संकेत भाग अठरा :
निशा शाल्मलीची कहाणी ऐकून खूप उदास झाली होती. निम्मी रात्र होऊन गेली होती पण ती झोपू शकली नव्हती. आदित्य पाणी पिण्यासाठी बाहेर आला तेंव्हा त्याला निशाच्या खोलीतील लाईट चालूच दिसली. त्याने थोडे दार उघडून पाहिले तर निशा खिडकीतून चंद्राकडे बघत होती. आदित्यने दार नॉक केले तेंव्हा तिने वळून पाहिले तर आदित्य होता.
निशा : अरे आदित्य तू ?? ये ना. तू अजून जागाच आहेस ??
आदित्य : खरतर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा आत येत आदित्य म्हणाला. का अजूनही तू शाल्मलीचा विचार करत आहेस ??
निशा : हो करत आहे. माझ्या डोक्यातून शाल्मली जातच नाही. तिच्या बाबतीत असे व्हायला नको होते. कृष्णाने तिची मदत करायला हवी होती. इतके वाईट व्हायला नको होते तिच्या पूर्ण फॅमिली सोबत. त्या सदानंदच्या सुडाच्या नादात तिची पूर्ण फॅमिली मरण पावली आणि बिचारी शाल्मली तर खूपच त्रास भोगून आजही अतृप्तच आहे.
आदित्य : तिचा बदला पूर्ण झाला नाहीच ना शेवटपर्यंत त्यामुळे तिचा आत्मा अतृप्त राहिला आणि अशा तऱ्हेने तुझ्या घरात म्हणजेच त्या खोलीत वावरत आहे. आपल्याला तिचा बदला पूर्ण करायला हवा. म्हणजेच त्या सदानंदला शोधून काढायला हवे पण कसे ते समजत नाही. कारण डायरीत सदानंदच्या गावाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल सांगू शकेल असे कोणीतरी भेटायला हवे. असो आता तू फार विचार करत बसू नकोस झोप आपण उद्या बोलू यावर ठीक आहे ?? झोप आता
निशा : झोपते तू ही झोप.
आदित्य : थोडा पुढे जाऊन थांबला आणि मागे वळून म्हणाला येईल ना तुला एकटीला झोप की थांबू ??
निशा : नाही नको. येईल मला झोप.
मिसेस पत्की आणि आदित्यच्या आईची छानच गट्टी जमली होती. मिसेस पत्कीच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली होती.
निशा आणि आदित्य तयार होऊन खाली आले तसे मिसेस पत्की म्हणाल्या :
मिसेस पत्की : आदित्य काय झालं काल?? तुम्ही काहीतरी शोधायला गेला होता ना ?? मिळाले का तुम्हाला पुरावे ?? काय आहे नक्की तिथे ??
आदित्य : हो मिसेस पत्की सगळे काही सापडले आहे मला. लवकरच सगळं नीट होईल अशी आशा आहे. मी तुम्हाला दोन तीन दिवसात ते घर दोष विरहित करून देईन. जरा धीर धरा मी करतो सगळं नीट.
निशा : आदित्य मी पण येत आहे तुझ्या सोबत.
आदित्य : नको निशा. तुला ऑफिस नाही का ? आणि मी करेन सगळ मनेज.
निशा : ऑफिस आहे पण तरीही मला आता त्या वास्तूशिवाय दुसरे काहीही सुचणार नाही आणि कामात लक्ष पण लागणार नाही. त्यापेक्षा काही दिवसांची सुटी घेऊन मी तुलाच मदत करेन.
आदित्य : का गरिबाच्या पोटावर पाय देताय मॅडम ?? तुम्ही मला मदत करता करता याच कामाला तुमचे करिअर बनवले तर माज गरीबाच काय होईल ?? आदित्य मस्करिने निशाला म्हणाला.
निशा : काही तुझ्या पोटावर पाय देत नाही मी. ते घर माझ्या बाबांनी घेतल आहे म्हणून मी जास्त लक्ष घालत आहे. बाकी मला तुझ्या कामाला करिअर बनवण्यात काहीच रस नाही समजल तुला ??
आदित्य : बघ आई ही सतत अशी वाद घालत असते आणि कामात अडथळा आणत असते. काही नाही ग हिला माझ्याशी वाद घालायचा असतो ना म्हणून करते ही सगळं.
आई : काहीही काय म्हणतोस रे तिला ?? ती येते म्हणते तर येऊ दे ना तिला. निशा जा तू.
शेवटी दोघेही बाहेर पडले.
आदित्य आणि निशा दोघेही आधी आदित्यच्या ऑफिसमध्ये आले. आदित्यने तिथे त्याच्या काही विश्वासू लोकांना बोलावून ठेवले होते. ते आदित्यची वाट पहात असताना तिथे आदित्य आला आणि त्यांना केबिनमध्ये येण्याचा इशारा केला. दोघेही आत येतात तेंव्हा आदित्य म्हणतो, मला काही महत्त्वाची माहिती हवी आहे आणि जी काही माहिती द्याल ती तुमच्या पुरतीच मर्यादित असेल आणि काम लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. मला आता या केसचा लवकरात लवकर निकाल लावायचा आहे समजल ??
दोघांनी मान हलवली तसे आदित्यने शाल्मलीचा फोटो काढलाआणि सखा तुकाच्या हातात देत म्हणाला, हीचा नवरा कोण आणि कुठे रहातो याची सगळी माहिती मला पुढच्या दोन तासात हवी आहे. दोघेही फोटो घेऊन निघून गेले.
तर इकडे निशा गालातल्या गालात खूप हसत आहे हे आदित्यच्या लक्षात आले.
आदित्य : काय निशा ?? हसायला काय झालं ??
निशा : काय नावं आहेत तुझ्या विश्वासू लोकांची ?? सखा तूका ???. म्हणजे कोण सखाराम तुकाराम का ??
आदित्य : नाही अशी नावे नाहीत त्यांची. सखा म्हणजे सदाशिव खानोलकर आणि तुका म्हणजे तुषार कारखानीस. पण मी त्यांना सखा तुका असे म्हणतो आणि त्यांची नावे काही असुदेत आपल्याला कामाशी मतलब. त्या बाबतीत माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे समजल.
निशा : ?? हो हो समजल.
आदित्य : हॅलो, बोला सखा तुका काही समजले का ?? आदित्य खूप अधीर होऊन विचारत होता. सखा तुकाचे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. त्या दोघांचे आभार मानत त्याने फोन ठेवला आणि निशाचा हात धरून पटकन तिथून बाहेर पडला.
निशा : आतातरी सांगणार आहेस का मला आपण कुठे जात आहोत ते ?? कधीचे विचारत आहे पण सांगत नाहीस तू काहीच.
आदित्य : तू ज्या सखा तुकाल नावं ठेवत होतीस ना त्यांनी सांगितले आहे सदानंद कुठे राहतो ते. आपण तिकडेच जात आहोत.
निशा : खरंच. अरे वा कुठे रहातो तो सदानंद.
आदित्य : इथून जवळच नीरा नावाचे गाव आहे. तिथे रहातो. गाव तसे छोटे आहे पण आज संध्याकाळ पर्यंत त्याला शोधून घरी जायला हवे निशा. आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. बोलता बोलता दोघे नीरा गावात येतात.
दोघेही खाली उतरले आणि सदानंद देशमुखचे घर शोधू लागले.
बराच वेळ शोधूनही पण सदानंदचे घर काही सापडले नाही. गावात लोकांना विचारले तेंव्हा काही लोक आदित्य आणि निशाकडे तिरकस नजरेने बघून निघून गेले.
यामुळे आदित्य खूप हताश झाला आणि स्वतःचे दोन्ही हात भिंतीवर आपटून घेतले.
निशा : वेड लागले आहे का तुला ?? इतका का हायपर होतो आहेस. आता कुठे एक गल्ली विचारत आलो आहोत आपण तेवढ्यात वैतागलास ?? त्याचा हात स्वतःच्या हातात घेत म्हणते.
आदित्य : मी वैतागलो नाही निशा आणि हार तर अजिबात मानणार नाही पण सदानंदचे नाव घेताच लोक आपल्याकडे विचित्र नजरेने बघून काहीच उत्तर न देता निघून जात आहेत. हे लक्षात येतंय का तुझ्या ?? म्हणजे नक्कीच सदानंद बद्दल त्यांना माहीत आहे पण ते सांगत नाहीत. असेच सगळ्या गावाने केले तर आपल्याला सदानंद सापडणे अवघड होईल.
निशा : आदित्यला हतबल पाहून निशाला कसेतरीच झाले. सगळे ठीक होईल आदित्य तू जरा शांत हो म्हणून तिने आदित्यला पाणी दिले.
गावातील काही लोकं एका झाडाखाली गप्पा मारत होते. ते पाहून आदित्य आणि निशा त्यांच्याकडे गेले. आदित्यने सदानंदचा फोटो दाखवून त्याच्या बद्दल त्या लोकांना विचारले, तर सगळे एकमेकांकडे बघू लागले. त्यातील एका व्यक्ती ने विचारले, तुम्ही कोण आणि तुम्हाला सदानंद बद्दल माहिती कशासाठी हवी आहे ??
आदित्यने घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाला हे बघा तुम्हाला आमची काही मदत करता येत असेल तर प्लीज करा. आम्हाला सदानंदपर्यंत पोहचणे खूप महत्त्वाचे आहे हे आता तुम्हाला पटले असेलच.
तेंव्हा त्यातील काही लोक मदतीसाठी तयार झाले. तुम्ही आमच्या मागे या तुम्हाला सद्याच घर दाखवतो असे म्हणत ते पुढे झाले, आणि आदित्य निशा त्यांच्या मागे जाऊ लागले. बऱ्याच वेळाने ते एका छोट्या खोली जवळ येऊन थांबले आणि त्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाले, हेच सद्याच घर.
पण ते घर आणि डायरीत शाल्मलीने वर्णन केलेले घर कुठेच मॅच होत नव्हते. या आधी सदानंद कुठे रहात होता ?? आदित्य ने विचारले तसे ते लोक म्हणाले तुम्हाला कसे माहीत सदानंद या आधी दुसरीकडे रहात होता ??
आदित्य : मी गावात आल्यावर काही लोकांना विचारले तेंव्हा समजले मला. त्यावर ते लोक म्हणाले हो खर आहे ते. हे सदानंद च घर नाही. पलीकडे त्या दोन खोल्या दिसतात का, हात दाखवत ते लोक म्हणाले तसे निशा आणि आदित्यने तिकडे पाहिले तर ते घर शाल्मलीच्या वर्णनाशी मिळते जुळते होते. ते घर होते सदानंदचे पण तिथं त्याला त्याच्या बायकोचे भास होत होते म्हणून तो दिवस रात्र ओरडत होता. म्हणून मग त्याला इकडे आणून ठेवले होते.
आदित्य : तुम्हाला काय माहित आहे त्याच्या बायकोबद्दल ??
खरतर काहीच नाही. तस हे गाव खूप कमी लोकवस्तीचे होत आधी. सदानंद मात्र आधी पासूनच या गावात रहात होता त्यामुळे त्याच्या घराजवळ वस्ती अशी नव्हतीच. चार पाच वर्षापूर्वी आम्ही येथे आलो तेंव्हा पासून तो अंथरुणातच होता आणि एकसारखा ओरडत होता. त्याच्या आवाजाने आमची बायका पोरं घाबरायला लागली म्हणून आम्हीच चार पाच जणांनी त्याला इथे खोलीत ठेवला. शेवटपर्यंत त्याचे फारच हाल झाले.
आदित्य : शेवटपर्यंत हाल झाले म्हणजे ???
आओ म्हणजे सद्या रोज मरणाची भीक मागत होता. स्वतःशीच काहीतरी बडबडत होता. मी चुकलो, शाल्मली पण किती वर्ष तू माझ्या चुकीची शिक्षा मला देणार आहेस ?? मी मरणाची भीक मागतो ग मला नको छळू माझ्या वर दया कर पण मला आता मरण दे शाल्मली असे काहीतरी तो बोलत असे. शेवटी महिन्यापूर्वीच तो वाट बघून बघून मेला बघा.
आदित्य : त्या लोकांचे बोलणे ऐकून आदित्य चिंतेत पडला कारण त्याच्यासाठी ही केस म्हणजेच शाल्मलीला या पाशातून मोकळे करणे अजुनच कठीण झाले होते. आदित्य त्या खोलीत जायला निघाला तसे ते लोक म्हणाले, तुमची अडचण ओळखून आम्ही मदत केली तरीही जरा जाता एक सांगतो, तुम्ही लोक ह्या खोलीत आणि त्याच्या जुन्या घरात जाऊ नका. उरला प्रश्न तुमच्या घराचा तर ते घर सोडून दुसरीकडे कुठेही रहा. बाकी तुमची इच्छा असे बोलून ते लोक निघून गेले.
आता आदित्य आणि निशा तिथे उभे होते आणि त्यांच्या समोर ती खोली आणि घर होते.
आदित्य : निशा तू बाहेरच थांब मी जाऊन बघतो आत.
निशा : आदित्य थांब, मी पण येते तुझ्या सोबत.
आदित्य : कधीतरी माज ऐकत जा निशा. ही जागा आणि वेळ दोन्ही भांडण्या साठी योग्य नाही त्यामुळे मी सांगतो ते ऐक, थोड्याच वेळात अंधार पडायला सुरुवात होईल त्यामुळे पटकन मला जाऊन बघुदे. तसंही सदानंद मला आहे त्यामुळे इथे काही मिळेल असे मला वाटत नाही पण एकदा बघुन येतो. हे काम माज आहे तर मलाच करुदे तू थांब इथेच.
निशा : मलाही तुझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट नाही. पण मी येणार म्हणजे येणार सांगितल ना एकदा.
शेवटी निशाच्या हट्ट पुढे आदित्यने हात टेकले आणि दोघेही आत गेले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा