हॅलो फ्रेंड्स...तुम्हाला गाडी चालवता येते का..? अफकोर्स येतच असेल. आता तर लहानातल्या लहान मुलांना मोबाईल आणि गाडी चालवणं येतच. काही अपवाद असतील ज्यांना गाडी चालवता येत नाही... त्यातली मी एक..?.
मला गाडी चालवता येत नाही?
पण मजा हि झाली की आमच्या घरात गाडी चालवणारी व्यक्ती एक ती म्हणजे माझी मोठी बहीण. आणि नेमकं तिचं लग्न ठरलं. आता ती तर गाडी घेऊन जाणार नाही सासरी. त्यामुळे गाडी ची जबाबदारी आली माझ्यावर. मला जिथे सायकल चालवताना डोळे पांढरे होतात.. तिथे गाडी... बाप रे बाप !
घरातून डायरेक धमकी मिळाली या दोन महिन्यात तुला गाडी शिकावीच लागेल...!
मी ही नंदीबैला प्रमाणे हो मध्ये हो मान हालवली. काही प्रॉब्लेम आला तर गाडी निदान चालवायला आली पाहिजे म्हणून मी ही गाडी चालवण्यासाठी तयार झाले. पण गोष्ट इथेच थांबत नाही बरं का, गोष्ट इथून सुरू झाली.
दिवस पहिला नेहमीप्रमाणे आम्ही मैदानावर यायचं ठरवलं. ताई ऑफिसमधून संध्याकाळी साडेपाच वाजता मैदानावर येईल आणि मी माझ्या ऑफिस मधून साडेपाच वाजता मैदानावर येऊ आणि तिथे मग मिळून आम्ही दोघी गाडी गाडी शिकणार. सॉरी सॉरी मी शिकणार आणि ती मला शिकवणार.
ठरलं संध्याकाळी ताई ऑफिसमधून मैदानावर आली आणि मला ऑफिसमध्ये नेमका उशीर झाला. संध्याकाळची वेळ, थंडीचे दिवस त्यामुळे लवकर अंधार पडायला लागला आणि आम्ही दोघेही गाडी न शिकता सरळ घरी आलो.
दिवस दुसरा... त्यादिवशी ताई ची ऑफिस मध्ये मीटिंग होती त्यामुळे ती उशिरा आली. उशिरा म्हणजे पंधरा मिनिटच... पण मी त्या पंधरा मिनिटात घरी कल्टी खाल्ली?. तोही दिवस असाच गेला.
दिवस तिसरा.... त्या दिवशी संध्याकाळी घरी जायच्या टाइमिंग ला ताई माझ्या ऑफिस च्या समोर गाडी घेऊन.
" मॅडम इथूनच सुरुवात करताय कि मैदानावर जाऊन ?"
" बापरे...! ऑफिसच्या माणसांसमोर गाडी ?... नको रे बाबा..! उगाच इज्जतीचा पंचनामा व्हायचा. त्यापेक्षा मैदानावरच जाऊन शिकूया. "असा विचार करून मी मान जोरजोरात नकारार्थी हलवली.
मी आणि ताई मैदानावर आलो. छातीत जाम धडधडत होतं. ताईने माझ्या हातात गाडीची चावी दिली.
" घ्या चालवा.."
मीही थरथरत्या हाताने चावीची गाडी...सॉरी सॉरी...गाडीची चावी घेतली आणि गाडी स्टार्ट केली.
बापरे...!? किती भयंकर टेन्शन आलं होतं मला. तरीही गाडी स्टार्ट केली आणि क्षणात पुढे जाऊन पुन्हा थांबवली. मागून ताई ओरडली....
" तुझा बॅलन्स का जातोय लगेच..??? थोडासा तरी बॅलेन्स सांभाळ. "
मी पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि पुढे जाऊन पुन्हा गाडी थांबवली. ताईने पुन्हा बोलायला सुरुवात केली. पण मी.... मी होते. की माझ्याच्याने गाडी पुढे जाईना. असं करता करता तो दिवस गाडी थांबवायलाच गेला. अंधार पडला तसे आम्ही घरी गेलो.
झालं.... ताई ने माझ्या नावाची पोथीच वाचायला सुरुवात केली. किती किती हसले असतील आई बाबा आणि ताई माझ्या वर ?. ऐकून डोळ्यात पाणी उभं राहिलं ?.
मी मनाशी निर्धार पक्का केला उद्याच्या उद्या गाडी शिकणार ?.
अन दिवस चौथा .... काल केलेला निर्धार आज अंधारात गेला आणि मी जैसे थे या शब्दावर अंमलबजावणी केली. कारण माझा निर्धार हा त्या दिवसापुरता झाला ??.
दिवस दहावा.... काय आहे ना दर दिवसाचं काय लिहिणार तेच तेच तेच तेच...?
म्हणून डायरेक्ट दहावा दिवस घेतला. हा तर हाच दिवस...हाच तो सुवर्ण दीन..( मी हिन दीन ??) सॉरी दिन..ज्या दिवशी मी गाडी चक्क दोन मीटर अंतर चालवली ?.
हो....तुम्ही बरोबर ऐकलत...दोन मीटर. केवढा मोठा इतिहास तो...!
पण म्हणतात ना सोन्याची किंमतच नाही ?. ताईने माझ्या नावाने शिव्या घातल्या.
काही नाही हो... मी बस गाडी ला ब्रेक मारताना गाडी रस्ता सोडून गटाराच्या दिशेने गेली. पण त्यात माझी काय चुकी.... ?? ? चुकी तर स्कूटी ची ना..? ?
असो....तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस...त्यांनतर मात्र मी थांबले नाही. अशीच प्रगती करत राहिले....कधी गटाराचे दर्शन कर...कधी झाडाच्या पाया पड, तर कधी रस्त्याला साष्टांग दंडवत घाल...हे आणि असे उपक्रम मी राबवत राहिले. आणि माझ्या ताईने शिव्यांची लाखोली वाहत त्याला चार चाँद लावले.
तो दिवस मला अजूनही आठवतो....त्या दिवशी गाडी ने रस्त्याला साष्टांग नमस्कार घातला....आणि ताई ने माझ्या नावाने शिव्या द्यायला सुरुवात केली.
" मर...काय करायचं ते कर. मी चालले...यायचं असेल तर घरी गाडी घेऊन ये...?" ताई तावातावाने निघून गेली.
ती खरंच गेली...मी आणि गाडी दोघेही केविलवाणे तिला जाताना पाहत होतो ??
" नको...नको ताई...मला या चांडळणीच्या हाती देऊन जाऊ नको ताई थांब....?"
" अरे ये कौन बोला...??" मी विचार करत होते...कारण मला विचित्र आवाज येऊ लागले होते...
" मी...की बोलतेय...स्कूटी. ताई मला तुझ्या हाती देऊन गेली या पेक्षा फुटक नशीब कोणाचं असेल. ??♀️" एक क्षण मला असच वाटून गेलं की स्कूटी माझ्याशी बोलत आहे.
मी नकारार्थी मान हलवली..." नाही..माझ्यावर परिणाम झाला आहे...चल ज्यो...आपल्याला निघायला हवं." मी स्वतः ला समजावलं. आणि गाडी हळूहळू पायापायाने चालवत जाऊ लागले.
माझं घर आणि घराकडे जाणारे रस्ता...शेवटी गावतलेच रस्ते ते.
रस्त्यात खड्डे...की खड्ड्यात रस्ते...! हा मोठा यक्ष प्रश्न पडला होता मला.
त्यात फोर व्हीलर असली की दुसऱ्या गाडीला रस्ताच नाही जा - ये करायला. त्यात उतार....!
मी कशी बशी गाडी थोड्या थोड्या अंतरावर थांबवत चालवत होते. की समोर एक फोर व्हीलर उभी दिसली.
खडबडीत, अरुंद रस्ता...त्यात मला गाडी बाजूने काढता येत नव्हती...( चालवता येत नाही असं बोलणं माझ्या इभ्रतीला शोभत नाही....?)
आता मी ती गाडी कधी निघून जातेय याची वाट पाहत होते. पण मग अशीच उभी कशी राहणार ना म्हणून मग मोबाईल काढला आणि कानाला लावला. म्हणजे कोणालाही माझ्या कमजोरी बद्दल समजणार नाही. आहे ना मी हुशार...? फक्त माझ्या घरच्यांना दिसत नाही. असो...!
मी तशीच फोनवर बोलत उभी होते...म्हणजे फोनवर बोलण्याचे नाटक करत होते. पण हाये रे मेरी फुटी किस्मत... साला तो गाडीवाला गाडी बाजूला काही घेऊन जाईन. शेवटी अजुन किती वेळ अशी ताटकळत उभी राहणार ना मी...म्हणून मग मोठ्या हिमतीने गाडी स्टार्ट केली आणि हळू हळू अगदी ऐटीत त्या गाडी च्या बाजूने माझी गाडी काढली.
हुश्... केवढे मोठे काम केले मी...जाताजाता मुद्दाम त्या कार मध्ये डोकावून पाहिलं...कोणीच नव्हतं आत.
च्यायला उगाच तिथे उभी होते ?. आता तो गाडीवाला यायच्या आधी निघून गेलेलं बरं म्हणून रेस ओढली आणि तिथेच सत्यानाश केला....??♀️
काय म्हणून काय विचारता....आधीच उतार त्यात मोठमोठाले दगड आणि मी अचानक रेस ओढल्याने मला गाडी च हॅण्डल सावरता येईना आणि तशीच वेगाने पुढे गेले. मोठ्या मुश्किलीने रेस कमी केला...आणि स्कूटी स्लो झाली. पण पुढच्याच क्षणी आडवी सुद्धा झाली. ??
मी थोडक्यात वाचले...गाडी मात्र पुन्हा शहीद झाली. एक क्षण वाटलं की स्कूटी माझ्याकडे काकुळतीने पाहत आहे ?.
पण नंतर स्वतः ला समजावलं आणि हॅण्डल ला पकडून कशीबशी स्कूटी उभी केली. पण स्कूटी उभी राहते न राहते तिचं हॅण्डल दुसऱ्या बाजूला वळल आणि गाडी दुसऱ्या बाजूने खाली पडली.
" मेले... ठार मेले..?. आज काय मी घरी पोचत नाही वाटतं. " पुन्हा स्कूटी उभी केली. आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना...म्हणून आजुबाजुला पाहिलं तर....तर एक मुलगा मघाशी उभी असलेल्या त्या कार चा दरवाजा उघडत होता. पण त्याही पेक्षा भयंकर म्हणजे त्याने...त्याने पाहिलं...???
याला म्हणतात इज्जतीचा पंचनामा, फालुदा, कॉकटेल, भाजीपाला...जो आताच झाला होता. मी माझं तोंड लपवलं..गाडी स्टार्ट केली आणि निघून ही गेले.
अशक्य....अबब....हे कसं काय घडू शकतं...मी न थांबवता न पडता गाडी घरापर्यंत आणली...तेही ड्राईव्ह करत...!
अविश्वसनीय....! अकल्पनीय...! अनाकलनीय....
?????????????
ताई...आई...बाबा...तिघेही मला आ वासून पाहत होते???.
मी मात्र अगदी जणू फरारी च चालवली या ॲटित्युड मध्ये गाडी त्यांच्यासमोर उभी केली ?. बॅग स्टाईल मध्ये खांद्यावर घेतली. स्कूटी ची चावी तर्जनी मध्ये गोल गोल फिरवत आत निघून गेले ??.
खरच मला अजूनही विश्वास बसत नव्हता म्हणून एक जोरदार चिमटा काढला स्वतः ला.
" तुम्हाला काही मदत हवी आहे का...?" समोरून एक राकट आवाज आला आणि मी भानावर आले.
एक मुलगा मला म्हणाला...आणि मी भांबावून आजुबाजुला पाहिलं...गाडी अजूनही जमिनी वर आडवी पडलेली होती.
मी मागे वळून पाहिलं तर ती फोर व्हिलर अजुन ही तशीच उभी होती...आणि तीच मुलगा मला विचारत होता.
" तुम्हाला लागलं तर नाही ना. " त्याने पुन्हा एकदा मला विचारलं.
" न...नाही..." मी कसं बस त्याला उत्तर दिलं.
" एक मिनिट हा..." असं म्हणत त्याने स्कूटी उभी केली.
" Thanks..." मला जाम लाजल्या सारखं झालं.
" मोस्ट वेलकम..." त्याने ही हसत रिप्लाय दिला.
" मला वाटलच...तू स्कूटी कुठे ना कुठे ठोकणारच...ज्योती तू ना उद्यापासून गाडी ला हात सुद्धा लावायचा नाही. समजल...?. मी माझी गाडी घेऊन सासरी जाईन पण तुझ्या हातात देणार नाही. " ताई ने त्याच्या समोर पुन्हा एकदा माझ्या नावाचा उदोउदो केला.
चावी माझ्या हातून अक्षरशः खेचून घेतली आणि स्कूटी स्टार्ट केली.
" आता इथेच उभी राहणार आहेस की घरी येतेस...?" तिने भुवई उंचावली.
" येते..." मी मान खाली घातली आणि तिच्या मागे जाऊन बसले.
हळूच तिरप्या नजरेने त्याला पाहिलं तर तो हसत होता. किती किती राग आला मला माझाच...?
खरंच स्कूटी चालवणं एवढं कठीण आहे का..?
✍️ ज्योती पिरणकर
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा