांगत आहेस. हे घर म्हणजे बाबांचं स्वप्न होत आई, आणि तू हे विसरतेस. बाबांची शेवटची आठवण असलेल्या घरात तुम्ही म्हणताय तसा काही दोष असला तरीही मी हे मान्य करणार नाही मग माझा जीव गेला तरी चालेल. 

मिसेस पत्की : हे तू काय बोलतेस निशु ?? मी तुझ्या बाबांना गमावले आहे, आता फक्त तूच तर माझ्या जगण्याचा आधार आणि कारण आहेस. ठीक आहे तुला हवं ते कर मी तुला अडवणार नाही. असे म्हणून तोंडाला पदर लावत त्या आत निघून गेल्या.

निशाला एकदम कसतरी झालं, तिचे डोळे पाणावले. पण आदित्य समोर तिला रडायचं नव्हतं. तिने प्रयत्नाने डोळ्यातलं पाणी डोळ्यात जिरवल. पण आदित्यच्या नजरेतून ते सुटले नाही. तिने रागाने आदित्यकडे पाहिले आणि म्हणाली, या सगळ्याला फक्त तुम्ही कारणीभूत आहात. तुम्हीच भलते सलते माझ्या आईच्या डोक्यात भरवले म्हणून आज हे घडत आहे. आज मी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अस रागात बोलत ती त्या रूमकडे वळली, तसे आदित्यने तिचा हात पकडून तिला ओढले. तिचा सगळा भार आदित्यवर पडला आणि दोघेही शेजारच्या सोफ्यावर पडले. आदित्यच्या अंगावर होती निशा. दोघांचे चेहरे एकमेकांच्या खूपच जवळ, इतके की एकमेकांना एकमेकांचे श्वास जाणवायला लागले होते. आदित्यचे हात तिच्या कमरेवर तर तिचे हात आदित्यच्या छातीवर होते. आदित्य तिच्या डोळ्यात हरवून गेला होता, हे इतक्या अचानक घडले की परिस्थिती लक्षात यायला निशाला जरा वेळच लागला. तिचा बावरलेला चेहरा पाहून आदित्य गालातल्या गालात हसत होता. निशाच्य हे लक्षात येताच अजुनच रागाने ती लाल झाली, तिचे लाल नाक तिच्या सौंदर्यात भरच घालत होते. आदित्यला ती खूपच गोड दिसत होती. त्याने तिच्या डोळ्यात पाहून तिच्या गुलाबी नाजूक ओठांना पाहिले आणि तो जरा तिच्याकडे झुकला. तशी निशा पटकन उठून उभी राहिली.

निशा : तुमची हिम्मत कशी झाली, माझ्या अंगाला हात लावण्याची ?? 

आदित्य : माझी हिम्मत अजून तुम्ही पहिलीच कुठे मिस निशा. अजून काही बघण्याची इच्छा नसेल तर त्या रूममध्ये जाण्याचा हट्ट सोडा आणि माझ्या कामात अडथळे निर्माण करू नका प्लीज. 

हे ऐकून निशाच राग सातव्या मजल्यावर पोहचला. तशी ती तडक पुन्हा तिकडेच जायला निघाली. आदित्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून हसला आणि निशा जीना चढणार तेवढ्यात त्याने मागून दोन्ही हातानी तिला अलगद उचलले आणि तिच्या बेडवर आणून झोपवले. ती उठून बसणार तेवढ्यात पुन्हा तिचे दोन्ही हात पकडुन तिला झोपवले आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून शांत पणे पण तितक्याच गंभीर आवाजात म्हणाला, निशा मी सांगतोय तेच ऐक. आता इथून तू हलणार पण नाहीस, आणि तसा प्रयत्न केलास तर इथेच मी तुला बांधून ठेवेन. अँड आय मीन इट. समजल. आज रात्रभर मी इथेच आहे, कारण तू काहीतरी सीन क्रिएट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीस हे मला समजले आहे त्यामुळे बंदिवान व्हायचं नसेल तर ऐकशील. असे म्हणून तिच्या नाकावर स्वतःचे नाक घासत तिथून बाहेर पडून तिच्या रूमला बाहेरून लॉक केले.


क्रमशः


🎭 Series Post

View all