Login

संकेत भाग तेवीस.

कथा मालिका

संकेत भाग तेवीस : 


आदित्य आज लवकर तयार होऊन खाली येतो. आज तो निशा सोबत बाहेर फिरायला जाणार होता त्यामुळे फार उत्साहात आणि छान मूड मध्ये होता. त्याला पाहूनच त्याची आई त्याला म्हणते काय रे आदी, आज इतका नटून थटून तयार झाला आहेस काही खास कारण आहे का ?? 


आदित्य : जरा लाजत नाही ग आई, खास काय त्यात?? सहजच आपलं तयार होऊन आलो आहे. बऱ्याच दिवसात केस मुळे स्वतःकडे नीट लक्षच दिले नाही त्यामुळे मग आता म्हणाल होऊया तयार. 


आई : अग बाई, निशा केवढी सुंदर दिसतेस तू ?? ये ना इकडे मला बघुदे तुला जरा नीट. 


आदित्य : आईच्या या बोलण्यावर मागे वळून बघतो आणि बघतच रहातो. निशाने पिंक कलर च कुर्ता आणि त्यावर मॅचीग लेगीन, केसांची सुंदर स्टाइल, मोजकाच पण आवश्यक मेक अप, हातात ब्रेसलेट तर दुसऱ्या हातात घड्याळ आणि कपाळा वर सुंदर नाजूक पण उठून दिसेल अशी टिकली. बापरे काय इथेच मारणार आहे की काय मला ही, केवढी सुंदर दिसतेय ही आज आदित्य मनातच म्हणतो. 


आई : निशाच्या जवळ जाऊन तिच्या कानामागे काळे तीट लावतात आणि तिला प्रेमाने जवळ घेतात.


मिसेस पत्की : काय झालं आज माझ्या लेकीचं एवढं कोड कौतुक का होतंय सांगाल का मला ?? 


आई : का म्हणून काय विचारताय मिसेस पत्की, बघा एकदा तुमच्या लेकीकडे किती गोड दिसते आहे ही. म्हणून तीट लावला बाकी काही नाही. 


मिसेस पत्की : निशाकडे बघत खरच ग निशा आज वेगळीच दिसत आहेस तू. पण काय ग तुला तर मेकअप करायला आवडत नाही ना ?? मग आज अचानक काय झाले ?? 


निशा : आदित्य कडे बघत कुठे जास्त मेकअप केला आहे आई ?? आज ड्रेस खूप दिवसांनी घातला आहे म्हणून तुला तसे वाटत असेल. बाकी मी नेहमी सारखीच तयार झाली आहे. 


तिच्या या बोलण्यावर सगळेच हसतात आणि आदित्य आईला सांगतो आज आम्ही जरा बाहेर जात आहोत यायला उशीर होईल वाट बघत बसू नकोस. सगळेच संमती देतात आणि दोघेही बाहेर पडतात. 


आज आदित्य फोर व्हिलर नाही तर बाईक सोबत घेतो आणि डोळ्यांनीच निशाला मागे बसायला सांगतो. दोघेही सुसाट बाहेर पडतात. रोड वरून गाडी वेगात धावत एका मॉल समोर येऊन थांबते. हा तोच मॉल असतो जिथे आदित्य आणि निशा पहिल्यांदा भेटलेले होते. दोघेही मॉल मध्ये जातात, आदित्य निषासाठी काही कपडे खरेदी करतो निशा नको म्हणत असतानाही तो तिच्यासाठी कपडे घेतो आणि ट्रय करायला सांगतो. 


निशा बळेच कपडे घालून येते आणि आदित्य तिच्याकडे बघतच रहातो. निशा लाजून लाल होते. 


मग दोघेही दिवसभर इकडे तिकडे निवांत फिरत राहतात. बघता बघता संध्याकाळ होते आणि शहरापासून खूप लांब एका निवांत हिरवळीवर आदित्य निशाला घेऊन येतो. ती जागा खूप शांत आणि निसर्ग रम्य आहे हे पाहून निशाला खूप बरे वाटते. निशा निसर्गाच्या कुशीत स्वतःला हरवून बसते आणि आदित्य हळूच मागून तिला मिठीत घेतो तशी ती भानावर येते आणि विचारते, तुला कसे माहीत मला निसर्ग आवडतो ते. 


आदित्य : आपल्या जवळच्या खास व्यक्तीची आवड निवड माहीत करून तर घ्यायलाच हवी ना ?? आणि इतके दिवस मिसेस पत्की घरात असून मग त्याचा फायदा काय ?? 


निशा : अच्छा, म्हणजे आईला विचारले तर तू ?? बरं पण आज दिवसभर मला फिरायला घेऊन येण्यामागे काही खास कारण की मी उद्या माझ्या घरी जाणार म्हणून आणलास मला इथे ?? 


आदित्य : तुला काय वाटतं निशा ?? का आणलं असेल मी तुला इथे ?? 


निशा : ते मला कसं माहीत असेल तूच सांग. 


आदित्य : मला सांगायचे आहे माझ्या मनातले आणि हीच ती योग्य वेळ आहे निशा. आदित्य गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणातो, निशा पहिल्यांदा पाहिले तेंव्हा च तू मला खूप आवडली होतीस. कदाचित ते आकर्षण आहे असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले होते पण नंतर तू माझ्या आयुष्यात आलीस आणि कधी तुझ्या प्रेमात पडलो मला समजलेच नाही. माझ्याशी लग्न करशील निशा ?? 


निशा : त्याच्याकडे बघतच रहाते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. बऱ्याच वेळाने निशा त्याला उभ करते आणि म्हणते एकदा आईशी बोलून घेते आणि मग सांगते मी. 


आदित्य : तिच्या आणखी जवळ जात म्हणतो, आईला जे सांगणार आहेस ते आता इथे मला सांग ना. 


निशा : वळून जायला लागते तेवढ्यात आदित्य तिचा हात धरतो आणि तिला आपल्याकडे ओढून घेतो, निशाला हे अनपेक्षित असल्याने ती आदित्यच्या अंगावर आदळते आणि तिचे ओठ आदित्यच्या मानेवर टेकतात. तसा आदित्य शहरतो आणि म्हणतो, निशा पटकन होकार देऊन टाक ना. तुझे उत्तर तुझ्या डोळ्यात दिसत आहे मग ते ओठावर का येत नाही तीचा चेहरा ओंजळीत घेत आदित्य म्हणतो तशी निशा त्याला लाजून मिठी मारते आणि म्हणते हो मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. 


आदित्य : हे ऐकून आदित्य आनंदाने मिठी जास्तच घट्ट करतो. पुन्हा तिचा चेहरा ओंजळीत घेऊन ओठ तिच्या कपाळावर टेकतो आणि तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकुन पटकन बाजूला होतो. 


दोघेही आनंदाने घरी येतात आणि झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार होऊन सगळे निशा च्या घरी जातात. पंडितजी घराची वास्तुशांती करतात आणि सगळीकडे सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते. आज खऱ्या अर्थाने मिसेस पत्कीचे आणि निषाचे घर दोषमुक्त होऊन त्यांना मिळालेले असल्यामुळे सगळेच आनंदी होतात. याच वेळी आदित्यची आई आदित्यसाठी नीशाचा हात मागतात आणि मिसेस पत्की निशाकडे बघतात तर ती लाजून खोलीत निघून जाते आणि मिसेस पत्की हसून होकार देतात. 


आदित्य निशाच्या खोलीत येतो तर ती बाल्कनी मध्ये उभी असते. आदित्य तिला स्वतःकडे वकवतो आणि म्हणतो, कधी करुया मग लग्न ?? मिसेस पत्कीनी होकार दिला आहे आपल्या लग्नाला आणि मी तुला मनातून कधीच बायको म्हणून स्वीकारले आहे. मग फक्त विधी बाकी आहेत ते कधी करुया निशा ?? निशा लाज तच त्याला मिठी मारते आणि आदित्य हसायला लागतो. 



समाप्त.

🎭 Series Post

View all